विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.
१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.
येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.
धन्यवाद.
>>तुम्ही अधिक वेळा कॅम्पला
>>तुम्ही अधिक वेळा कॅम्पला जाता तिथे तुम्हाला साधनेच्या अधिक काही प्रक्रिया शिकवल्या जातात.
जस्ट एक सुधारणा, विपश्यना साधनेच्या अधिक काही प्रक्रिया नाहीत ज्या पुढ्च्या शिबीरांमधे शिकवल्या जातात, आनापान आणि विपश्यना ह्याच दोन ध्यानक्रिया प्रत्येक शिबीरांमधे करायच्या असतात. सगळ्या १०, २०, ३० ,३५ आणी ६० दिवसांच्या शिबीरांमधे ह्याच दोन ध्यानक्रिया त्याच वेळापत्रकानुसार करायच्या असतात.
>> अजून थोडे लिहायचे आहे ते लिहीनच लवकरच...
पुप्रप्र, लिहा लवकर वेळ काढून...
- (प्रतिक्षीत) सोकाजी
सोकाजीराव विपश्यना करून काही
सोकाजीराव विपश्यना करून काही फायदा होत नाही असे तुमच्या इथल्या वावरावरून वाटते.
प्रत्येक जण तुम्हाला शरण आला आहे असे का वाटते?
सोकाजीराव धन्यवाद. मी फक्त
सोकाजीराव धन्यवाद. मी फक्त एकच कॅम्प केला. त्यामुळे तेवढेच माहीत.
>> प्रत्येक जण तुम्हाला शरण
>> प्रत्येक जण तुम्हाला शरण आला आहे असे का वाटते?
काही कळले नाही, म्हणजे काय ?
- (जिज्ञासु) सोकाजी
मन स्थिर होणं एव्हढीच माझी
मन स्थिर होणं एव्हढीच माझी सध्याची गरज आहे. >> मग मायबोलीवर येणे बंद करावे लागेल, आंतरजालावर घालवताय तो वेळ पण कमी करावा लागेल. >>>
सोशल मीडीया पूर्ण बंद हे आताच नाही. तसे करता आले तर संपूर्ण मायबोलीला ताजमहाल मधे पार्टी देईन.
वेल, सुरेख लिहीलंत. आवडलं. सोकाजी, तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे, कळकळ पोहोचली. पण माझ्या काही धारणा आहेत.
मेडिटेशन मला किंचित किंचित जमू लागलं आहे. त्यासाठी तुमचं जे वेळापत्रक आहे त्याची मला आवश्यकत वाटत नाही. मुळात शरीराला लगलेल्या अनावश्यक सवयी तोडायच्या असतात त्यासाठी हा प्रोग्राम आहे. लहानपणापासून मनावर झालेले भले बुरे संस्कार काढून टाकल्याशिवाय त्यावर नवं बी रुजत नाही. या संस्कारात अहंकार आणि अन्य षडरिपू असतात. ते सर्व काढून मन शून्यवत करणे, म्हणजे चार्वाकाचा , बुद्धाचा शून्यवाद. याकडे जाण्यासाठी विपश्यना उपयोगी आहे. शून्यवाद आणखी कडक करणारं अजून एक नाव आहे, पण सध्या माझ्या हाताशी नाही.
मला इतके टोकाला जायचे नाहीये. संन्यास घ्यायचा नाहीये ना अध्यात्माला वाहून घ्यायचेय. जसे शरीर निरोगी करण्याचं एखादं टूल आलं तर एव्हढंही निरोगी होऊ नये कि कधी मृत्यूच येणार नाही. थोडं शरीर झडेल आणि वृद्धावस्थेत त्रास होणार नाही एव्हढंच बघावं. तसंच या जन्मात करायची सगळी कामं करायची तर त्यासाठी थोडा अहंकार, थोडा ताणतणाव गरजेचा आहे असं माझं मत आहे. हे कोणत्याही तत्वज्ञानात निषिद्ध असेल तर असो. मला त्याची पर्वा नाही.
एखादं काम करण्यासाठी थोडी स्ट्रेस घ्यावी लागते, तेव्हढी माझ्यात राहिली तर मला हवीच आहे. मला फक्त तिचे व्यवस्थापन करता येईल एव्हढेच स्वतःला आतून नियंत्रित करायचे आहे. इगो लेस किंवा शून्य अहंकार ठेवून मला समाजात वावरायचे नाही. जशास तसे उत्तर देणे थोडे कमी होईल, पण अनेकदा इगो आवश्यक असतो. तसे सध्या रशियाचं जहाज अमेरिकेने पकडल्यावर रशियाने जर अहंकारविरहीत भूमिका घेतली तर सुपरपावर म्हणून तिचं स्थान शून्यवत होईल.
हे सगळं एक्स्प्लेन करणं मला जमणार नाही कारण ते माझे माझ्या सोयीसाठी असलेले विचार आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे बुद्धाने सुद्धा गृहस्थाश्रमासाठी कडक नियम केलेले नाहीत. म्हणून मी सौम्य विपश्यना म्हटलं होतं. एक उत्सुकता म्हणून मी दहा दिवस शिबीराला जाईन, अर्थात माझा नंबर लागला तरची बात. नाहीतर लडाख, तिबेटला सुद्धा जाईन, ते ही सायकलवर. पण त्यासाठी थोडं धन गाठीशी पाहिजे आणि ते कमावण्यासाठी स्ट्रेस येणारच आहे.
