खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिठलं भाकरी, मस्तच
आंब्याचा शिरा कसला भारी दिसतोय.
अनिंद्य, मस्तच झालाय खमण. एक नंबर.
इडल्या मस्त दिसतायेत

अनिंद्य ढोकळा मस्तच... जाळीदार झालाय
रेसिपी द्या तिन्ही ढोकळ्याची... माझा ढोकळा नेहमी फसतो

casserole हा शब्द आमच्याकडे वापरातला नसल्याने आणि चपातीचा डब्बा असेच म्हटले जात असल्याने मी तो आता वाचल्यावर गूगल केला. अशाच प्रकारची भांडी आली. मराठी प्रतिशब्द मात्र मिळाला नाही. पण याचा पुलाव हा सुद्धा एक अर्थ सापडला Happy

जबरदस्त की हो बन्डु! दिवाळी आली. Happy काय काटा आला आहे अंगावर, चकलीच्या.
सगळेच फोटो मस्त आहेत, हळूहळू पाहिले सगळे.

इडली, सुरळीच्या वड्या, चकली. तीनही आवडीचे प्रकार.

पायलट रन - बीटा टेस्टिंग ! झकास हाय.

दिवाळी फराळ कुणी ऑफर केला तर सर्वात आधी चकलीच उचलणार 🤤

… अनिंद्य, रेसिपी द्या तिन्ही ढोकळ्याची...

जुई, मला रेसिपी लिहिता येत नाही.

दुसरे असे की आमचे किचन अंदाजपंचे दाहोदरसे तत्वावर चालते, मोजमाप नाहीच 😁

चकली अफलातून!! एक उचलून पटकन खावीशी वाटते. आणि एक कप गरम चहा नंतर.
दिवाली फराळात गोडाचा कंटाळा आला की चकली आणि शेव साथ देतात.
चकलीचा कंटाळा मला कधीच येत नाही इतकी प्रिय.
बंडु, पाठवा ती चकली इकडे. भाजणीची आहे ना?

त्या बाहेरच्या सोडा घालून कायच्या काय जाड बनवतात.

चकली एक नंबर !!
रंग आणि धारदारपणा पाहून माझ्या मामीची चकली आठवली आणि ती चवीला अफाट असायची. त्यामुळे तुमची चकली बघून सुद्धा तीच चव जीभेवर आली. दिवाळीला सुरुवात झाली Happy

Pages