The Ba***ds of Bollywood - द आर्यन (शाहरुख) खान शो!

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2025 - 07:19

The Ba***ds of Bollywood - द आर्यन (शाहरुख) खान शो!

जेव्हा शाहरुखने आपल्या मुलाचे नाव आर्यन ठेवले तेव्हापासून मी आर्यनला ओळखत आहे. शाहरुख प्रचंड आवडीचा. अपवादानेच त्याचा एखादा चित्रपट बघितला नसावा. तरी एका हिंदु-मुस्लिम जोडप्याने आपल्या मुलाचे नाव आर्यन ठेवावे याचे कौतुक वाटण्यापलीकडे तो मुलगा काय कसा आहे याची फार कल्पना नव्हती. मध्यंतरी ड्र्ग्स केसमध्ये तो अडकला तेव्हाही त्याच्याबद्दल फार जाणून घ्यावेसे वाटले नाही. किंबहुना त्यावरून त्याला जज न करता शाहरुख या बापाबद्दल वाईट वाटले होते. थोडक्यात लाडक्या बापाचीच पहिली इनिंग संपली नसल्याने त्याच्या मुलाबद्दल शून्य उत्सुकता होती.

पण, काल त्याच मुलाने, आर्यन शाहरुख खानने दिग्दर्शित केलेले जे काही पाहिले त्यानंतर ईतर कश्यापेक्षाही त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची उत्सुकता जास्त राहील.

खरे तर गेले काही दिवस त्याच्या रील बघण्यात येत होत्या. त्यात तो शाहरुखचीच फर्स्ट कॉपी वाटावे असे संवाद म्हणत होता. ते पाहून म्हटले याची अवस्था अभिषेक बच्चनपेक्षा वाईट होणार. अभिषेक एक गुणी कलाकार असूनही त्याची नाहक अमिताभशी तुलना होणे त्यावर अन्यायकारक ठरले होते. आणि हा जर शाहरुखचीच शैली घेऊन अभिनेता बनायला जाणार असेल तर फार वाईट पद्धतीने तोंडावर आपटेल.

पण तेव्हा मला याची कल्पना नव्हती की त्याचे खरे क्षेत्र तर दिग्दर्शन आहे. आणि काय पहिल्याच चेंडूवर षटकार मारावे किंवा पहिल्याच सामन्यात शतक झळकवावे अशी कामगिरी केली आहे त्याने.

सात एपिसोडची मालिका, रात्री बघायला घेतली. म्हटले तीन-चार एपिसोड आज बघू आणि शिल्लक उद्या.. पण रात्रभर रिमोट हातात घ्यावासा वाटला नाही. सकाळी साडेसहा वाजता पुर्ण संपवूनच सोफ्यातून ऊठलो. एकीकडे पहाटेचे उजाडत होते तर दुसरीकडे एक नवीन स्टार उदयास येत आहे असे फिलींग आले.

स्टोरी म्हटले तर दोनचार ओळींची आहे. ती सांगून पोपटाचा जीव घेत नाही. पण नेपोकिड आणि आऊट सायडर यांची लव्हस्टोरी आहे समजा. सॉरी समजू नका, तीच स्टोरी आहे आणि ती ज्या पद्धतीने प्रेझेंट केली आहे ते कमाल आहे. म्हटले तर हटके आहे, म्हटले तर तेच आपले मसाला मूवी मटेरीयल आहे. पण फुल्ल ऑन एंटरटेनमेंट आहे. आणि या उद्दीष्ट्यापासून एका मिनिटभरासाठी चित्रपट हलत नाही.

चित्रपटात करण जोहरने करण जोहरचाच रोल केला आहे. त्याच्याकडून आर्यनला दिग्दर्शनाच्या टिप्स मिळाल्या असतीलच. पण दिग्दर्शनावर करणचा प्रभाव जाणवत नाही. कारण तो जाणवला असता तर वेगळेपण जाणवले नसते. ते वेगळेपण आर्यन स्वतःच घेऊन आला असण्याची दाट शक्यता आहे.

दिग्दर्शनच नाही तर कथा, पटकथा, संवाद सगळीकडे आर्यन खानचे नाव आहे. आणि संवाद कमाल आहेत. कित्येक पंचलाईन आहेत. तर कित्येक एपिसोड अश्याच एखाद्या पंचलाईनवर संपतात.

