‘consciousness’ किंवा जाणीव याची याची सर्वमान्य व्याख्या अजूनही करता आलेली नाही, जाणीव हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, उदाहरणार्थ “तिला ह्या गोष्टीची जाणीव नाही” “त्याच्या टेबलाखाली एक उंदीर आला होता त्याची त्याला जाणीव नव्हती,”
एखादे दृश्य बघितल्यावर आपल्याला ज्या भावनांची अनुभूती होते त्याला मनोवैज्ञानिक म्हणतात “qualia.” क्वालीआ हे जाणिवेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का? कारण कामेऱ्याला जाणीवा consciousness नाहीत. अजून एक, ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना आपल्या प्रिय पत्नीच्या मनात येत असतील काय?आपल्या मनात आणि तिच्या मनात काय विचार येतात हे तिला काय किंवा मला काय शब्दात सांगता येत नाहीत. कारण आम्ही दोघेही रोबो नाही आहोत.
1996 साली त्यावेळच्या जागतिकविजेत्या बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला गुगल DeepBlue ह्या प्रोग्रामने हरवले. समजा DeepBlue ज्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटले असते? त्या संगणकाला काय वाटले असेल.
David Chalmers ह्या तत्ववेत्याच्या मताप्रमाणे प्रत्येक कणाला गुणधर्म असतात उदाहरणार्थ रंग रूप तापमान घनता विद्युतभार स्पिन इत्यादि त्याप्रमाणे त्याना जाणीवही असते. अगदी रस्त्यात पडलेल्या दगडालाही जाणीवा आणि भावना असतात.
यंत्रांना जाणीव आणि भावना असतात काय? हा प्रश्न मानवी इतिहासात वेळेवेळी चर्चिला गेला आहे. अलन ट्युरिंग ह्या संगणक शास्त्रज्ञाने १९५० साली ह्यावर “Computing machinery and intelligence” हा शोध निबंध प्रसिद्ध केला. ह्याचेच रुपांतर पुढे Turing Test.मध्ये झाले.
जो पर्यंत मशीन कविता कथा लिहित नाही , किंवा स्वरावली बनवत नाही, ह्याशिवाय, केवळ लिहितच नाही तर हे काव्य “मी” लिहिले आहे ही जाणीव त्याला होत नाही, तो पर्यंत त्याची माणसाशी बरोबरी होणार नाही. हा अहं भाब जेव्हा जागृत होईल तेव्हा यंत्र आणि मानव यातला फरक संपेल. तेव्हा त्या यंत्राला यशाचा अभिमान, यंत्रातला एखादा पूर्जा किंवा ट्रांझिस्टर फेल झाल्यावर वाटणारे दुखः, दुसरया यंत्रा बद्दल असूया, कुणी खोटी स्तुती केल्यास धोक्याची घंटी, चुकी केल्यास होणारा मनस्ताप ह्या भावना अनुभवास येतील.
हे लिहिणे सोप आहे पण मशीनला भावना आहेत की नाहीत हे आपण जोपर्यंत आपण स्वतः मशीन बनत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील एक टप्पा.
