
'ब्रेकिंग बॅड' या ऑल टाईम बेस्ट टीव्ही सिरीजचा लेखक दिग्दर्शक विन्स गिलिगन याची नवीन मालिका अॅपल टीव्हीवर शुक्रवारी सुरू झाली.
पहिल्या सीझनमध्ये ९ एपिसोड असणार आहेत, दर शुक्रवारी एक याप्रमाणे रिलीज होतील.
त्यांचा कीस किंवा पिसं काढायला, त्यावरून वाद घालायला, प्रसंगी हमरीतुमरीवर यायला हा धागा उपयोगी पडेल.
****************************************************************************************************************
इथे स्पॉइलर्स येतील. नको नको म्हणत कधी अनवधानाने, कधी राहावत नाही म्हणून दिले जातील. त्याला इलाज नाही.
ज्यांनी मालिका अजून बघायला सुरुवात केलेली नाही त्यांनी आपापल्या जबाबदारीवर धागा वाचावा किंवा वाचू नये!
****************************************************************************************************************
गिलिगनचे अनेक फॅन्स इथे आहेत, त्यांना पेशल आणि सहर्ष आमंत्रण.
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' 
हो. बाकी झोशाने हिच्याबरोबर
हो. बाकी झोशाने हिच्याबरोबर शुभमस्तु केलं, पण बाकीचे खातापितांना दिसले का?
तसंच इन्फेक्शन सुरू झालं उंदरापासून, मग सगळे प्राणी/पक्षी याला ससेप्टिबल आहेत का? की फक्त मॅमल्स? मग त्यांनी झू उघडल्यावर लोकांना का मारलं?
झाडांचं काय?
कथा झरझर पुढे गेली नाही ही
हो!
कथा झरझर पुढे गेली नाही ही असे प्रश्न पडू लागतात. सापसाप पुढे जात राहिली की विचार करायला वेळच मिळत नाही.
कंसॉलिडेटेड ग्रोसरी करत आहेत म्हणजे खात असावे असं आपलं मी ठरवलं. रेसिपीज डोक्यात असतील तर बरं. इनोव्हेशन करणारा कलेक्टिव्ह मेंदू आहे का कसं कल्पना नाही.
सगळे एकच मेनू खात असतील का?
सगळे एकच मेनू खात असतील का? वैयक्तिक आवडीनिवडी नसणार ना? सगळे फक्त लिक्ड डोनट्सच खात असतील का?
वैयक्तिक आवडी निवडी नाहीत आणि
वैयक्तिक आवडी निवडी नाहीत आणि एकच मेन्यू खाणार. मग योग्य आणि पुरेसा व्यायाम, कॅलरी वगैरे करणार. सगळे सडपातळ एआय जनरेटेड फोटो सारखे दिसतील ना?
सगळ्यांचे केस न्हावी सारखेच कापेल ना? कपडे तरी वेगळे का घालतील सगळे? असे बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत. रिप्रोडक्शनचे काय?
हे कनव्हर्जन परमनंट आहे? रिव्हर्सिबल आहे? पॉलीज्युस पोशन सारखं सारखं लिक करायला लागतं?
कलेक्टिव्ह माईंड म्हणजे फ्री
कलेक्टिव्ह माईंड म्हणजे फ्री विल नाही असंच पाहिजे ना?
केकू आहेत का? त्यांची अशी काहीतरी गोष्ट होती ना? किंवा रायन रेनॉल्डचा फ्री गाय!
शेवटी ती झोशा जोशात येऊन फ्री विलने काही करणार असा काही शेवट करू नका.
हो ना असेच बरेच प्रश्न पडले,
हो ना असेच बरेच प्रश्न पडले, गेसेस तर नाहीच , उलट आणि जरा भितीच वाटायला लागली की या लेवल्स चा थॉट गिलिगन करेल का ? अपेक्षांना उतरेल ना, की निळा पडदेच निघणार शेवटी. तसे नको प्लीजच!!
मी बघायला सुरूवात केली एपिसोड
मी बघायला सुरूवात केली एपिसोड ३ पण पाच मिनिटांत गाढ झोप लागली. ती सुद्धा इतकी, की आधीच्या पाच मिनिटांत काय पाहिले तेही आठवत नाही. मग एकदम कसलातरी स्फोट झाला तेव्हा जाग आली. आता पुन्हा बघेन. झोप आली हे परवाच्या माझ्या स्थितीबद्दल आहे. एपिसोडच्या दर्जाबद्दल नाही
>>> झोशा जोशात येऊन
>>> झोशा जोशात येऊन

एक अगदीच बेसिक प्रश्न आहे.
एक अगदीच बेसिक प्रश्न आहे.
झोशा कॅरनच्या पुस्तकावरच्या फोटोतल्या सारखी कशी आणि का दिसते?
ती इनफेक्टेड पूर्वजन्मीची माणूस आहे ना/ का? का शेप शिफ्टर प्रकार पण आहेत त्यांच्यात. पहिल्या भागात हा प्रश्न पडला न्हवता कारण काहीच माहित न्हवतं. का ती एलियन वगैरे आहे? ते शेप शिफ्टिंग करू शकतात?