फक्त थोडी शिवीगाळ कमी करता आली असती तर फॅमिली चित्रपट झाला असता. हल्ली फॅमिली वेबसिरीजचे निकष सुद्धा बदललेच आहेत म्हणा, पण ते लाऊनही जरा जास्त वाटल्या. त्यातही Ass hole हा शब्द ईतके वेळा ऐकला की Ba***ds of Bollywood देखील मी Bad Ass of Bollywood असे वाचू लागलो Happy

पण त्यातल्या त्यात एक चांगले म्हणजे अश्लील शब्दांचा किंवा संदर्भाचा वापर विनोद निर्मिती करायला फारसा केला नाहीये. ते अजून वल्गर वाटते. यात ते एक कल्चर म्हणून येताना दाखवले आहे. कदाचित बॉलीवूडचे कल्चर तसेच असावे. आणि हो, अंगप्रदर्शन बिलकुल नाही. त्यामुळे हेडफोन लावून बघितल्यास फॅमिली मूव्ही आहे Happy

अभिनय सगळ्यांचेच मस्त. मला उगाच वाटत होते की यात काही नेपोकिडस सहन करावे लागतील. पण तसे काही नाहीये. हिरो-हिरोईन फ्रेश आहेत. हिरोईन सुंदरच नाही तर चांगला अभिनय करणारी आहे. हिरोचा मित्र झालेला राघव जुयाल याला फक्त डान्स शो मध्ये बघायचो, त्यात तो त्याच्या स्लो मोशन डान्ससाठी फार प्रसिद्ध आहे. त्याला ईतका उत्स्फुर्त अभिनय करताना बघणे सुखद धक्का होते.

पहिल्या की दुसऱ्याच एपिसोडमध्ये समीर वानखेडेचा संदर्भ आला आहे. त्याची जरा खेचली आहे. त्या वादाची पार्श्वभूमी माहीत आहे, पण फार डिटेलमध्ये कोण चूक कोण बरोबर याची कल्पना नाही. त्यामुळे त्यावर नो कॉमेंट्स. ईतरही काही ठिकाणी असे स्पूफ आणि काही बॉलीवूडवरच टोमणे आढळतील, पण तुम्ही कान नाक डोळे उघडे ठेवायचा लोड न घेता पिक्चर एन्जॉय करा.

शाहरुखच्या मुलाचा चित्रपट आणि बॉलीवूडचाच विषय असल्याने त्यात कॅमिओ करणार्‍यांची लिस्ट अभिनेत्यांपेक्षा मोठी होईल ईतकी आहे. ती फोडत नाही. उत्सुकताच असेल तर गूगल करू शकता. पण एक नाव फोडायला हरकत नाही आणि ते म्हणजे खुद्द शाहरुख खान!
तो सुद्धा हजेरी लाऊन गेला आहे आणि त्याने आपल्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये स्वतःवर विनोद आणि स्वतःचे कौतुक, असे दोन्ही करून घेतले आहे.

लॉर्ड बॉबी देओल यात हिरोईनचा बाप आणि मागच्या पिढीचा सुपर्रस्टार दाखवला आहे.
एकेकाळी बॉबी देओल असा रोल करतोय हे हास्यास्पद वाटले असते. आता या रोलसाठी त्याच्यापेक्षा बेस्ट कोणी असूच शकत नाही असा त्याच ऑरा झाला आहे.

कास्टिंगचे जसे फुल मार्क्स बॉबी देओलला जातील तेवढेच अर्शद वारसीच्या गफूरला मिळायला हवे. या भुमिकेसाठी एकीकडे विश्वासार्ह वाटावी अशी भाईगिरी आणि त्याचवेळी पिक्चरच्या जॉनरला जागत संवादात थोडा ह्युमर असे दोन्ही आणायचे होते. अर्शदची त्यात मास्टरीच आहे. त्याच्या एंट्रीला आणि नंतरही तो पडद्यावर आल्यावर "गफूsर" म्हणून गाणे/बॅकग्रांऊड म्युजिक वाजते ते सुद्धा मला आवडले.

शेवटचा ट्विस्ट बघून डोके भंजाळून जाते. त्यावर सगळ्यांनी पाहिल्यावर वेगळी चर्चा होईल.
त्यावर दुसऱ्या बाजूने देखील अजून एक ट्विस्ट येत तो प्रॉब्लेम सुटलेला दाखवतील असे वाटले होते पण तसे काही झाले नाही. पब्लिकला हॅपी एंडिंग आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी जुळून आलेल्या बघायची सवय लागली आहे. पण प्रत्यक्षात लाईफ तसे नसते. ते दि एण्डच्या पाटीसोबत संपत नाही तर पुढेही चालूच राहते.