१३.८ बिलियन वर्षांपूर्वी महाविस्फोट big bang झाला आणि विश्वाची सुरवात झाली. तेव्हा अवकाशात केवळ मूळ कण होते. तिथून सुरवात होऊन प्रथम उदजन hydrogen वायू निर्माण झाला. त्यानंतर अवकाश अनेक स्थित्यंतरातून गेले आणि आजच्या बुद्धिमान माणसाचा उदय झाला. सरते शेवटी आपण सर्व हे “माती” पासून आलो. ह्या निर्जीव मॅटरला जाणीव. भावना. अहंकार. स्वत्व. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, प्रेम हे भाव कसे निर्माण झाले? हे जर आपल्याला समजले तर आपणही असे जीवन निर्माण करू शकू. आज जी ठायी ठायी आपल्याला “कृबु” दृग्गोचर होते आहे तो ह्या प्रवासातला अत्यंत सोपा टप्पा आहे. ह्यात Deepblue आणि तत्सम प्रोग्राम येतात. ह्याच संगणकाने गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला होता. बुद्धीबळाच्या खेळात हे संगणक माणसापेक्षा कैक पटीने हुशार आहेत, पण हाच प्रोग्राम चार वर्षांच्या मुला समोर tic-tac-toe. खेळताना नांगी टाकेल! अश्या प्रोग्रामला आज लोक “कृबु” समजत आहेत, शास्त्रीय भाषेत ह्याना संकुचित “कृबु” Narrow AI म्हटले जाते. पण आता शास्त्रज्ञ सर्वंकष “कृबु” General AI AGI विकसित करण्यात आपले लक्ष केंद्रित करत आहेत. सर्वंकष “कृबु” म्हणजे जर एखाद्या मुलाला शिकवले तर त्याला अनेक खेळ खेळता येतील, अनेक कौशिल्ये शिकता येतील. तर माणूस हा असा आहे. तो गणित सोडवू शकेल, बाजारहाट करू शकेल, नकला करू शकेल, विनोद सांगून लोकांना हसवू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो कधी काळी अधे मध्ये आत्मचिंतनही करेल म्हणजे मी कोण आहे. कुठून आलो आहे? ह्या माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? इत्यादि.
ही AGI केव्हा विकसित होईल? काहींच्या मते लवकरच.काहींचे मत आहे की कदाचित २०५० पर्यंत तर काही असेही म्हणतात की कधीही नाही. हे सोपे काम नाहीये ह्याची शास्त्रज्ञांना जाणीव आहे. पण का? का?
Moravec ह्या शास्त्रज्ञाने ह्याबद्दल प्रथम विचार केला, म्हणून ह्याला Moravec’s Paradox असे म्हणतात. त्याच्या म्हणण्या प्रमाणे माणसांच्या साठी अवघड असणारे गणित किंवा तर्कशास्त्र ह्यासारखे विषय संगणकाला शिकवणे सोपं आहे पण मानवांसाठी सोपे असणारे टास्क म्हणजे चालणे, चेहरे ओळखणे किंवा जीव्हज प्रमाणे बर्टीला सगळ्या आणि कुठल्याली गोष्टीत सल्ला देणे असा संगणक बनवणे सोपे नाही,
Teaching computers hard things being easy and teaching them easy things being hard. शास्त्रज्ञाच्या मते कारण असे आहे की माणूस हा उत्क्रांतीच्या फेऱ्यामधून गेला आहे. डबक्यातल्या एक पेशी पासून उत्क्रांती होत होत अखेर त्याची परिणीती आजच्या मानवात झाली आहे. जीवनातल्या संघर्षात टिकून रहाण्यासाठी त्याच्या मेंदूत अनेक कौशल्ये कोरली गेली आहेत. त्याचा आपल्याला आपसूकच फायदा झालेला आहे, पण संगणकाला ह्या संघर्षातून जावे लागलेले नाही, परिणामतः ३७२६१८ गुणिले ३१५३७७८ हे गणित आपल्यासाठी अवघड आहे पण संगणकासाठी सोप आहे. तोल सांभाळून चालणे आपल्यासाठी सोपे आहे पण संगणकासाठी अवघड आहे. तुम्ही रोबोचे विडिओ बघितले असणार. जरा पहा ते कसे उभे रहातात, हसू येईल बघून.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
पुढच्या भागात मानवी मेंदूचे कार्य कसे चालते त्याची थोडक्यात माहिती घेऊ आणि यंत्रांना जाणीव होऊ शकेल का ह्यासाठी शास्त्रज्ञ काय संशोधन करत आहेत त्याची चर्चा करू.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध भाग १
Submitted by केशवकूल on 21 October, 2025 - 03:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोप्या भाषेतील शास्त्रीय
सोप्या भाषेतील शास्त्रीय विवेचन आवडले . पुभाप्र
राजकडे इतक्या विविध विषयांवर
=============================================== अवांतर ================================================
राजकडे इतक्या विविध विषयांवर इतकं ज्ञानभांडार आहे! पण ते ज्ञान केवळ इतरांच्या पोस्ट्सवर तुच्छतादर्शक पिंका टाकण्याच्याच कामी का येतं?