तर तूर्तास हे असे विस्कळीत लिहून गायब होत आहे. धन्यवाद वाचल्याबद्दल.
>>>>>>>> त्यासाठी थोडा अहंकार
>>>>>>>> त्यासाठी थोडा अहंकार, थोडा ताणतणाव गरजेचा आहे असं माझं मत आहे.
होय खरे आहे. फक्त सत्व असेल, किंव फक्त रज असेल तरी त्रासच. तम हवाच. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ईरेला पडणे, अतृप्तीमधुन स्वतःची प्रगती होण्याकरता झटणे, हट्ट करणे, आपल्या संरक्षणार्थ संताप येणे हे सारे हवेच.
कशाचाही अतिरेक वाईटच. जसे बळीराजाही अति दानशूरत्वामुळे गोत्यात आला.
सगळे एव्हढं दणकून स्पष्ट
सगळे एव्हढं दणकून स्पष्ट लिहीत आहेत तर मी हात धुवून घेऊ का ?
कि मी लिहीलं कि इथला राग माझ्यावर दुसरीकडे निघेल ?
मला आधी नीट शब्दात नाही सांगता आलं. कुठल्याही संस्थेच्या नावाने चालणार्या जीवनकलेशी संबंधित शिबीराचा फायदा होणं यात नवीन काही नाही. चांगलंच आहे. खटकणारी बाब म्हणजे नंतर त्या संस्थेचे लोक मागे लागतात. आधी एस एस एस, मग फोन कॉल्स. त्याची भाषा खूप मृदू पण एक गोड धमकीही असते. लाजेकाजेस्तव तुम्ही पुन्हा जाता. मग तुम्हाला मोटिवेट केले जाते. असे न करणे म्हणजे केव्हढे मोठे पाप ( जे काही असेल ते) असं सुचवलं जातं. हळू हळू अनिच्छेने का होईना तुम्ही त्यांचा भाग बनता. तुमच्या भागात शिबीरे आयोजित करता. मग ही संस्था मोठी होई लागते.
जीवनकला हे फक्त एक माध्यम असतं लोक खेचायचं. विपश्यना केंद्रात असंच आहे असं म्हणायचं नाही. पण अशा दोन तीन संस्था डोळ्यांसमोर आल्याच असतील. या संस्थांचे चेहरे तुम्हाला दिसतात तेच सर्वेसर्वा आहेत कि ते कठपुतळी बाहुले आहेत ही भीती वाटते. काही वर्षांपूर्वी कला हा शब्द वापरणार्या एका संस्थेचे २५ लाख सदस्य होते. नंतर एकदा त्यांनी एकाच शहरात २५ लाख साधक जमवण्याचा विक्रम केला. आज ही संस्था जगभरात आहे. असेच कुणीतरी मोफत योग शिकवत होते.
हे मोफत कुणी तरी स्पॉन्सर तर केलेले नाही ना ? ज्यांच्याकडे सोन्याचा कळस बांधायचे पैसे आहेत ते खरंच देणग्यांवर अवलंबून असतील ?
उद्या ही संस्था एक उपयोगी कला शिकवून मोठी होत होत नंतर अशाच अन्य संस्थांची बहीण निघाली तर आश्चर्य वाटणार नाही. आम्ही सर्वस्पर्शी आहोत असं कुणी तरी म्हणतंच ना ?
एक लेखक -
एक लेखक -
एस एस वाय, आर्ट ऑफ लिविंग, इशा फाउन्डेशन (कसलेतरी इनर इंजिनिअरींग) आणि असे अनेक देशी - विदेशी संस्था त्यांचे कोर्स चालवतात. बहुतेक सर्व छोटे ध्यान धारणा कोर्सेस पासून सुरुवात करून आज प्रचंड मोठ्या 'उद्योगात' रुपांतर झालेल्या संस्था झाल्या आहेत. या सर्वांचे संस्थापक हे देव, ऋषी, गुरुजी, पूज्यनीय अश्या अनेकविध नावांनी ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांचे सत्संग, लोकांनी नियमितपणे भेटणे, शिबिरे करणे, साधकांची आपल्या आपल्यातच एक सोसायटी निर्माण होणे ही सर्व व्यवच्छेदक लक्षणे आहेत. हार्मलेस ते एमोशनली कॉस्टिक ते फिजिकली अब्युझिव्ह असा एक मोठा स्पेक्ट्रम आहे.
तुमच्या प्रश्नाचा रोख हा विपश्यना या स्प्रेक्ट्रममध्ये कुठे बसते हा दिसतो आहे.
विपश्यनेचा कल्ट अजूनतरी पाहण्यात आलेला नाही. विपश्यना शिबिरे केलेले, नेमाने करणारे, पुन्हा पुन्हा करणारे साधक, घरीच विपश्यना करणारे साधक, करून पुन्हा ढुंकुन न बघणारे शिबिरार्थी, करण्याची इच्छा आहे पण न जमणारे शिबिरार्थी यातल्या कुणाचेही ग्रुप बघण्यात नाही. हे लोक सत्संग , सामुहिक ध्यानाला वगैरे नियमितपणे भेटणे वगैरे करतात हे देखील दिसले नाहिये. मागणीच्या तुलनेत विपश्यना केंद्रे कमी आहेत त्यामुळे तिथे नेहेमीच शिबिरे लगेच भरतात, व अनेक लोकांना प्रवेश मिळत नाही. विपश्यना संस्था भारंभार केंद्रे उघडायच्या मागे आहे असे दिसत नाही. विपश्यना संपल्यावर कोणीही तुम्हाला देणगी द्या म्हणून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, गिल्ट ट्रॅप लावून वगैरे सुचवत नाही. बहुतेक इच्छा असेल तर अमूक इथे जाउन देणगी द्या असे एक कोरडे वाक्य फेकले जाते.
