Cनाटक, चित्रपट, मुलाखती , वेब सिरीज यांवर धागे आहेत.
हा एक धागा नाटक/ चित्रपट / मुलाखती सोडून इतर मराठी कार्यक्रमांची ओळख/ परीक्षण करून देण्यासाठी.
सध्या ललितलेखनात टाकला आहे कारण मला कुठे ठेवावा हे उमगलं नाही. कोणाला जास्त योग्य कॅटेगरी/ गट सुचल्या जरूर कळवावे. धन्यवाद!
***
अपूर्वाई, काव्य-स्वर-सुरांचा त्रिवेणी संगम!
श्री गणेशाला वंदन करून सुरू झालेला हा कार्यक्रम - खरं तर सोहळा - साडेतीन तास प्रेक्षकांना/ श्रोत्यांना गुंतवून ठेवत, भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत, हास्याची कारंजी उडवत अखेर
विठ्ठलाच्या पायाशी येऊन संपला.. तोच मुळी अजून एखादी कविता/ जुगलबंदी/ मेडली जमून गेली असती अशी हुरहूर लावतच.
शरयू आणि विक्रम भट (तबला )यांच्यातील भूलभुलैया गाण्याच्यावेळी झालेली जुगलबंदी, शरयू दाते आणि कीबोर्ड वरील दर्शना जोग यांनी मिळून सादर केलेली लताबाईंच्या गाण्यांची अंतर्मुख करणाri शांत स्वरातील मेडली, सोशल मीडियावर लोकप्रिय झालेलं, “भरतीचा मज नाही, ओहोटीची लाज नाही” हे गाणं/ काव्य, अमर ओक यांची ऐहिकापलीकडील जगाची झलक दाखवणारी, परमात्म्याचा स्पर्श झालायंस वाटणारी सुरेल सुरावट ही काही मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये.
झांजारलं हा खरोखरच काव्य सर आणि ताल यांचा अभुतपूर्व (?) आविष्कार वाटला.
ते शब्द, ती शब्दफेक, ते काव्यवाचन, मुरलीचे स्वर, ऑक्टोपॅड वरील ठेका ( रोहन वानगे यांचा ) यांच्या सुरेख मिलाफाने ती झांजर वेळ, यमुना नदी, त्यात हरवलेली ती कृष्णमय राधा अवघं चित्र डोळ्यासमोर तरळलं, आणि क्षणभर आपणही जणू त्याचा भागच आहोत असं काहीस जाणवून गेलं.
हा त्यांचा अमेरिकेतील अकरावा कार्यक्रम/ प्रयोग होता. अजून दोन कार्यक्रम शिल्लक आहेत. तुमच्या शहरात आला असेल तर नक्की बघा.
भविष्यात इतरत्रही ह्या कार्यक्रमांचे प्रयोग व्हावेत आणि काव्य- सुरांमध्ये न्हाऊन निघताना ती झांजरवेळ अधिकाधिक रसिकांना अनुभवता यावी ह्या शुभेच्छा!
असे दर्जेदार कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचविचल्याबद्दल Five Dimensions चे मनापासून आभार!
चांगला धागा.
चांगला धागा.
छान धागा.
छान धागा.
हेमंतकुमार आणि ऋतुराज धन्यवाद
हेमंतकुमार आणि ऋतुराज धन्यवाद!
ऋतुराज - म्हणजे वसंत नाही का? Just a thought!
मागच्या आठवड्यात मृदुला दाढे जोशी यांचा 'सफर ए गुलजार'
कार्यक्रम बघण्याचा योग आला.
माझा कट्टा वरील त्यांच्या मुलाखतीमुळे अर्थातच उत्सुकता होती.
अपेक्षेप्रमाणे त्यांनी गाण्यातली जादू फार सुंदर प्रकारे उलगडून दाखवली.
इतर गायिका आणि वाद्यवृंद सगळेच कसलेले कलाकार वाटले.
' द फोक आख्यान'
' द फोक आख्यान'
ज ब र द स्त
पंचविशीच्या आतबाहेरील पंचवीसेक मुलांनी सजविलेला हा अख्यानाचा थाट तुमच्या शहरात येत असेल तर नक्की अनुभवायला जा.. मुलांना घेऊन !
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेली ही मुलं - त्यांचे परिश्रम, त्यांच या कलेवरील प्रेम आणि ध्यास.. हा असा कार्यक्रम करायचा त्यांचा ध्यास, ते प्रत्यक्षात आणण्याचं कसब आणि धाडस
सगळंच अचंबित करणारं आहे.