पण एक आहे, तो शेवटाचा ट्विस्ट आवडो न आवडो, पटो न पटो, जर तुम्ही फिल्मी किडे आहात तर ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल.

मी ब्रिन्ज वॉच करत बघितल्याने एखादा छान पाच तासाचा पिक्चर बघितल्यासारखे वाटले. ते देखील कंटाळा न येता. कारण पिक्चर असावा तशीच वेगवान सिरीज आहे. उगाच ताणून खेचून मोठमोठे तासाभराचे आठ दहा भाग आणि सीजन वन टू करत बसले नाहीयेत. बरेचसे सीन टाळ्या अन शिट्टया याव्यात असे आहेत. जे थिएटरमध्ये बघायला सुद्धा मजा आली असती. थोडक्यात आर्यन खान चित्रपट दिग्दर्शन करायला सुद्धा तयार आहे. त्यामुळे दोन्ही बापलेकांचा एकत्र चित्रपट, म्हणजे "स्टारींग शाहरुख खान अँड डायरेक्टेड बाय आर्यन खान" लवकरच बघायला आवडेल. Happy

- ऋन्मेऽऽष

IMG-20250921-WA0016.jpgइतरत्र प्रकाशित

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>Ba***ds of Bollywood देखील मी Bad Ass of Bollywood असे वाचू लागलो<<
ते बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड असावे, एक चांदणी कमी पडत असली तरीहि. कारण त्याचा संदर्भ आहे पुढे...

राज हो, असावे नाही तसेच आहे. शेवटी ते नाव दाखवले सुद्धा आहे.
बाकी चांदण्या मी सुद्धा मोजल्या होत्या. आणि माझे इंग्लिश कच्चे तर स्पेलिंग चुकते काय म्हणून गूगल करून चेक सुद्धा केली होती Happy
पण त्या चांदण्या केवळ सिंबोलिक आहेत, लोकांनी गेस करू नये म्हणून मुद्दाम चुकवल्या आहेत.

Ba***ds of Bollywood बिंज वॉच करुन संपवली.. कोणताही सामाजिक संदेश, सध्याचे समाजातले / देशापुढ्चे प्रश्ण , कोणतेही नवीन दिग्दर्शकीय प्रयोग इत्यादी न करता एक उत्तम मनोरंजक, टिपिकल बॉलिवुड सिरीज अनेक दिवसांनी पाहिली. मजा आली...सगळे धागे मस्त जुळवलेत. कलाकार बेस्ट आहेत.
सिरीज बघुन नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.. मजा आली एकदम.. डायलॉग जबरी आहेत..
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन हे सगळं खरच आर्यन खान ने केलं असेल तर पोरगं गुणी निघालं की शाहरुख चं.. अर्थात आई बापांचा भक्कम सपोर्ट आहेच पण अजुन चांगले चित्रपट बघायला अवडतील त्याच्याकडुन..

स्मिता पूर्ण पोस्ट +७८६

यात समलैंगिक दृश्य आहेत असे कुठेतरी वाचले होते. पण ते नुसते नावाला ओझरते दाखवले आहे. आणि ज्या कॅरेक्टर बाबत ते दाखवले आहे ते एकदाच दाखवून पुढे त्याचा काहीच संदर्भ न देत असे असण्यात काही विशेष नाही असे दाखवले आहे जे आवडले.

भन्साळी, जोहर, स्कॉर्सेसीसारखे दिग्गज पण आर्यनच्या पाय धुऊन पाणी प्यायचं इतकी अफलातून वेब सिरीज आहे!
डायलॉग्ज तर इतके झणझणीत की जिभेवर मिरचीचा ठेचा लावल्यासारखं वाटतं. पण खरी मजा आली ती क्लायमॅक्समध्ये – एकदम अंगावर काटा आणणारा!

आर्यन हा दिग्दर्शनाचा शाहरुखच! जसा शाहरुखने बच्चन आणि बाकी हिरोंना खाऊन टाकलं, तसाच आर्यन पूर्ण बॉलिवूड गिळणार आहे! आता पासून हिंदी सिनेमा = आर्यनचा सिनेमा.