विपश्यना केंद्रे नेमकी कशी चालतात, कोण त्यांना मोठी देणगी देते की केवळ साधकांच्या देणगीतून चालतात याची कल्पना नाही. पण ती केवळ शिबिर संपलेल्या साधकांवर चालत नसावी - मोठे देणगीदार असणार हा माझा कयास आहे.
विपस्सना लोकांत पुन्हा आणणारे गोयेंकांचा श्री श्री गुरुजी झालेला नाही. त्यांच्या नंतर कोणी मठाधिपतीही नाहिये. ट्रस्ट चालवणारे लोक असतीलच पण त्यातले कोणी नवीन पूज्य गुरू झालेले नाही.
मी काही साधक, नियमित ध्यान करणारा व्यक्ति नाही. कुतुहल म्हणून या सर्व संस्थांकडे, त्यांच्या कारभाराकडे बघत असतो. वरती लिहिलेली माहिती ही वर्तमानपत्रे, फर्स्ट हँड अकाउंट, जवळपासच्या लोकांकडून समजलेली माहिती यावर आधारीत आहे. हा काही शास्त्रीय पद्धतीने केलेली डेटाचा अॅनालिसिस नाहिये.
विपस्सना ही बुवाबाजी, ध्यान शिबिरे यांच्या धंद्यातली भांगेतली तुळस आहे असे मला वाटते.
टवणे सर,
टवणे सर,
कदाचित मी जास्तच संशयी असेन. पण दूधाने पोळलं कि म्हणतात ना..
तुमची पोस्ट आवडली आणि पटली. तर्कशुद्ध आहे.
विपस्सना ही बुवाबाजी, ध्यान
विपस्सना ही बुवाबाजी, ध्यान शिबिरे यांच्या धंद्यातली भांगेतली तुळस आहे असे मला वाटते.>>
टवणे सर यांच्या आख्ख्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत.
टवणे सरांनी दिलेली माहिती
टवणे सरांनी दिलेली माहिती बरोबर आहे.
मी विपश्यना करून कित्येक वर्षे झाली. कोणीही देणगी मागायला येत नाही, संपर्क करत नाही. त्यांचे विभागानुसार whatsapp groups आहेत ते तुम्ही जॅाईन केले तर त्यावर विपश्यनेचे एक/तीन दिवसाचे कोर्स कुठे आहेत, सेवकांची गरज कुठे आहे याचे अपडेट येतात. फक्त ॲडमिन पोस्ट करू शकतात.
एक दिवसीय कोर्सला गेलात तरी कोणी तुमच्याशी बोलत, प्रचार करत नाही. देणगी मागत नाही. देणगी द्यायची सोय असते.
विपश्यनेच्या कोर्स मधे गोयंकाजींचे जे आख्यान असते त्यात दोन ते तीन गोष्टी सोडून खटकण्यासारखे काहीही नाही. आता करून बरीच वर्षे झाली पण त्यात ते कुठेतरी सांगतात की अमुक तमुक वर्षांनी विपश्यना पुनरूज्जिवीत होणार होती आणि जगभरात पोचेल असे भाकीत कोणीतरी केले होते. मग ते पुढे सांगतात की बरोबर त्याच वेळेस त्यांनी ती कला आत्मसात केली व आता जगभरात किती केंद्रे आहेत. सो, अप्रत्यक्षपणे ते स्वतःची पाठ थोपटत आहेत.
ही माहिती आठवेल तशी लिहीली आहे खरी आहेच असा माझा दावा नाही. माझी स्मरणशक्ती दगा देत असेल.
मी विपश्यना सोडून बाहेर कोणतेही कोर्सेस, शिबिरे केली नाहीत. माबोवरच विपश्यने विषयी वाचले होते. बहुदा पाचपाटील यांच्याच लेखानंतर मी हे करायला हवे असा निर्णय घेतला.
मला व्यक्तीशः अतिशय चांगला अनुभव आला. माझ्या जवळच्या सगळ्यांना मी आवर्जुन सांगतो की एक तरी दहा दिवसाचे शिबिर नक्की करा. तुम्हाला त्यात जे गवसेल ते फार महत्वाचे असेल.
आनापान, एकाग्रता, ध्यानधारणा वगैरे सगळे एकीकडे पण तिथे तुम्ही जेव्हा मोबाईल, नेट, मित्र, सहयोगी, फॅमिली यांच्या पासून दूर असता. पूर्ण मौन पाळता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पहायला वेळ मिळतो. ते जे self realisation येते ते कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्वाचे आहे.
माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे हा
माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे हा धागा वाचनीय झाला आहे.
फक्त एक बाब खटकली. रशिया अमेरिका हे एकरेषीय नाही. इथे लिहीणे योग्य नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/83373
हा एक छान अनुभव,..
