माझ्याकडे एक १५ वर्षाची दहावी तील मुलगी ६ महिने पाळी आली नाही यासाठी सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिचे वजन होते ९६ किलो. तिचे वडील सांगत होते डॉक्टर तुम्हीच तिला काहीतरी सांगा.
अशीच १७ वर्षांची दुसरी मुलगी ( बारावीतील) आली होती. तिचे वजन ८७ किलो होते. पाळीची अनियमितता यासाठी.
तिची आई मला कौतुकाने सांगत होती तिचे पप्पा तिचे फार लाड करतात. तिला रोज दोन वडापाव आणून देतात.
एक तिसरी मुलगी गरोदर असताना येत होती. गरोदर होण्यापूर्वी तिचे वजन होते १०९ किलो आणि नवव्या महिन्यात वजन होते १३३ किलो.
अर्थात बाळाचे वजन ३ किलोच होते. ( आता तुला दोन जीवांसाठी खायला हवे या सल्ल्याचे टोकाचे उदाहरण).
अशी असंख्य उदाहरणे आजकाल वैद्यकीय व्यावसायिक रोज पाहत असतात
"डॉक्टर आम्ही काहीही केले तरी आमचे वजन कमीच होत नाही."
"पण आम्ही काही खातच नाही."
आम्ही इतके जिम मध्ये घाम गाळतो पण वजन काही हलत नाही.
वजनाचा काटाच बरोबर नाही.
वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो.
वजनाचा तक्ताच चूक आहे .
एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ?
आम्ही हवा खाल्ली तरी जाडे होतो.
आम्ही तुपाचा वास जरी घेतला तरी तरी आमचे वजन वाढते.
आता फक्त उपास करणे बाकी आहे.
जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?
आता कशी तब्येत छान दिसते आहे पूर्वी तर लोक मला पाप्याचे पितर म्हणत असत.
माझे वजन बरोबर आहे, फक्त उंचीच थोडी कमी आहे.
बाळंतपणात "जरा" जास्त खाल्लं तर वजन इतकं वाढलं ते आता काही केल्या कमी होत नाही.
दोन मुलं झाली आता काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे का ?
मी संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे वजन वाढलं.
मेनो पॉज नंतर वजन वाढतंच.
पायाचं हाड मोडलं होतं त्यामुळे दीड महिना घरी बसलो होतो त्यामुळे वजन वाढलं
हि वाक्ये वेगवेगळ्या रागात लयीत आणी स्वरात ऐकायला येतात.
यातील सर्वात प्रामाणिक वाक्य म्हणजे डॉक्टर वजन कमी करायला हवं आहे हे कळत आहे पण ते वळत नाही. समोर इतके रुचकर पदार्थ येतात आणि मग मोह आवरत नाही.
खरं तर प्रत्येक वजनदार माणसाची हीच स्थिती आहे.
बहुसंख्य "वजनदार" लोकाना आपले वजन "थोडंसं" जास्त आहे आणी आपण ते थोडंसं कमी करावे असे वाटत असतं. पण आपण काही इतर लोकांसारखा जास्त खात नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत असतं
म्हणून जवळ जवळ सर्वच वजनदार लोक आपण प्रत्यक्ष खात असलेल्या अन्नापेक्षा कमी अन्न खातो असा दावा करीत असतात. हे denial (नाकबूल) आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Denial.
वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या.
आज जगात ४० कोटी लोक भुकेलेले आहेत तर ३४० कोटी लोक जाडे/ वजनदार आहेत.(२०२२ )
जगभरात कुपोषणापेक्षा अतिपोषणामुळे तिप्पट लोक मृत्यू पावतात.
लठ्ठपणा हा रोग आता जागतिक स्तरावर मोठा प्रश्न बनला आहे. आणी यात फक्त श्रीमंत देशच नव्हे तर गरीब देश हि सापडले आहेत.
अगदी रस्त्यावर किंवा झोपड्यात राहणारे लोकही आता भरगच्च आणी पोट सुटलेले दिसतात.
दिल्ली किंवा मुंबईत उच्चभ्रू शाळांत ७० % मुले हि अतिवजनाची शिकार बनलेली आढळली आहेत.
वजनदार लोकांचे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी कमी होते आणी लठ्ठ व्यक्तींचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते.
जगातील १/३ लोक "वजनदार"( OVERWEIGHT) आहेत आणी १/१० लोक लठ्ठ (OBESE) आहेत.
शरीर वस्तुमान निर्देशांक (BODY MASS INDEX-BMI) हे आपले वजन मोजण्याचे परिपूर्ण नसले तरी सर्वात सोपे परिमाण आहे.
