
'ब्रेकिंग बॅड' या ऑल टाईम बेस्ट टीव्ही सिरीजचा लेखक दिग्दर्शक विन्स गिलिगन याची नवीन मालिका अॅपल टीव्हीवर शुक्रवारी सुरू झाली.
पहिल्या सीझनमध्ये ९ एपिसोड असणार आहेत, दर शुक्रवारी एक याप्रमाणे रिलीज होतील.
त्यांचा कीस किंवा पिसं काढायला, त्यावरून वाद घालायला, प्रसंगी हमरीतुमरीवर यायला हा धागा उपयोगी पडेल.
****************************************************************************************************************
इथे स्पॉइलर्स येतील. नको नको म्हणत कधी अनवधानाने, कधी राहावत नाही म्हणून दिले जातील. त्याला इलाज नाही.
ज्यांनी मालिका अजून बघायला सुरुवात केलेली नाही त्यांनी आपापल्या जबाबदारीवर धागा वाचावा किंवा वाचू नये!
****************************************************************************************************************
गिलिगनचे अनेक फॅन्स इथे आहेत, त्यांना पेशल आणि सहर्ष आमंत्रण.
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' 
झोशा काही सांगते आहे तर केरल
झोशा काही सांगते आहे तर केरल प्लीज केरल प्लीज करत बसतात. प्राण जायच्या वेळी 'राज तुम्हारा बेटा नही है बल्की' .... खटाक.... दिवा विझला. आणि इथे ऑडिबल नॉईज मुळे धड ऐकू आलं नाही यात विलक्षण साम्य आहे ना? >>>
सत्यं ब्रूयात् प्रियं
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्!
अंजली
मला एकदम We just want to help
मला एकदम We just want to help फिलिंगच आलं.>>
हो ना! फारच अनकंफर्टेबल फीलिंग. ते ही डॉक्टर्स ऑफिस मधल्या फ्रंट स्टाफ कडून 
तेही देसी
तेही देसी
अर्र! डेफिनेटली सस्!
अर्र! डेफिनेटली सस्!
ओएमजी!!!!
ओएमजी!!!!
बाप रे , बरंच काय काय झालं
बाप रे , बरंच काय काय झालं आजच्या भागात! डोक्याला शॉट देऊन गेला आहे !! प्रश्न प्रश्न वाढत आहेत!!
आता एक आठवडा विचारात घालवा
आता एक आठवडा विचारात घालवा त्या शीटखाली दडलंय काय?
शीट खाली तर आहेच... पण ते
शीट खाली तर आहेच... पण ते बारकोड दिसणे, तो नॉट फाऊंड येणे... बाकी बारकोड कशाचा आहे हे घरी बसून ऍप वर स्कॅन करून समजलं असतं की... तर ते सोडून देऊ.... मग त्या बारकोड चा मॅच डोळ्याला समजणे, त्या इंटर्नल पिशवीच्या बाहेरच्या अक्च्युअल प्रॉडक्टची, म्हणजे शोधायची आहे ब्राऊन रंगाची पिशवी, लोकेशन सापडली वर कपडे चढविलेल्या डॉग फूड ची. ते डॉग फूड ही कर्मधर्म संयोगाने गावातच बनवत होते. तर मूळ ब्राऊन पिशवीत काय आहे ते शोधायला त्याच प्रकारची ब्राऊन पिशवी वापरणाऱ्या भलत्या उत्पादनाच्या कारखान्यात वेष्टनात काही सापडणे हा किती लाँग शॉट आहे!
पण आता कायनातने ठरवलं असेल तर काय घ्या!
आपण उत्सुकता दाखवायची.
आपण उत्सुकता दाखवायची. Lol>>>
आपण उत्सुकता दाखवायची. Lol>>>>> नाहीतर काय? लाँग आणि स्लो....
फॉरवर्ड सुद्धा केलं नाही न जाणो काहीतरी क्लू सुटायचा..
(No subject)
.
.
.
काय कॅरल शिकणार गुळाचा दीड तारी पाक घरच्या घरी करायला? पाहायला विसरू नका 'प्लूरिबस' येत्या शुक्रवारी सहा वाजता!