टवणे सर,
टवणे सर,
विपश्यना केंद्र चालवायला स्थानिक लोकांनी पुढाकार घेतलेला असतो, त्या त्या सेंटरची व्यवस्थापकीय बॉडी स्वतंत्र असते. त्यामुळे मार्केटिंग स्पॅमिंग हे सुद्धा सेंटर सेंटर नुसार ठरते.
मला आळते सेंटरचे वर्षाला एक दोन मेल देणगी साठी येतात. परंतु त्यात काय हवे आहे, काय करायचे आहे याचा स्पष्ट उल्लेख असतो.
गुरुजींना पूज्य म्हणण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांचाही यथावकाश श्री श्री होऊ शकतो. फक्त प्रक्रिया स्लो असेल.
अजून एक म्हणजे गुरुपरंपरेला थेरवादात किंवा इतर बौद्ध परंपरांतही स्थान आहे त्यामुळे गुर्जींच्या अभावातून गुरुजींचे अस्तित्व तरळत ठेवण्याचे कार्य यशस्वीपणे केले जाते.
किंबहुना आम्ही गुरुजींच्या प्रतिमा न वापरता त्यांचे देव्हारे माजवत नाही या ठसवण्यातून त्यांना नेमके काय अपेक्षित आहे? म्हणजे न-प्रतिमेतून देव्हारे माजवणेच होय. शिवाय रोज गुरुजींच्या वीडियो कॅसेट्स लावलेल्या असतातच ना. मला हे काही विशेष पटले नाही पण ते अग्रेसिव नाहीत एवढे खरे.
विपश्यना ही औदासीन्यतेची साधना आहे. आयुष्याला जास्तीत जास्त नीरस करत नेणे आणि स्व विरघळवून टाकणे (जे मला अजिबात मानवी वाटत नाही) ही कोणत्याही सृजनशक्यतेवर बेसिक घाला आहे. कोणतीही कला त्यातून निर्माण होऊ शकत नाही. अहंभाव हा कोणत्याही सृजनाचा मुख्य पाया आहे आणि कोणत्याही कलेमधे कलावंताच्या अहंतेमुळेच श्रेष्ठत्व प्राप्त होते. नीरस साधनेतून कोणतेही सौंदर्य जन्माला येऊ शकत नाही. मानवी आयुष्यात चिन्हांना प्रचंड महत्व आहे आणि चिन्हांचा अव्हेर करणारी कोणतीही साधना अमानवी आहे. चिन्हांशिवाय सौंदर्य नाही, सौंदर्याशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही, आणि अहंभावाशिवाय आत्मभावाशिवाय सौंदर्याची, कलेची लालसा शक्य नाही. राग लोभ अनुरागांशिवाय शिवाय आयुष्याला अर्थ नाही.
ही उदास साधना केवळ साधनांसाठी आणि प्रक्रियेच्या अनुभवाच्या (साध्यासाठी नव्हे) नॉव्हेल्टी साठी करायची असल्यास म्हणजे मोबाईल पासून दूर राहणे, दहा दिवस मौन राहणे वगैरे करायला विपश्यना करायची गरज नाही.
अनुभव म्हणून ठीक आहे, तत्त्वज्ञान मला मान्य होऊ शकत नाही. आणि अनुभव देखील हा मला नीरसते कडे नेणारा वाटला.
विजय देशमुख,
तुमच्या चेहऱ्याकडे पाहून विपश्यना तुम्हाला पटेल असे वाटत आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, इतरांना विचारून तुम्हाला काही फारसे हाती लागणार नाही. आरशात पाहिले तर अजून वजन कमी झाल्याने कसे दिसाल याची कल्पना येईल. त्यावरून ठरवा.
रामदेव बाबा, श्री श्री श्री
रामदेव बाबा, श्री श्री श्री इत्यादींना बुवाबाजी नक्कीच म्हणता येत नाही. त्यांच्या कडे जाणारे लोक तंत्र मंत्र म्हणून त्यांच्याकडे जात नाहीत.
ते कल्ट बनत आहेत आणि नंतर एखाद्या विचारसरणीला तुम्हाला बांधून घेत आहेत. लोकल गुंडे आणि राजकारणी यात जो फरक आहे तो .
शाह रुख खानचा कल्ट आहे का?
शाह रुख खानचा कल्ट आहे का?
याचे उत्तर "ते" देऊ शकतील.
याचे उत्तर "ते" देऊ शकतील.
गोएंका गुरूंजीची विपश्यना ही
गोएंका गुरूंजीची विपश्यना ही त्यांच्या मायग्रेनच्या तासातून मुक्त झाल्यानंतर आली आहे. गोएंका गुरूजी यांचे कोणत्याही सांस्क्रुतिक / राजकीय संघटनेशी संबंध असल्याचे संदर्भ , पुरावे नाहीत. नाहीतर आता पर्यंत गदारोळ झाला असता.
गोएंका गुरूजींच्या विपश्यना पंथाबद्दल बौद्ध आणि हिंदू दोन्ही धर्मियांना आक्षेप आहेत. गोएंका विपश्यना पद्धतीत कुणाचीही मूर्ती नसते. त्यात कोणताही धर्म ते आणत नाही. धम्म हा ते वेगळ्या अर्थाने घेतात. त्यांनी जी विपश्यना सांगितली आहे ती गृहस्थांसाठीच आहे.