यात माणसाचे वस्तुमान भागिले उंचीचा वर्ग (WT / HT x Ht). यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची मीटर्स मध्ये मोजलेली हवी.
यात स्वस्थ माणूस -- BMI १९ ते २५ हवा
वजनदार माणूस BMI २५ ते ३०
आणी लठ्ठ BMI ३० पेक्षा जास्त.
याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३४ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे.
उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे वजन ५७ किलो ते ७४ किलो मध्ये असायला हवे. म्हणजे सरासरी वजन ६५ ते ६६ किलो .
A waist-to-height ratio is a better indicator of visceral fat (fat around your organs) and related health risks than BMI alone. Keeping your waist to less than half your height is a simple goal for better health.
वजनाच्या माणसाला ८-९ किलो जास्त वजनाची मुभा असते.( बहुसंख्य लोकांची हि तक्रार असते कि वजनाचा पल्ला(RANGE) फार कमी आहे. किंवा वजनाच्या तक्त्यात दाखवलेले प्रमाण वजन फारच कमी आहे.
http://halls.md/body-mass-index/av.htm
यात हा BMI मापक आहे. असा कोणताही मापक जालावरून आपल्याला पाहता येईल
हि लेखमाला म्हणजे कोणताही स्वयंभू विचार नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय माहितीचे सोप्या शब्दात भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे.
यात विविध वैद्यकीय पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.उदा.harrison's principles of internal medicine.
तेंव्हा विदा किंवा दुवा उपलब्ध आहे पण लगेच मिळेल असे नाही( शोधावा लागेल).
जाता जाता -- बर्याच लोकांना वरीलपैकी एखादे विधान आपल्याबद्दलच लिहिले गेले असावे असे वाटू शकते.
चांगली सुरुवात. सोनाराने कान
<< पण आपण काही इतर लोकांसारखा जास्त खात नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत असतं. >>
चांगली सुरुवात. सोनाराने कान टोचलेले बरे असते. एक गोष्ट सगळ्यात मस्त ही आहे की प्रत्येकाला स्वतःचे वजन स्वतःलाच उचलावे लागते. ज्यांचा स्वतःच्या खाण्यावर ताबा नाही अशा लोकांबद्दल मला सहानुभूती वाटत नाही.
खाण्याविषयी पहिली पोस्ट
खाण्याविषयी पहिली पोस्ट 'उपाशी" बोक्याकडून आली हे गमतीशीर वाटलं.
(No subject)
उपाशी माणुस किंवा मांजर आधी
उपाशी माणुस किंवा मांजर आधी खाणेच शोधणार

चांगली सुरवात. वाढणारे वजन हा माझ्या मुलीच्या बाबतीत मला चिंताग्रस्त करणारा विषय झालाय. आशा करते की ही लेखमाला मला मदत करेल.
खूपच छान लिहीलेय. सहज,
खूपच छान लिहीलेय. सहज, सोप्या भाषेत असल्याने चटकन रिलेट झाले.
वाचतेय!
वाचतेय!
चांगल आहे
चांगल आहे
खरंच सोनाराने कान टोचायला हवेत
मुख्य युक्तीवाद राहिला की
मुख्य युक्तीवाद राहिला की सुबोध.
"मी खाण्यासाठी जगतो/ते, जगण्यासाठी खात नाही."
पुभाप्र. तुम्ही तिकडे पोटाच्या पिशवीच्या आकाराबद्दल लिहिलेय त्याला +१००. मुख्य म्हणजे तो पूर्वपदावर आणता येतो हे अनुभवले आहे.
>>>>माझ्या मुलीच्या बाबतीत
>>>>माझ्या मुलीच्या बाबतीत मला चिंताग्रस्त करणारा विषय झालाय
मुलं ऐकतात का आईबापांचं. माझी मुलगी रोज उठुन बोबा टी पित असते. किती साखर असते त्यात. पण ऐकायचं नाही. योगा व बॅडमिंटन करते पण तरी सुद्धा.
बोबा टी >> पहिल्यांदाच ऐकलं.
बोबा टी >> पहिल्यांदाच ऐकलं. काय असतं ?
कोल्ड टी आणि त्यात ढब्बे
कोल्ड टी आणि त्यात ढब्बे ढब्बे साबुदाण्याचे गोळे असतात. मऊ असतात. काय बंडल लागतो तो बोबा टी.
अनुस्वार राहिल्यासारखं नाव
अनुस्वार राहिल्यासारखं नाव आहे.
