‘consciousness’ किंवा जाणीव याची याची सर्वमान्य व्याख्या अजूनही करता आलेली नाही, जाणीव हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, उदाहरणार्थ “तिला ह्या गोष्टीची जाणीव नाही” “त्याच्या टेबलाखाली एक उंदीर आला होता त्याची त्याला जाणीव नव्हती,”
एखादे दृश्य बघितल्यावर आपल्याला ज्या भावनांची अनुभूती होते त्याला मनोवैज्ञानिक म्हणतात “qualia.” क्वालीआ हे जाणिवेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का? कारण कामेऱ्याला जाणीवा consciousness नाहीत. अजून एक, ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना आपल्या प्रिय पत्नीच्या मनात येत असतील काय?आपल्या मनात आणि तिच्या मनात काय विचार येतात हे तिला काय किंवा मला काय शब्दात सांगता येत नाहीत. कारण आम्ही दोघेही रोबो नाही आहोत.
1996 साली त्यावेळच्या जागतिकविजेत्या बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला गुगल DeepBlue ह्या प्रोग्रामने हरवले. समजा DeepBlue ज्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटले असते? त्या संगणकाला काय वाटले असेल.
David Chalmers ह्या तत्ववेत्याच्या मताप्रमाणे प्रत्येक कणाला गुणधर्म असतात उदाहरणार्थ रंग रूप तापमान घनता विद्युतभार स्पिन इत्यादि त्याप्रमाणे त्याना जाणीवही असते. अगदी रस्त्यात पडलेल्या दगडालाही जाणीवा आणि भावना असतात.
यंत्रांना जाणीव आणि भावना असतात काय? हा प्रश्न मानवी इतिहासात वेळेवेळी चर्चिला गेला आहे. अलन ट्युरिंग ह्या संगणक शास्त्रज्ञाने १९५० साली ह्यावर “Computing machinery and intelligence” हा शोध निबंध प्रसिद्ध केला. ह्याचेच रुपांतर पुढे Turing Test.मध्ये झाले.
जो पर्यंत मशीन कविता कथा लिहित नाही , किंवा स्वरावली बनवत नाही, ह्याशिवाय, केवळ लिहितच नाही तर हे काव्य “मी” लिहिले आहे ही जाणीव त्याला होत नाही, तो पर्यंत त्याची माणसाशी बरोबरी होणार नाही. हा अहं भाब जेव्हा जागृत होईल तेव्हा यंत्र आणि मानव यातला फरक संपेल. तेव्हा त्या यंत्राला यशाचा अभिमान, यंत्रातला एखादा पूर्जा किंवा ट्रांझिस्टर फेल झाल्यावर वाटणारे दुखः, दुसरया यंत्रा बद्दल असूया, कुणी खोटी स्तुती केल्यास धोक्याची घंटी, चुकी केल्यास होणारा मनस्ताप ह्या भावना अनुभवास येतील.
हे लिहिणे सोप आहे पण मशीनला भावना आहेत की नाहीत हे आपण जोपर्यंत आपण स्वतः मशीन बनत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील एक टप्पा.
१३.८ बिलियन वर्षांपूर्वी महाविस्फोट big bang झाला आणि विश्वाची सुरवात झाली. तेव्हा अवकाशात केवळ मूळ कण होते. तिथून सुरवात होऊन प्रथम उदजन hydrogen वायू निर्माण झाला. त्यानंतर अवकाश अनेक स्थित्यंतरातून गेले आणि आजच्या बुद्धिमान माणसाचा उदय झाला. सरते शेवटी आपण सर्व हे “माती” पासून आलो. ह्या निर्जीव मॅटरला जाणीव. भावना. अहंकार. स्वत्व. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, प्रेम हे भाव कसे निर्माण झाले? हे जर आपल्याला समजले तर आपणही असे जीवन निर्माण करू शकू. आज जी ठायी ठायी आपल्याला “कृबु” दृग्गोचर होते आहे तो ह्या प्रवासातला अत्यंत सोपा टप्पा आहे. ह्यात Deepblue आणि तत्सम प्रोग्राम येतात. ह्याच संगणकाने गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला होता. बुद्धीबळाच्या खेळात हे संगणक माणसापेक्षा कैक पटीने हुशार आहेत, पण हाच प्रोग्राम चार वर्षांच्या मुला समोर tic-tac-toe. खेळताना नांगी टाकेल! अश्या प्रोग्रामला आज लोक “कृबु” समजत आहेत, शास्त्रीय भाषेत ह्याना संकुचित “कृबु” Narrow AI म्हटले जाते. पण आता शास्त्रज्ञ सर्वंकष “कृबु” General AI AGI विकसित करण्यात आपले लक्ष केंद्रित करत आहेत. सर्वंकष “कृबु” म्हणजे जर एखाद्या मुलाला शिकवले तर त्याला अनेक खेळ खेळता येतील, अनेक कौशिल्ये शिकता येतील. तर माणूस हा असा आहे. तो गणित सोडवू शकेल, बाजारहाट करू शकेल, नकला करू शकेल, विनोद सांगून लोकांना हसवू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो कधी काळी अधे मध्ये आत्मचिंतनही करेल म्हणजे मी कोण आहे. कुठून आलो आहे? ह्या माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? इत्यादि.