.
.
(No subject)
चाटुन तरी बघ यार! काय आहे ते
चाटुन तरी बघ यार! काय आहे ते कळेल तरी. तू तशी पण इनफेक्ट झाली नाही आहेस, त्यांनी कनवर्ट करायचे अथक प्रयत्न तर केलेच आहेत. आता हे चाटून काय असं आभाळ कोसळणार आहे!
गूळ का गूळ पाक का पाक होजाए!
गूळ पाक आणि 'काय'ने सुरू
गूळ पाक आणि 'काय'ने सुरू होणारं वाक्य
दीड तारी त्याला कोण मारी!
एकदम 'लिक' बेट वाक्य!
एकदम 'लिक' बेट वाक्य!
बघितला का? जिसका डर था वही
बघितला का? जिसका डर था वही हुआ! HDP !!
आता हे काय स्टेम सेल नवीन प्रकरण? आधी हा हॅपी वायरस असाच पसरत होता ना?
जर या लोकांना काही इंडिव्हिज्युआलिटी नाही तर नावं तरी का आहेत?
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' >>> एव्हढा वेळ नाही. वुई आर ओके विथ फटाकडी, भिंगरी, मोसंबी नारिंगी, भन्नाट भानू, बोलातिगु, ए जी सशि, ह्योनपा,मानबा, तुपारे. हे ज्यांनी पाहिले नाहीत त्यांच्या निर्णयाचा आदर आहे.
असंख्य चाहते म्हणजे सहा जण ? आर्यन मधे पण व्हिक्टीम ची संख्या सहाच आहे. आर्यन पाहिला नसेल तर रिस्पेक्ट. पाहणार नसाल तर फुल्ल रिस्पेक्ट. पाहणार असाल तर यू आर विनर !
आता हे काय स्टेम सेल नवीन
आता हे काय स्टेम सेल नवीन प्रकरण? आधी हा हॅपी वायरस असाच पसरत होता ना? >>> तो व्हायरस जेव्हा पसरला तेव्हा हे १२ सोडून इतर सर्वांना त्याची लागण झाली. यांना का झाली नाही त्यावर संशोधन करायला त्यांचे स्टेम सेल हवे असतात - असे मी समजलो.
तो गँबलिंग सीन होता त्याचा काय संदर्भ आहे? तो लुटूपुटूचा होता का? अशा गेम्स मधे या १२ पैकी एकतरी असल्याशिवाय त्या गेम्स ना काही अर्थच नाही ना?
कॅरल हसली फायनली या भागात.
काय कॅरल शिकणार गुळाचा दीड तारी पाक घरच्या घरी करायला? पाहायला विसरू नका 'प्लूरिबस' येत्या शुक्रवारी सहा वाजता! >>>
हो!
हो!
गॅम्बलिंग मध्ये आपला फ्रेंची कूल होता तो दुसरा चिडलेला ना? कसा काय?
हे लोक वंशासातत्य राखण्यासाठी जीव वाढवतात का? त्या लोकसंख्या वाढीचा दर काय आहे? १० वर्षांचे अन्न आहे यात तो दर जमेस धरला आहे का? अन्न तोडायचे नाही, कोणाला मारायचे नाही मग जमिनीवर पडलेले सफरचंद, मुळापासून विलग झालेले बटाटे, इतर वनस्पती खाणे आणि मेलेली माणसे खाणे यात अर्थाअर्थी काही फरक नाही. दुसरे चालते तर पहिले चालायला काही हरकत असू नये.
आणि आज पर्यंत मानवाने निर्माण केलेलं ( अर्थात इतरांना इजा पोहोचवून) अन्न चालतं, म्हणजे दुसऱ्यांनी मारलेले चालते स्वतः मारायचे नाही असला भोंदू धर्म दिसतोय.
