PLUR1BUS (There is no 'I' in 'we'!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 November, 2025 - 10:06

'ब्रेकिंग बॅड' या ऑल टाईम बेस्ट टीव्ही सिरीजचा लेखक दिग्दर्शक विन्स गिलिगन याची नवीन मालिका अ‍ॅपल टीव्हीवर शुक्रवारी सुरू झाली.
पहिल्या सीझनमध्ये ९ एपिसोड असणार आहेत, दर शुक्रवारी एक याप्रमाणे रिलीज होतील.
त्यांचा कीस किंवा पिसं काढायला, त्यावरून वाद घालायला, प्रसंगी हमरीतुमरीवर यायला हा धागा उपयोगी पडेल.

****************************************************************************************************************
इथे स्पॉइलर्स येतील. नको नको म्हणत कधी अनवधानाने, कधी राहावत नाही म्हणून दिले जातील. त्याला इलाज नाही.
ज्यांनी मालिका अजून बघायला सुरुवात केलेली नाही त्यांनी आपापल्या जबाबदारीवर धागा वाचावा किंवा वाचू नये!
****************************************************************************************************************

गिलिगनचे अनेक फॅन्स इथे आहेत, त्यांना पेशल आणि सहर्ष आमंत्रण.
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी लिहीन लिहीन म्हणतो आणि विसरतो. या बीबीच्या वरच्या फोटोत कॅरलच्या नाकाच्या खाली तोंडावर आयताकृती पिवळी पट्टी/ छाया आहे. ती चित्रात तशीच आहे का इथे टाकताना रिझोल्युशन चा काही खेळ झाला आहे.
एकुणच पोस्टर मधल्या पिवळ्या रंगाचा काही संदर्भ अजुन मिळालेला नाही ना?

मला काही सेकंद नीट बघितल्यावर एकदम ती पिवळी पट्टी दिसू लागली. तू उल्लेख केला नसतास तर नसते कळाले. फोटोच्या वेळचे रिफ्लेक्शन आहे इतके "ब्लू कर्टन" साधे आहे की एकदम पुढच्या कोणत्यातरी एपिसोड मधे उलगडा आहे माहीत नाही Happy

. की जे सांगितल्याने कॅरल अनकंफर्टेबल होते. ते फक्त गतस्मृती विव्हलता आहे का आणखी काही सबजेक्ट मॅटर मध्ये आहे ते बघायचं आहे. >>> हेलनच्या डोक्यातील माहिती तिने (झोशाने) वापरू नये असे ती म्हणत असते ना? हेलन मरण्याआधी काही वेळ त्यांच्यात सामील झाल्याने तिची माहिती ट्रान्स्फर झालेली असते ना?

बाय द वे हेलन केवळ खाली पडल्याने मेली का? उभे असल्याच्या अवस्थेत अनेकांवर त्या व्हायरसचा परिणाम झाला. ती एकटीच का मेली? तो सीन येतो तेव्हा कथेची आता असलेली माहिती झालेली नव्हती.

हो, तो बहुधा रेझोल्यूशनचा लोच्या असावा. पुन्हा ट्राय करते.

>>> बाय द वे हेलन केवळ खाली पडल्याने मेली का?
हो, पडताना झालेल्या हेड इन्ज्युरीमुळे मेली आय थिंक.

हेलनच्या डोक्यातील माहिती तिने (झोशाने) वापरू नये असे ती म्हणत असते ना? >> मेंशन करू नको इतकंच ना? माहिती तर सगळी कलेक्टिव्ह पूल मध्ये गेलीच असेल. आता त्या पूल मधुन फेच करताना त्या माहितीचा सोर्स हा मेटाडेटा त्या टेबल्स मध्ये ठेवलाय, किती मेटा डेटा आहे कोण जाणे!

पडताना झालेल्या हेड इन्ज्युरीमुळे मेली आय थिंक. >> काय माहित हेड ट्रॉमा का ... कॅरल तेव्हा चिडली वगैरे होती त्याचं फळ!
नक्की किती चिडलं की माणूस मरतं. कोण चिडचिडप्रूफ असतात? हे पण प्रश्न अ‍ॅड करा.

असे बरेच लोक मेलेत ना पण, सगळेच कन्वर्ट होऊ शकले नाहीत म्हणून तर इतक्या कॅजुअल्टीज.
मला नाही दिसत आहे पिवळी पट्टी Happy
त्या डीएचएल डॉक्टरशी बोलल्यानंतर अगदी शेवटच्या मिनिटभरात काहीतरी सुचल्या/समजल्यासारखं स्माइल येतं तिच्या चेहर्‍यावर असं वाटलं का कोणाला? >> हो मला वाटलं होतं!

हो गेली पिवळी पट्टी.

पण खरे म्हणजे राहू द्यायला हवी होतीस. आपण किती वेगवेगळे अर्थ त्यातून काढू शकतो समजले असते Happy

Lol

अंजली१२ने पाहिलाच नव्हता होय E3 अजून! बघ लवकर!>>>>>>>> बघितला बघितला.
शुभमस्तु... शुपी शुप शुप! Lol

डीएचएल डॉकटर... का? कळलं नाही. मला तर ती हसल्यासारखी नाही वाटली. परत बघते. Wink
कॅरोल किती संयतपणे चिडचिड करते.