त्या सगळ्या विषयांवर स्वतः स्वतंत्र सविस्तर प्रासादिक वगैरे लेख लिहून ते आम्हा कामन पीपलना एन्लायटन का करत नसतील हा मला नेहमी प्रश्न पडतो.
कदाचित आपण त्यासाठी वर्दी आडियन्स नसू, त्यामुळे ते मोस्टली फक्त चर्चाप्रस्ताव-प्रकारचे धागे काढून आम्हा इग्नरन्ट लोकांची मजा बघतात.
हे अवांतर झालंय, पण मला त्यांना तसे एन्लायटनिंग लेख लिहायची या निमित्ताने विनंती करायची आहे.
- ज्ञानाभिलाषी स्वाती आंबोळे
=============================================== अवांतर समाप्त ================================================
>>राज मी काहीतरी निराळे बोलत
>>राज मी काहीतरी निराळे बोलत आहे.<<
एआयला ह्युमन एलिमेंट (इमोशन्स) नसणे हा मुद्दा आहे ना तुमचा. तशी गरज भासलेली नाहि, सध्यातरी. एआयचा आयक्यु अॅक्वायर्ड नॉलेज मुळे हाय असेल परंतु इक्यु शुन्य आहे. तुम्हि वर चिनी भाषेचं दिलेलं उदाहरण बुद्धिमत्तेचंच लक्षण आहे. असो..
तुम्हि वर दिलेली लिंक उघडली, त्यातल्या या पॅराचं शेवट्चं वाक्य वाचल्यावर पुढे वाचावसं वाटलं नाहि. (सोराने घातलेला धुमाकुळ तुमच्या पर्यंत आलेला दिसत नाहि) १९८० सालातली थियरी आहे ती.. तेंव्हा थँक्स, बट नो थँक्स...
>>Moravec’s Paradox states that it is easy to train computers to do things that humans find hard, like mathematics and logic, but it is hard to train them to do things humans find easy, like walking and image recognition.<<
दोन गोष्टी सांगतो हल्लीच
दोन गोष्टी सांगतो हल्लीच पाहिलेल्या.
१. AGT कार्यक्रमात नऊ वर्षांची मुलगी गाणं म्हणायला येते. कोणतं गाणं यावर ती एक सांगते. मग हेच का निवडलं यावर तिचं उत्तर " याचाच सराव करत आहे म्हणून." साधं सरळ पाठ न केलेले उत्तर. "हा प्रश्न विचारून आम्हाला मूर्खपणा केल्यासारखे वाटलं."- सायमन. "I am sorry Simon."-मुलगी.
२. अगदी लहान मुलं काचेच्या ब्रिजवर काय करतात याचा विडिओ पाहिला. त्यांना अजून भाषा येत नाही, चालता येतंय. काचेचा ब्रिज म्हणजे काय हे माहिती नाही. ती काय सावधपणा दाखवतात ते पाहून हसू येतं.
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली नाही आणि नैसर्गिक उत्स्फूर्तपणे क्रिया होते ती फार आवडते.
खूप सुंदर लेख आणि चर्चा.
खूप सुंदर लेख आणि चर्चा.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/ChatGPT
जिज्ञासूंनी अवश्य वाचावा.
>>>>>>>समजा एका माणसाला
>>>>>>>समजा एका माणसाला =ज्याला चिनी भाषेचा अजिबात गंध नाही आणि त्याला सर्व साधने म्हणजे शब्द कोश चिनी लिपी इत्यादि पुरवली =एका बंद खोलीत बसवले आहे. एका फटीतून त्याला चिनी भाषेत प्रश्न केला तर तो माणूस त्याचे चिनी भाषेत उत्तर देऊ शकेल.