हाहाहा
हाहाहा
मुलं रोज पितात म्हणुन पालक त्यावरच अनुस्वार लावतात पण मुलं ऐकत नाही.
उत्तम आरंभ!
उत्तम आरंभ!
कितीही बेचव असले तरी काही
कितीही बेचव असले तरी काही खाद्यपदार्थांच्या नशिबी प्रसिद्धी असते हेच खरे.
आणि कितीही बोंबा मारल्यातरी पोट्टे काही बोबा प्यायचं सोडत नाहीत. बोबा प्यायची स्ट्रॉ देखील ढब्बी असते त्या गोळ्यांमुळे.
Bubble Tea South East Asia
Bubble Tea South East Asia मध्ये लोकप्रिय आहे. आपल्या इथे काही दिवस फॅड राहील
डॉक्टर अलीकडे ओझेंटिक नावाचे
डॉक्टर अलीकडे ओझेंटिक नावाचे जे औषध प्रकार आलेले आहेत ते भारतामध्ये अगदी सहजपणे सर्रास दिले जातात का त्या औषधांचा माझ्या सर्कल मध्ये असलेला प्रभाव आणि परिणाम पाहता भारतासारख्या मधुमेहग्रस्त देशाला या प्रकारची औषधे वरदान ठरतील असा कयास होता मात्र भारतीय लोकांचे कार्ब प्रेम या सगळ्यांना पुरून उरले आहे असेच जाणवते. शिवाय सतत सोशल मीडिया वरती व्हिज्युअल फूड प्रेझेंटेशन म्हणजे फूड पॉर्न पाहत राहिल्यामुळे खूप खाऊ खाऊ वाटते. आज-काल फूडी असणे म्हणजे कुल असणे फारच बोकाळले आहे त्यामुळे लोक खाण्याचे नानाविध प्रकार आणि नानाविध आऊटलेट्स शोधून शोधून सतत खात आणि चरत असतात.
नुकत्याच झालेल्या किंक्रांतीला न भूतो न भविष्यती अशी मी भोगीची ताटे पाहिली. काही दिवसांनी संक्रांती पेक्षा किंक्रांत जास्त महत्त्वाची होणार आहे या भोगीच्या ताटांमुळे.
ते बोबा टी दिसायलाच
ते बोबा टी दिसायलाच attractive असावं मी अजून पिलं नाही पण फोटोत दिसतंय त्यावरून ,ते पूर्वी जेली च्या शो च्या कलरफुल मणी कम क्रिस्टल यायचे जे पाण्यात फुगवून ,फ्लॉवरपॉट मनिप्लान्ट मध्ये सजवायला वापरायचे ते आठवतात .आम्ही ते फुगले ,वापरून झाले की शेवटी टाकून द्यायच्या आधी फोडत बसायचो
दिसायचे मस्त रंगीत मणी बाटलीत.
लोक खाण्याचे नानाविध प्रकार
लोक खाण्याचे नानाविध प्रकार आणि नानाविध आऊटलेट्स शोधून शोधून सतत खात आणि चरत असतात >>>>> या उलट जाणवतं आजकाल…. लोकं कॅानशियस झाली आहेत खाण्यापिण्या बाबतीत.
रील्स किंवा सोमी च्या
रील्स किंवा सोमी च्या माध्यमातून food आदलत राहते आपल्या समोर आणि नसलेल्या भुका जागृत होतात
Shopping चं पण तसंच आहे
ते दिसायला लागलं की फोन ठेवून द्यायचा
स्वयंपाक घरात जाऊन जे असेल ते खाऊन यायचं मग काहीही फरक पडत नाही
भरल्या पोटी ना zomato ना myntra, वरण भात खा पैसे वाचवा
बोबा टी छान असतो की. कशाला
बोबा टी छान असतो की. कशाला वाईट लागेल गोड असल्यावर
>>शिवाय सतत सोशल मीडिया वरती व्हिज्युअल फूड प्रेझेंटेशन म्हणजे फूड पॉर्न पाहत राहिल्यामुळे खूप खाऊ खाऊ वाटते.
१००% सहमत. मी रेसिपी सांगणार्या आणि फूड जॉईंट्स सांगणार्या सर्व प्रो आणि नॉन प्रो लोकांना अनफॉलो करायला सुरुवात केली आहे.