बाकी अमेरिकन मानसिकता... आपण सर्वात बेस्ट, आपल्याला सगळं कळतं, आपण जगाचे प्रश्न सोडवू, आपण वर्ल्ड पीस करू इ. विषयी जगाला काय वाटतं? कोणी अमेरिकेला कसं खार लावून विचारत नाही, फक्त इग्नोरच नाही तर शक्यतोवर दूरच ठेवतात हे सांगायचं असेल तर ते छान पोचलं. त्यावरची कॅरल ची प्रतिक्रिया, तो अभिनय, एकही शब्द न बोलता, किंबहुना शब्द गिळून केलेला अभिनय निव्वळ लाजवाब!
आणि कोणाला इजा न करता, आनंदात
आणि कोणाला इजा न करता, आनंदात जगायचे आहे तर खुशाल जगा. पण मग अन्न कमी पडलं तर काहीतरी लूप होल काढायची अभिलाषा का बरं मनी बाळगता? जो धर्म आहे तो कसोशीने पाळा की.
या पृथ्वीवर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट होते हे मात्र लक्षात असू द्या. ते कायोटी आणि रॅकून आले अंगावर की ही लोकं काय करतात? हे शहरातील माणसाळलेले प्राणी. बाकी वन्य हिंस्त्र पशू पक्षी बरेच आहेत. वॅक्सिन आणि अँटीबायोटिक्स डीनायर असतीलच ना हे लोक!
मरा म्हणावं! एक कोविड आला की सगळे मरतील की!
गॅम्बलिंगचा सीन मेड अपच होता.
गॅम्बलिंगचा सीन मेड अपच होता. फ्रेन्चीने त्या आयपॅचवाल्याला 'आता चीड की!' म्हणून खूण केली ना!
मला फ्रेन्चीचं (काय नाव आहे त्याचं? कुंबाया?) कॅरेक्टर आवडलंय. त्यालाही त्याची इन्डिव्हिज्युआलिटी सोडायची नाही, पण तो नुसता पोलाइटच नाही तर 'दे सी इट डिफरन्टली' हे समजण्याइतका ओपन माइंडेड आहे.
त्याला कॅरलचा पॉइंट ऑफ व्ह्यू - आणि त्यामुळे तिची चीडही - समजते.
आणि त्याला लाइफने दिलेल्या लिंबांचं लेमनेड, नव्हे मार्गरीटा करता येते!
गिलिगन हलकट आहे बाकी!
दीड आठवडा नुसता कॅरलने काय पाहिलं असेल म्हणून तर्कवितर्क करण्यात गेला आणि या एपिसोडमध्ये त्याने त्यातली हवाच काढून टाकली!
उरलेले ११ कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांना आपण नको आहोत हे कळल्यावर कॅरलसारख्या खत्रुड बाईच्यासुद्धा डोळ्यांत पाणी आलं!
पण आता निदान त्यांचा कन्सेन्ट आणि त्यांच्या स्टेम सेल्स मिळाल्याशिवाय त्यांना कन्वर्ट करता येणार नाही हा दिलासा मिळाला.
हे लोक इतकं ड्रायव्हिंग करताहेत, गॅस कुठे भरतात?
आता उरलीसुरली भिस्त त्या पॅराग्वेच्या मनुक्षावर (मानोसुस?) आहे!
)
कॅरलच्या व्हीडिओमुळे त्याला खरंच मदत झाली - त्या स्टोरेज फॅसिलिटीमधून बाहेर पडून दोन घास खाऊ शकला बिचारा!
(लोल घरचा फूड सायंटिस्ट 'but that food was sitting the in the refrigerator for 9 days!' म्हणून ओरडा करत होता त्याला तु .क. देऊन गप्प केलं!
त्याची 'शॅपरोन' त्याच्या मनातल्या/स्मृतीतल्या आईसारखी दिसणारी असावी का? अपार्टमेन्टमध्ये बहुतेक फक्त वडिलांबरोबरचा फोटो होता.
>>>
>>>
बाकी अमेरिकन मानसिकता... आपण सर्वात बेस्ट, आपल्याला सगळं कळतं, आपण जगाचे प्रश्न सोडवू, आपण वर्ल्ड पीस करू इ. विषयी जगाला काय वाटतं? कोणी अमेरिकेला कसं खार लावून विचारत नाही, फक्त इग्नोरच नाही तर शक्यतोवर दूरच ठेवतात हे सांगायचं असेल तर ते छान पोचलं.