Ba***ds of Bollywood बिंज वॉच करुन संपवली.. कोणताही सामाजिक संदेश, सध्याचे समाजातले / देशापुढ्चे प्रश्ण , कोणतेही नवीन दिग्दर्शकीय प्रयोग इत्यादी न करता एक उत्तम मनोरंजक, टिपिकल बॉलिवुड सिरीज अनेक दिवसांनी पाहिली. मजा आली...सगळे धागे मस्त जुळवलेत. कलाकार बेस्ट आहेत. >>>>>>>सेम , स ह म त. आवडली हि वेबसीरीज.

माझे दोनतीन मित्र आहेत जे बॉयकॉट बॉलीवूड गॅंगचे आजीवन सभासद आहेत. ते देखील सिरीज वेगवान आणि एंगेजिंग आहे असे आधी कबूल करून नंतर नावे ठेवत आहेत. त्यामुळे यावर तर आता शिक्कामोर्तब झालेच आहे Happy

यालासुद्धा चांगले दिवस आले
का ते सिरीज बघितल्यावरच समजेल...

Guess what just blew up again? Bobby Deol’s 1997 classic “Duniya Haseeno Ka Mela” from Gupt just racked up 5 million new views!! all because it appears in Aryan Khan’s new series The Ba*ds of Bollywood! The song returns in the climax, tying old and new in a cinematic twist. Nostalgia + plot twist =

शाहरुखनेच मदत केली असणार...अथवा करण कडून करून घेतले दिग्दर्शन आणि याचे नाव.पुढे केले!! अन्यथा इतकी सफाई कशी येईल पहिल्याच प्रयत्नात?

कशी लपून छपून मदत करणार?
केली तर सीन शूट करत असताना सर्वांसमोरच करावी लागणार..
आणि शूटिंग काही शाहरुखच्या स्वतःच्या घरात झाले नसणार..
इतके लोकं उपस्थित असणार तिथे तर एव्हाना ही गोष्ट गावभर झाली असती.
त्यामुळे मला तरी ती शक्यता फार वाटत नाही.

आणि पहिल्याच प्रयत्नात म्हणाल तर त्याआधी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून कोणालातरी मदत केली असेनही. मला कल्पना नाही. पण एक आहे, घरचेच प्रोडक्शन हाऊस असताना, बाप जगातला सर्वात मोठा सुपरस्टार असताना, त्याने चित्रपट निर्मिती प्रक्रिया लहानपणापासून अगदी जवळून पाहिली असणार. त्याच्यासाठी ते काही नवीन नसणार.

काही ठोस पुरावा नसल्यास त्याचे श्रेय नाकारू नये असे वाटते.

शाहरुखनेच मदत केली असणार...अथवा करण कडून करून घेतले दिग्दर्शन आणि याचे नाव.पुढे केले!! अन्यथा इतकी सफाई कशी येईल पहिल्याच प्रयत्नात?
>>> व्हेरी कॉमन... बरेचदा पहिली कलाकृती खूप सक्सेस होते...
भालचंद्र नेमाडे – कोसला , ग्रेस (सदाशिव बापट) – धूसर काळोख
कुंदन शाह – जाने भी दो यारो ,
राहुल रवैल – लव्ह स्टोरी
राजीव पाटील – जोगवा
परेश मोकाशी – हरिश्चंद्राची फॅक्टरी

तुम्ही म्हणता तर नक्की पहाणार...

पण दिग्दर्शनावर करणचा प्रभाव जाणवत नाही.
हे कसे काय ओळखता? दिग्दर्शनावर याचा किंवा त्याचा प्रभाव आहे की नाही हे कोणत्या निकषांवर ठरते? उद्या आर्यनखानने एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले व त्यात दोन चार गाड्या उडवल्या तर रोहीत शेट्टीचा प्रभाव, अति इमोशनल बनवला तर गुरूदत्तचा प्रभाव ...असे काही असते का?

बाकी शाहरूख संपत आला म्हणून नवीन कोणाला पकडायचे तर त्याच्या फॅमिलीला... असा सूर या लेखातून दिसला. वेबसिरीज चांगली असेल ही पण "एकीकडे पहाटेचे उजाडत होते तर दुसरीकडे एक नवीन स्टार उदयास येत आहे असे फिलींग आले." , "पण, काल त्याच मुलाने, आर्यन शाहरुख खानने दिग्दर्शित केलेले जे काही पाहिले त्यानंतर ईतर कश्यापेक्षाही त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची उत्सुकता जास्त राहील." हे असले लिखाण तर पैसे घेऊन ही कोणी करत नाही.

तुम्ही म्हणता तर नक्की पहाणार...
>>>
धन्यवाद योगी Happy

..

