विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.
१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.
येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.
धन्यवाद.
सोकाजी आणि स्वधर्म,
सोकाजी आणि स्वधर्म,
तुम्ही एक मोठी गल्लत करत आहात. मनाच्या एकाग्रतेसाठी आनापान ही प्रक्रिया ही विपश्यनेची prerequisite आहे. मन एकाग्रच करायला शिकायचे असेल तर केवळ एवढे करून काम भागायला पाहिजे. विपश्यना ही पुढची स्टेप करायची गरज नाही.
सोकाजी,
तुम्ही तुमचीच उदाहरणे किती इनकॉन्सिस्टेंट आहेत ते पहा.
ज्ञानेश्वरांना भाषेची, काव्याची आसक्ती होती. ती केवळ टूल म्हणून त्यांनी वापरलेली नाही. ऐसी अक्षरे 'रसिके' असे त्यांनी स्वतःच म्हंटले आहे. रसाचा परिपोष व्हायचा असेल तर मन नुसते एकाग्र आणि समचित्त असून चालत नाही, तर ते आसक्त देखील असायला हवे असते. आसक्तीशिवाय सौंदर्याचा ध्यास घेता येत नाही.
ज्ञानेश्वर स्वतः नाथांच्या परंपरेतले असूनही त्यांनी भावशरणाता निवडली आहे. कारण अद्वैत हे केवळ कल्पनेतच अस्तित्वात येते हे त्यांना कळले होते. कारण शरीराची जोवर सीमा आहे तोवर द्वैत मिटवता येत नाही आणि म्हणून आपले सगळे आयुष्य ज्ञानेश्वरी सारख्या अक्षरयज्ञात आणि अत्यंत रसाळ रससंपृक्त कला निर्माण करत आसक्त होऊन म्हणजे, विठ्ठलाच्या सगुण रूपाप्रती तीव्र आस व्यक्त करीत घालवले आहे आणि त्यानंतर शरीराची सीमा शरीर त्यागून ओलांडली आहे. स्वतःचे शरीर त्यागणे ही प्रचंड हिंसात्मक गोष्ट ईश्वराच्या ओढीच्या तीव्र आसक्तीपोटीच शक्य आहे. कोणताही स्थितप्रज्ञ माणूस असे करणार नाही. झाडावरून जसे सहज फळ पडते तसा तो एक दिवस सहज गळून जाईल ही खरी स्थितप्रज्ञता आहे. केवळ भावभावांनाचे निरीक्षण करून सुख दुःखाचा फरक न पडणे म्हणजे स्थितप्रज्ञतेचे केवळ लिमिटेड आकलन आहे.
तुकाराम तर आसक्तीने ओतप्रोत भरलेला होता. समर्पण, द्वैताचे माधुर्य, तत्कालीन समाजव्यवस्थेवरचा राग, बंडखोरपणा आणि त्याबरोबरच पुन्हा विठ्ठलाच्या सगुण रूपासाठी आणि निर्गुणासाठी चाललेला अत्यंत तीव्र आसक्त ध्यास (भेटी लागे जीवा लागलीसे 'आस') म्हणजे तुकाराम आहे. म्हणून तुकाराम श्रेष्ठ कला निर्मू शकतात. कोणत्याही स्थितप्रज्ञ व्यक्तीला काळ्यावर पांढरे करून 'शहाणे करून सोडावे सकलजन' हा ध्यास का लागेल? तोही जीवावर आणि संसारावर उदार होऊन? ध्यास या शब्दातच आस आहे. आसक्ती शिवाय कोणतेही वर्ल्डली कार्य करणे हे संपूर्ण पणे अशक्य आहे त्यात कला तर आसक्तीचा सर्वोच्च आविष्कार आहे. अक्षरश: त्यांनी शिव्या ही घातल्या आहेत. माणसाच्या स्वार्थाचा द्वेषपूर्ण निषेध देखील केला आहे. संसाराचा त्रास आणि त्याचा उद्वेग सगळे सगळे मांडले आहे. समचित्त असणाऱ्या माणसाने कशाला उद्वेग राग आनंद दुःख व्यक्त करावा बरे? कुठल्याही अँगल ने मला तुकाराम स्थितप्रज्ञ वाटत नाही. म्हणून त्याची कला श्रेष्ठ आहे आणि मराठी भाषेलाच खांद्यावर धरणारी आहे.
साक्षीभाव हा काही फक्त सुख दुःख या दोनच गोष्टीपुरता मर्यादित ठेवायचा नाही. तेवढ्यावरच विपश्यना थांबत नाही. जेव्हा हा अनुरागाचा संस्कार चित्तात तयार होतो तो तोडायचा आहे हे देखील विपश्यना शिकवते. जेणेकरून आसक्ती तयार होणार नाही.
नुसत्या साक्षीभावाने पाहायला गेलो तर माणसाचा आत्मभाव हा सतत जागृत असतो आणि तो केवळ जागेपणीच नाही तर तो स्वप्नात देखील असतो आणि तो तसा असताना जो जो अनुभव आपल्याला येतो तो या आत्मभावाला साक्ष ठेवूनच येतो. त्यामुळे साक्षीभावासाठी वेगळे स्पेशल काही करायची गरज नसते कारण आपला आत्मभाव कधीही नष्ट होत नाही. त्यासाठी वेगळी साधना करण्याची गरज नाही.
आत्मभाव नष्ट झाला तर वैयर्थ ही नैसर्गिक रित्या पुढची स्टेप आहे त्यामुळे ती सृजनाला देखील मारक आहे.
>> दुःखदायक प्रसंगी ज्याच्या
>> दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. <<
असा स्थिरबुद्धी मुनी काय घंटा करणार आहे? काय करायचा हा स्थिरबुद्धी मुनी घेऊन? बस म्हणावे जंगलात आणि जा खपून.
बुद्धाने कलेवर आणि सृजनावर
बुद्धाने कलेवर आणि सृजनावर काही फंडामेंटल विचार दिलेला नाही. अगदी स्थापत्याबद्दल देखील तो उदासीन होता. मात्र त्याच्या अनुयायांना कलांचा विचार करावा लागला आहे. विहार लेणी आणि या सगळीकडे त्यांना कलेचा विचार करावा लागला आहे.