जे लोक जास्त चिकित्सक आहेत, ज्यांना सूचना ऐकल्यानंतर ती अंमलात आणण्याऐवजी प्रश्न पडतात त्यांना विपश्यना योग्य नाही. हा प्रकार म्हणजे अनुभव घ्या आणि ठरवा असा आहे. किमान पहिल्यांदा तरी ओपन माईंडने सर्व सूचनांचं पालन करता येत असेल तरच विपश्यनेला जा. शंका, कुशंका, प्रश्न यामुळे नुकसान तुमचेच.
पहाटे चार ला उठण्याची जी शिस्त आहे ती तुमच्या शरीराचे बॉडी क्लॉक ठीक करण्यासाठी आहे. रात्रभर जागरण करणे, सकाळी उशिरा उठणे ही जीवनशैली अनेक रोगांना निमंत्रण देते. त्यामुळे सुद्धा ताण वाढतो. अशा शरीराला विपश्यना करता येणार नाही. गोएंका गुरूजींचे जे टाईमटेबल आहे ते अनेक जिम ट्रेनर्स, योग गुरू विना औषध व्याधीमुक्त जीवन या प्रोग्रामसाठी सुचवत असतात. नियमित झोप आणि सकाळी लवकर उठणे यामुळे निम्मे प्रॉब्लेम्स कमी होतात. किमान यासाठी तरी विपश्यनेला जावं. अनुभव आला किंवा न आला तर तो बोनस समजावा. तो काही कुंडलिनी जागृत होणे वगैरे सारखा अनुभव नाही याची खूण्गाठ मनाशी बांधावी.
रॉय यांनी म्हटले आहे:
रॉय यांनी म्हटले आहे:
>> विपश्यना ही औदासीन्यतेची साधना आहे. आयुष्याला जास्तीत जास्त नीरस करत नेणे आणि स्व विरघळवून टाकणे (जे मला अजिबात मानवी वाटत नाही) ही कोणत्याही सृजनशक्यतेवर बेसिक घाला आहे. कोणतीही कला त्यातून निर्माण होऊ शकत नाही.
त्यावरून मला खूप वर्षांपूर्वी (बहुधा डिसें २०१० किंवा २०१४ मध्ये) संदीप जावळे यांचा लोकप्रभा या मासिकात आलेला लेख आठवला. त्यात त्यांनी म्हटले होते की भारतात अंदाजे दोन हजार लेणी आहेत. लेणी खोदणे हा कलेचा एक उत्तुंग अविष्कार आहे. खडकात लेणी कोरणे यासाठी प्रचंड धीर लागतो व सभोवतालची सामाजिक परिस्थिती शांत व कलहमुक्त असावी लागते. तसेच समाजात आर्थिक सुबत्ता असावी लागते, तरच कारागीर प्रचंड लेणी कोरू शकतात. वरून खाली कोरत आलेली कैलास लेणी कोरण्यासाठी वीस पिढ्या (४०० वर्षे) लागल्या असाव्यात असे म्हणतात. त्यांचे सर्वात महत्वाचे म्हणणे हे होते की ८० ते ९० % लेणी ही बौध्द तत्वज्ञानाचा प्रभाव जोपर्यंत होता, म्हणजे ८ व्या शतकापर्यंतच कोरली गेली आहेत. ८ व्या शतकानंतर शंकराचार्यांचा उदय झाला, वैदीक तत्वज्ञान जास्त पसरले व बौध्दांचा प्रभाव कमी झाला.
हे आठवण्याचे कारण असे की, बुध्दाच्या मार्गातील विपश्यना साधना जीवन नीरस व कलाहीन बनवते असा कुणाचा समज होऊ नये. मी एका सर्जनशील व्यवसायात कार्यरत आहे व विपश्यना साधना दोनदा केली आहे. मला विपश्यना साधना केल्यानंतर असा प्रश्न पडला होता पण अनुभव मात्र उलट आला आहे.
आपल्याला कुणी एखाद्या निर्जन
आपल्याला कुणी एखाद्या निर्जन बेटावर आणून टाकले, तिथे आपल्याला कोणत्यातरी प्रकारे अन्न मिळून जगता येत आहे आणि आसरा आहे तर आपण तिथे वेळ घालवण्यासाठी जे काही करू तीच साधना होईल. विपश्यनाही तोच प्रकार मी म्हणेन. चांगली किंवा वाईट किंवा उपयोगी असा काही विचार करायचा नाही. ज्याला वाटेल त्याने करायची, किंवा नाही करायची.
स्वधर्म,
स्वधर्म,
विपश्यना by design समचित्त राहणे, सुख दुःखाचा अनुराग/संस्कार तयार न करणे शिकवते.
समचित्त मनाला इनोव्हेशन करण्याची गरज उरत नाही. कोणताही ड्राइव नसलेले मन कोणतीही कला निर्मू शकत नाही. दगडे खोदून मनाला समचित्त करता येत नाही. मुळात दगडासारख्या जैसे थे राहू शकणाऱ्या पदार्थाचा जसा आहे तसा आनंद घेता येतोच तरीही त्याला आकार देणे, त्यामध्ये मुर्त्या आणि सुंदर चित्रे रेखणे, या सगळ्याचा अट्टाहास करायची काहीही गरज उरत नाही. आसक्त आणि झपाटलेली मनेच हे गांडीव पेलू शकतात. जेव्हा तुम्ही सुंदर लेण्या खोदायला जाता तेव्हा तुम्ही सौदर्याची आसक्ती तयार करता. जे विपश्यनेच्या मूळ तत्त्वांना पूर्ण विसंगत आहे.