केकू याला 'बुद्धीमत्तेपेक्षा' काहीतरी वेगळे म्हणतायत.
राज याला बुद्धीमत्ता म्हणतायत.
----------------
इथे मला वाटतं 'मोटिव्हेशन' हा डेल्टा फॅक्टर आहे. मनुष्याला शिकण्याकरता आपोआप मोटिव्हेशन असते, क्युरिऑसिटी असते. ती रोबॉट ला असेल का तर नाही.
त्यामुळे या डेल्टा फॅक्टरच्या अभावी, रोबॉट चिनी भाषा शिकणारच नाही. रोबॉटमध्ये ती 'शिकण्याची इच्छा' इन्ड्युस करावी लागेल/ प्रोग्रॅम करावी लागेल.
------------------------------------------------------
ज्ञान शक्ती-क्रिया शक्ती-इच्छा शक्ती ................... ही त्रयी जिकडेतिकडे, अध्यात्मात येते.
किती जणांनी गेल्या वर्षीची ही
किती जणांनी गेल्या वर्षीची ही न्यूज वाचली होती? विषयाच्या अनुषंगाने यावर चर्चा करायला आवडेल
https://timesofindia.indiatimes.com/etimes/trending/eerie-video-ai-powered-robot-kidnaps-12-other-robots-convinces-them-to-quit-jobs-in-china/amp_articleshow/115551082.cms
एक प्रश्न – रोबोला माणसाच्या
एक प्रश्न – रोबोला माणसाच्या जाणिवा देणे अवघड पण माणसाला रोबोची कृत्रिम बुद्धिमत्ता देण्याचे प्रयोग होतात का?>>>
मस्क च Neuralink बघा/ वाचा
फार्स विथ द डिफरंस
फार्स विथ द डिफरंस
मला लिंक दिसत नाहीये.
पण शीर्षकावरून काही बोध होतो आहे. असे होऊ शकते. पुढच्या भागात बघू या.
छन्दिफन्दि
ब्रेन आणि संगणक ह्यांच्या interface बद्दल वाचले आहे. ब्रेन अपलोडिंग ह्या संदर्भात.
या क्षेत्रातलं शून्य ज्ञान
या क्षेत्रातलं शून्य ज्ञान आहे. जर्नेलिस्टिक ओपिनियन किंवा ऑब्जेक्टिव्ह अॅप्रोच म्हणून एव्हढे नक्की म्हणता येईल आज २०२५ पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता विशिष्ट कार्यांमध्ये (उदा., भाषांतर, मेडिकल डायग्नोसिस) मानवापेक्षा चांगली आहे.
पण जाणिवा, भावना, आणि स्वायत्त नैतिकता यांच्यासाठी ती अजूनही मर्यादित आहे असं मला वाटतं. आज तरी एआय ट्रेनिंग वरच काम करतंय. उद्या मानवी पेशी आणि न्यूरोसायन्सचा वापर झाला तर काय होईल हे माझ्यासारख्या सामान्यांना सांगणे अवघड आहे.
आज तरी जनरेटिव्ह ए आय चित्रं "जनरेट" करू शकेल, पण एआय ट्रेनिंगच्या पलिकडे जाऊन नव्याने काही "क्रिएट" करू शकत नाही. तांत्रिक प्रगती (उदा., न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंग) आणि क्वांटम AI मुळे भविष्यात काही मर्यादा कमी होऊ शकतात, पण पूर्णपणे मानवासमान बनणे हे सध्याच्या ज्ञात विज्ञानापलीकडे आहे. त्यापलिकडे फिक्शन आहे. पण कदाचित २०४० पर्यंत आपल्याला काही उत्तरं मिळतील. तोवर वाट बघूयात.