अनित्य अनात्म क्षणभंगुरतेची (विशेषत: अस्तित्वाच्या क्षणभंगुरतेची) जाणीव करून देणारा बुद्ध त्याच्या अनुयायानी मात्र नित्य आत्म करायचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसतो. जगात सर्वात महाकाय पुतळे बुद्धाचेच उभे दिसतात मला त्याचे अनुयायी जातील तिथे उभे करतात. आणि जगात मला वाटते बुद्धाच्या मुर्त्या सगळ्यात जास्त खपतात.
याउलट विठ्ठल किंवा कोल्हापूरची अंबाबाई यांच्या मुर्त्या अगदीच लहान थोडक्या आहेत. म्हणजे सगुण रूपात पुजल्या जाणाऱ्या देवांना महाकाय असण्याचा सोस नाही. मात्र देव आहे का नाही, तो साकार आहे का निराकार आहे या प्रश्नाचे उत्तरच न देणारा आणि अस्तित्वाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देणारा बुद्ध मात्र जागोजागी महाकाय होऊन उभा आहे.
स्वतःच्या वस्त्रांचाही त्याग करणरे जैन वीतराग ही डोंगरांमध्ये परत शेकडो फुटांचे होऊन का उभे असतात हे देखील मला कळलेले नाही.
टिचिंग्ज ऑफ बुद्धा एक अप्रतिम
टिचिंग्ज ऑफ बुद्धा एक अप्रतिम पुस्तक अहे. साधे सोपे.
मी सोकाजीराव त्रिलोकेकर
मी सोकाजीराव त्रिलोकेकर यांच्याकडे आधी एका कल्टचे भारावलेले सदस्य म्हणून बघत होतो. पण हळूहळू त्यांचे पुढचे प्रतिसाद पाहून त्यांच्या बद्दलचे माझे मत निवळले. ते कल्टचे अंधभक्त नसून डोळसपणे बघत आहेत हे मला पटले. त्यांचे प्रोफाईल सुद्धा आश्वासक आहे. इतकेच काय ध्यान, मेडीटेशन इ बाबतचे त्यांचे विचार क्लिअर आहेत. अभ्यासू आहेत. गैरसमजाबद्दल क्षमा असावी.
आधी उगीचच अनेक धाग्यांप्रमाणे वरवर बघितले पण आता इंटरेस्स्ट निर्माण झाला आहे. वाचतोय. ऐकतोय. आता लिहावंसं वाटत नाही इतकंच.
सोकाजी यांना मी वैयक्तिक
सोकाजी यांना मी वैयक्तिक रित्या ओळखत नाही मात्र मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडीशी कल्पना आहे. त्यांचे पूर्वी नानाविध प्रकारचे कॉकटेल कसे करावेत यावर लेख यायचे तेव्हापासून कदाचित मी त्यांना वाचत आलेलो आहे. मध्यंतरी मला कळाले की त्यांनी मद्य मद्य लालसा सोडून दिलेली आहे तेव्हा असेही कळाले की त्यांनी विपश्यना साधना सुरू केलेली आहे. अर्थात वाढत्या शरीरामुळे मद्य सोडणे हे तसे पथ्यावरच पडणारे असले तरी यामागे केवळ आरोग्य नसून विपश्यना देखील आहे असा माझा कयास आहे.
मद्याचा आनंद घेत घेत त्यांना ध्यानाची गोडी लागली असावी किंवा कोणत्याही एक्स्टर्नल सबस्टन्स शिवाय त्या धुंद अवस्थेत जाता येईल का अशी चाचपणी ते करत असावेत म्हणून त्यांनी ध्यान सुरू केले असावे काय? त्यांना आधीपासूनच म्हणजे जनम से ही इंटरेस्ट होता? एकंदरीत उत्साही आणि चौकस उत्सुकता असणाऱ्या माणसाला ध्यान विपश्यना या गोष्टींचे एक सुप्त आकर्षण असतेच.
एक लेखक, प्रांजळ कबुली आवडली.
एक लेखक, प्रांजळ कबुली आवडली. (मी स्वतः यांच्याबद्दल विपश्यना साधक यापेक्षा कुठले वेगळे मत बनवलेले नाही, त्यांचा विपश्यना अनुभवाचा धागा वाचलेला होता आणि तिथे त्याबद्दल दाद देताना काय खटकले हे ही लिहिले होते. विपश्यनाचा प्रचलित अर्थ गोयंकांनी सुरू केलेली विपश्यना असा बहुत करून रूढ झालेला आहे. हा धागा त्याबद्दलचा आहे हे हेडर मधुन स्पष्ट होते. त्यावरून इथे त्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.)
ही फक्त तुमच्या प्रांजळपणाची पावती आहे.
@धनश्री
@धनश्री
>> आपले डीप सीटेड ट्रस्ट इश्युज असे कसे जातील? जे कोणी हे वचन देते, मला त्यांचे अजिबात खरे वाटत नाही. देअर आर सम वुंडस दॅट नेव्हर हील.
अस मत होण्याच पहिलं कारण, आपल्या धारणा (Conditiong of mind), त्या ह्याला कारणीभूत असतात. मन धारणांपलीकडच्या गोष्टींना स्वीकारत नाही. खुद्द आइन्स्टाइन ‘क्वांटम एनटँगलमेंटला’ स्विकारू शकला नाही, त्याला तो ‘स्पूकी एक्शन’ म्हणून मोकळा झाला.
दुसरं कारण, एखाद्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असणे. आतापर्यंत सगळीकडे फक्त वचनं, उपदेश, प्रवचनं दिली जात होती, फक्त थियरी. प्रॅक्टिकल मार्गच सांगितला जात नव्हता ज्याने डीप सीटेड ट्रस्ट इश्युज असे कसे जातील. फक्त मन स्थिर करा, शांत रहा, स्थितप्रज्ञ व्हा असे फक्त थिरियोटीक उपदेश, पण मन स्थिर करायचं म्हणजे काय करायचं ह्याचा ‘योग्य आणि पायऱ्या-पायऱ्यांचा डॉक्युमेंटेड मार्ग’ कोणीच सांगत नव्हतं. योगाच्या आणि प्राणायामाच्या मार्गाचं जे काही सांगितल जात होत ते फार वरवरचं होतं, त्यात डीप सीटेड ट्रस्ट इश्युज निघून जातील इतकं खोलवर जाणं नाहीयेय. हे फारच धाडसाचं आणि आक्षेपार्ह विधान आहे म्हणून माझा वैयक्तिक अनुभव शेअर करतो ते जस्टिफाय करायला.
