सर्वांना येणार्या नववर्षाच्या शुभेच्छा!
घरात रेखाटलेली चित्रे, सरावचित्रे बरीच जमली होती. त्यांना रद्दी म्हणून कचर्यातही टाकवेनात आणि उपयोगही काय करावे कळेना. कच्ची रेखाटने, अर्धवट राहिलेली चित्रे, मनासारखी न झालेली चित्रे फाडून टाकली. पण तरीही पुष्कळ स्केचेस उरली. लहान, मोठी सर्व प्रकारची. मग म्हटले बघावे कुणाला ही चित्रे अशीच हवी असतील तर देऊन टाकू, त्याचे त्यांनी पुढे काय करावे हे मलाही माहित नव्हते आणि दिल्यावर माझ्यापुरता विषय संपणार होता. काही का करेनात! म्हणून फेबुवर Giveawayची पोस्ट टाकली आणि गंमत म्हणजे धडाधड चिकार मेसेजेस आले. एकजण म्हणाली मी व्हेट कडे काम करते, तुझ्याकडे कुत्र्यामांजरांची काहीही असली तरी मला चालतील. दुसरी म्हणाली फिलीपिन्समधल्या माझ्या गावातल्या शाळेच्या बोर्डवर ही लावता येतील. बर्याच जणांनी नुसतीच आवडली असे आवर्जून सांगायला मेसेजेस केले. नेबरहुड्मधल्या एका आजींनी सांगितले मला सगळी हवी आहेत! मग काय मला बरेच झाले, त्या आजींना जवळच्या पार्कात भेटले आणि दिली सर्व चित्रे. छान ओळख, गप्पा झाल्या. मी विचारले की तुम्ही काय करणार आहात यांचे? तर म्हणाल्या हे बघून मला स्वतःला स्केचींग ट्राय करायला आवडेल, पूर्वी करत होते. काही मी घरात लावीन.
दुसर्या दिवशी आजींचा मेसेज आला की वर्क कमिशन करशील का? डिसेंबरात ख्रिसमसला मी बहीणीकडे जाणार आहे, ती ओरेगनमध्ये राहते. तिला फ्लेमिंगो आणि निळी आयरीस फुले या दोन गोष्टी फार आवडतात, तर या दोन गोष्टींची स्केचेस करुन देशील का?
म्हणून मग ही दोन चित्रे केली. आजींना फारच आवडली. मी ट्रेस पेपरने प्रोटेक्ट करुन दिली, फ्रेमवर्क आजी करुन घेणार होत्या.
कमिशनिंगचा सध्यातरी इरादा नाही, हे छंदापुरतेच सिमित आहे. पण आलेला अनुभव एकदम छान होता आणि आश्चर्यकारक.
स्ट्रॅथमोर या पेपर ब्रँडच्या ६ बाय सहा च्या जाड कागदाच्या चौकोनी टाईल्सचा एक सेट अलिकडे घेतला होता. त्यावरच ही चित्रे काढली. कागद जाड असल्याने, ही चित्रे नुसतीच आर्ट किंवा वाशी टेपने किंवा पिन्स ने डार्क सॉफ्ट बोर्डवर लावली की सुद्धा छान दिसतात. माझी काही चित्रे मी घरात हल्ली तशीच लावते. पुढच्या गिव्हअवेमध्ये त्यांचा नंबर लागेल 
Strathmore 300 series artist paper tile.
Faber Castell Polychromos colored pencils.
Amazon Basics HB pencil.
Orange Serenity
Iris Elegance
अलिकडील चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - Killdeer: https://www.maayboli.com/node/87355
रंगीत पेन्सिल्स - Wings of Sapphire (Blue bellied Roller): https://www.maayboli.com/node/87286
मस्त चित्र. निळं आयरीस तर
मस्त चित्र. निळं आयरीस तर सुरेखच. 👌
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
अतिशय सुंदर चित्रे...
अतिशय सुंदर चित्रे...
छान !!!(
छान !!!(
सुंदर
सुंदर
मस्त जमलीयेत वर्षा. आता एक
मस्त जमलीयेत वर्षा. आता एक सुंदर वॅाटरमार्क/लोगो बनव बघू.
सुरेख. अशीच कामे मिळत राहोत
सुरेख.
अशीच कामे मिळत राहोत
जबरदस्त चित्रे. अतिशय सुंदर.
जबरदस्त चित्रे. अतिशय सुंदर.
बारकावे फार सुंदर टिपलेत
मी फेसबुकवर नाही. नाहीतर मीच मागितली असती.
सुं द र !
सुं द र !
खूपच छान
खूपच छान
वाह.... फारच सुंदर....
वाह.... फारच सुंदर....
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
खूप सुंदर आलीं आहेत.
खूप सुंदर आलीं आहेत.
Giveaway ची कल्पना आवडली. कमिशन वर करायला मिळालं यासाठी अभिनंदन!
तू पक्षांची सिरीज सुरू केलीस तेव्हा माझ्या आठवणीत तू आणि भाऊ_नमस्कार यांच्यात पेंटींग माध्यमनातून चर्चा (?) चालली होती.
तेव्हा तुझा एक मुद्दा - पेन्सिल कलरिंग करायला कमी पसारा/ जागा लागते किंवा सुटसुटीत पडते - अतिशय पटला.
थोडक्यात तुझ्यापासून प्रेरणा घेत थोड फार पेन्सिल coloring करायला सुरुवात केली. अर्थात अगदीच शिकाऊ / प्राथमिक पातळीवर आहे. पण हे एक माध्यम मिळाले. एक दोन पक्षी केले, फळे, फुले केली..
मजा येते .
Thanks
सिमरन, शरदजी, धनवन्ती, भाऊ,
सिमरन, शरदजी, धनवन्ती, भाऊ, जयु, आडो, जाई, ऋतुराज, मंजूताई, निर्मल, शशांक, धनश्री, छंदी - सगळ्यांना धन्यवाद! शरदजी तुम्हाला सहावेळा
आडो, हो ते करायचेय, किंवा मला खरंतर जपानी हान्कोटाईप स्टँपसारखे काहीतरी करायचेय. बघूया.
>>Giveaway ची कल्पना आवडली. कमिशन वर करायला मिळालं यासाठी अभिनंदन!
करायला मिळालं 'असतं'. त्याबरोबर येणारी टाईम कमिटमेंट, जबाबदारी आण इतर बाबी सध्यातरी जमण्यातल्या नाहीत त्यामुळे छंदापुरतेच आहे हे. पण असं कुणी मुद्दाम सांगितलं तेव्हा करायला जास्त मजा आली हे नक्की.
हो हो पेन्सिल्स खूपच सुटसुटीत माध्यम आहे. तुझी चित्रं पोस्ट कर की. युट्यूबवर चिकार ट्यूटोरियल्स आहेत, शिवाय तुझ्या जवळील लायब्ररीत कलर्ड पेन्सिल्स टेक्निक्सवर पुस्तकेही आरामात मिळतील.
पूर्वी एक चित्रकलाविषयक चर्चा करायला एक धागा काढला होता बघ: https://www.maayboli.com/node/37359
असं कुणी मुद्दाम सांगितलं
असं कुणी मुद्दाम सांगितलं तेव्हा करायला जास्त मजा आली हे नक्की. >> खरंय
युट्यूबवर चिकार ट्यूटोरियल्स>> ते बघूनच थोडी फार केली .
धागा चांगला आहे.
खूपच छान !
खूपच छान !