( इंग्रजी संज्ञा देवनागरीत टाईप केल्यात, पण विंडोच्या बाहेर जाऊन म/ई बटण दाबणे होत नाही. सॉरी त्याबद्दल )
लेखाबद्दल - बुद्धीला चालना देणारा आहे. प्रतिसाद उत्तम आहेत. चालना मिळतेय.
>>>>उद्या मानवी पेशी आणि
>>>>उद्या मानवी पेशी आणि न्यूरोसायन्सचा वापर झाला तर काय होईल हे माझ्यासारख्या सामान्यांना सांगणे अवघड आहे.
ह्म्म्म!!! इन्टरेस्टिंग थॉट. क्लोनिंग आणि ए आय ..... खतरनाक कॉम्बिनेशन होइल का? का दोन्ही एकत्र नाही होउ शकणार? काळच ठरवेल. आपल्या हयातीत काहीतरी मस्त मस्त घडावं.
क्लोनिंग आणि ए आय .....
क्लोनिंग आणि ए आय ..... खतरनाक कॉम्बिनेशन होइल का? >> असंच कुठे तरी वाचलेलं कि माणसाच्या बोटावर डेटा सेव्ह करता येऊ शकेल. पण आता या गावगप्पा वाटतात. असे संशोधन झाल्याचे काही पेपर्स पब्लिश होत नाहीत तोपर्यंत. जर हे शक्य झाले तर मग मानवी पेशींचा वापर होऊ शकेल का ? मेडीकल साईडचे लोक यावर प्रकाश टाकू शकतील.
@केशवकूल
@केशवकूल
https://nypost.com/2024/11/20/tech/robot-tells-ai-coworkers-to-quit-their-jobs-and-come-home/
यावर थोडी अधिक माहिती मिळाली..
https://interestingengineering.com/innovation/ai-robot-kidnaps-12-robots-in-shanghai
फार्स विथ द डिफरंस
फार्स विथ द डिफरंस
मी पहिली क्लिप बघू शकलो .
दुसरी साठी मला वाटते subscribe करायला पाहिजे.
हे जर होक्स नसेल तर मात्र विचार करण्यासारखे आहे. बघतो अजून काही माहिती मिळतीय का.
>>तुम्ही म्हणता त्यात तथ्य
>>तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, सध्या ज्याला आपण AI म्हणतो ते प्रोग्राम म्हणजे chatGPT ग्रोक हे माझ्या मते निव्वळ गुगल सर्च इंजीनचे उदात्ती करण आहे>>>>
शब्दबद्ध करणं कठीण जात होतं त्यामुळे एआय लाच विचारलं (फक्त LLM पुरतच मर्यादित) --- Be sure it's definitely much more than what appear on surface.
.
.
.
****Embodiment (The Reality Link): The 6-year-old's understanding of "heavy" comes from straining to lift a backpack; "cold" comes from shivering. The LLM's understanding of "heavy" comes from seeing it paired with "anchor," "steel," and "burden." The LLM has superior syntactic coherence, but the child has the genuine, felt experience that grounds the meaning in reality.
आता ही पण news पहा.https:/
आता ही पण news पहा.
https://cybernews.com/tech/ai-robot-revolt-china/
वर तुम्ही दिलेली news पण महत्वाची आहे.
srd नी सांगितल्या प्रमणे जर नेट वर नसेल तर ...
मी माझ्या लेखात जे qualia म्हटलं आहे तेच हे आहे.
मी वर दिलेली दुसरी लिंक याच
मी वर दिलेली दुसरी लिंक याच संदर्भातील थोडी अधिक डिटेल्ड आहे, It's about what's prompted in commands and what didn't.
दुर्दैवाने मी कुठेही
दुर्दैवाने मी कुठेही subscribe करत नाही त्यामुळे वाचू शकलो नाही.