मी सद्गुरूंच्या ईशा फाउंडेशनचं ‘इनर इंजिनियरिंग’ ह्या शिबीराला जाऊन आलोय. त्यात एक क्रिया आहे. डोळे बंद करून, सगळ्या शरीराला जसं वाटेल तसे आळोखे पिळोखे देत नाचायचं किंवा शरीर सैल करायचं, संगीताच्या तालावर. मनात कसलेलही किंतू न बाळगता कसल्याही Inhibitions न बाळगता फ्री फ्लो मधे मुक्त व्ह्यायचं. ते सेशन संपल्यावर असं सांगितलं, “‘ह्या क्रियेने आता तुमची सगळी जुनी कर्म गळून पडली आणि तुम्ही हलके झालात.” त्यावर ६०-७०% शिबिरार्थींचा विश्वास बसला असावा, श्रद्धेपोटी, (अंध?)विश्वासामुळे.
आपले डीप सीटेड ट्रस्ट इश्युज अचेतन मनाच्या खूप खोल तळाशी दडपलेले असतात. मनाच्या खूप खोल तळापर्यंत गेलं तर त्यांना साफ करता येऊ शकेल. पण मनाच्या तळाशी पोहोचायचं कसं? आणि पोहोचलो तरी डीप सीटेड ट्रस्ट इश्युज साफ करायला शोधायचे कसे? समजा एखाद्यावरच्या रागामुळे डीप सीटेड ट्रस्ट इश्यु झाला असेल आणि त्याला घालवायचं असेल तर त्याला शोधायचे कसे?
विपश्यना ध्यानप्रणाली ह्याचा प्रॅक्टिकल मार्ग दाखवते, खात्रीचा! त्या मार्गाने गेल्यास आपले डीप सीटेड ट्रस्ट इश्युज जातात. हे वचन नाही, प्रॅक्टिकल मार्ग आहे. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. पण हा मार्ग चिंतनाचा किंवा चर्चेचा नाही, तो प्रत्यक्ष अनुभूतीचा मार्ग आहे.
बुद्ध सांगतो प्रज्ञा ३ प्रकारची असते
१. श्रुत प्रज्ञा - ऐकीव माहितीवर मिळालेली
२. चिंतनमय प्रज्ञा - चिंतन करून, मनन करून, नेती-नेती करून मिळालेली
३. भावनामय प्रज्ञा - प्रत्यक्ष अनुभवलेली, अनुभूतीद्वारे मिळालेली
दुर्दैवाने आपण पहिल्या दोन प्रकारांमध्ये अडकून पडलो आहोत. ३ ऱ्या प्रकाराची आपल्याला (स्वतःला) ओळख नाहीयेय त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव, अनुभूती नसल्याने आपण दुसऱ्यांच्या अनुभूतीच्या शब्दजंजाळात अडकून पडलो आहोत.
विपश्यना भावनामय प्रज्ञेचा मार्ग दाखवते, प्रत्यक्ष अनुभूतीचा. जी अचेतन मनाच्या खूप खोल तळाशी घेऊन जाते आणि आपले डीप सीटेड ट्रस्ट इश्युज दाखवून देऊन त्यांच्यापासून मुक्ती देते. ऑल वुंड्स गेट हील!
- (साधक) सोकाजी
धनश्री,
धनश्री,
आपल्या आयुष्यातील घटना आपण आपल्या दृष्टीने पाहतो.
जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडून त्रयस्थ दृष्टीने पाहता तेव्हा त्यातील layers लक्षात येत जातात. आपण पाहिलेली घटना आपल्याच आयुष्यातील असली तरी ती आपण कधी कधी मनाच्या डोळ्यांनी पाहिलेली असू शकते. आपले मन हे षड्रिपू सारख्या अनेक विचारांनी प्रभावित असू शकते.
तुम्ही जेव्हा स्वतः त्यातून बाहेर पडून फक्त विचाराच्या व लॅाजिकच्या दृष्टीने पाहू लागता तेव्हा अनेक गोष्टींचा, आपल्या व सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याचा उलगडा होतो. यालाच तटस्थ, साक्षीभाव म्हणता येईल ना?
त्यामुळे आपल्या पूर्व आयुष्यातील अनेक गोष्टींचा सल कमी होतो.
When you disappear, your problems disappear.
-Kapil Gupta
सोत्री व अतरंगी - माझ्या
सोत्री व अतरंगी - माझ्या कमेन्टची दखल घेउन, सविस्तर प्रतिसाद दिलात. अनेक चांगल्या गोष्टी त्यातून कळल्या. आपली आभारी आहे.
@रॉय
@रॉय
>> आसक्तीशिवाय सौंदर्याचा ध्यास घेता येत नाही.
यामध्ये आसक्ती (attachment) आणि आस्वाद /अनुभूती (appreciation) यांची गल्लत होते.
उदा.:
बागेतले गुलाबाचे फूल पाहणे आणि पाहताच चेहऱ्यावर हलकेच स्मितहास्य फुलणे हा सौंदर्याचा अनुभव, आस्वाद .
ते फूल खुडून सदऱ्याला खोचणे किंवा स्त्रीच्या केसात माळणे ही आसक्ती
पहिले मुक्त करते, दुसरे बांधते.
तात्पर्य: आसक्ती शिवाय सौंदर्याचा आस्वाद घेता येतो; पण आसक्ती आल्यावर सौंदर्य बंधनात बदलते.
बाकीचा प्रतीसाद वाचून स्वधर्म यांना पडलेला प्रश्न रास्त आहे असे म्हणायला वाव आहे.
- (आस्वादी) सोकाजी
@ एक लेखक
@ एक लेखक
तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण आता लिहावसं वाटत नाही असं मात्र म्हणून नका, प्लीज लिहा!
