कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध भाग १

Submitted by केशवकूल on 21 October, 2025 - 03:02

‘consciousness’ किंवा जाणीव याची याची सर्वमान्य व्याख्या अजूनही करता आलेली नाही, जाणीव हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, उदाहरणार्थ “तिला ह्या गोष्टीची जाणीव नाही” “त्याच्या टेबलाखाली एक उंदीर आला होता त्याची त्याला जाणीव नव्हती,”
एखादे दृश्य बघितल्यावर आपल्याला ज्या भावनांची अनुभूती होते त्याला मनोवैज्ञानिक म्हणतात “qualia.” क्वालीआ हे जाणिवेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का? कारण कामेऱ्याला जाणीवा consciousness नाहीत. अजून एक, ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना आपल्या प्रिय पत्नीच्या मनात येत असतील काय?आपल्या मनात आणि तिच्या मनात काय विचार येतात हे तिला काय किंवा मला काय शब्दात सांगता येत नाहीत. कारण आम्ही दोघेही रोबो नाही आहोत.
1996 साली त्यावेळच्या जागतिकविजेत्या बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला गुगल DeepBlue ह्या प्रोग्रामने हरवले. समजा DeepBlue ज्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटले असते? त्या संगणकाला काय वाटले असेल.
David Chalmers ह्या तत्ववेत्याच्या मताप्रमाणे प्रत्येक कणाला गुणधर्म असतात उदाहरणार्थ रंग रूप तापमान घनता विद्युतभार स्पिन इत्यादि त्याप्रमाणे त्याना जाणीवही असते. अगदी रस्त्यात पडलेल्या दगडालाही जाणीवा आणि भावना असतात.
यंत्रांना जाणीव आणि भावना असतात काय? हा प्रश्न मानवी इतिहासात वेळेवेळी चर्चिला गेला आहे. अलन ट्युरिंग ह्या संगणक शास्त्रज्ञाने १९५० साली ह्यावर “Computing machinery and intelligence” हा शोध निबंध प्रसिद्ध केला. ह्याचेच रुपांतर पुढे Turing Test.मध्ये झाले.
जो पर्यंत मशीन कविता कथा लिहित नाही , किंवा स्वरावली बनवत नाही, ह्याशिवाय, केवळ लिहितच नाही तर हे काव्य “मी” लिहिले आहे ही जाणीव त्याला होत नाही, तो पर्यंत त्याची माणसाशी बरोबरी होणार नाही. हा अहं भाब जेव्हा जागृत होईल तेव्हा यंत्र आणि मानव यातला फरक संपेल. तेव्हा त्या यंत्राला यशाचा अभिमान, यंत्रातला एखादा पूर्जा किंवा ट्रांझिस्टर फेल झाल्यावर वाटणारे दुखः, दुसरया यंत्रा बद्दल असूया, कुणी खोटी स्तुती केल्यास धोक्याची घंटी, चुकी केल्यास होणारा मनस्ताप ह्या भावना अनुभवास येतील.
हे लिहिणे सोप आहे पण मशीनला भावना आहेत की नाहीत हे आपण जोपर्यंत आपण स्वतः मशीन बनत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील एक टप्पा.
१३.८ बिलियन वर्षांपूर्वी महाविस्फोट big bang झाला आणि विश्वाची सुरवात झाली. तेव्हा अवकाशात केवळ मूळ कण होते. तिथून सुरवात होऊन प्रथम उदजन hydrogen वायू निर्माण झाला. त्यानंतर अवकाश अनेक स्थित्यंतरातून गेले आणि आजच्या बुद्धिमान माणसाचा उदय झाला. सरते शेवटी आपण सर्व हे “माती” पासून आलो. ह्या निर्जीव मॅटरला जाणीव. भावना. अहंकार. स्वत्व. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, प्रेम हे भाव कसे निर्माण झाले? हे जर आपल्याला समजले तर आपणही असे जीवन निर्माण करू शकू. आज जी ठायी ठायी आपल्याला “कृबु” दृग्गोचर होते आहे तो ह्या प्रवासातला अत्यंत सोपा टप्पा आहे. ह्यात Deepblue आणि तत्सम प्रोग्राम येतात. ह्याच संगणकाने गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला होता. बुद्धीबळाच्या खेळात हे संगणक माणसापेक्षा कैक पटीने हुशार आहेत, पण हाच प्रोग्राम चार वर्षांच्या मुला समोर tic-tac-toe. खेळताना नांगी टाकेल! अश्या प्रोग्रामला आज लोक “कृबु” समजत आहेत, शास्त्रीय भाषेत ह्याना संकुचित “कृबु” Narrow AI म्हटले जाते. पण आता शास्त्रज्ञ सर्वंकष “कृबु” General AI AGI विकसित करण्यात आपले लक्ष केंद्रित करत आहेत. सर्वंकष “कृबु” म्हणजे जर एखाद्या मुलाला शिकवले तर त्याला अनेक खेळ खेळता येतील, अनेक कौशिल्ये शिकता येतील. तर माणूस हा असा आहे. तो गणित सोडवू शकेल, बाजारहाट करू शकेल, नकला करू शकेल, विनोद सांगून लोकांना हसवू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो कधी काळी अधे मध्ये आत्मचिंतनही करेल म्हणजे मी कोण आहे. कुठून आलो आहे? ह्या माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? इत्यादि.
ही AGI केव्हा विकसित होईल? काहींच्या मते लवकरच.काहींचे मत आहे की कदाचित २०५० पर्यंत तर काही असेही म्हणतात की कधीही नाही. हे सोपे काम नाहीये ह्याची शास्त्रज्ञांना जाणीव आहे. पण का? का?
Moravec ह्या शास्त्रज्ञाने ह्याबद्दल प्रथम विचार केला, म्हणून ह्याला Moravec’s Paradox असे म्हणतात. त्याच्या म्हणण्या प्रमाणे माणसांच्या साठी अवघड असणारे गणित किंवा तर्कशास्त्र ह्यासारखे विषय संगणकाला शिकवणे सोपं आहे पण मानवांसाठी सोपे असणारे टास्क म्हणजे चालणे, चेहरे ओळखणे किंवा जीव्हज प्रमाणे बर्टीला सगळ्या आणि कुठल्याली गोष्टीत सल्ला देणे असा संगणक बनवणे सोपे नाही,
Teaching computers hard things being easy and teaching them easy things being hard. शास्त्रज्ञाच्या मते कारण असे आहे की माणूस हा उत्क्रांतीच्या फेऱ्यामधून गेला आहे. डबक्यातल्या एक पेशी पासून उत्क्रांती होत होत अखेर त्याची परिणीती आजच्या मानवात झाली आहे. जीवनातल्या संघर्षात टिकून रहाण्यासाठी त्याच्या मेंदूत अनेक कौशल्ये कोरली गेली आहेत. त्याचा आपल्याला आपसूकच फायदा झालेला आहे, पण संगणकाला ह्या संघर्षातून जावे लागलेले नाही, परिणामतः ३७२६१८ गुणिले ३१५३७७८ हे गणित आपल्यासाठी अवघड आहे पण संगणकासाठी सोप आहे. तोल सांभाळून चालणे आपल्यासाठी सोपे आहे पण संगणकासाठी अवघड आहे. तुम्ही रोबोचे विडिओ बघितले असणार. जरा पहा ते कसे उभे रहातात, हसू येईल बघून.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
पुढच्या भागात मानवी मेंदूचे कार्य कसे चालते त्याची थोडक्यात माहिती घेऊ आणि यंत्रांना जाणीव होऊ शकेल का ह्यासाठी शास्त्रज्ञ काय संशोधन करत आहेत त्याची चर्चा करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्जीव वाळूपासून I mean silica क्षणार्धात गणिते करणारा संगणक बनतो, आणि आपल्याला काहीही आश्चर्य वाटत नाही.
Given enough time, Hydrogen turns into people.

Pages