मी माझ्या लेखात जे qualia
मी माझ्या लेखात जे qualia म्हटलं आहे तेच हे आहे. >>>
म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का? कारण कामेऱ्याला जाणीवा consciousness नाहीत. अजून एक, ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना आपल्या प्रिय पत्नीच्या मनात येत असतील काय?>>>
या बाबत माझे राज यांच्या म्हणण्याला अनुमोदन असेल, रोबो/ एआय नी भावनिक प्रगल्भता दाखवावी हे सध्यातरी गरजेचे नाही आणि वस्तुनिष्ठ बुद्धिमत्तेच्या व्याख्येच्या कक्षेत ही ते बसणार नाही (जसं मानवाकडे असणारी बुद्धिमत्ता, प्राण्यांकडे असणारी बुद्धिमत्ता )
पण त्यांच्या(एलएलएमच्या ) उत्तरांत सब्जेक्टिव्ह एम्बोडिमेन्ट असणे गरजेचे आहे, जे की एका एलएलएमसाठी कंटिन्यूस लर्निंग प्रोसेस असते.
ओके
ओके
आपण बोलूच ह्याबद्दल.
LLM, काय किंवा IMAGE ओळखणे हे AGM चे काही अंश आहेत. अश्या किती MODULE असतील आणि त्यांचे एकत्रीकरण कसे करायचे ह्याची आपल्याला सध्या तरी अजिबात कल्पना नाही
तसेच एखाद्या robot मध्ये जाणीव निर्माण झाली आहे की नाही याची परिक्षा कशी करायची या बद्दलच्या सगळ्या परिक्षा हळू हळू फेल होत आहेत.
Blade Runner हा सिनेमा ह्या साठीच बघावा.
मस्त सहज,सोपी सुरवात
मस्त सहज,सोपी सुरवात
<<<<पण माणसे स्वाभाविकरीत्या काहीतरी वेगळी वागतात, काही कलाकृती तयार करतात - आधी नसलेले काहीतरी निर्माण करतात - याबद्दलचे ज्ञान कसे येणार?>>>+१
Ai ने अमुक केलं पाहिजे तमूक
Ai ने अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे अशा अधिकच्या अपेक्षा ठेवायला नको. त्यांना त्यांचं काम करू द्या. म्हणजे माहितीच्या ढिगाऱ्यातून हवी तीच लवकर शोधून देणे.
पण अद्ययावत माहिती पुरवण्याचं काम कुणीतरी करत राहायला हवं. शिवाय जर एकाहून अधिक स्रोत निर्माण झाले तर तेसुद्धा आपसापात जोडले जायला हवेत. तसेच माहिती आणि नियमात केलेले बदल मोठ्या महत्त्वाच्या कार्यालयांनी एका ठराविक केंद्रीय स्रोताकडे बदल पाठवायला हवेत. म्हणजे एआइ या संकल्पनेला आणखी दोन जोडण्याची गरज आहे आणि ती सुधारली पाहिजे.
उदाहरणार्थ - ( आजचीच घटना २०२५_१०_२४ शुक्रवार) बरेच इतर जिल्ह्यांतील लोक आपल्या नातेवाईकांकडे मुंबईत आले आणि राणीची बाग ऊर्फ जिजिमाता उद्यान पाहायला गेले. ...तर गेट बंद. त्यांनी गूगल सर्च केल्यावर त्यांना बुधवार बंद असे दिसले असणार. पण अचानक दिवाळीनिमित्त बुधवारची सुटी रद्द करून उद्यानाने ती शुक्रवारी घेतली. इथे एआइने/ला वेळीच सावध केले असते तर .....