ही AGI केव्हा विकसित होईल? काहींच्या मते लवकरच.काहींचे मत आहे की कदाचित २०५० पर्यंत तर काही असेही म्हणतात की कधीही नाही. हे सोपे काम नाहीये ह्याची शास्त्रज्ञांना जाणीव आहे. पण का? का?
Moravec ह्या शास्त्रज्ञाने ह्याबद्दल प्रथम विचार केला, म्हणून ह्याला Moravec’s Paradox असे म्हणतात. त्याच्या म्हणण्या प्रमाणे माणसांच्या साठी अवघड असणारे गणित किंवा तर्कशास्त्र ह्यासारखे विषय संगणकाला शिकवणे सोपं आहे पण मानवांसाठी सोपे असणारे टास्क म्हणजे चालणे, चेहरे ओळखणे किंवा जीव्हज प्रमाणे बर्टीला सगळ्या आणि कुठल्याली गोष्टीत सल्ला देणे असा संगणक बनवणे सोपे नाही,
Teaching computers hard things being easy and teaching them easy things being hard. शास्त्रज्ञाच्या मते कारण असे आहे की माणूस हा उत्क्रांतीच्या फेऱ्यामधून गेला आहे. डबक्यातल्या एक पेशी पासून उत्क्रांती होत होत अखेर त्याची परिणीती आजच्या मानवात झाली आहे. जीवनातल्या संघर्षात टिकून रहाण्यासाठी त्याच्या मेंदूत अनेक कौशल्ये कोरली गेली आहेत. त्याचा आपल्याला आपसूकच फायदा झालेला आहे, पण संगणकाला ह्या संघर्षातून जावे लागलेले नाही, परिणामतः ३७२६१८ गुणिले ३१५३७७८ हे गणित आपल्यासाठी अवघड आहे पण संगणकासाठी सोप आहे. तोल सांभाळून चालणे आपल्यासाठी सोपे आहे पण संगणकासाठी अवघड आहे. तुम्ही रोबोचे विडिओ बघितले असणार. जरा पहा ते कसे उभे रहातात, हसू येईल बघून.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
पुढच्या भागात मानवी मेंदूचे कार्य कसे चालते त्याची थोडक्यात माहिती घेऊ आणि यंत्रांना जाणीव होऊ शकेल का ह्यासाठी शास्त्रज्ञ काय संशोधन करत आहेत त्याची चर्चा करू.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध भाग १
Submitted by केशवकूल on 21 October, 2025 - 03:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचतेय. इंटरेस्टिंग विषय
वाचतेय. इंटरेस्टिंग विषय आहे.
चांगला माहितीपूर्ण लेख.
चांगला माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्त लेख!
मस्त लेख!
वाचतोय.. येऊ द्या पुढचे भाग
एक प्रश्न – रोबोला माणसाच्या जाणिवा देणे अवघड पण माणसाला रोबोची कृत्रिम बुद्धिमत्ता देण्याचे प्रयोग होतात का? म्हणजे मशीन तेच काम करतात माणसासाठी. पण माणसातच इनबिल्ट सुपरपॉवर वगैरे..
केकू लेख आवडला. उत्तम विषयावर
केकू लेख आवडला. उत्तम विषयावर छान लिहीले आहे.
आपणच कोणाचा तरी आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स असू. आपणही ट्रायल एररने शिकतोच की.