@रॉय
ध्यान सुरू करण्यामागे काही वैयक्तिक कारणं होती. बऱ्याच ध्यानप्रणाली अभ्यासल्यानंतर विपश्यना ध्यानप्रणाली ही प्रॅक्टिकल, शास्त्रीय बैठक असलेली आणि अत्यंत परिणामकारक ध्यानप्रणाली आहे हे जाणवलं आणि त्यात स्थिरावलो. ध्यानाबद्दल फार लहानपणापासून आकर्षण होते, वडिलांमुळे. ते माझे गुरूबंधू ही होते, त्यांचे बहुतेक गुरु हे माझेही गुरू होते लहानपणी.
दारू/कॉकटेल लाउंज बंद होणं हे बाय प्रोडक्ट आहे, ठरवून केलेलं नाही.
- (आभारी) सोकाजी
@रॉय,
@रॉय,
तुंम्ही भरपूर लिहिले आहे. पण तुमचे विचार विपश्यना शिबिरातल्या अनुभवावर आधारित आहेत की तुमच्या वाचन व चिंतनावर आहेत ते मी विचारले होते. ते काही तुम्ही लिहीले नाही. असो.
तुम्ही विपश्यना साधनेमुळे एक प्रकारची उदासीनात येईल व कला किंवा इतर सौंदर्य निर्मिती होणार नाही असे काहीसे म्हणत आहात. माझा विपश्यना शिबिरातला अनुभव बरोबर उलट आहे. संपूर्ण ११ दिवसात तिथे सेवा देणारे लोक व केंद्राचे व्यवस्थापन पाहणारे लोक वेळेच्या वा कामांच्या बाबतीत जराही कुठे ढिले पडले आहेत असे मला जाणवले नाही. शिबिर उत्कृष्टच झाले पाहिजे असा त्यांचा ध्यास जाणवतो. तसेच काही साधकाना मी अगदी जवळून ओळखतो. त्यांच्या वागण्या बोलण्यात असे औदासिन्य जाणवले नाही. उलट ते अधिकाधिक दर्जेदार निर्मिती करत आहेत असेच जाणवले. विपश्यना केंद्रात अनुभवाला येणारे एकच औदासिन्य मला जाणवले ते म्हणजे देणगी मागणे किवा देणगी स्वीकारण्याबद्दल.
ज्ञानेश्वरी, गाथा, गीता इत्यादीबाबत आपण लिहिले आहे. अशा ग्रंथांबाबत माझा अनुभव असा आहे की त्यातल्या भाषेच्या सौंदर्यात व अध्यात्मिक संकल्पनांचे गूढ अर्थ शोधण्यात एक उच्च दर्जाचे बौद्धिक मनोरंजन होते पण आपल्या प्रत्यक्ष जीवनात व आचरणात फारसा फरक पडत नाही. असे अनेक ग्रंथोपजीवी प्रवचनकार आहेत ज्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात या ज्ञानाचा काही परिणाम झालाय असे दिसत नाही.
<<असे अनेक ग्रंथोपजीवी
<<असे अनेक ग्रंथोपजीवी प्रवचनकार आहेत ज्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात या ज्ञानाचा काही परिणाम झालाय असे दिसत नाही.>> योग्य निरीक्षण आहे.
फरक पडलेले काही असतीलही परंतु बोलबाला आणि त्यावर चर्चा करणारे जास्त दिसतात. लहानपणापासुन हे निरीक्षण आहे. घरी दारी सर्वत्र दिसणारे. गप्पा मारण्यास अध्यात्म-ज्ञानेश्वरी-गीता-दासबोध गप्पा संपल्या की मूळपदावर. त्यात समीक्षक झालेले वगैरे इतरांना उत्तम पत्र लिहितात पण ते स्वतः तेच आचरणात आणत नाहीत.
अर्थात काही आश्रम, देवस्थानही आहेत जिथे मनोभावे सेवा करणारे दिसतात. पण हे ज्ञानप्राप्तीतून की असं करायचं असतं, त्याने भलं होतं म्हणतात म्हणुन ते अलाहिदा.
विपश्यना शिबीर करून आलेले सुद्धा जणु दहा दिवस काश्मीरला फिरून आलो, काय मस्त होतं ना! त्या आठवणी अनुभव आता आयुष्यभर पुरतील, जाऊन याच एकदा अशा रीतीने सांगणारे, आणि मग मूळपदावर आलेले अनेक दिसतात. काही त्यात चमत्कार सापडलेलेही दिसतात (त्यानेच बोलावलं गेलो, आल्यावर अमुक काहीतरी शुभं झालं वगैरे.) ही उदाहरणे स्वतः पाहिलेली, जवळची आहेत. काही प्रचंड सकारात्मक फरक पडलेली उदाहरणे सुद्धा आहेत.
पण ध्यानात काही असेल तर ते कुठला चमत्कार, त्यात दैवी अनुभव, देव, धर्म वगैरे काही नसुन ती स्वतःची खोल मानसिक ओळख करून देणारी, मनोविकार दूर करून मनावर ताबा मिळवून देणारी वगैरे अशी ध्यानप्रणाली असेल अन्यथा बाकी सगळ्या केवळ आपापल्या परीने आपापल्या समजुती कल्पना हे वेगळे सांगणे न लगे.
हेच कुठल्या इतर मार्गांनी कुणी करू शकत असतीलही, विपश्यना त्यातला एक मार्ग नक्कीच वाटतोय.
धन्यवाद सोत्रिजी आणि मानवजी.
धन्यवाद सोत्रिजी आणि मानवजी.
मानव यांचा मुद्दा मला पटला आहे. निव्वळ वाचनाने अनुभव येत नाही. नाहीतर ऑटोमोबाईल इंजिनियरने डिग्री घेतल्या घेतल्या कार मधला फॉल्ट शोधून इंजिन खोलून दोष दूर केलाय असे चित्र दिसले असते.