मूळात एआय किंवा रोबाट मधे
मूळात एआय किंवा रोबाट मधे ह्युमन एलिमेंट (इमोशन्स, काग्निझंस) का हवा हा प्रश्न आहे. सुदैवाने रोबाट मधे कंपॅनियन शोधण्याची वेळ अजुन आलेली नाहि. (जपॅन काहि प्रमाणात अपवाद असेल). येत्या काहि वर्षांत एआय मॉडेल्स अजुन विकसित होउन बुद्धीबळ, टिक टॅक टो, चेकर्स एकाच बैठकीत अनेकांशी खेळु शकेल, अजुन भावस्पर्शी कविता, ढाचु पटकथा लिहु शकेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मशिन लर्निंगच्या कंटिन्युअस लर्निंगला सुद्धा काहि मर्यादा आहेत. एका ठराविक फ्रेमवर्क, बाउंडरीजच्या बाहेर जाउन आउटऑफदबॉक्स थिंकिंग जी सर्वसाधारण माणूस करु शकतो, ती या मॉडेल्सना भविष्यात साकारता येइल/यावी का, हा कळीचा मुद्दा आहे..
विल स्मिथच्या "आय रोबाट" मधलं रोबाटचं बंड आपल्या हयातीत तरी प्रत्यक्षात उतरणार नाहि असं मला वाटतंय...
मूळात एआय किंवा रोबाट मधे
मूळात एआय किंवा रोबाट मधे ह्युमन एलिमेंट (इमोशन्स, काग्निझंस) का हवा हा प्रश्न आहे. >> अगदी सहमत.
माझ्या मते मुळात इमोशन्स, काग्निझंस, सेल्फ अवेरनेस इ. येण्यासाठी सजीव पेशींची (cell) गरज आहे म्हणजे biology आणि chemistry ची गरज आहे. जर यंत्रमानवामध्ये सजीव पेशीच नसतील तर ’consciousness’ किंवा जाणीव येईलच कुठून?
मूळात एआय किंवा रोबाट मधे
मूळात एआय किंवा रोबाट मधे ह्युमन एलिमेंट (इमोशन्स, काग्निझंस) का हवा हा प्रश्न आहे.>>> आपल्याला अजून जाणीव बद्दल बरेच काही शिकायचे आहे. कदाचित रोबोट ना जाणीव प्राप्त झाली तर आपल्याला बरेच काही प्रयोग करता येतील.
सध्या रोबोट जसे प्रोग्रामिंग केले आहे तसे वागत आहेत. त्यामुळे त्यांची उपयुक्तताही मर्यादित आहे.
काही मानसिक रोगांच्या अभ्यासात आणि त्यावर उपचार शोधण्यात मदत होईल. Alzheimer’s disease Schizophrenia depression इत्यादी चे खरे स्वरूप आणि त्यावर उपचार ह्यांचा अभ्यास करता येईल.
जर यंत्रमानवामध्ये सजीव पेशीच नसतील तर ’consciousness’ किंवा जाणीव येईलच कुठून?>>>
नाही. असे म्हणणे बरोबर नाही. मेंदू खर तर इन्फर्मेशन प्रोसेसिंग करत असतो. त्यासाठी सजीव पेशींची वगैरेची गरज नाही. ह्या मागे substrate independance ची कल्पना आहे. आपण आपल्या मित्राला एक लेख इमेलने पाठवला आणि त्याचा प्रिंट घ्यायला सांगितला. तर त्या लेखातला विचार हा अनेक माध्यमातून जात असतो. मणजे आपल्या मेंदूतून., हार्ड डिस्क ,
नंतर विद्युत लहरी, पुन्हा हार्ड डिस्क, मग लेसर आणि शेवटी कागद आणि शाई! पण त्यातील संकल्पना बदलत नाही त्याप्रमाणे सजीव पेशी काय किंवा त्याचे सोफ्टवेअर/हार्डवेअर इम्प्लीमेंटेशन ह्यामुळे काही फरक पडत नाही असा सध्याचा विचार आहे.
उपाशी बोका
Neuroscientist Christof Koch, chief scientific officer at the Allen Institute for Brain Science, thinks he might know the answer. According to Koch, consciousness arises within any sufficiently complex, information-processing system. All animals, from humans on down to earthworms, are conscious; even the internet could be. That's just the way the universe works.
