माझ्याकडे एक १५ वर्षाची दहावी तील मुलगी ६ महिने पाळी आली नाही यासाठी सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिचे वजन होते ९६ किलो. तिचे वडील सांगत होते डॉक्टर तुम्हीच तिला काहीतरी सांगा.
अशीच १७ वर्षांची दुसरी मुलगी ( बारावीतील) आली होती. तिचे वजन ८७ किलो होते. पाळीची अनियमितता यासाठी.
तिची आई मला कौतुकाने सांगत होती तिचे पप्पा तिचे फार लाड करतात. तिला रोज दोन वडापाव आणून देतात.
एक तिसरी मुलगी गरोदर असताना येत होती. गरोदर होण्यापूर्वी तिचे वजन होते १०९ किलो आणि नवव्या महिन्यात वजन होते १३३ किलो.
अर्थात बाळाचे वजन ३ किलोच होते. ( आता तुला दोन जीवांसाठी खायला हवे या सल्ल्याचे टोकाचे उदाहरण).
अशी असंख्य उदाहरणे आजकाल वैद्यकीय व्यावसायिक रोज पाहत असतात
"डॉक्टर आम्ही काहीही केले तरी आमचे वजन कमीच होत नाही."
"पण आम्ही काही खातच नाही."
आम्ही इतके जिम मध्ये घाम गाळतो पण वजन काही हलत नाही.
वजनाचा काटाच बरोबर नाही.
वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो.
वजनाचा तक्ताच चूक आहे .
एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ?
आम्ही हवा खाल्ली तरी जाडे होतो.
आम्ही तुपाचा वास जरी घेतला तरी तरी आमचे वजन वाढते.
आता फक्त उपास करणे बाकी आहे.
जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?
आता कशी तब्येत छान दिसते आहे पूर्वी तर लोक मला पाप्याचे पितर म्हणत असत.
माझे वजन बरोबर आहे, फक्त उंचीच थोडी कमी आहे.
बाळंतपणात "जरा" जास्त खाल्लं तर वजन इतकं वाढलं ते आता काही केल्या कमी होत नाही.
दोन मुलं झाली आता काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे का ?
मी संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे वजन वाढलं.
मेनो पॉज नंतर वजन वाढतंच.
पायाचं हाड मोडलं होतं त्यामुळे दीड महिना घरी बसलो होतो त्यामुळे वजन वाढलं
हि वाक्ये वेगवेगळ्या रागात लयीत आणी स्वरात ऐकायला येतात.
यातील सर्वात प्रामाणिक वाक्य म्हणजे डॉक्टर वजन कमी करायला हवं आहे हे कळत आहे पण ते वळत नाही. समोर इतके रुचकर पदार्थ येतात आणि मग मोह आवरत नाही.
खरं तर प्रत्येक वजनदार माणसाची हीच स्थिती आहे.
बहुसंख्य "वजनदार" लोकाना आपले वजन "थोडंसं" जास्त आहे आणी आपण ते थोडंसं कमी करावे असे वाटत असतं. पण आपण काही इतर लोकांसारखा जास्त खात नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत असतं
म्हणून जवळ जवळ सर्वच वजनदार लोक आपण प्रत्यक्ष खात असलेल्या अन्नापेक्षा कमी अन्न खातो असा दावा करीत असतात. हे denial (नाकबूल) आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Denial.
वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या.
आज जगात ४० कोटी लोक भुकेलेले आहेत तर ३४० कोटी लोक जाडे/ वजनदार आहेत.(२०२२ )
जगभरात कुपोषणापेक्षा अतिपोषणामुळे तिप्पट लोक मृत्यू पावतात.
लठ्ठपणा हा रोग आता जागतिक स्तरावर मोठा प्रश्न बनला आहे. आणी यात फक्त श्रीमंत देशच नव्हे तर गरीब देश हि सापडले आहेत.
अगदी रस्त्यावर किंवा झोपड्यात राहणारे लोकही आता भरगच्च आणी पोट सुटलेले दिसतात.