स्वधर्म,
स्वधर्म,
>> तुंम्ही भरपूर लिहिले आहे. पण तुमचे विचार विपश्यना शिबिरातल्या अनुभवावर आधारित आहेत की तुमच्या वाचन व चिंतनावर आहेत ते मी विचारले होते. <<
मी याचे उत्तर दिलेले आहे. मला ते देणगीसाठी मेल करतात म्हणून. ते साधकांनाच मेल करतात. आणि माझ्या अनुभवावरून तसे मी सांगत आहे.
मी धम्मालय आळते आणि धम्मसुगंध भोसे या दोन ठिकाणी शिबिर केलेले आहे.
मी ज्या संज्ञा वापरत आहे त्यांना गोयंका गुरुजींच्या शिबिरात त्यायोगे स्क्रिप्चर मधे जो अर्थ आहे तोच आहे.
उदा. आसक्ती म्हणजे attachment च. आणि आस्वादाबरोबर मी त्याची अजिबात गल्लत करत नाही.
शिवाय मी ज्या स्केल वर बोलत आहे तो नॅनोस्कोपिक आहे, परंतु तुम्ही त्याचे रूढार्थ घेऊन वरवरची उदाहरणे देऊन मला समजावून देण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे मनाच्या कंप्युटेशनच्या लेवलवरच्या संस्कारांबद्दल मी बोलत आहे. एखाद्या मनुष्याने एखाद्या गोष्टीचा ध्यास मुळात 'का' घ्यावा याचे कोणतेही उत्तर मला शिबिरातून किंवा त्यायोगे तपासलेल्या भारतीय ग्रंथांतून मिळालले नाही. हा प्रश्न valid आहे.
सोकाजी ज्या प्रत्यक्ष भावनामय अनुभूतीच्या कोशाबद्दल बोलत आहेत तो मनाच्या कंप्यूटेशन स्तरावरचा असा नॅनोस्कोपिक आहे. ती अनुभूती म्हणजे शिबिरात जाण्याची वरवरची अनुभूती नव्हे.
शिवाय विपश्यना शिबिर करायला येणारे जवळ जवळ सर्व लोक ट्रांसॅक्शनल वृत्ती घेऊन येतात असे मला जाणवले. एक सायको थेरपी म्हणून. मी तशी कोणतीही अट न ठेवता केवळ अन केवळ उत्सुकतेपोटी ती केलेली आहे.
>> असे अनेक ग्रंथोपजीवी प्रवचनकार आहेत ज्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात या ज्ञानाचा काही परिणाम झालाय असे दिसत नाही. <<
हेच बहुतेक साधकांबद्दल देखील. अगदी जे सांगत असतात की आमच्यावर सकारात्मक वगैरे परिणाम झाला त्यांना साधी चहाची तल्लफ सुद्धा शमवता येत नाही. बिट्स आणि पिसेस मधेच वरील ग्रंथांचा प्रभाव ही सर्व मनुष्यमात्रांवर पडत असतो. ते गृहीतच धरलेले आहे.
सिलेक्टिव आसक्ती हाच दु:ख मुक्तीचा मार्ग आहे.
- नबुद्ध उर्फ अडाणी गौतम
@रॉय,
@रॉय,
आपण एक नव्हे तर दोन विपश्यना शिबिरे केली आहेत हे स्पष्ट केल्याबद्दल आभार. कदाचित माझ्या नजरेतून सुटले असावे. नेनोस्कोपिक स्केल व मनाच्या कॉम्प्युटेशन लेवल वरील हे काही मला समजले नाही. पण यावर आता इथे चर्चा करून काही समजेल असे वाटत नाही.
बाकी आपण म्हणता की काही लोकाना ती साधना (किंवा कोणतीही साधना) करून साधी चहाची तल्लफही शमवता येत नाही. याबाबत संपूर्ण सहमत आहे. पूज्य समजल्या गेलेल्या ग्रंथांचे वाचन (पारायण) करण्याने सुध्दा अगदीच वरवरचा फरक पडतो. उलट लोकांकडून इतका आदर मिळतो की साध्य मिळालेच असे पठण करणाऱ्या लोकाना वाटते. मला वाटते बुद्धाच्या मार्गात अशी भ्रामक मुक्तीची शक्यता तुलनेने कमी आहे.
विपश्यना असो की कोणतीही गोष्ट
विपश्यना असो की कोणतीही गोष्ट, ती फक्त एकदा केल्याने कोणीही त्यात मास्टर कसे होईल?
वरच्या अनेक प्रतिसादांमधे विपश्यना केलेल्या काही व्यक्ती शिबिरानंतक पण कशा वागतात याविषयी उल्लेख आले. एखाद्याने फक्त विपश्यना शिबिर केले तर लगेच त्यांच्यात आमुलाग्र बदल होईल ही अपेक्षाच चुकीची आहे.
जगातली कोणती गोष्ट अशी दहा बारा दिवसात साध्य होईल?
शिबिर करून आल्यावर नंतर तुम्ही किती वेळा साधना करता, रोजच्या दैनंदिन जीवनात स्वतःचे निरीक्षण करून कसे स्वतः मधे बदल घडवत जाता यावर त्या व्यक्तीतील दुरगामी बदल अवलंबून असतील ना?
शिबिरात ही गोष्ट सांगतात की. एकदा एक शिबिर केले आणि तुम्ही लगेच बुद्ध झालात असे होत नाही.
शिबिर ही फक्त एक पहिली पायरी आहे.
जर मी शारीरिक व्यायामाचे व आहाराचे एक शिबिर केले, ज्यात रोजचा व्यायाम व आहार काय असावा ते त्यांनी शिकवले व दहा दिवस करून घेतले, पण ते शिबिर झाल्यावर मी त्यातली सगळी शिकवण बासणात गुंडाळून ठेवली व त्याचा कधीही काहीही वापर केला नाही तर मी निरोगी होईन का?
तसेच विपश्यनेचे पण आहे.
It’s not a destination or goal, it’s a process.
@अतरंगी नेमके! सहमत आहे.
@अतरंगी
नेमके! सहमत आहे.