चांगल्या माहितीचं उत्तम संकलन
चांगल्या माहितीचं उत्तम संकलन आणि सहजसोपं विवेचन.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
उत्तम माहिती आणि सोप्या भाषेत
उत्तम माहिती आणि सोप्या भाषेत.
मानवी बुद्धी आणि कृबु मधला फरक डेकार्टचे वाक्य बदलून - I feel therefore I am! असा सांगता येईल कदाचित.
Moravec’s Paradox बद्दलही अधिक वाचायला आवडेल.
अगोदरच्या कुणी तुम्हाला
अगोदरच्या कुणी तुम्हाला पडलेला प्रश्न कसा सोडवला आहे हे तुमच्यासमोर आणून ओतणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ज्या गोष्टी डिजिटल( चित्रे, लेखन, ध्वनी वगैरे) केल्या गेल्या नाहीत त्या यातून बाद असतात.
सुरेख लेख! आवडला.
सुरेख लेख! आवडला.
हाच प्रोग्राम चार वर्षांच्या मुला समोर tic-tac-toe. खेळताना नांगी टाकेल! >>> इथे तो बुद्धिबळ वाला प्रोग्रॅम चालणार नाही कारण तो त्याकरता बनवलेला नाही (नॅरो एआय) - अशा अर्थाने वाचायचे ना?
एजीआयकरता हे कॉम्प्युटरला "जाणीव" निर्माण होण्याची गरज आहे, की जगात जितके ज्ञान आहे ते सगळे त्याने सध्याच्याच पद्धतीने आत्मसात केल्याने (किंवा टू बी प्रिसाइज त्याला फीड केल्याने) येईल असा प्रश्न पडतो. पण माणसे स्वाभाविकरीत्या काहीतरी वेगळी वागतात, काही कलाकृती तयार करतात - आधी नसलेले काहीतरी निर्माण करतात - याबद्दलचे ज्ञान कसे येणार? तर त्याबद्दल असेही शक्य आहे - की माणसे हे जे करतात ते आधीच्या ज्ञानाचेच "डेरिव्हेटिव्ह" असते व ते जर माणसाला आले तर कॉम्प्युटरलाही येईल. हे डोक्यातले रॅण्डम विचार आहेत. मला पूर्ण समजले आहे असे म्हणू शकत नाही.
>>> तर त्याबद्दल असेही शक्य
>>> तर त्याबद्दल असेही शक्य आहे - की माणसे हे जे करतात ते आधीच्या ज्ञानाचेच "डेरिव्हेटिव्ह" असते व ते जर माणसाला आले तर कॉम्प्युटरलाही येईल.
हो!
>>> I feel therefore I am!
याबद्दलही मला शंका आहे. आपण 'फील' करतो म्हणाजे नक्की काय? झाडेझुडुपेही 'फील' करतात म्हणतात, पण ते खरंतर त्यांचे प्रोग्राम्ड रिस्पॉन्सेस असतात फक्त!
आपणही सूक्ष्म पातळीवर केवळ मायक्रोब्जची कॉलनी आहोत की! फील आपण करत असतो की ते?
दुसर्या बाजूने उदा. एखाद्या सायकोपॅथ माणसाला 'अमुक प्रसंगाला अमुक रिअॅक्शन' हे 'माहीत' असतं, तो ती एनॅक्टही करू शकतो पण तो इतरांसारख्या इन्टेन्सिटीने ती फील करत नाही. मग उद्या कृबुही तसंच 'मी फील करतो' म्हणाला तर ते नेगेट कसं करायचं? कशाच्या आधारावर?
मला तो 'अहं'भाव हीच बॉटमलाइन वाटते आहे. मी एक 'मी' आहे असं मला वाटतं आहे म्हणून मी मी आहे. (लोल हे 'असा मी असामी'मधल्या 'आय अॅम द हू ऑफ द यू'सारखं वाटतंय वाचायला!
)
त्यामुळे गोइंग बॅक टु डेकार्ट, 'आय थिंक आय अॅम द वन हू इज थिंकिंग अॅन्ड फीलिंग, देअरफोर आय अॅम' असं काहीतरी होईल!
हा 'आय' कुठे किंवा कुठल्या शारीरिक/जैवरासायनिक प्रक्रियांचा परिपाक असतो? असो, हे फार भरकटायला लागलं.