ह्याईव्ह लोक सगळे एकमेकांना कनेक्टेड असतात. त्यामुळे प्रेतं उचलणारी बाई मोपेड आणि जेट चालवू शकते तसं डिलिव्हरी पर्सन सर्जरी करतो हे अधोरेखित करायला दाखवलं.
कॅरल आता भडकली तर जातील आणखी ११ मिलियन ढगात ना!

तं उचलणारी बाई मोपेड आणि जेट चालवू शकते तसं डिलिव्हरी पर्सन सर्जरी करतो हे अधोरेखित करायला दाखवलं.>>> गॉट ईट!

What we know about them:
१. 'जॉइन' रिव्हर्सिबल आहे.
२. इन्डिव्हिज्युअल्स इतरांना अफेक्ट न करता दारू बिरू पिऊ शकतात.
३. पॅराग्वेचा माणूस कॅरलइतकाच खत्रुड आणि तिच्याहून जास्त काटेकोरपणे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट टाळतो आहे.

या आठवड्याचा एपिसोड उद्याच येतो आहे! Can't wait...!!

Meanwhile मुलांबरोबर पहिल्यापासून बघायला सुरुवात केली. पहिल्या भागात हेलनही तिला 'इट्स गुड इफ इट (तिचं लेखन) मेक्स ईव्हन वन पर्सन हॅपी' असं म्हणाली होती! Happy
मग जॉइनने तिला नेमकं तेच त्याच शब्दांत सांगितलं.

जॉईन रिव्हर्सिबल आहे, म्हणजे ते सगळ्या जगाला (ही ११ माणसं सोडून) माहित आहे. म्हणजे एंडगेम रिव्हर्सिबिलीटीचा फॉर्म्युला सांगणारा एक ट्रेटर शोधायचा (तो कसा शोधयचा याच्या आता एकेक क्लुप्त्या चेक मार्क करायच्या.) अर्धा वेळ त्यात गेला की मग उरलेल्या अर्ध्या वेळात ते गुलबकावलीचं फुल शोधत फिरफिर फिरायचं आणि मग ७ बिलियन लोकांच्या फ्री विलची पर्वा न करता त्यांना परत एकेक डोनट खायला द्यायचा असं असणार का? Wink

असं कसं! असं कसं!! ते परत जुळणार नाही याची काळजी घ्यायला नको? का पोस्ट सीझन प्ले ऑफची रूम ओपन ठेवायची आहे? Proud
तुटले की पार्श्वसंगीत म्हणून हे संदीपचे गाणे वाजवा.

बंध रेशमी तुझ्या सवे जे जुळले
अन क्षितीजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एक क्षणात हे रंगबंध विस्कटले
तुटले!

Lol

३ सीझन्स ठरले आहेत म्हणे ना ? पहिल्याच सीझन च्या फिनाले पर्यन्त काहीही मार्ग सापडायची अपेक्षा ठेवू नका. एखादी लहान अचीवएन्ट टोवर्ड्स द बिगर गोल दाखवतील बहुतेक. मला अशीच स्लो, घोळवून सांगितलेली स्टोरी ची पद्धत अ‍ॅक्चुअली आवडते आहे! मी त्या लॅरी आणि कॅरल च्या त्या संभाषणाचा पार्ट ३ वेळा पाहिला! कॅरोल चं इन्टरॉगेशन - हेलन चं माझ्या पुस्तकांबद्दल काय मत होतं, माझी पुस्तकं "तुम्हाला" कशी वाटली वगैरे. खूपच मज्जा आली Happy

>>> मी त्या लॅरी आणि कॅरल च्या त्या संभाषणाचा पार्ट
मी जरा त्या 'खोटं बोलत नाहीत, पण शुगरकोट करतात'पाशी अडले तिथे. व्हॉट मेक्स अ लाय अ लाय? Proud

आणि मुळात हे सगळे प्रोटोकॉल्स आले कसे? का? फिजिकली हर्ट करायचे नाही, खोटे बोलायचे नाही वगैरे ? ११ लोकांना मारले तर खरे तर त्यांना सोपे होईल ना? की त्यांना मुद्दाम स्टडी सब्जेक्ट म्हणून जिवंत ठेवले असावे का?

युधिष्ठिर झालाय त्यांचा. उत्तर माहित असुन ते न सांगणे, त्यासाठी हार्ट अटॅक आणणे म्हणजे शेवटी मारणे, किंवा मारायची तयारी दाखवणे. पण परत आम्ही मारलं नाही कॅरलने बेडी तोडायची परवानगी दिली नसती तर ते पाप आमचं नाही तिचं. म्हणजे मूळ कोड मध्ये लपवायचा कोड करायचा, त्यासाठी पाप्लिटेशन वाढवायची तजवीज करायची हे कसलं आलंय हर्ट न करणे. थोडक्यात हर्ट न करणे ला लिमिट्स आहेत. जसं खोटं बोलण्याला आहेत.