समाधी साधन | संजीवन नाम |
समाधी साधन | संजीवन नाम |
शांति दया सम | सर्वांभूती ||१||
शांतिची पैं शांति | निवृत्ती दातारू |
हरिनाम उच्चारू | दिधला तेणे ||२||
शम - दम - कळा| विज्ञान-सज्ञान |
परतोनि अज्ञान | न ये घरा ||३||
ज्ञानदेवा सिद्धी-साधन अवीट |
भक्तिमार्ग नीट | हरिपंथी ||३||
कळा - युक्ति, कौशल्य , दम - इंद्रयनिग्रह , पैं - निश्चर्य्यार्थक , शम - मनोनिग्रह, संजीवन - पुनरूज्जीवन
हा धागा ऑफलाईनही आठवत राहतो.
हा धागा ऑफलाईनही आठवत राहतो.
खरं तर विषय एव्हढा व्यापक आहे कि छोटंसं काही लिहीलं कि अर्थाचे अनर्थ होतील का ही काळजी लागून राहते.
मी लिहीताना त्या त्या वेळी लागू असलेल्या अटी न लिहीता गृहीत धरून लिहीते. एका दमात. नंतर लॉग आउट झाल्यावर टर्म्स अॅण्ड कंडीशन्स लिहायला हव्या होत्या हे आठवते. आता कुणाचेही प्रतिसाद न वाचता राहून गेलेले लिहून काढते.
ओशोंची प्रवचने मला आवडतात. युट्यूबवर त्यांची प्रवचने डाऊनलोड करून ऐकत बसते. त्यामुळे माझी विचारसरणी त्या अनुषंगाने आहे. नंतर लक्षात आलं कि ओशोंची समाधी आणि ध्यान, गोएंका गुरूजींचे समाधी आणि ध्यान आणि बुद्धाची समाधी - ध्यान तसेच संतांचे ध्यान यात थोडा थोडा फरक आहे. त्यामुळं एका वेळेला एकाच पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांच्या कन्सेप्ट्स लक्षात ठेवून समजून घेता येतं. नाहीतर गोंधळ उडतो.
ओशो म्हणतात कि तल्लीनता म्हणजे ध्यान. तुम्ही करत असलेलं काम एकाग्रतेने करणे म्हणजे ध्यान. चालता चालता चालण्याच्या क्रियेवर लक्ष केंद्रित करून चालण्याची मौज लुटता यायला लागली तरी ध्यान लागतं. आताच माझी फकिरी ही कविता वर आलेली पाहिली. हा फकीर म्हणजे एक बंजारा आहे. त्याच्याकडे एकतारी असते. त्याला जगाचं भान नसतं. तो एकतारी घेऊन त्याच्या धूनवर गाणं म्हणत फिरत असतो. स्वतःच्याच तंद्रीत. तेच ध्यान लागणे.
संन्यास न घेतलेल्यांना ध्यानाचा उपयोग करत असलेलं काम तल्लीनतेनं करता यावं इतकाच आहे. याला सौम्य विपश्यना म्हणतात. आपल्या हातातलं काम त्या कामाकडे तटस्थपणे बघून ताण न घेता करता येण्यासाठी मन स्थिर असावं लागतं त्यासाठी विपश्यना मदत करते. माझी एव्हढीच अपेक्षा आहे.
याच्या पुढची स्टेज म्हणजे संन्याशांसाठी सांगितलेलं व्रत. ते कडक आहे आणि त्यांचं ध्यान लागणं हे मोह मायेपासून मुक्त होण्यासाठी आहे. ती वेळ आपल्यावर आलेली नाही. जर संन्यास घ्यावासा वाटला आणि निब्बाणाला जावे असे वाटले तर बेशक तसे करावे. कदाचित काही वर्षांनी वाटेलही तसे. त्या वेळचं त्या वेळी बघू. आता सौम्य विपश्यना भरपूर आहे . इथे टिंगल करतील म्हणून सांगितले नव्हते. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची दोन वेगवेगळी शिबीरे पण केली आहेत. एका शिबीरात जे गुरूजी होते ते खूप हुषार होते. ते पेशाने मानसोपचारतज्ञ होते. त्यांनी अक्षरशः दहा मिनिटात सर्वांना ध्यानाच्या अवस्थेत नेले. तोअनुभव अवर्णनीय होता. दोघा तिघांचे नव्हते लागले कारण त्यांचे मन साशंक होते.
वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे ध्यान लावण्यासाठी शंका बाजूला ठेवणे गरजेचे आहे. सोकाजी आणि माझी वेव्हलेंग्थ जुळत नसल्याने त्यांचे म्हणणे मला समजत नाहीये. कदाचित नंतर पुन्हा आल्यावर समजेल आणि कळेलही.
एकदाच ऑफिसमध्ये एक माणूस
एकदाच ऑफिसमध्ये एक माणूस (गोरा) ध्यान शिकवण्यास आलेला. लंचटाईममध्ये
पण त्याचा आवाज इतका शांत होता.ताबडतोब मला असे वाटले डोळे मिटल्यावरती - मी पाण्यात आहे आणि वरती गुलाबी लाटा फेसाळ अश्या उसळतायत , हेलकावे खातायत. मला फार शांत वाटलेले स्मरते आणि नंतर बेक्कार कोव्हिड सुरु झाला व परत काही ऑफिसात ध्यान वगैरे झाले नाही.
>> मी आर्ट ऑफ लिव्हिंगची दोन
>> मी आर्ट ऑफ लिव्हिंगची दोन वेगवेगळी शिबीरे पण केली आहेत. एका शिबीरात जे गुरूजी होते ते खूप हुषार होते. ते पेशाने मानसोपचारतज्ञ होते. त्यांनी अक्षरशः दहा मिनिटात सर्वांना ध्यानाच्या अवस्थेत नेले. तोअनुभव अवर्णनीय होता. <<
>> एकदाच ऑफिसमध्ये एक माणूस (गोरा) ध्यान शिकवण्यास आलेला. <<
रानभुली,
यावरून एक मुद्दा आठवला की गुरु निवडताना तो किती हुशार आहे म्हणजे फॉर्मली शिकलेलेला आहे आणि इंटेलेक्चुअल आहे हे पाहण्यापेक्षा आपण त्याच्याशी 'कनेक्ट' होतो का ते पाहावे. गुरु कडे अनुभवांचा विस्डम हवा. म्हणून गुरु फॉर्मली किती किती हुशार आहे याला काही महत्व नाही. अत्यंत कमी बोलणारे परंतु ज्यांच्या पायाशी बसल्यावर, ज्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर निरतिशय शांत वाटावे असे काही लिंगायत गुरु मी पाहिले आहेत. आमच्या इकडचे साधे सामान्य लोक त्यांना गुरुस्थानी मानताना त्यांनी किती वितंड वाद केला आहे वगैरे काही पाहत नाहीत. समर्पण इतक्याच भावनेला महत्त्व असते.