पण कृबुला भावनिक मेंदू नाही
पण कृबुला भावनिक मेंदू नाही ना ? म्हणजे अजून तरी तो तितका विकसित नाही ज्याने एक स्वतंत्र अहं ( अहंकाराचा नाही, अस्तित्वाचा) येईल. जो आपल्याला मायक्रोब्ज मुळे का होईना ( फसवाही असेल एखाद्यावेळी) आहे. ढोबळमानाने फरक करताना हे एवढं वेगळेपण खणखणीतपणे दिसतं. प्रत्येक माणूस वेगळा असतो, अगदी एकाच आईच्या पोटी येणारी जुळी भावंडे सुद्धा सारखी नसतात. पण कृबुला अशी वेगवेगळी जाणीव नाही अजून. त्याचे interaction नेहमी लॉजिकल/ क्रिटिकल थिंकिंग (डेकार्टच्या वाक्य बदलायचे कारण हे थिंकिंग), ॲनॅलिटिकल व डेटा ड्रिव्हन असणार, आपले इमोशन किंवा कॅरेक्टर ड्रिव्हन असणार, जे परिस्थितीनुसार बदलू शकते. ज्याचा ठराविक अंदाज लावणे कठीण आहे.
मला वाटत नाही सगळे निर्णय आपण आधीच्या ज्ञानाच्या डेरिवेटिव्हने घेतो, थोडा भाग असेलही कॅल्क्युलेटेड पण माणूस प्रत्येक दिवशी नवा असतो. आपला स्वभाव, परिस्थिती आणि एकंदर ड्राईव्ह आपले डेरेव्हिटव्ह बदलू शकते. ज्ञान आणि माहिती असूनही आपण काही प्रत्येक गोष्ट ठरवून- आखून करत नाही. तोही एक मोठा फरक आहे. माणसाच्या सगळ्या क्रिएटिव्हीटीचा तोच आधार आहे.
मला वाटतं आहे की मी तुम्ही दोघांनी लिहिलेलेच पुन्हा वेगळ्या शब्दांत लिहिले.
वर पुन्हा पुन्हा 'अजून विकसित
वर पुन्हा पुन्हा 'अजून विकसित' आणि 'ढोबळमानाने फरक' लिहिताना भवितव्याची सूक्ष्म भीती वाटत होती. सध्या तरी काय फक्त ट्रॅफिक लाईट निवडा आणि सिद्ध करा की तुम्ही रोबॉट नाही ही स्टेज आहे. Clearly choosing pictures with traffic lights is already a piece of cake for an AI.
क्षमस्व केकू, पुरे करतेय.
छान लेख वाचतोय.
छान लेख वाचतोय.
>>>>>>>आधी नसलेले काहीतरी
>>>>>>>आधी नसलेले काहीतरी निर्माण करतात - याबद्दलचे ज्ञान कसे येणार? तर त्याबद्दल असेही शक्य आहे - की माणसे हे जे करतात ते आधीच्या ज्ञानाचेच "डेरिव्हेटिव्ह" असते व ते जर माणसाला आले तर कॉम्प्युटरलाही येईल. हे डोक्यातले रॅण्डम विचार आहेत. मला पूर्ण समजले आहे असे म्हणू शकत नाही.
सॉलिड आहे हा विचार.
पण जे 'स्फुरण' होते ते अवकाशातून, कुठल्या तरी हायर इन्टेलिजन्स्कडुन येत असावे. ते निव्वळ आधीच्या ज्ञानाचे डेरिव्हेटिव्ह नसावे असे वाटते. उदा नानकांनी ट्रान्स मध्ये जाउन जे काही सांगीतले ते भाई मर्दाना यांनी लिहून घेतले. ते आधीच्या ज्ञानातून आलेले नसावे तर चितीचे स्फुरण असावे.
Moravec’s Paradox बद्दल
Moravec’s Paradox बद्दल कुणाला जास्त वाचायचे असेल तर इथे वाचा.
https://www.scienceabc.com/innovation/what-is-moravecs-paradox-definitio...
आपल्या मुम्बैतील तरुणांनी चालवलेली ही साईट आहे, अत्यंत सुबोध आणि सोप्या शब्दात शास्त्रीय विषयाचे विवेचन इथे वाचायला मिळेल.
