PLUR1BUS (There is no 'I' in 'we'!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 November, 2025 - 10:06

'ब्रेकिंग बॅड' या ऑल टाईम बेस्ट टीव्ही सिरीजचा लेखक दिग्दर्शक विन्स गिलिगन याची नवीन मालिका अ‍ॅपल टीव्हीवर शुक्रवारी सुरू झाली.
पहिल्या सीझनमध्ये ९ एपिसोड असणार आहेत, दर शुक्रवारी एक याप्रमाणे रिलीज होतील.
त्यांचा कीस किंवा पिसं काढायला, त्यावरून वाद घालायला, प्रसंगी हमरीतुमरीवर यायला हा धागा उपयोगी पडेल.

****************************************************************************************************************
इथे स्पॉइलर्स येतील. नको नको म्हणत कधी अनवधानाने, कधी राहावत नाही म्हणून दिले जातील. त्याला इलाज नाही.
ज्यांनी मालिका अजून बघायला सुरुवात केलेली नाही त्यांनी आपापल्या जबाबदारीवर धागा वाचावा किंवा वाचू नये!
****************************************************************************************************************

गिलिगनचे अनेक फॅन्स इथे आहेत, त्यांना पेशल आणि सहर्ष आमंत्रण.
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते लोक कॅरल शी भांडण झाल्यावर जेंव्हा शहर सोडून जातात तेंव्हा ते कुठे राहतात. एका अक्ख्या शहराची दुसरीकडे व्यवस्था करणे म्हणजे काय खायचे काम नाही.

मला त्याची शॅपरोन आणि त्याच्यात काय बोलणं होतं त्याबद्दल कुतुहल वाटलं. त्याला तरी subtitles द्यायची!
>>>>>>>>>>>> ती त्याला बाळा वगैरे म्हणत असते (माय सन) की what can we do for you son? do we need to answer any questions? मग तो म्हणतो dont call me your son you are not my mother! my mother is a bitch!!

मी स्टार्टप शो वर बघितल्यामुळे सबटायटल्स दिसतात.

मी आत्ता एक थिअरी वाचली की कॅरल कन्सेन्ट देणार नसली तरी तिची एग्ज फ्रोझन आहेत आणि ते हेलनला माहीत होतं. त्यांचा उपयोग तिच्या स्टेम सेल्स एक्स्ट्रॅक्ट करायला होऊ शकतो का?

दुसरा एक प्रश्न मला असा पडला की जर एचडीपी पिऊनसुद्धा दहा वर्षांत पृथ्वीवर त्यांचा निर्वंश होणार आहे, तर हा संदेश जिथून आला तिथे काय परिस्थिती असेल आत्ता? की हा तिकडच्यांचा डायिंग मेसेज होता?

स्वातीची पोस्ट वाचल्यावर आता आणखी एक हॅरी पॉटर पॅरेलल दिसू लागलं. Proud अँटी पॅरेलल...
लिलीचा लव-बाँड हॅरीचे रक्षण करतो, एकदा नाही, दोनदा नाही १६ वर्षे रक्षण करतो. आणि तेच रक्त त्याच्या नेमेसिसचा अंत होण्यास कारण ठरते.

इथे त्या ऑफस्प्रिंग मध्ये जाणाऱ्या स्टेमसेल्स कॅरलला, पक्षी पेरेंटलाच गोत्यात आणणार. Lol

Bothe resurrection and death of nemesis, right?
Maybe the sequence will be flipped here?

रेझरेक्षनला लव्ह पार्टची गरज न्हवती ना? ब्लड ऑफ एनिमी फॉर्सिबली टेकन.
नेमेसिसच्या अंताला ही फक्त रक्त कारण होतं, निदर कॅन डाय व्हाईल अदर सर्व्हाईव्ह,.. आईच्या रक्ताचा इफेक्ट संपलेला.

apple tv वर Drops of God ही मालिका आहे, ज्यांना कुणाला पुढच्या एपिसोड पर्यंत पाहायला एखादा मस्त माल पाहिजे असेल तर ही पाहा.

थोडा संथ एपिसोड मुद्दाम दाखवला बहुतेक. कॅरोलचं एकटेपण अंगावर यावं म्हणून? >>>> कदाचित. त्यात ते थोडेफार यशस्वी झाले. पण त्या मनूसोस चा प्रवास दाखवायची काही गरज नव्हती. ते कथेशी थेट निगडित नव्हते. मी ते पळवत पाहिले. तेच पाहायचे तर Man vs Wild शो काय वाईट होता.

हातघाईवर आलेली, काही धरबंध नसल्यासारखी वागणारी, वेसण उडवून पळणाऱ्या गाईसारखी कॅरल. कुठे पेंटिंग चोर, गवतावर गोल्फ खेळून काहीतरी बदल म्हणून काचाच फोड, रोल्स रॉइस घे, फॅन्सी फाईन डाईन कर, फटाक्यांची रोषणाई बघत रंपा पीत शून्यात नजर लाव, मग आपलंच घर किंवा डोकं लिटरली जळणार असेल तरी स्थितप्रद्न्याची लक्षणे दाखवत ठेविले अनंते नजर लावून बघ प्रकार करते आहे.... तोच पेरूव्हियन माणूस कुणाचा जराही फेवर न घेता, कुणाच्या गाडीतून इंधन घ्यायची वेळ आली तरी पैसे ठेवून, आपल्या स्वतःच्या जीवावर आणि अटी शर्तींवर ताठ मानेने ध्येयाच्या मागे जातोय. आपल्यामुळे इतरांना आणि इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ नये, आणि गैरवापर घडू नये याची यथायोग्य काळजी घेत एकेक पाऊल टाकतोय...