पण दिग्दर्शनावर करणचा प्रभाव जाणवत नाही. हे कसे काय ओळखता?
>>>>>>>
तुम्हीच प्रश्न विचारला आणि पुढे रोहित शेट्टी आणि गुरुदत्त यांची उदाहरणे घेऊन तुम्हीच उत्तर दिले Happy
करण जोहरने असा चित्रपट कधी दिग्दर्शित केला नाही. तरी समजा तो हे करू शकला असता तर त्याने ते आर्यनखान साठी करण्याऐवजी स्वतःच कधीतरी केले असते आणि आपल्या दिग्दर्शनातील हा पैलू देखील जगाला दाखवला असता. क्रिएटिव्ह लोकांना त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे असेच पहिले वाटते. मदत करायची असते तर एखादा कुछ कुछ होता है किंवा स्टुडन्ट ऑफ द इयर छापाचा मूवी त्याला बनवून दिला असता ज्याबद्दल त्याचे स्वतःचे आधीच कौतुक झाले आहे.

..

बाकी शाहरूख संपत आला म्हणून.....
>>>>>>>
यावर वेगळा स्वतंत्र चार पानांचा लेख आणि खाली शंभर प्रतिसाद माझेच असा धागा काढावा लागेल. म्हणून यावर तूर्तास रुमाल Happy

..

म्हणून नवीन कोणाला पकडायचे तर त्याच्या फॅमिलीला... असा सूर या लेखातून दिसला.
>>>>>
शाहरुख मला आयुष्यभर पुरेल. त्याची जागा दुसऱ्याला नाही. याने दिग्दर्शनाचा असा पैलू दाखवला नसता तर मी याचेही कौतुक कधी केले नसते. ना आधी कधी कुठे केले होते. कौतुक सोडा कधी याची दखल सुद्धा घेतली नव्हती.

वेबसिरीज चांगली असेल ही पण.....
>>>>>>>>
वेब सिरीज तुम्ही एकदा बघितल्यावर चर्चा करायला आणखी मजा येईल. कारण तुम्हाला माझी काही उत्तरे सिरीज न बघताच समजणार नाहीत.

..

पण........ हे असले लिखाण तर पैसे घेऊन ही कोणी करत नाही.
>>>>>>
पैसे घेऊन असले लिखाण होणार सुद्धा नाही Happy
एकदा तुम्ही आपली लेखणी विकली की मग तुम्हाला तेच लिहावे लागते जे तुमच्या मालकांना आवडेल.
हे राजकीय लिखाणासारखेच झाले, तुम्हाला कधी स्वतःचे प्रामाणिक मत मांडता येत नाही. तुमचे पक्ष नेते जे बोलतील तेच उचलून धरावे लागते. मी माझे विचार अश्या कुठल्या चौकटीत अडकवले की संपलोच म्हणून समजा.

आर्यनने फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोडक्शन मध्ये डिग्री शिक्षण ही घेतलं आहे US मधून
>>>>>

ओह.. याची कल्पना नव्हती!
म्हणजे आयुष्यात काय करायचे आहे याबाबत तो आणि शाहरुख क्लिअर होते!

स्कॅम १९९२ हर्षद मेहता
B***ads of Bollywood आर्यन खान
स्कॅम २००३ तेलगी

गणपतीनंतर लागोपाठ तीन जबरदस्त वेब सिरीज पाहिल्या. याच क्रमाने..
दोन्ही स्कॅम एकेक आठवडा घेत पाहिल्या
आणि Ba***ds of bollywood एका रात्रीत नॉन स्टॉप संपवली.
वरखाली स्कॅम आणि मध्ये बॉलीवूड..
मस्त सँडविच झाले तीन मालिकांचे Happy

भन्साळी, जोहर, स्कॉर्सेसीसारखे दिग्गज पण आर्यनच्या पाय धुऊन पाणी प्यायचं इतकी अफलातून वेब सिरीज आहे!
डायलॉग्ज तर इतके झणझणीत की जिभेवर मिरचीचा ठेचा लावल्यासारखं वाटतं. पण खरी मजा आली ती क्लायमॅक्समध्ये – एकदम अंगावर काटा आणणारा!

sarcastic कॉमेंट हे आता पहिला एपिसोड पाहिल्यावर कळले.... पहिल्यांदा वाटले होते की सरळसोट लिहीले आहे.