दिल्ली किंवा मुंबईत उच्चभ्रू शाळांत ७० % मुले हि अतिवजनाची शिकार बनलेली आढळली आहेत.
वजनदार लोकांचे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी कमी होते आणी लठ्ठ व्यक्तींचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते.
जगातील १/३ लोक "वजनदार"( OVERWEIGHT) आहेत आणी १/१० लोक लठ्ठ (OBESE) आहेत.
शरीर वस्तुमान निर्देशांक (BODY MASS INDEX-BMI) हे आपले वजन मोजण्याचे परिपूर्ण नसले तरी सर्वात सोपे परिमाण आहे.
यात माणसाचे वस्तुमान भागिले उंचीचा वर्ग (WT / HT x Ht). यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची मीटर्स मध्ये मोजलेली हवी.
यात स्वस्थ माणूस -- BMI १९ ते २५ हवा
वजनदार माणूस BMI २५ ते ३०
आणी लठ्ठ BMI ३० पेक्षा जास्त.
याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३४ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे.
उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे वजन ५७ किलो ते ७४ किलो मध्ये असायला हवे. म्हणजे सरासरी वजन ६५ ते ६६ किलो .
A waist-to-height ratio is a better indicator of visceral fat (fat around your organs) and related health risks than BMI alone. Keeping your waist to less than half your height is a simple goal for better health.
वजनाच्या माणसाला ८-९ किलो जास्त वजनाची मुभा असते.( बहुसंख्य लोकांची हि तक्रार असते कि वजनाचा पल्ला(RANGE) फार कमी आहे. किंवा वजनाच्या तक्त्यात दाखवलेले प्रमाण वजन फारच कमी आहे.
http://halls.md/body-mass-index/av.htm
यात हा BMI मापक आहे. असा कोणताही मापक जालावरून आपल्याला पाहता येईल
हि लेखमाला म्हणजे कोणताही स्वयंभू विचार नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय माहितीचे सोप्या शब्दात भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे.
यात विविध वैद्यकीय पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.उदा.harrison's principles of internal medicine.
तेंव्हा विदा किंवा दुवा उपलब्ध आहे पण लगेच मिळेल असे नाही( शोधावा लागेल).
जाता जाता -- बर्याच लोकांना वरीलपैकी एखादे विधान आपल्याबद्दलच लिहिले गेले असावे असे वाटू शकते.
<<<दोन्हीपैकी एकही डॉक्टर ने
<<<दोन्हीपैकी एकही डॉक्टर ने साखर नी मैदा खाणे बंद करा असे सांगितले नाही, काय कारण असेल?>>>
डॉ च्या अभ्यासक्रमात आतापर्यंत आहारशास्त्राचा समावेश नव्हता. मला वाटतं आता जी मंडळी शिकतात त्यांना आहारशास्त्र हा विषय आहे पण इंट्रोडक्कटरी स्वरुपात. डॉ मंडळी मुख्यतः शरीर शास्त्र (anatomy and physiology) आणि जीव रसायनशास्त्र (biochemistry) शिकतात आणि त्या ज्ञानाच्या आधारावर आवड असेल तर आहारशास्त्राचा अन्वयार्थ लावू शकतात. पण सगळे डॉ तसे करतीलच किंवा ते करण्यासाठी त्यांना वेळ मिळेलच असे नाही.
आहारशास्त्र ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे आणि एविडंस बेस्ड न्युट्रिशन रिसर्च भारतात जवळ जवळ होतच नाही. आहारशास्त्राच्या रिसर्च मध्ये अमेरिकेन फंडिंग एजंसीज देखील फार पैसा देत नाहीत. त्यामुळे मुळातच आहारशास्त्र विषयक रिसर्च हा मुख्यतः इंडस्ट्री स्पॉन्सर्ड असतो. उदा सध्या आलेली किटो आणि हाय प्रोटिन लाट ही मुख्यतः बीड इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च चार परिपाक आहे.
त्यामुळे हा मुळातच एक खूप गुंतागुंतीचा विषय आहे. पण एक आय अजुन तरी ह्या ला पर्याय देण्यासाठी सक्षम नाही.