कैलास लेणी असोत किंवा अजून कोणत्याही लेण्या असोत, सौंदर्यांच्या आणि त्या योगे निराकाराला आकारात कैद करण्याच्या अपार ओढीनेच खोदल्या जाऊ शकतात. मना मधे सौंदर्याची आसक्ती पंचेंद्रीयाने होणाऱ्या ज्ञानाच्या अनुभवांच्या कंदावरच संस्कारित होऊ शकते. म्हणजे या संस्कारांचा अनुराग केल्या शिवाय सौंदर्याची आसक्ती शक्य नाही. कलेमध्ये किंवा कलेच्या ध्येयाप्रति कलेपासूनच aloof राहता येत नाही.
त्यामुळे विपश्यना हा सृजनावर घाला आहे. सृजन करण्याचा कोणताही हेतू विपश्यनेच्या तत्त्वज्ञानाने मांडता येत नाही.
विपश्यनेच्या उदासीन राहण्याच्या तत्त्वात सौंदर्याची आसक्ती निर्माण करणे मूळ तत्त्वाच्या विरुद्ध आहे. जी गोयंका गुरुजींच्या शिबिरात शिकवतात ती विपश्यना मी इथे गृहीत धरत आहे.
बौद्धांच्या सुंदर लेण्या आणि विपश्यनेच्या शिबिरात जी विपश्यना शिकवतात या दोघांच्यात पूर्ण विसंगती आहे.
याविषयी अधिक क्रिएटिव चर्चा हवी असल्यास माझी 'गुरुजींचा हॉलोग्राम' (हंस दिवाळी २०२१) ही कथा वाचावी. हवी असल्यास तुम्हाला ईमेल वरती पाठवतो.
>> म्हणजे ८ व्या शतकापर्यंतच
>> म्हणजे ८ व्या शतकापर्यंतच कोरली गेली आहेत. ८ व्या शतकानंतर शंकराचार्यांचा उदय झाला, वैदीक तत्वज्ञान जास्त पसरले व बौध्दांचा प्रभाव कमी झाला. <<
बदामी लेण्यांना अवश्य भेट द्यावी असे सुचवतो.
भारतीय तत्त्वज्ञानात कस कसा बदल होत गेला ते सर्व लेण्या क्रमाने पाहिल्यास अतिशय स्पष्ट कळते. अगदी शैवांकडे देखील अफाट सौंदर्यदृष्टी होती. बुद्धाच्या वैष्णविकरणाचा प्रयत्न देखील बदामी मधे पाहायला मिळतो.
तो लेण्यांचा पट म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानावर दगडात कोरलेला एक चित्रपटच आहे. अरुण खोपकर म्हणतात तसे प्राकसिनेमा.
>>जेव्हा तुम्ही सुंदर लेण्या
>>जेव्हा तुम्ही सुंदर लेण्या खोदायला जाता तेव्हा तुम्ही सौदर्याची आसक्ती तयार करता. जे विपश्यनेच्या मूळ तत्त्वांना पूर्ण विसंगत आहे.>>
- हं.
रॉय,
रॉय,
>> समचित्त मनाला इनोव्हेशन करण्याची गरज उरत नाही.
>> त्यामुळे विपश्यना हा सृजनावर घाला आहे.
कोणतेही सृजन हे मनाच्या एकाग्रतेचा परिपाक असतं. लेखकाला, कवीला किंवा कोणत्याही कलाकाराला ज्या रचना/कलाकृती स्फुरतात त्याचा उगम हा चैतन्यात/निराकारात (कॉन्शसनेसमधे) असतो. त्याच्याशी तादात्म्य पावल्याशिवाय सृजन होत नाही. उदा. चित्रकाराला चित्रात एका स्पेसिफिक रंगची छटा वापरावीशी वाटते, ते वाटणं कुठून येतं? लेखकाला टिपीकल शब्द किंवा एखादी कोटी नेमकी कशी सुचते आणि ते सुचण म्हणजे नेमक काय? कुठून येतं ते? तर ते चैतन्यातून येतं. त्यासाठी समचित्त असाव लागतं. समचित्त मन एकाग्र असतं आणि तेव्हाच ते चैतन्याशी तादात्म्य पावतं आणि निर्मिती होते, सृजन होतं.
तुम्ही म्हणालात तसं, विपश्यना by design समचित्त राहणे शिकवते, मन एकाग्र करायला शिकवते, जे सृजनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, ‘विपश्यना हा सृजनावर घाला आहे’ हे त्या design ला व्यत्यास आहे, नेमकं विरुद्ध आहे.
>> जेव्हा तुम्ही सुंदर लेण्या खोदायला जाता तेव्हा तुम्ही सौदर्याची आसक्ती तयार करता.
>> बौद्धांच्या सुंदर लेण्या आणि विपश्यनेच्या शिबिरात जी विपश्यना शिकवतात या दोघांच्यात पूर्ण विसंगती आहे.
लेणी खोदणं हा नैसर्गिक ऊर्मीचा आविष्कार असतो. लेणी खोदणारा ‘सुंदर लेणी‘ खोदायला जात नाही, तो फक्त लेणी खोदायला जातो. त्या सुंदर असण हे बाय-प्रोडक्ट आहे. कारण ‘ब्युटी लाईज इन द आय ऑफ बिहोल्डर’, ह्याच सुंदर लेण्यांचा विध्वंस करणारेही होतेच, त्यांच्यासाठी त्या लेणी सैतानाचं काम होतं. तर, ह्या लेणी खोदण्यासाठी (ज्या सुंदर असण हे बाय-प्रोडक्ट आहे) मनाची एकाग्रता, समचित्तता लागते, त्याशिवाय ते सृजन शक्य नाही.