पहिला एपिसोड पाहिला. अगदी वॉव आहे अशी वाटली नाही ही वेबसिरिज.. लिड अ‍ॅक्टर लोकांनी सहज अभिनय केला आहे म्हणून एपिसोड पाहू शकलो. बॉबी देओलने आश्रम किंवा अ‍ॅनिमलचे बेअरींग तसेच ठेवले आहे.

करण जोहर रणबीरसिंगला "तेरे बेटी की मा की च्यू**" अशी शिवी देतो हे पाहून डोक्याला हात लावला. प्रत्यक्ष जीवनात ही लोकं असलेच बोलत असतील बहुतेक..!!

योगी ३–४ एपिसोड बघून व्यक्त व्हा.. कदाचित आवडतेय या गटात याल Happy

खालची कॉमेंट तुम्हाला अशी नाही पण यावरून इनजनरल सर्वांनाच लिहितो.. including Me

बरेचदा बहुचर्चित मालिका (किंवा चित्रपट) बाबत होते काय.. तर आपण ती बघून तिच्यावर काही चांगले वाईट मत व्यक्त करायचे हे डोक्यात ठेवून ती बघतो. लोकांच्या वाचलेल्या पोस्ट डोक्यात घोळवत बघतो आणि त्या अनुषंगाने खरे खोटे पडताळून बघितल्यासारखे बघतो, आणि आपल्याही नकळत यात मालिका बघायची मजा निघून जाते.

कोणाला एखादी कलाकृती आवडेल, कोणाला नाही, ज्याची त्याची आवड वेगळी असणारच.. पण मनाची पाटी कोरी करून बघणे गरजेचे. एकदा मालिका चित्रपट बघायला सुरुवात केली की इतर सारे विचार शून्य व्हायला हवेत.

Bads of Bollywood मधील हिरोचा पहिला पिक्चर म्हणून किल पाहिला आता. निव्वळ खतरनाक!
Violence जास्त होता असेही म्हणू शकत नाही. कारण तोच पिक्चर होता. कमी असता तर मजाच गेली असती. तोच usp होता.
त्यानंतर ही सिरीज म्हणजे भारीच आहे..

आज पूर्ण केली. शेवटचे दोन भाग अ आणि अ वाटले. विशेषतः पुरस्कार समारंभातल्या मारामारीपासून पुढचं सगळंच. तिथपर्यंतची सीरीज आवडली. शिव्या मात्र फार आहेत. मी फारशा वेबसीरीज बघत नाही म्हणून मला विचित्र वाटलं असेल. एवढ्या प्रमाणात f वर्ड्स वापरतात का खऱ्या आयुष्यात लोक? कदाचित त्या जगात वापरतही असतील.

शेवटचा ट्विस्ट अनपेक्षित.
एकंदरीत फुल बॉलिवूड मसाला करमणूक आहे.

शाहरुख खान as a शाहरुख खान होता तर थोडा कृत्रिम दाखवायलाच हवा.. डायरेक्षनल टच आहे तो सुद्धा Happy

त्याचे खरे क्षेत्र तर दिग्दर्शन आहे. आणि काय पहिल्याच चेंडूवर षटकार मारावे किंवा पहिल्याच सामन्यात शतक झळकवावे अशी कामगिरी केली आहे त्याने.>>>> किती मुक्ताफळं...
त्याला बापा चा, कजो चा फुल्ल सपोर्ट आहे. त्यामुळे षटकार मारणे पॉसीबल आहे.

शाहरुखने कधी कुठली फिल्म दिग्दर्शित केल्याचे आठवत नाही.. त्यामुळे त्याचा सपोर्ट बाद.
करण जोहरने कुठली या जॉनरची आणि इतकी चांगली सिरीज किंवा पिक्चर केला आहे का?

काल ही सिरीज पाहायचा प्रयत्न केला. पहिला एपिसोड पूर्ण झाला. पण मला असं तुटक तुटक वाटलं. दिग्दर्शनात काही खास वाटलं नाही. डायलॉग्स वरतीच बाजी मारून द्यायचा प्रयत्न दिसतोय. त्यातही अति शिवराळ भाषा आणण्यासाठी म्हणून उगाचच टपोरी मित्र दाखवणे हेपण अतिच. केवळ मला हे दाखवायचे आणि हे पण दाखवायचं आणि माझं झालेला अपमान दाखवायचा आहे असं काहीतरी डोक्यात ठेवून उगाचच धागे जोडलेत तेही पहिल्या एपिसोड मध्ये च आणि त्याचं हे वीण तयार करून ब्रँडचा स्टिकर जोडायचा प्रयत्न दिसतोय.

Pages