परत झोशा काही सांगते आहे तर केरल प्लीज केरल प्लीज करत बसतात. प्राण जायच्या वेळी 'राज तुम्हारा बेटा नही है बल्की' .... खटाक.... दिवा विझला. आणि इथे ऑडिबल नॉईज मुळे धड ऐकू आलं नाही यात विलक्षण साम्य आहे ना? Wink

यापेक्षा एक सोपं इफ स्टेटमेंट असतं कोड मध्ये तर किती एलिगंट झाला असता एक्स्पिरिअन्स! बाईगं या प्रश्नांची उत्तरे देणे आमच्या वॅल्युज, एथिक्सच्या विरोधी आहे. मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. कशाला वाढेल हार्ट रेट?
इतकी माणसं येणार हे कॅरला माहित होते म्हणूनच तिने झोशाला बाहेर आणले. मग दोन बिल्डिंगच्या मधोमध कशाला ठेवलं? जरा कोपच्यात तरी घेऊन जायचं. कार मधुन एक चक्कर मारुन आणते करायचं. वेळ कसा वाढवता येईल ते बघायचं. हतकडी घालून वेळ वाढेल हे परत बॉलिवुड आणि नॉट सो थॉट थ्रू सोल्युशन झालं. हाईंड साईट अर्थात. पुढच्या वेळेला फेलसेफ विचार कर कॅरल.

>>> आणि मुळात हे सगळे प्रोटोकॉल्स आले कसे? का?
ते तर केवळ त्या जॉइनिंगचा इनहेरन्ट परिणाम म्हणून आले असं वाटतं मला. म्हणजे जर सगळ्यांचा ब्रेन एक झाला, तर हार्मिंग एनीवन इज सेल्फ-हार्म. सगळ्यांना सगळं माहीत असल्यामुळे मुळात खोटं हा कन्सेप्टच नाही.

प्रॉब्लेम होतो आहे तो या आऊटसाइडर्समुळे.
जसं लहान मुलाला स्ट्रेन्जर सेफ्टी शिकवावी लागते तसं त्यांना यांचं बिहेवियर कळायला त्रास होतो आहे.

>>> बाईगं या प्रश्नांची उत्तरे देणे आमच्या वॅल्युज, एथिक्सच्या विरोधी आहे. मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही
असं तिने सांगितलं होतं ना आणि आधी एकदा शांतपणे? त्या ड्रिंक्स घेतानाच्या सीनमध्ये?

कॅरल चा व्हाईट बोर्ड मस्त आहे. एका मागे एक स्लायडींग काहीतरी.
मेयर घर साफ करत होता तिचं हाहा...
त्यांना मुद्दाम स्टडी सब्जेक्ट म्हणून जिवंत ठेवले असावे का?>>> मलाही तसंच वाटतंय. गिनिपिग्ज असावेत ते.

हो!
मग इथे का गडबडली? ट्रेन करायला हवंय का? (हे एआय नाही, आणि गिलिगनने मी कुठलेही जनरेटिव्ह एआय वापरत नाही इ. सांगितलं आहे. त्याची स्टोरी/ जर्म १० वर्षे जुना एआय पूर्ण काळातील आहे इ. मान्यच) पण एकुण जनरेटिव्ह एआय आणि यात अनेक साम्यस्थळे/ पॅरलल्स दिसतात.

काल माझी डॉ अपॉईंटमेंट एका रिसेप्शनिस्टने इतक्या प्रेमाने दुसर्‍या लोकेशनला बदलून दिली डिअर डिअर म्हणत (मला वसवसची अपेक्षा होती खरं तर) Proud तुला दुसर्‍या क्लिनिकचा अ‍ॅड्रेस सापडेल ना? लिहून घेतेस का वगैरे म्हणायली लागली. अजून १-२ रस्ते सांगितले गुगल मॅप कदाचित तुला बरोबर नेणार नाही वगैरे! मला एकदम We just want to help फिलिंगच आलं.

मी जरा त्या 'खोटं बोलत नाहीत, पण शुगरकोट करतात'पाशी अडले तिथे >>> एक संस्कृत सुभाषित की वचन आहे ना खरे बोलावे, अप्रिय बोलू नये वगैरे. ती झोशा व नंतर लॅरी सुद्धा तसेच काहीतरी करतोय असे वाटले.

ते "त्यांनी" वाचले असेलच. नाहीतर त्यांना संस्कृतमधला फक्त दारू पिण्याशी संबंधित शब्द माहीत आहे असे होईल, जोईला जसे इटालियनमधले फक्त बॅड वर्ड्स माहीत असतात Happy

संस्कृतमधला फक्त दारू पिण्याशी संबंधित शब्द माहीत आहे असे होईल>>>>>> आता आमच्या भावना दुखावल्या जाणार आहेत याची नोंद घ्यावी Lol

Pages