त्या व्हायरसच्या नक्की अॅबिलिटी काय आहेत हे अजुनही धूसरच आहे.
त्या चित्राशी मिळतेजुळते
त्या चित्राशी मिळतेजुळते फीचर्स असलेली बाई जिथे असेल तिथून हातातलं
) बोलावली गेली.
प्रेतकाम टाकून (आणि आंघोळ करून!बाईच, कारण ते रोबॉन कॅरेक्टर आधी बाई असणार होतं हे त्यांना हेलनकडून कळलं.
हे अगदी कर्टन इन फ@$ ब्लू
हे अगदी कर्टन इन फ@$ ब्लू उत्तर झालं!
बघा तुम्हीच म्हण्जे झालं
बघा तुम्हीच म्हण्जे झालं
मला बाकी व्हायरस इन्फेक्शन >> हाइव मेन्टालिटी लॉजिक कळलं पण कॅरल च्या अँगर ने ३ मिलियन मेले याच पडद्यात अजून गुरफटले आहे.
११! ११मिलियन मेले!
११! ११मिलियन मेले!
3 काय आणि ११ काय! डझ इट मॅटर
3 काय आणि ११ काय! डझ इट मॅटर
वन टू मेनी 
तिकडे एचवन प्रेतं उचलणे प्रोफेशनला मिळत असेल. सगळ्यांना सगळी कामं करता आली तरी प्रिव्हलेज वापरून लोक नकार देतील का?
हे अगदी कर्टन इन फ@$ ब्लू
हे अगदी कर्टन इन फ@$ ब्लू उत्तर झालं! >>>
कारण ते रोबॉन कॅरेक्टर आधी बाई असणार होतं हे त्यांना हेलनकडून कळलं. >>>
इथे मला एकच प्याला मधे सिंधूचा पार्टी नसून बाई आहे हे समजल्यावर होणारा संवाद आठवला अंतु बर्वा मधला 
पाहिला ग्रेनेड एपिसोड. हा भाग नेटाने पूर्ण केला. नवीन काही सापडले नाही. थीम बिल्ड केली जात आहे हे दिसते पण फार स्लो झाला हा भाग. मागच्या वेळेस ते बर्फातले हॉटेल वगैरे पाहिले होते ते आठवले.
बेकॉसॉ मधे ती बहुतांश वेळा खत्रुट मोड मधे असते ते बघायचा कंटाळा आला होता ते आठवते. इथेही जरा हास आता किंवा कोणालातरी थँक यू वगैरे म्हण असे डोक्यात येते.
बाय द वे, हिरॉइन (किंवा हीरो) प्रिस्क्रिप्शन ची बॉटल उघडून ओंजळभर गोळ्या न मोजता गल्प करते हा क्लिशे अजून किती काळ चालणार आहे?
>>> इथेही जरा हास आता किंवा
>>> इथेही जरा हास आता किंवा कोणालातरी थँक यू वगैरे म्हण असे डोक्यात येते.
इथे ते जस्टिफाइड वाटलं मला. आधीच माणूसघाणी, त्यात आत्ताच पार्टनर डोळ्यांदेखत गेलेली, आणि या विअर्ड इन्फेक्टेड लोकांनी घेरलेली पूर्णपणे एकाकी पडलेली बाई जितकी बिथरेल तितकी बिथरली आहे ती.
हो ते कॅरेक्टरच्या दृष्टीने
हो ते कॅरेक्टरच्या दृष्टीने कन्सिस्टंट आहे. फक्त बघताना तसे वाटते, अशा अर्थाने
अर्थात ती झोशाला शुभमस्तु करायला बोलावते, तितके तरी आहे
लोल हो!
लोल हो!
हो! ते बर्फाचे हॉटेल म्हणजे
हो! ते बर्फाचे हॉटेल म्हणजे 'हे चांगले लोकेशन आहे इथे शूट करनाईच मंगताय' करुन कथेत आणलेलं आहे. तिकडे ती पार्टनर होती हे अधोरेखित होण्याव्यतिरिक्त काय होतं?
नाही रे! इथे सगळे एकोप्याने खेळीमिळीने इतके नांदताहेत की हा खत्रुडपणा हवाहवासा वाटतोय. आज सकाळी चॅट जीपीटी वापरताना ओपन एआयने प्रेमाने तुम्हाला याच्या बरोबर ते पण हवं असेल तर मी देऊ शकतो सांगितलं तेव्हाच माझ्या मनात विचार आलेला की ओपन एआयची खत्रुड व्हर्जन काढली पाहिजे. इतकं प्रेमाने बोलू नका रे! 
इथेही जरा हास आता किंवा कोणालातरी थँक यू वगैरे म्हण असे डोक्यात येते. >>
>>> तिकडे ती पार्टनर होती हे
>>> तिकडे ती पार्टनर होती हे अधोरेखित होण्याव्यतिरिक्त काय होतं?