मी माझ्या लेखात अत्यंत थोड्या शब्दात विवेचन करत आहे. यातील प्रत्येक कल्पने बद्दल शास्त्रज्ञ आणि तत्ववेत्त्यांनी भरभरून लिहिले आहे. मी फक्त भारवाही हमाल म्हणून काम करत आहे.
सर
आपण का म्हणून संगणकाची बरोबरी करावी, संगणक गणितातील प्रश्न चुटकीसरसे सोडवतो आपण त्याची बरोबरी करू शकत नाही खर आहे. अहो पण सर, त्या संगणकाची संकल्पना मानवानेच केली आहे ना.
पुन्हा एकदा
मानवी मेंदू हा सर्वस्वी मूलभूत द्रव्यांपासून बनलेला आहे ज्याना काहीही जाणीव नाही. मग अशी जाणीव मानवी मेंदूत कुठून निपजली असावी?
चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांचे आभार.
धन्यवाद केकू.
धन्यवाद केकू.
चांगल्या माहितीचं उत्तम संकलन
चांगल्या माहितीचं उत्तम संकलन आणि सहजसोपं विवेचन. + १
उत्तम लेख व माहितीपूर्ण चर्चा वाचत आहे.
पुभाप्र
srd
srd
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, सध्या ज्याला आपण AI म्हणतो ते प्रोग्राम म्हणजे chatGPT ग्रोक हे माझ्या मते निव्वळ गुगल सर्च इंजीनचे उदात्ती करण आहे, आपण जी चर्चा करणार आहोत/ करणार आहोत ह्याच्या पल्याड आहे. माझ्या स्वप्नातला रोबो नवजात अर्भका सारखा क्लीन स्लेट मेंदू असलेला असेल. मग तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून शिकत जाईल. हे शक्य होईल का? मला माहित नाही,
फा.
आपण क्रिएटीव जीनिअस लोकांबद्दल बोलत नाहीयेत. आपण सर्व साधारण मानवाबद्दल बोलत आहोत. क्रिएटीव जीनिअस लोकांची बातही अलग है. ते देवांचे लाडके लोक आहेत, बघू जमले तर त्याबद्दल ही बोलूयात. धनश्रीने काहीतरी हिंट दिलेली आहेच.
हा 'आय' कुठे किंवा कुठल्या शारीरिक/जैवरासायनिक प्रक्रियांचा परिपाक असतो? असो, हे फार भरकटायला लागलं >>> हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याबद्दल सविस्तर लिहीणार आहे.
खूप उत्सुकतेने लेख वाचायला
खूप उत्सुकतेने लेख वाचायला घेतला. सलामीचे दोन परिच्छेद वाचल्यावर फक्त फास्ट फॉरवर्ड स्कीम केला.
पुढील भागाची प्रतीक्षा नाही तरीही शुभेच्छा.
Moravec’s Paradox बद्दल वाचते
Moravec’s Paradox बद्दल वाचते, धन्यवाद.
>>> ते देवांचे लाडके लोक आहेत, बघू जमले तर त्याबद्दल ही बोलूयात
अस्मिता, केकू त्या न्यूरोसर्जनच्या ड्युअलिझम थिअरीकडे चाललेत बघ.
ड्युअलिझम>>ओके
ड्युअलिझम>>ओके
पण न्यूरोसर्जन कोण?
हे न्यूरोसर्जन. वाहत्या
हे न्यूरोसर्जन. वाहत्या धाग्यावर चर्चा झाली होती या व्हीडिओवरून.
ड्युअलिझम म्हणजे माझ्या
ड्युअलिझम म्हणजे माझ्या समजुती प्रमाणे mind and body ह्यांचे निरनिराळे अस्तित्व,
तुमचा तो सर्जन मला वाटतय की आत्म्या बद्दल बोलत असावा. क्लिप बघितली नाहीये,
काही तत्वाद्न्यांच्या मते देकार्त ने मोठी गोची करून ठेवली आहे.
प्रॉब्लेम इन डिफाइनिंग
प्रॉब्लेम इन डिफाइनिंग कॉन्शसनेस - ॲन्ड द सोर्स ऑफ इट असा एकूण विषय.
ॲन्ड द सोर्स ऑफ इट >>> हा
ॲन्ड द सोर्स ऑफ इट >>> हा विषय अजेंड्यावर आहेच. तो जेव्हा येईल तेव्हा बोलूच.