मला भारतीय लोक सगुण भक्तीत इतके (का) रमतात याविषयी पूर्वीइतके पाखंडी विचार येत नाहीत.
चांचल्य हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. कारण मन हे मेंदूच्या जैविक प्रोसेसर कॉम्प्युटेशनल पातळी वर जरी कमी आयसोलेशन लेवल असले तरी प्रत्यक्षात हा प्रोसेसर इतका फ़ास्ट आहे ही तो एकाच वेळेस अनेक गोष्टी करू शकतो असे सिम्युलेशन तयार होते.
याविषयी आपल्या चरक संहितेत विस्ताराने आले आहे. मनाच्या अणूत्व (atomicity) सारख्या प्रॉपर्टी व्यवस्थित समजावून सांगितले आहे.
चंचल मनाच्या मूळ आयसोलेशन पातळीवर जाऊन एकाग्रचित्त होणे शक्य असावे मात्र ते शतकांत एखाद्याला साध्य होत असावे. त्यामुळे parallel थ्रेड्स जितक्या कमीत कमी करता येतील तेवढा प्रयत्न करत राहावा. तरीही मन चंचलच राहणार आहे.
मन चंचल नसले असते तर माणूस इवॉल्वच होऊ शकला नसता. त्याला मारायला इतके वेरियेबल्स आजूबाजूला असताना मनाला स्थिर राहणे केवळ अशक्य असावे.
विपश्यनेसारखी एक निरस, कठोर, सृजनहीन साधना सतत करत राहून (सुरुवातीला तिही confined space मधे) मनाचा स्थायीभाव बदलण्याचा अट्टाहास का करावा तर त्यातून कदाचित (कदाचितच) दु:ख मुक्तीचे कमळ फुलेल म्हणून? मन हे चंचल चिखल आहे ही काय अनैसर्गिक गोष्ट नाही. मन तसे असण्याला लाखो वर्षांची उत्क्रांती घडलेली आहे. ती घडली आहे म्हणजे ती नैसर्गिक निवड आहे. मग मनाचा हा स्वयंभू स्वभाव बदलून दु:ख मुक्ती कशी काय बरे साधता येईल?
बुद्धाच्या काळात सरासरी वय ७३ नव्हते. साहजिक तेव्हा वेदनांचे प्रमाण ही जास्तच असेल. माणसांना आठ आठ नऊ नऊ मुलं जन्माला आली की एखाद दुसरे जगत असे. आज एखादे मूल पुरेसे असते ते शांतपणे सुखात वाढते. तेही होत नसेल तरी तंत्रज्ञान आहेच की, तोही प्रश्न सुटला. ते मूळ किमान ७३ पर्यंत जगेल अशी एक मोठी शक्यता आजच्या भारतात नांदत आहे. आज लोकांवर ताण आहे म्हणताहेत, मग आठाठ बाळंतपणे अयशस्वी होणाऱ्या त्या जुन्या काळात, लावलेली ज्वारी येईल का नाही याची घंट्याची शाश्वती नसणाऱ्या त्या काळात लोक किती ताणात असतील? आज कसला इतका प्रचंड ताण आहे?
अशी काय मोठी दु:खे कोसळत आहेत आताच्या मानवांवर? तरीही हा आटपिटा का करत आहेत लोक?
कदाचित हाही एक शायनिंग मारायचा प्रयत्न तर नाही ना? आम्ही पाहा कसे enlightened? कदाचित हा सुप्त अहंकारच असावा.
विपश्यना करायला जाणारी लोकं बरीच सुखवस्तू लोक असतात. (सरकारी नोकरांना तर पगारी सुट्टी मिळते शिबिरांसाठी. त्यांची संख्या बरीच असते.) या कुणाला दु:ख मुक्तीची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. (किमान माझ्या बॅच च्या वेळेच्या साधकांपैकी ४० टक्के MPSC वाले, २० टक्के सरकारी नोकर, आणि उरलेले आमच्या सारखे रैंडम पण चांगल्या खात्या पित्या घरचे लोक होते.)
बुद्ध किंवा गीता सांगणारा कृष्ण ही राजकुमार राजे मंडळी होती. त्यामुळे त्यांच्या त्यागाला अजूनच ग्लोरिफिकेशन मिळालले आहे.
अतरंगी,
अतरंगी,
>> शिबिरात ही गोष्ट सांगतात की. एकदा एक शिबिर केले आणि तुम्ही लगेच बुद्ध झालात असे होत नाही. <<
मलातरी बुद्ध व्ह्यायची काडीचीही इच्छा नाही. मी दु:खी झालो तरी तेही नैसर्गिकच आहे तेही मी तितक्याच तीव्रतेने भोगेन.
To hell with this enlightenment!
म्हणुन आधी आपल्याला काय हवंय
म्हणुन आधी आपल्याला काय हवंय हे स्पष्ट हवं.
वरती रानभूली यांना स्वतःला काय हवंय, व तत्सम शिबीर यांच्यातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट केलंय आणि त्यानुसार केल्याचे समाधान सुद्धा झाल्याचे दिसते आहे.
अशा कुणाला पकडुन तू इथं नको यात काय पडलंय डोंबल, तू ती विपश्यनाच कर, म्हणुन मागे लागले तर काय होईल ?
आणि उलट ज्यांना यातुन पुढे जाऊन मनोविकार दूर करायचे असतील तर 'अरे पूर्वी किती त्रास, ताण, दुःख असेल लोकांना तुला तर चांगला पगार मते तुला कसला डोंबलाचा त्रास/ताण /दुःख रे? चल आर्ट ऑफ लिव्हिंग बेसिक कोर्स किंवा ते इनर इंजिनिअरिंग कर तेवढं पुरेसं आहे तुला' असं सांगितले तर काय फायदा?