<<<
That's an interesting take!!

हो - र्हेच्या अॅक्टिंगबद्दल प्रश्नच नाही!
मला ते दहा वर्षांचं गणित काही कळलं नाही. शेती निषिद्ध आहे का त्यांच्यात?
जॉन सीना आल्यावर मला जाम
जॉन सीना आल्यावर मला जाम हसायला आलं. त्यात त्याचा काहीतरी संवाद होता बहुतेक फार्मिंग इ बाबत तो मिस झाला. परत बघितला पाहिजे तो भाग.
ज्या त्या डिस्प्लेवर वेलकम
ज्या त्या डिस्प्लेवर वेलकम कॅरल लिहितात तर वाटेतल्या सगळ्या गॅस स्टेशनवर गॅस भरून ठेवत असतील कोणी सांगावं!
कॅरोल एकदम लहान मुलीसारखी आहे
कॅरोल एकदम लहान मुलीसारखी आहे हट्टी, चिडकी तरी पण निरागस वाटत राहते. तिच्या हेअरकटमुळे फनी पण वाटते. तिचे सारकास्टिक प्रश्न मस्त असतात.
गॅम्बलिंगचा सीन मेड अपच होता.
गॅम्बलिंगचा सीन मेड अपच होता. फ्रेन्चीने त्या आयपॅचवाल्याला 'आता चीड की!' म्हणून खूण केली ना! >>> "त्यांना" एकमकेकांच्या मनातले कळते. पण या १२ पैकी लोकांच्या नाही. त्यामुळे तसा पोकर शक्य आहे. मला म्हणायचे होते की हे १२ नसतील तर बाकीच्यांमधे पोकर गेम पॉइण्टलेस आहे ना? या १२ पैकी किमान एक असले तर नेहमीसारखा होईल. पण त्याकरता तो आख्खा सेट अप कशाला चालू ठेवतील?
त्या स्टोरेज फॅसिलिटीमधून बाहेर पडून दोन घास खाऊ शकला बिचारा! >>> तो स्वतःच्या घरी येतो का?
मधे ते घड्याळ फ्लॅशबॅक मधे जाताना दाखवले ते कधी? पॅराग्वेच्याच सीनला?
>>> पण त्याकरता तो आख्खा सेट
>>> पण त्याकरता तो आख्खा सेट अप कशाला चालू ठेवतील?
त्याची विश ही त्यांची कमान्ड आहे म्हणून! तो गेल्यावर ते सगळे मिळून आवराआवरीही करतात!
टाईम मागे गेला तो १२व्या दिवशी कॅरल कुंबायाला भेटली, दरम्यान नवव्या दिवशी पराग्वेमध्ये मनोसस तिचा व्हिडिओ पाहून बाहेर पडला हे दाखवायला.
हो.
हो.
पेरूग्वेला पहिली मेल पोहोचते तेव्हा. ते इतकं एक्सप्लिसिट दाखवायची गरज न्हवती. मेल उघडली आणि त्याला समजलं आणि जेवला पोटभर तरी समजलं असतं
>> इतकं एक्सप्लिसिट दाखवायची
>> इतकं एक्सप्लिसिट दाखवायची गरज न्हवती.
होती ना - ते त्याच्या घरी गेल्यामुळे त्याच्या बॅकग्राउंडबद्दल कळलं ना? त्याला काही बायकामुलं असल्याचं दिसलं नाही.
मला त्याची शॅपरोन आणि त्याच्यात काय बोलणं होतं त्याबद्दल कुतुहल वाटलं. त्याला तरी subtitles द्यायची!
मला पाहिल्यापासून भीती आहे की
मला पाहिल्यापासून भीती आहे की वरिजिनल ऍपल टीव्हीवर सब टायटल असतील आणि फार नॉन इंग्लिश बोलायला लागले की मला सबस्क्रिप्शन घातला लागतंय की काय!
Pages