सर्वत्र जो अनासक्त
सर्वत्र जो अनासक्त पंचपक्वन्न पाहता
न तोंपास्वे हेमाशेपोवे तो भोजक संयमी।
करिता तो उपवास भक्ताच्याही मनासही
नेई खेचुनी वेगाने अन्नवासना ती दांडगी।
तीस रोधुनी दुर्लक्षें रहावे मत्परायण
वासना रोधली ज्याने तो संकल्पसंयमी।
एक ओळखीच्या बाई आहेत. त्या
एक ओळखीच्या बाई आहेत. त्या दिवसभर वेगवेगळ्या साईटसवर डाएट प्लान, न्युट्रिशन्स व्हॅल्यू, विविध व्यायामप्रकार हे बघत असतात. दुसरा वापर खूप क्वचित असतो. त्यांच्याकडे या बाबतीतले जे ज्ञान जमा झाले आहे ते थक्क करणारे आहे. दीक्षित डाएट त्या दिवसातून दोन वेळा बावन्न मिनिटे वाचतात. इंटमिटंट फास्टिंग दर दोन तासांनी वाचतात.
पण त्यांचे वजन कमी व्हायचे सोडा वाढतच चालले आहे याचे काय कारण असावे ?
माझे वय ३२ आहे, उंची ६ फुट.
माझे वय ३२ आहे, उंची ६ फुट. वजन सतत ९६ ते १०२ किलोच्या आसपास असायचे. खूप लठ्ठ दिसायचो, चेहरा मान सुजल्यासारखी दिसायची, एकदा जमिनीवर बसलो की परत उठायची इच्छा व्हायची नाही किंवा उठायला प्रचंड जोर लावावा लागायचा. पोट भयंकर सुटल होत. रोज रनिंग वगैरे करून पाहिले वजन जराही इकडे तिकडे हलले नाही. मागच्या वर्षी कंपनीतर्फे हेल्थ चेकअप झाले होते, रिपोर्ट सहज चॅट जीपीटीवर अपलोड केले, चॅट जीपीटीने सांगितले की फास्टिंग ब्लड शुगर बॉर्डर वर आले आहे, लवकरच डायबेटीस होईल!
मी घाबरलो व माझी सर्व माहिती देऊन ह्यावर उपाय विचारला, चॅट जीपीटीने मला एक प्लॅन आखून दिला, ज्याला मी “झीरो शुगर पॉलीसी” असे नाव दिले. त्यानुसार साखर, मैदा, गहू, तांदूळ, खाणे संपूर्ण बंद केले! मी गेले वर्षभर बिनसाखरेची कडवट कॉफी पितोय, मला कडू चव मिळाली नाहीतर किक बसत नाही आता, गोड काहीही खाल्ले तर तोंडाला विचित्र लागत नो दिवसभर गिल्ट वाटतो तो वेगळा! तर रोज एक जेवणात फक्त १ भाकरी, रात्री १ नी दिवसा १! सोबत कसलीही भाजी असली तरी चालते पण शक्यतो पालेभाजी. सुरुवातीला १ भाकरीने पोट भरायव्हे नाही म्हणून सलाद किंवा कोशिंबीर खायचो, आता १ भाकरीही जड वाटते, अर्धी किंवा पाऊणही खूप वाटते. रोज संध्याकाळी तळजाई टेकडी चढतो म्हणजे पूर्ण मंदिरापर्यंत. हे सतत ६ महिने केल्यावर आता वजन ८८ कीलो आहे, शरीर सडपातळ झालय. शरीर ज्याप्रमाणात कमी झालं त्या प्रमाणात वजन कमी झालेल दिसत नाही अशी तक्रार चॅट जिपीटीला केल्यावर त्याने सांगितल की मांस छाती नी दंडात भरले जाते आहे.
अजूनही मी डायेट फॉलो करतोय, साखर १०० टक्के बंद केल्याचे प्रचंड फायदे मला दिसत आहे, चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो येत असल्याचे अनेकांनी सांगितले, थकवा वगैरे जाणवत नाही, पूर्वी खूप घाम यायचा, आता घाम खूप कमी येतो, चैट जिपितीने सांगितले की साखर बंद केल्यामुळे शरीराची सूज कमी झाली, दुसरा मोठा शत्रू मैदा ही बंद केला आहे पण कुठून ना कुठून माथी मारला जातोच, बिस्कीट, ब्रेड पाव, हे मैद्याचे प्रमुख स्रोत १०० टक्के बंद केलेत, भाकरी सगळीकडे मिळेलच अशी परिस्थिती नसते, गव्हाची पोळी सांगितली तरी स्वस्त असल्यामुळे हॉटेलवाल्यांनी मैदा त्यात मिक्स केलेला असतोच. काहीच मिळाले नाही तर कमी हार्मफुल असा भात खातो. चिकन मटण अंडी कितीही खायला मनाई नाही, प्रोटीन जितके आले तितके चांगले!