हो, आठवलं. मी काहीही न पाहता
हो, आठवलं.
हे न्युरोसर्जन स्वातीला खूप आवडले होते. (स्पिरिच्युॲलिटी आणि सायन्स एकत्र आणलं की माझे एंटिने वर होतात, हल्ली उच्छाद आहे त्याचा) त्यामुळे मी फक्त वरवर ऐकून काहीही न पाहता त्यांना 'डिल्युजनल' निघू शकतील असे म्हटले होते. हा फारच ॲब्स्ट्रॅक्ट विषय आहे आणि येथे ठोकून द्यायला फारच स्कोप आहे, कुणाचे कितीही ऐकले - वाचले तरी शेवटी आपापलेच चिंतन करावे लागते असे माझे मत झाले आहे.
धनश्रीने दिलेली हिंटही आध्यात्मिक चैतन्य/ चेतना ( consciousness) याबद्दल आहे. त्यातही 'पोचलेल्या' लोकांची चेतनाही heightened consciousness असते. आपली खाली कुठेतरी असते. प्रत्येकाचीच वेगवेगळ्या स्तरावर येत असावी. जनरल 'स्फुरण' जे म्हणू ते कुठल्याही प्रतिभावान व्यक्तीला होऊ शकते, त्याला आध्यात्मिक असायची गरज नसावी. प्रतिभा आणि अध्यात्म पुष्कळ वेळा एकत्र दिसतं, खास करून साधुसंतांमधे आणि तसे असले तरी ते चूक/ बरोबर नाही पण सर्वस्वी वेगळ्या स्तरावरील जाणिवा असायला हव्यात असं वाटतं.
तुम्ही लिहा केकू, वाचेन.
मला आता SHUT DOWN करावा
मला आता SHUT DOWN करावा लागणार आहे.
तेव्हा ॠ सर म्हणतात तसे शुभ रात्री
>>> हे न्युरोसर्जन स्वातीला
>>> हे न्युरोसर्जन स्वातीला खूप आवडले होते.

>>अगोदरच्या कुणी तुम्हाला
>>अगोदरच्या कुणी तुम्हाला पडलेला प्रश्न कसा सोडवला आहे हे तुमच्यासमोर आणून ओतणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ज्या गोष्टी डिजिटल( चित्रे, लेखन, ध्वनी वगैरे) केल्या गेल्या नाहीत त्या यातून बाद असतात.<<
>>तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, सध्या ज्याला आपण AI म्हणतो ते प्रोग्राम म्हणजे chatGPT ग्रोक हे माझ्या मते निव्वळ गुगल सर्च इंजीनचे उदात्ती करण आहे<<
हम्म.. मशिन लर्निंग्ची साफ वासलात लावुन टाकलीत...
राज
राज
मी काहीतरी निराळे बोलत आहे.
कदाचित तुम्ही "chinese room" चा कन्सेप्ट वाचला असेल.
"The Chinese room argument holds that a computer executing a program cannot have a mind, understanding, or consciousness, regardless of how intelligently or human-like the program may make the computer behave. The argument was presented in a 1980 paper by the philosopher John Searle entitled "Minds, Brains, and Programs" and published in the journal Behavioral and Brain Sciences. Wikipedia"
समजा एका माणसाला =ज्याला चिनी भाषेचा अजिबात गंध नाही आणि त्याला सर्व साधने म्हणजे शब्द कोश चिनी लिपी इत्यादि पुरवली =एका बंद खोलीत बसवले आहे. एका फटीतून त्याला चिनी भाषेत प्रश्न केला तर तो माणूस त्याचे चिनी भाषेत उत्तर देऊ शकेल.
ह्याला बुद्धिमत्ता म्हणायचे का?
machine learning, NLP, face recognition इत्यादि AGI चे भाग आहेत. तेव्हा त्या दृष्टीने विचार करा. अगदी पूर्वी ELIZA नावाचा एक प्रोग्राम लिहिला गेला होता, तो वापरणार्याला खरेच वाटेल की संगणक हा जणू जिवंत माणूस आहे. अजूनही हा प्रोग्राम नेट वर आहे. घटकाभर करमणूक पाहिजे असेल तर तुम्ही गंमत म्हणून वापरुन पहा,
बाकी चाटजीपिटी विनोद तर जग जाहीर आहेत.
Pages