इथं झालंय काय की रानभुली यांनी गोयंका विपश्यनाचा कोर्स केलेला नव्हता, त्यांच्या इतरत्र पोस्ट्सवरून आणि नंतर त्यांची इथली पोस्ट वाचून मला ते लगेच कळले. सोकाजीरावांना वाटले त्या गोयंका विपश्यनाबद्दल बोलत आहेत (धाग्याचा विषय तोच आहे) आणि कुणीतरी अनऑफिशियल भलतेच लोक त्याचे शिबीर चालवत आहेत. तिथुन सुरवात झाली.
त्यानंतर मग एकलेखक यांच्या पोस्ट त्यातून बुद्ध विपश्यना म्हणजे काय याकडे धागा वळला. आणि मग जे झाले ते मागील पानांवर दिसत आहे. त्यात रानभूली यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होता असे वाटत नाही.
या सगळ्यात वेल आपला विपश्यना अनुभव लिहू लागल्या होत्या, आता त्यांची पुढची पोस्ट आली तर ज्यांनी आधीची वाचली होती त्यांना लिंक लागेल, पण इतरांना साठी पहिली पोस्ट शोधणे जरा कसरत होईल. त्यांनी लिहावे, पण दोन्ही पोस्ट्स अलग, इथे शांतता प्रस्थापित झल्यावर किंवा वेगळ्या/नव्या धाग्यात असे मला वाटतेय, अर्थात त्यांचा निर्णय हे एक काय झाले याचे निरीक्षण आणि पुभाप्र आहे हे नोंदवण्यास.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे
ओके रॅाय.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, एखाद्याने शिबिर केले पण त्याला चहाचीही तल्लफ कंट्रोल करता येत नाही किंवा त्याच्यात काहीही बदल घडला नाही, हा मुद्दा विपश्यनेच्या चर्चेत गैरलागू असावा.
ज्या सवयी वर्षानुवर्षे आपल्यात भिनल्या आहेत त्याचे पाश असे एका रात्रीत तोडता येणे अवघड आहे. सवयी व स्वभाव बदलणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. कोणी ती केली नाही यात विपश्यनेला नावे ठेवण्यासारखे काही नाही.
विपश्यना आपल्याला एक मार्ग दाखवते, त्यावर चालणे न चालणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय.
यावरून एक मुद्दा आठवला की
यावरून एक मुद्दा आठवला की गुरु निवडताना तो किती हुशार आहे म्हणजे फॉर्मली शिकलेलेला आहे आणि इंटेलेक्चुअल आहे हे पाहण्यापेक्षा आपण त्याच्याशी 'कनेक्ट' होतो का ते पाहावे. >> मी असं कुठेच म्हटलेलं नाही कि तो हुषार आहे हे आधी समजल्याने ध्यान लागलं. दहा मिनिटात पूर्ण ग्रुपला ध्यानात नेणं ही हुषारी नाही का ? त्यांच्याबद्दल आम्हाला सेशन नंतर समजले. शांत आणि एक लयीत बोलणे ही कला असल्याने ते जे सांगत त्याने ट्रान्स मधे जायला होत होतं.
का कुणास ठाऊक या धाग्यावर गैरसमजच जास्त होत आहेत.
आता मात्र या धाग्याच्या ओढीने पुन्हा लॉग इन करणार नाही. धन्यवाद सर्वांचे.
आठाठ बाळंतपणे अयशस्वी
आठाठ बाळंतपणे अयशस्वी होणाऱ्या त्या जुन्या काळात, लावलेली ज्वारी येईल का नाही याची घंट्याची शाश्वती नसणाऱ्या त्या काळात लोक किती ताणात असतील? आज कसला इतका प्रचंड ताण आहे?>>>>
तेव्हा ताण होता का याची शंका वाटते.
प्रत्येकीची ७-८ मुले मरत आणि एक जगे असे नव्हते होत हो. कित्येकांची सगळी जगत. माझ्या ओळखीतच कित्येकांना आठ मावश्या व पाच मामा वगैरे होते
तुम्ही लिहिलेय ते तर त्याआधीचे.
तेव्हा डोक्यात शंका नव्हत्या. बहुतेक लोक सश्रद्ध होते, देवावर भार सोडुन निवांत होते. शेतात ज्वारी आली नाही तर गावचा सावकार द्यायचा, नाहीतर देशोधडीला लागायचे. पण म्हणुन जुन मध्येच नोवेंबरात तांदुळाचे पिक हाती लागेल का याचा ताण कोण घेत नसे. अन्याय गपचुप सहन केला जात असे. आयुष्यात संघर्ष भरपुर होता पण सहनशक्तीही तेवढीच होती.
आता लोकांना काहीच सहन होत नाही. इथे माबोवर लोक किती ट्रोलिंग करतात काही लोकाना, काही विषयांना. आपला ताण आपणच वाढवतोय, बाकी काही नाही.
>> का कुणास ठाऊक या धाग्यावर
>> का कुणास ठाऊक या धाग्यावर गैरसमजच जास्त होत आहेत.
आता. आता मात्र या धाग्याच्या ओढीने पुन्हा लॉग इन करणार नाही.
गैरसमज नाही वाटत, छान चर्चा चालू आहे, मतमतांतरं तर असणारच. त्यामुळे कृपया तुम्ही प्रतिसाद द्यायला येत रहा!
- (अभ्यासू) सोकाजी
>>>>>>मलातरी बुद्ध व्ह्यायची
>>>>>>मलातरी बुद्ध व्ह्यायची काडीचीही इच्छा नाही.
हे मान्य आहे की आयुष्य हे कधीकधी विषारी असते, पण म्हणुन हार मानायची का? जे अमृतमय क्षण आहेत ते का दवडायचे?
माझ्या बाळाबरोबरचे अनुभव इतके सुंदर आहेत की मलाही पुनःपुनः जन्म घेउन ते अनुभवायचेत. टु हेल विथ मोक्ष.
वरील उतारा हा अवांतर आहे. विपश्यनेशी त्याचा संबंध नाही.
Pages