तुम्ही म्हणालात तसं, विपश्यना by design समचित्त राहणे शिकवते, मन एकाग्र करायला शिकवते, जे सृजनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, लेणी खोदणं आणि आणि विपश्यनेच्या शिबिरात जी विपश्यना शिकवतात ती, हे परस्पर सुसंगत आहे.
>> आसक्त आणि झपाटलेली मनेच हे गांडीव पेलू शकतात.
>> अहंभाव हा कोणत्याही सृजनाचा मुख्य पाया आहे आणि कोणत्याही कलेमधे कलावंताच्या अहंतेमुळेच श्रेष्ठत्व प्राप्त होते
ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’, तुकारामांची ‘गाथा’, रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक’, ह्या कलाकृती आसक्त आणि झपाटलेल्या मनाचे सृजन नक्कीच नव्हत्या. तसंच त्यामागे कोणताही अहंभाव नव्हता किंवा कोणतेही श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्या कलाकृतींच सृजन झाल नव्हत. त्या महानुभावांनी ‘शांत आणि समचित्त’ मनानेच ते गांडीव पेललं होतं.
तुम्ही म्हणालात तसं, विपश्यना by design हेच समचित्त राहणे शिकवते. त्यामुळे, त्या अनासक्त आणि समचित्त मनाने सृजनतेच गांडीव पेलणं शक्य होतं.
>> विपश्यना ही औदासीन्यतेची साधना आहे.
तुम्ही म्हणालात तसं, विपश्यना by design समचित्त राहणे शिकवते. मन जर समचित्त असेल तर औदासीन्यता नष्ट झालेली असणार कारण समचित्तता आणि औदासीन्यता एकत्र असू शकत नाही. त्यामुळे, विपश्यना ही औदासीन्यतेची साधना असूच शकत नाही.
>> तुमच्या चेहऱ्याकडे पाहून विपश्यना तुम्हाला पटेल असे वाटत आहे
अशी डेरोगेटरी कमेंट, मन जर समाचित्त असेल तर सुचणार नाही. त्यामुळे, अहंभाव असलेलं मन समचित्त करण्यासाठी विपश्यनेचं design अत्यंत उपयोगी आहे.
- (विपश्यनेचं design पटलेला) सोकाजी
लेणी ह्या शब्दाचे अनेकवचन
लेणी ह्या शब्दाचे अनेकवचन लेणी आहे, लेण्या नाही. त्या शब्दाला विविध प्रत्यय लावताना लेणीचे लेण्या होते, अनेकवचनात नाही. जसे मुले कार्ले व भाजे येथील लेणी पाहायला गेली व त्यांनी लेण्यांचे सुंदर फोटो काढले.
स्थितप्रज्ञ अवस्था व विपश्यना करुन मिळवलेली मनाची अवस्था यात काय व किती फरक आहे?
लेणी खोदणारे सगळेच बुद्ध साधक होते आणि त्यांनी विपश्यना करुन मनावर ताबा मिळवलेला हे तरी कशावरुन. एक लहान काळ असा असावा जेव्हा बहुसंख्य बौद्ध धर्माच्या आधिपत्याखाली असावेत. जर ते सगळेच विपश्यना करुन विकारमुक्त झाले असते तर समाज तिथेच थांबला असता. मुले जन्माला घालायची उर्मी संपलीच असती.
विपश्यना हा एक साधनेचा मार्ग आहे तसे अनेक इतर मार्ग भारतीय भुमीवरील वेगवेगळ्या तत्वज्ञानात सांगितले गेलेत. त्यातल्या कुठल्याही मार्गावर चालुन त्यातली सर्वोच्च अवस्था प्राप्त करणारे किती होते? सगळा समाजच अमुक एका तत्वज्ञानाच्या पुर्णत्वाला पोचलाय अशा वेळा इतिहासात किती वेळा आल्यात? प्रत्येकजण साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर राहणार, काही सोडुन देणार. माणुस आहे मशिन नाही.
गोयंका गुरुजींनी तर भरपुर विपश्यना साधना केली असणार. साधना उदासिन बनवते तर तेही उदासिन व विरक्त झाले असते. इतर लोकांना त्यांनी प्रवृत्त केले असते का? तो विचारच नष्ट झाला असता ना.. आजही समाजात वेगवेगळी तत्वज्ञाने सांगणारे भरपुर आहेत. पण त्या सांगितल्या तत्वज्ञानावर अढळपणे चालणारे किती आहेत?
प्रतिसादात 'लेणी' हा बदल केला
प्रतिसादात 'लेणी' हा बदल केला आहे, धन्यावाद. प्रतिसाद टंकताना चूक झाली खरी! (मन समचित्त असायला हवे होते
)
भगवत गीता, श्लोक २.५६ मधे स्थितप्रज्ञता म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे.
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: | वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते ||
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.
विपश्यना साधना ही स्थितप्रज्ञ होण्याचीच साधना आहे. विपश्यना करुन मिळवायची मनाची अवस्था हीच स्थितप्रज्ञ अवस्था.
