काटा वजनाचा --७
स्त्रियांच्या बाबतीत वजन फार पटकन वाढते असा अनुभव आहे. यात आयुष्याचे तीन कालखंड फार महत्त्वाचे आहेत.
१) पौगंडावस्था
२) गरोदरपण
३) रजोनिवृत्ती
१) पौगंडावस्थेत म्हणजेच वयात येण्याच्या आसपास आपल्या मुलीचे वजन फार पटकन वाढले असा बऱ्याच स्त्रियांचा अनुभव आहे. याचे कारण काय?
मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते?
adipostat म्हणजे काय आणि वजन थोडे कमी होऊन परत का वाढते?
यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते.
आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात. हि ग्लुकोज तुम्हाला अन्नातून थेट मिळते किंवा इतर पिष्टमय पदार्थांचे( रवा मैदा आटा तांदूळ ज्वारी बाजरी बटाटा रताळे इ) विघटन करून अथवा चरबी पासून तयार करून मिळवता येते.
आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली.
काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन.
आता पर्यंत आपण पहिले कि वजन जास्त म्हणजे किती आणि कसे मोजायचे आणि जास्त वजनाचे तोटे काय आहेत.
आता आपण हे पाहणार आहोत कि काही लोकांचे वजन पटकन का वाढते आणि काही लोकांचे काहीही केले तरी का वाढत नाही.
प्रथम एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे -- केवळ जास्त वजन म्हणजे जास्त चरबी नव्हे.
जास्त वजन परंतु कमी चरबी अशी माणसे असतात( खेळाडू धावपटू किंवा पिळदार शरीराची माणसे)
आणी याच्या उलट वजन बरोबर पण अंगावर चरबी जास्त अशा माणसांचे स्नायू आणी हाडांचे वजन कमी असते आणी शरीरात चरबी जास्त.
असे म्हणतात कि पोटाचा प्रश्न सुटला कि सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरु होतो.
तेंव्हा आपल्या पोटाचा घेर किती असावा हे अगोदर लिहिलेले आहे. भारतीय वंशाच्या लोकांसाठी कमरेचा जास्तीत जास्त घेर हा पुरुषांसाठी ३५ इंच आणी स्त्रियांसाठी ३१. ५ इंच हा आहे.हा घेर आपण जेथे प्यांट घालतो त्या कमरेच्या हाडाच्या जरासा वर मोजला पाहिजे आणी हा पोटाचा सर्वात (पुढे येणारा) पुरोगामी भाग यावर मोजला पाहिजे. यापेक्षा जास्त घेर असणार्यांना मधुमेह आणी हृदयविकार याचा जास्त धोका संभवतो.
जाता जाता -- पूर्वी लोक बर्याच दिवसांनी भेटले कि "उरा उरी" भेटत असत
आता "उदरा उदरी" भेटतात.
माझ्याकडे एक १५ वर्षाची दहावी तील मुलगी ६ महिने पाळी आली नाही यासाठी सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिचे वजन होते ९६ किलो. तिचे वडील सांगत होते डॉक्टर तुम्हीच तिला काहीतरी सांगा.
अशीच १७ वर्षांची दुसरी मुलगी ( बारावीतील) आली होती. तिचे वजन ८७ किलो होते. पाळीची अनियमितता यासाठी.
तिची आई मला कौतुकाने सांगत होती तिचे पप्पा तिचे फार लाड करतात. तिला रोज दोन वडापाव आणून देतात.
एक तिसरी मुलगी गरोदर असताना येत होती. गरोदर होण्यापूर्वी तिचे वजन होते १०९ किलो आणि नवव्या महिन्यात वजन होते १३३ किलो.