वर्षभराआधी मला टाईट होणाऱ्या पँट आता कंबरेत अतिशय लुज होताहेत. माझ्या बेल्टच्या बक्कलचा हा फोटो पाहिला तरी लक्षात येईल. वजन ८५ करायचे माझे टारगेट आहे. चॅट जीपीटीच्या मार्गदर्शनाने बॉडी बिल्डिंगचा एक मास्टर प्लान आखला होता पण वजन कमी करणे नी बॉडी बिल्डिंग दोघ एकत्र शक्य नाही, तरी सुवर्णमध्य काढलाय! ह्या वर्षीचे टारगेट आहे बॉडी बिल्डिंग! त्या साठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
या भागात लिहिलंय (खाण्यावर
या भागात लिहिलंय (खाण्यावर कंट्रोल राहिला नाही, व्यायाम नाही) त्यापेक्षा वेगळी कारणे वजन वाढण्याची असु शकतात.
हायपोथॉइराडीझम एक, तसेच इतरही. काही औषधांमुळे वजनवाढ होते पण सहसा तशी औषधे विशेष आजारा शिवाय देत नाहीत. ठराविक वया पर्यन्त (अथवा मेटॅबोलीक चेंजेस होण्याच्या टप्प्यापर्यँत? (याला बदलेली जीवन शैली आणि इतर कारणे असु शकतील)) कितीही खाल्ले तरी वजन वाढत नाही. वजन वाढण्याचा प्रयत्न करूनही नाही. नंतर हे बदलते आणि एकदा तसे मेटबॉलिक बदल झाले की कॅलरीज वाढल्या की वजन वाढु लागते.
असे काही नसेल हे रूल आउट करायला एकदा डॉकचे ओपिनियन घ्यावे. चाट जीपीटीवरच विसंबुन राहु नये.
से आधीच केले असेल तर उत्तमच, पण चाट जीपीटी काय सांगतो यावर बारकाईने लक्ष ठेवत त्याबद्दल संबंधीत प्रोफेशनल्सचे ओपिनियन विचारात घेत करणे उचित.
उदा: तुम्ही मैदा, पॉलिश्ड पदार्थ, सिम्पल कार्ब्स अगदी कमी केले, साखर बंद केली हे चांगले व त्याबद्दल अभिनंदन पण प्रथिने कितीही खा हरकत नाही हे एकदा तपासुन बघा.
रोज संध्याकाळी तळजाई टेकडी
रोज संध्याकाळी तळजाई टेकडी चढतो >> पुन्यातुन कि विमानानं येवुन जावुन ?
न तोंपास्वे हेमाशेपोवे तो
न तोंपास्वे हेमाशेपोवे तो भोजक संयमी >>
छान समयोचीत लेख
छान समयोचीत लेख
प्रतिसाद वाचतोय...
<<< काही औषधांमुळे वजनवाढ होते पण सहसा तशी औषधे विशेष आजारा शिवाय देत नाहीत.
>>>>
हे माझ्याबाबत सध्या होत आहे.. असा माझाच अंदाज. तरी डॉक्टर कडून कन्फर्म करून घेईन लवकरच.
<<<तुम्ही मैदा, पॉलिश्ड
<<<तुम्ही मैदा, पॉलिश्ड पदार्थ, सिम्पल कार्ब्स अगदी कमी केले, साखर बंद केली हे चांगले व त्याबद्दल अभिनंदन पण प्रथिने कितीही खा हरकत नाही हे एकदा तपासुन बघा.>>>
+१ प्रथिनांचा अतिरेक कायम स्वरुपी प्रॉब्लेम्स निर्माण करु शकतो.
चाट जीपीटीवरच विसंबुन राहु
चाट जीपीटीवरच विसंबुन राहु नये. >>>
हे खरे आहे, पण खरे सांगू तर मी ह्या आधी २ डॉक्टरांकडे गेलो होतो, एकाने नभात नी मटण वगैरे बंद करण्यास सांगितले, व दुसऱ्याने काहीबाही डाएट प्लान दिला. त्याच्याने शष्प फरक पडला नाही हे वेगळे सांगायला नको. दोन्हीपैकी एकही डॉक्टर ने साखर नी मैदा खाणे बंद करा असे सांगितले नाही, काय कारण असेल?
तरीही मी आणखी एका डॉक्टर ला हा डाएट प्लान फॉलो करतोय असे सांगितले, त्याने उत्तम आहे, चालू ठेव असे सांगितले. भाकरी फायबरयुक्त आहे तसेच गहू खात नाही ते ग्लूटेन फ्री म्हणूनही चांगले असल्याचे सांगितले.
Pages