पण शेवटी दोघांनाही आपापल्या मार्गावरून भ्रष्ट व्हावे लागणार, न्हवे लागलेच. हे एकेक पदर उलगडत ठाय लयीत सांगितले ती गिलीगनची पद्धतच आहे. असं एपिसोड बघून दोन दिवसांनी मला वाटतंय. बघताना मलाही प्रचंड स्लो वाटत होता. काहीच का घडत नाही आहे, तेच तेच परत दाखवून काय साधतोय असच पहिल्यांदा वाटलं होतं.

>> पण त्या मनूसोस चा प्रवास दाखवायची काही गरज नव्हती. ते कथेशी थेट निगडित नव्हते. मी ते पळवत पाहिले <<

ज्या गोष्टी माणसाला डिफाइन करतात त्यापैकी एक जिजीविषा, जीवावर उदार व्ह्यायची तयारी, दृढनिश्चय, हटवादीपणा, ठाव न सोडता आपल्या जगण्याला धरून राहणे इत्यादी इत्यादी. हे दाखवणे गरजेचे होते. मग ये ध्येय नोबल असेल किंवा नोशनल असेल किंवा अगदीच अनप्रॅक्टिकल असेल.

माझी आई बीच होती, तू माझी आई नाहीस असे तो का म्हणतो हे तरी तुम्हाला लक्षात आले पाहिजे.

मला भयंकर आवडला हा एपिसोड. 'शो, डोन्ट टेल'चं बहुधा मी पाहिलेलं बेस्ट उदाहरण असेल हे!! कॅरेक्टर बिल्डिंग आणि आर्कचंही!
आणि जॉर्जिया ओ'कीफचा संदर्भ आल्यामुळे ब्रेकिंग बॅडचीही आठवण झाली, आणि जेन गेल्यानंतरच्या जेसीच्या एकटेपणाचीही.
आत्ताचा कॅरलचा एकटेपणा आणि त्यात एक नातं आहे!
तसंच मनुसोसची आई क्लेप्टोमेनिआक वगैरे असली असेल का अशीही मला शंका आली. का तो विनामोबदला काही घेण्याच्या इतका विरुद्ध आहे?
तसं असेल तर तोही ब्रेबॅमधल्या मरीला एक नॉड ठरेल.

बाकी इन्टरनेटवर त्या पेंटिंगच्या अर्थावरून, कॅरलच्या ब्रेकडाऊनवरून, झोशाच्या प्रेग्नन्सीबद्दल वगैरे बर्‍याच कॉन्स्पिरसी थिअरीज डिस्कस होतायत.
गिलिगन सगळ्यांना येड्यात काढून हसणार आहे! Happy

माझी आई बीच होती, तू माझी आई नाहीस असे तो का म्हणतो हे तरी तुम्हाला लक्षात आले पाहिजे >>>> माझ्या नाही लक्षात आले हे पण Sad म्हणजे तो केंव्हा म्हणतो हे माहितीय, पण का म्हणाला हे समजले नाही.

बाकी ते आईस कोल्ड ड्रिंक बद्दल. ते ड्रोन ने आले मग गरम होणारच ना.
ते ऑफिस च्या खिडक्या फोडण्याबद्दल. जर ते लोक पाहिल्यासारखे झाले तर पहिली गोष्ट काय करतील तर त्या खिडक्या फोडल्याबद्दल करोल ला सु करतील. ये अमेरिका है बॉस. Lol
तेवढा एकटेपणा सोडला तर करोल स्वर्गात राहत आहे. जगाच्या इतिहासात एका व्यक्तीला खुश करायला एवढे लोक पूर्वी कधी झटले नव्हते. जगातल्या होऊन गेलेल्या यच्ययावत राजा-महाराज्याना, सुलतान-बादशाहांना करोल आणि त्या ११ जणांचा किती हेवा वाटत असेल. Happy

>>> माझी आई बीच होती
बिच. बिच होती. (बीच म्हणजे समुद्रकिनारा!)

ते ड्रोन ने आले मग गरम होणारच ना. >> गरम न होता आईस कोल्ड सर्व करायचं तर ते करायला ड्रोन चालणार नाही, मग काय हवं? ते जे हवं ते कॅरलच्या मनात आहे, हे अधोरेखित करायला तो सीन आहे.
'शो, डोन्ट टेल' >> हो!

ते डे १५ आवर ०६ मिनिट ०७ असतं तर शक्य होतं. डे ४८ ला आता शक्य नाही. Proud

आग दोनो तरफ से बराबर लगी है वगैरे आहे की काय अशी आता मला शंका येऊ लागली आहे. Lol

**** या प्रतिसादात स्पॉईलर्स आहेत ****
स्टेडियम मध्ये एकत्र झोपतात ते पाहून कॉलेज ची एक ट्रिप आठवली. तेंव्हा आम्ही एका मंगल कार्यालयात असेच जमिनीवर गाद्या टाकून झोपलो होतो.
बाकी तो मनूसोस बिनडोक वाटतोय. अगदी तत्वासाठी जीव गेलातरी बेहत्तर. जीव गेल्यावर जगाला कसे वाचविणार हे तोच जाणे.
त्या मुलींच्या गराड्यात असणाऱ्या जमैकन माणसाला नावे ठेवणारी करोल स्वतःसुद्धा मोहाला बळी पडलीच शेवटी. आता त्या मार्गाने तो व्हायरस पसरत नसावा म्हणजे मिळविली.

Pages