<<<दोन्हीपैकी एकही डॉक्टर ने
<<<दोन्हीपैकी एकही डॉक्टर ने साखर नी मैदा खाणे बंद करा असे सांगितले नाही, काय कारण असेल?>>>
डॉ च्या अभ्यासक्रमात आतापर्यंत आहारशास्त्राचा समावेश नव्हता. मला वाटतं आता जी मंडळी शिकतात त्यांना आहारशास्त्र हा विषय आहे पण इंट्रोडक्कटरी स्वरुपात. डॉ मंडळी मुख्यतः शरीर शास्त्र (anatomy and physiology) आणि जीव रसायनशास्त्र (biochemistry) शिकतात आणि त्या ज्ञानाच्या आधारावर आवड असेल तर आहारशास्त्राचा अन्वयार्थ लावू शकतात. पण सगळे डॉ तसे करतीलच किंवा ते करण्यासाठी त्यांना वेळ मिळेलच असे नाही.
आहारशास्त्र ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे आणि एविडंस बेस्ड न्युट्रिशन रिसर्च भारतात जवळ जवळ होतच नाही. आहारशास्त्राच्या रिसर्च मध्ये अमेरिकेन फंडिंग एजंसीज देखील फार पैसा देत नाहीत. त्यामुळे मुळातच आहारशास्त्र विषयक रिसर्च हा मुख्यतः इंडस्ट्री स्पॉन्सर्ड असतो. उदा सध्या आलेली किटो आणि हाय प्रोटिन लाट ही मुख्यतः बीड इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च चार परिपाक आहे.
त्यामुळे हा मुळातच एक खूप गुंतागुंतीचा विषय आहे. पण एक आय अजुन तरी ह्या ला पर्याय देण्यासाठी सक्षम नाही.
हेमाशेपोवे मधे पो च्या जागी
हेमाशेपोवे मधे पो च्या जागी भो टाकला तर अर्थपूर्ण होईल.
पण मानसशास्त्राचा विचार करता शेवटचे भोजन म्हणताना माणूस दणकून खाईल.
कोणत्याही वाचकाला वैयक्तीक
कोणत्याही वाचकाला वैयक्तीक सल्ला देणे शक्य नाही.
ज्याने त्याने आपल्या जवळच्या आहार तज्ज्ञ आणि डॉक्टरांना दाखवून आपल्यासाठी वैयक्तिक सल्ला घ्यावा हि विनंति.
लठ्ठपणा हा अनेक आजारांना नियन्त्रण देणारा आहे त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवून त्यामुळे येणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळावी या सध्या हेतूने हे लिहिलेले आहे.
मी कोणतेही वजन कमी करण्याचे वर्ग घेत नाही किंवा आहाराचे मार्गदर्शन करत नाही किंवा तसा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा (भविष्यात) कोणताही हेतू/ मानस नाही.
मी एक क्षकिरण तज्ज्ञ असून जे रोज पाहतो त्याकडे वाचकांचे लक्ष वळवावे एवढ्या मर्यादित हेतूने हि लेखमाला लिहिलेली आहे.
डॉ च्या अभ्यासक्रमात
डॉ च्या अभ्यासक्रमात आतापर्यंत आहारशास्त्राचा समावेश नव्हता.
हे बरोबर नाही.
मुळात वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम हा अतिशय साध्या तर्हेने शिकवला जातो.
ढोबळमानाने याचे वर्गीकरण असे आहे.
पहिल्या वर्षी शरीररचनाशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र आणि जीवरसायन शास्त्र हे माणसाच्या शरीराचे निरोगी असताना चालणाऱ्या क्रियांचे विषय शिकवले जातात.
दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात त्यात येणारे बदल आणि बिघाड शिकवले जातात नि त्यासाठी लागणाऱ्या औषधांची माहित ( पॅथॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधींविज्ञान)
तिसऱ्या वर्षात झालेला बिघाड( रोग) कसे बरे करायचे याचा साद्यन्त अभ्यास असतो
आता लठ्ठपणाबद्दल
पहिल्या वर्षात आपल्या शरीरात चरबी का आणि कशासाठी असते ती कशी जमवली जाते आणि त्याचा व्यय कसा केला जातो याचा अभ्यास असतो.
दुसऱ्या वर्षी चरबी मुळे शरीरात काय बिघाड होतात आणि ती / वाढविण्या /कमी करण्यासाठी काय औषधे देता येतील याचा अभ्यास असतो
तिसऱ्या वर्षात वैद्यकशास्त्र (medicine) यात लठ्ठपणा आणि त्यामुळे येणारे किंवा त्यामुळे बळावणारे आजार याबद्दल वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात सविस्तरपणे शिकवले जाते.
फरक एवढाच आहे प्रत्येक डॉक्टर यामध्येच व्यवसाय करेल असे नाही त्यामुळे त्यात जास्त खोलवर जाऊन वाचन करणे प्रत्येक डॉक्टर करेलच असे नाही.
आता डोळ्याचा डॉक्टर असेल तर तो लठ्ठपणाचा डोळ्यावर काय परिणाम होतो याबद्दल सखोल वाचन करेल तसे लठ्ठपणाचा मूत्रपिंडावर काय परिणाम होतो याची साद्यन्त माहिती वाचणार नाही.
जाता जाता वजन कमी करण्याचे
जाता जाता वजन कमी करण्याचे सल्ले देणारे असंख्य असतात
वजन कमी करायला असा "जाता जाता" सल्ला देणं म्हणजे नाक्यावर सिगारेट प्यायला उभ्या राहिलेल्या ओळखीच्या माणसाने शेअर बाजारातील "टिप"देण्यासारखं असतं. (ज्याने एक दमडी बाजारात गुंतवलेली नसताना)
डॉ तुम्ही मेडिसिन च्या
डॉ तुम्ही मेडिसिन च्या अभ्यासक्रमात असलेल्या विषयांची जी यादी दिली आहे शरीररचना शास्त्र (anatomy and physiology), जीव रसायनशास्त्र (biochemistry), सुक्ष्मजीवशास्त्र (microbiology), औषध विज्ञान (pharmacology), आणि चयापचय (metabolism) हे आहारशास्त्र (nutritional science and food science) ह्यांच्याशी पुरक (complimentary) विषय आहेत, पर्याय (substitute) नाहीत.
मेडिसिन च्या अभ्यासक्रमात फोकस शरीर आणि शरीरातील बदल ह्यावर अआहे. आहारशास्त्रात तो अन्न आणि अन्नघटक (carbohydrates, lipids, proteins, vitamins and minerals) ह्यावर आहे. ह्यांची ढोबळ माहिती असणे वेगळे आणि हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असते वेगळे.
<<<जाता जाता वजन कमी करण्याचे
<<<जाता जाता वजन कमी करण्याचे सल्ले देणारे असंख्य असतात
वजन कमी करायला असा "जाता जाता" सल्ला देणं म्हणजे नाक्यावर सिगारेट प्यायला उभ्या राहिलेल्या ओळखीच्या माणसाने शेअर बाजारातील "टिप"देण्यासारखं असतं. (ज्याने एक दमडी बाजारात गुंतवलेली नसताना)>>>
ह्याबद्दल तुमच्याशी सहमत. मी आहारशास्त्राची डिग्री अमेरिकेतील विद्यापीठातुन मिळवली. तिथले माझे एक (गोरे) प्राध्यापक पुण्यातील लोकांना कमीपणा वाटेल इतके 'कमाल शब्दात किमान अपमान ' ह्या तत्वांशी प्रामाणिक होते. ते नेहमी म्हणायचे 'since everyone eats, everyone has an opinion about nutrition '
'कमाल शब्दात किमान अपमान '
'कमाल शब्दात किमान अपमान ' ह्या तत्वांशी प्रामाणिक >>
हे 'किमान शब्दात कमाल अपमान' असे हवे का?
Pages