स्थितप्रज्ञ होणं म्हणजे उदासीन असणं नव्हे. किंबहुना, त्याअवस्थे संदर्भात उदासीन किंवा औदासिन्य ह्या शब्दप्रयोग योग्य नाही. त्याला 'दुःखी, खिन्न, निरुत्साही' ह्या अर्थांमुळे एक नकारात्म छटा येते.
- (उत्साही) सोकाजी
समचित्त हा शब्द योग्य वाटतो.
समचित्त हा शब्द योग्य वाटतो. उदासिन शब्दाला दु:खाची किनार आहे याच्याशी सहमत. प्रतिसाद छान आहे, माहितीपुर्ण वाटला.
गम और खुशी मे फर्क न महसुस हो जहा
मै खुद को उस मकामपे लाता चला गया…
रॉय,
रॉय,
सोकाजीराव यांनी 'औदासिन्य' व विपश्यना' या बाबत व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलेच आहे.
साधना यांनी तर खुद्द गोयंका गुरूजींचा दाखलाच दिला आहे. 'गोयंका गुरुजींनी तर भरपुर विपश्यना साधना केली असणार. साधना उदासिन बनवते तर तेही उदासिन व विरक्त झाले असते. इतर लोकांना त्यांनी प्रवृत्त केले असते का? तो विचारच नष्ट झाला असता ना.. '
मला असं वाटतं की जरी तुंम्ही सर्जनशील असाल तरी एकाग्रता नसेल, तर तुमचे प्रयत्न सर्व दिशांनी व खुरटे होऊ शकतात. वृक्ष निर्माण होण्याऐवजी झुडूप तयार होणे म्हणा. पण काहीतरी अर्थपूर्ण, परिणामकारक, भव्य दिव्य घडवायचं असेल, तर मन स्थिर, एकाग्र व समचित्त (एवढ्या तेवढ्याने विचलीत न होणारं) पाहिजे. विपश्यना ही मनाला असे वळण लावण्याची साधना आहे. तुंम्ही (रॉय) वरील सगळे विचार अनुभवाने बोलत आहात की केवळ लॉजीक वापरून असा प्रश्न पडला.
एकट्या बेटावर राहणारा आणि
एकट्या बेटावर राहणारा आणि मिळेल ते खाणारा माणूस साधना (आयडी नव्हे) करू शकेलच असे नाही. आपल्या आत बघायच्या ऐवजी तो आपल्या बाहेरच बघत राहील, मला इथून कधी सोडवले जातंय किंवा मला इथे अजून कोणाची कंपनी मिळते का, किंवा मला इथे सोयी सुविधा कुठे मिळणार आहेत का? ही आसक्ती झाली. साक्षीभाव नाही.
एका स्थितीमध्ये बसून मला हातापायाला झिणझिण्या येत आहेत.. त्या आल्या तरी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता त्यांच्याकडे साक्षी भावाने बघत राहणे आणि गेल्या तरी हुश्श गेल्या बाबा असा आनंद न अनुभवता त्याकडेही साक्षी भावाने बघणे हा या साधनेचा एक भाग आहे. याचा अर्थ असा नव्हे की काही उदासीन होणे. खूप thin line आहे यात.
आपण स्वतः कडे साक्षीभावाने बघतो तेव्हा बाकीच सगळं जग सुंदर आणि प्रेममय होऊन जातं आणि प्रेममय जग कधीचबुडासीन असू शकत नाही.
आज जी वेदना आहे तती कायम नसणार आहे त्यामुळे तिच्या अस्तित्वाने दुःख किंवा राग किंवा द्वेष न वाटू देणे. किंवा आज जे सुख आहे ते ही कायम असणार नाही त्यामुळे त्याचा लोभ न ठेवणे, त्याच्या मागे धावत न जाणे, त्याच्या जाण्याने दुःखी न होणे. जो अनुभव आहे त्याचा स्वीकार करणे हा साक्षीभाव प्रत्येक क्षणाला हवा. विपश्यना केंद्रातली साधना या साक्षीभावाशी तुमची ओळख करून देते. साधनेच्या अभ्यासाने तुम्ही ती अधिकाधिक वेळा अनुभवता. हळूहळू तुम्ही ध्यान अवस्थेत नसताना, रोजचे जगत असताना सुद्धा हा साक्षी भाव अनुभवू लागता. पण हे म्हणजे उदासीनता नव्हे.
हा साक्षीभाव काही क्षणांसाठी का होईना अनुभवायला लागल्यानंतरच ही thin line समजते. आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ती समजो हीच इच्छा.
>>>>>>आपण स्वतः कडे
>>>>>>आपण स्वतः कडे साक्षीभावाने बघतो तेव्हा बाकीच सगळं जग सुंदर आणि प्रेममय होऊन जातं
मला हेच पटत नाही. आपले डीप सीटेड ट्रस्ट इश्युज असे कसे जातील? जे कोणी हे वचन देते, मला त्यांचे अजिबात खरे वाटत नाही. देअर आर सम वुंडस दॅट नेव्हर हील.
अँड आय अॅम शुअर प्रत्येकाचे काही असे दुखरे भाग असतात.
हे अति फिलॉसॉफिकल होइल पण लॉस ऑफ इनोसन्स हा अॅडम इव्हच्या काळापासून आलेला शाप - कसा जाणार आणि कसं जग प्रेममय होणार? असो मला स्पष्ट करता येत नाही.
Pages