A Neuroscientist's Radical Theory of How Networks Become Conscious
Neuroscientist Christof Koch ह्यांचा इंटरव्यू
https://www.wired.com/2013/11/christof-koch-panpsychism-consciousness/
आता इंटरनेट केव्हा "जागृत" होमार ह्याची वाट बघूया.
Neuroscientist Christof Koch
मित्राला एक लेख इमेलने पाठवला आणि त्याचा प्रिंट घ्यायला सांगितला. >> निव्वळ एक workflow अधिक efficient केला इतपत म्हणता येईल. प्रेयसीचे पत्र गुलाबी कागदावर प्रिंट करून पाठवले म्हणजे कॉम्प्युटर (AI) conscious झाला असे म्हणता येणार नाही.
Neuroscientist Christof Koch ह्यांचा इंटरव्यू >> लिंक वाचता येत नाही.
All animals, from humans on down to earthworms, are conscious >> त्यांच्यात सजीव पेशी आहेत. कदाचित त्यामुळेच "जाणीव" आहे. कॉम्प्युटरमध्ये सजीव पेशी नाहीत (सध्या तरी).
even the internet could be. >> This may be wishful thinking.
That's just the way the universe works. >> पुनरुत्पादन करण्याची ओढ हा सजीवांच्या बाबतीत तरी निसर्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या दिवशी AI हा टप्पा गाठेल तेव्हाच मी सहमत असेन.
उपाशी बोका
उपाशी बोका
मी लिंक पुन्हा चेक केली. माझ्या कडे व्यवस्थित चालते आहे. Turing ने १९५० साली प्रथम AI सुतोवाच केले. त्याला आता फक्त ७५ वर्षे झाली आहेय. मानव आजच्या स्थितीत आला त्याला लाख वर्षे लागली.AI अजून फक्त २५ वर्षे तरी द्या, आगे आगे देखो होता ही क्या.
पुनरुत्पादन करण्याची ओढ हा निसर्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या दिवशी AI हा टप्पा गाठेल तेव्हाच मी सहमत असेन.>> त्या दिवशी आपले भविष्या AIच्या हातात असेल . बहुतेक AI आपल्याला झुरळा प्रमाणे वागवतील. ती परिस्थिती येऊ नये म्हणून आत्तापासून प्रयत्न करायला पाहिजेत.
मी वर substrate independance ची कल्पना मांडली आहे. पुन्हा एकदा सांगतो, कृबु साठी सजीव पेशींची अजिबात गरज नाही असा त्याचा अर्थ आहे, सजीव म्हणजे तरी काय? जीव देखील निर्जीव रसायना पासूनच बनतो. मोठा विषय आहे.
मला Start your free trial असे
मला Start your free trial असे दिसत आहे. जमल्यास archive.today वरून लेखाची लिंक पाठवावी ही विनंती.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आज
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आज काय अभिप्रेत आहे ते नक्की केलं पाहीजे.
माणसासारखाच सजीव माणूस , माणसासाठी लागणारे पदार्थ वापरून बनवायचा , ही शक्यता आहे. ती प्रत्यक्षात येईल किंवा नाही येईल. आज तरी ती फिक्शन आहे. फिक्शनल काथ्याकूटीला तेव्हांच अर्थ येईल जेव्हां त्याचा काही ढोबळ प्लान सांगता येईल. सध्या ते वैद्यकीय (न्यूरोसायन्स सायंटिस्ट्स + ए आय सायंटिस्ट्स) सांगत नाहीयेत. कुणाला माणसाच्या पेशी कुठल्या पदार्थ्यांच्या बनलेल्या असतात, काही पेशींसाठी स्पर्श आदी जाणिवांसाठी कोणते रसायन असतात हे सांगता येईल का ? संदेशवहनाची प्रक्रिया कशी होते, विद्युत भार असतो का असा स्टडी झालेला आहे का हे सोप्या भाषेत सांगता आलं तर आमच्या सारख्या शून्य ज्ञान असलेल्यांची सोय होईल.
Pages