बहुतेक ती चेकॉव्हची गन आहे. नंतर तिला एक्स्ट्रीम टेम्परेचर्समध्ये राहावं लागणार असेल. गिलिगन 'उगाच गंमत म्हणून' काही दाखवेल असं वाटत नाही.
>>> ओपन एआयची खत्रुड व्हर्जन काढली पाहिजे.
लोल मला तर जीपीएसबद्दलही वाटतं तसं. दोन एग्झिट चुकले तरी शांतपणे 'आता येईल तो यू टर्न घे' काय! ओरड ना, 'कुठे लक्ष आहे?!' म्हणून!
शेवटी तो गिलिगन आहे. बर्फाचे
शेवटी तो गिलिगन आहे. बर्फाचे हॉटेल दाखवले म्हणजे थेट थंडीत रहावे लागेल असा डायरेक्ट अर्थ नसेलही
कदाचित डोक्यावर बर्फ ठेवावा लागणे असे काहीतरी रुपक वगैरे असण्याचीही शक्यता आहे 
जौ द्या झालं. मी आता ब्लू कर्टन्स सोडून कशाला अर्थ काढत बसले!!
(No subject)
गिलिगन रूपके फार दाखवत नाही
गिलिगन रूपके फार दाखवत नाही ना? सीनचा सहसा थेट संदर्भ असतो नंतर किंवा त्या सीनमधे एक त्याच कथेतील संदर्भ असतो. "त्या सीनमधे ते पुस्तक आहे ना? त्यात भावी काळाबद्दल लिहीलेले आहे. या सीनमधे भावी काळाबद्दल चालले आहे..." असले प्रकार लक्षात नाहीत ब्रेबॅ मधे तरी.
>>> गिलिगन रूपके फार दाखवत
>>> गिलिगन रूपके फार दाखवत नाही ना?
हो, तू म्हणतोस तसेच थेट संदर्भच असतात मोस्टली.
'आता येईल तो यू टर्न घे' काय!
'आता येईल तो यू टर्न घे' काय! ओरड ना, 'कुठे लक्ष आहे?!' म्हणून! >> हो ना! कमित कमी 'नॉट अगेन!' करुन आयरोल तरी द्या. हे कुणालाच सुचलं नसेल असं शक्य नाही. कोणी तरी गूगल मॅप्सला एस्टेंशन काढलं ही असेल.
असं कसं? ग्रेनेड फुटला ना?
असं कसं? ग्रेनेड फुटला ना? Proud>>>>>> उईई... बघते आता एपि. म्हटलं इथे काही चर्चा नाही झाली. फार फुसका निघाला की काय तिसरा.
कॅरल चिडून ‘तुमच्या जगात सगळं
कॅरल चिडून ‘तुमच्या जगात सगळं (कॉफी कमर्शियलसारखं) परफेक्ट असेल, नाही का?!’ असं म्हणत जी उदाहरणं देते, ती हळूहळू तिने आणि हेलनने मिळून घेतलेल्या अनुभवांकडे तिच्या नकळत वळतात. आता तिच्या मनाला आठवणींतले ते क्षण परफेक्ट वाटतात, पण त्य त्या वेळी ती वैतागलेली होती किंवा तसं ॲक्ट करत होती.
Come to think of it, हेलन त्याने हिरमुसत नाही त्यवरून ते त्यांच्यातलं चिडवाचिडवीचं known dynamic असावं.
हळूहळू तिने आणि हेलनने मिळून
हळूहळू तिने आणि हेलनने मिळून घेतलेल्या अनुभवांकडे तिच्या नकळत वळतात >>> आणि त्यातला आईस हॉटेलचा उल्लेख झोशाच करते. मला एक मिनिट वाटले की इथे त्या संवादात तो संदर्भ आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून तो आधीचा सगळा सीन होता की काय.
ते त्यांच्यातलं चिडवाचिडवीचं known dynamic असावं. >>> हो तसेच असेल.
>>> आणि त्यातला आईस हॉटेलचा
>>> आणि त्यातला आईस हॉटेलचा उल्लेख झोशाच करते.
हो हो!
आणि त्या डीएचएल डॉक्टरशी बोलल्यानंतर अगदी शेवटच्या मिनिटभरात काहीतरी सुचल्या/समजल्यासारखं स्माइल येतं तिच्या चेहर्यावर असं वाटलं का कोणाला?
मी काल रात्री दुसर्यांदा पाहिला E3, तेव्हा या काही गोष्टी नोटिस झाल्या.
वेफेअरर एअरलाइन त्यापैकीच!
अंजली१२ने पाहिलाच नव्हता होय E3 अजून! बघ लवकर!
झोशा हेलनच्या मनातलं काय काय
झोशा हेलनच्या मनातलं काय काय नक्की सांगते ह्याची मला पण उजळणी करायची आहे. की जे सांगितल्याने कॅरल अनकंफर्टेबल होते. ते फक्त गतस्मृती विव्हलता आहे का आणखी काही सबजेक्ट मॅटर मध्ये आहे ते बघायचं आहे.
रीरन पण केलास तू!
Pages