अमेरिका दौऱ्यात ते ह्युस्टन, डॅलस, वॉशिंग्टन DC, आणि न्यू जर्सीला पुढच्या दोन आठवड्यात ते येत आहेत.
माझी बायको, तिची चुलतबहीण आणि
माझी बायको, तिची चुलतबहीण आणि आत्येबहीण अशा तिघी हा कार्यक्रम बघायला BKC ला मोठ्या उत्साहाने गेल्या होत्या आणि अतिशय टुकार कार्यक्रम म्हणून अर्ध्यातून निघून आल्या. तुम्हाला discourage करायचा उद्देश नाहीये, पण एक अनुभव म्हणून सांगितले. आणि हो, टीका करण्याच्या बाबतीत ती माझ्यापेक्षा खूप सोशिक आहे.
>>>>>>>खूप सोशिक आहे. Wink
>>>>>>>खूप सोशिक आहे. Wink
अर्थात!!
ज्याची त्याची आवड आणि समज!
ज्याची त्याची आवड आणि समज!
द फोक आख्यान - मी जाणार आहे .
द फोक आख्यान - मी जाणार आहे .. ट्रेलर रील्स बघून तर आवडत आहे !
ती बहुतेक गाणी, पोवाडे, कवनं स्वतः रचलेली आहेत असं ऐकलं...
हो.
हो.
पंची, पॉइंटी, ओघवतं, गोष्टीवेल्हाळ, प्रवाही आणि शिवाय अर्थगर्भ असं सगळं एकाचवेळी असलेलं ( अतिशय दुर्मिळ असं) आख्यानाच स्क्रिप्ट ही The Folk आख्यान ची अजून एक भलीभक्कम बाजू ..
ती एकहाती समर्थपणे सांभाळणारे लमाण बंधू Ishwar Andhare
यांचं खूप कौतुक वाटलं.
हर्ष राऊत आणि विनय कापसे या
हर्ष राऊत आणि विजय कापसे या दोघांच्या डोक्यात ही कल्पना आली.
त्यांनी या विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांची आपल्या घरी सहा महिने व्यवस्था केली.
डोक्यात कल्पना येणे आणि ती प्रत्यक्षात उतरविणे यासाठी निष्ठा, कळकळ, आत्मविश्वास आणि धाडस लगत. त्यांनी ते दाखवलं म्हणून हा अख्यानाचा थाट उभा राहिला.
बघितला काल हा शो.
बघितला काल हा शो.
थोडी लांबी कमी असती तर चालली असती. स्टोरीटेलींग/नॅरेशन अजून थोडं क्रिस्प हवं होतंआणि बॅकग्राऊंड म्युजिक म्युट जेव्हा निवेदक बोलतोय! त्या दोन मुलींचं गाणंही खूप मोठं होतं.
बाकी त्या कलाकारांची एनर्जी हॅट्स ऑफ! केवढी मेहेनत आहे या सगळ्या सादरीकरणामागे. यंग जनरेशन उत्साहाने लोककला सादर करतेय याचं कौतुक वाटलं.
मी दुसरीकडे लिहिलेलं इथे
मी दुसरीकडे लिहिलेलं इथे रीपोस्ट करते :
फोक आख्यान -आम्ही काल न्यू जर्सी कार्यक्रमाला गेलो होतो. मस्तच झाला कार्यक्रम, सगळे कलाकार भारी होते. बहुतेक जण ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे असेल, बरेचसे अगदी जेन्युइन, रॉ असे वाटले. सगळेच यंग, विशी पंचविशीचे पॅशनेट कलाकार! त्यामुळे तुफान एनर्जी होती. वाद्यसंच तर अमेझिंग. एकही फिल्मी गाणे नाही, एकही इलेकट्रॉनिक इन्स्ट्रुमेन्ट नव्हते, सगळी ऑथेन्टिक वाद्यं, ढोल ताशा, संबळ, पखवाज, हलगी वगैरे! मी या सगळ्याचं लॉजिस्टिक्स कसे मॅनेज केले असेल या कल्पनेने थक्क झाले आहे. संधी मिळाल्यास नक्की बघा असे रेको देईन.
फक्त कार्यक्रम दुसर्या हाफ मधे काही काही ठिकणी रेंगाळतो असे वाटले. निवेदन कुठे कुठे शॉर्ट करता आले असते.
अंजलीच्या लांबी कमी चालली असती याला अनुमोदन. पण हे लक्षात घेऊच शकतो की शो नवाच आहे, हे नविन कलाकार आहेत, आत्ता अननुभवी आहेत, त्यामुळे पुढे करतीलही फाइन ट्यून.