Submitted by फेरफटका on 10 February, 2014 - 10:59
धूसर होत, विरत जाणारी संध्याकाळ,
क्षितीजावर उधळीत जाते अनेकस रंग,
तुझ्या आठवणींचे....
हिरवे, पिवळे, जांभळे, ... कितीतरी..
काही ओळखीचे.... बरेचसे अनोळखी,
पण तरिही हवेहवेसे....
प्रत्येक रंग असतो अनाघ्रात.....
तुझा नाजुकसा स्पर्श झेलूनही...
तुझा शब्द न शब्द रंगवणारा प्रत्येक रंग,
घेऊन येतो नि:शब्दतेचं अबोल वरदान.....
अन प्रत्येक रंग असतो, तुझ्या श्वासातला उष्णावा माझ्यापर्यंत पोहोचवणारा, एक सुगंधी दूत.
सगळेच रंग कसे हवेसे वाटणारे, मनाला मोहवणारे,
तुझ्या डोळ्यातल्या नशेसारखे..... झिंगवणारे...
अंतरीचा कण न कण पुलकित करणारे.....
खरं सांगू सखे, हे सगळे रंग नुसतेच रंगवतात....
..... भिजवत नाहीत मला..
कारण, रंगांची रांगोळी जेव्हा तारा छेडते ना मनातल्या सतारीच्या..
तेव्हा एकच सूर शोधित रहातो मी .... वणवण करित...
तुझ्या अंतरंगातील शुभ्रतेचा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच सुरेख आहे.
खूपच सुरेख आहे.
A White Rose" by John Boyle O'Reilly ....... ही सुंदर कविता आठवली.
This poem is about love, contrasting the red rose (passion) with the white rose (purity) and ending with the idea that the sweetest love has a touch of desire.
धन्यवाद! A white rose शोधुन
धन्यवाद! A white rose शोधुन वाचेन आता.
हंळुवार व तरल , खूपच छान !!!!
हंळुवार व तरल , खूपच छान !!!!!
धन्यवाद भाऊ.
धन्यवाद भाऊ.
खूप छान, तरल.
खूप छान, तरल.
आजपर्यंत प्रतिसादच वाचले, पहिल्यांदा असं काही !
“आजपर्यंत प्रतिसादच वाचले,
“आजपर्यंत प्रतिसादच वाचले, पहिल्यांदा असं काही” - धन्यवाद!
अंगभूत आळशीपणा ही न लिहिण्याची प्रेरणा आहे
११ वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या ह्या कवितेला एकदम प्रतिक्रिया आल्यामुळे खूप आनंद झाला. अधून-मधून लिखाण करायला हवं असंही वाटायला लागलंय.
*अधून-मधून लिखाण करायला हवं
*अधून-मधून लिखाण करायला हवं असंही वाटायला लागलंय. * -
अहो फेफजी, ही दैवी कृपा व आज्ञा समजायची व पालन करायचं !
रच्याकने, तुमच्यामुळे उगीच मला मात्र हा घरचा आहेर मिळाला ! -
वा:, ताबडतोब बसलात का बाराखडी काढायला ! अहो, ते म्हणतात तें लिखाण वेगळं, तुमचं हे गिरवणं वेगळं !!
भाऊ
भाऊ

क्या बात हैं भाऊ!! बर्याच
क्या बात हैं भाऊ!! बर्याच दिवसांनी तुमचं व्यचि आलंय. मस्त जमलंय.
>>>>>>अधून-मधून लिखाण करायला
>>>>>>अधून-मधून लिखाण करायला हवं असंही वाटायला लागलंय. Happy
जरुर!!
छान लिहिलयं..!
छान लिहिलयं..!
रंगांची रांगोळी जेव्हा तारा
रंगांची रांगोळी जेव्हा तारा छेडते ना मनातल्या सतारीच्या..
तेव्हा एकच सूर शोधित रहातो मी .... वणवण करित...
तुझ्या अंतरंगातील शुभ्रतेचा... >>> खूप छान
भाऊ
मस्त व्यक्तिचित्र.
छान कविता!
छान कविता!
भाऊ व्यंगचित्र आवडलं!
रुपाली विशे-पाटील, सिमरन,
रुपाली विशे-पाटील, सिमरन, छन्दिफन्दी - धन्यवाद!
सुरेख आहे !
सुरेख आहे !