The Ba***ds of Bollywood - द आर्यन (शाहरुख) खान शो!
जेव्हा शाहरुखने आपल्या मुलाचे नाव आर्यन ठेवले तेव्हापासून मी आर्यनला ओळखत आहे. शाहरुख प्रचंड आवडीचा. अपवादानेच त्याचा एखादा चित्रपट बघितला नसावा. तरी एका हिंदु-मुस्लिम जोडप्याने आपल्या मुलाचे नाव आर्यन ठेवावे याचे कौतुक वाटण्यापलीकडे तो मुलगा काय कसा आहे याची फार कल्पना नव्हती. मध्यंतरी ड्र्ग्स केसमध्ये तो अडकला तेव्हाही त्याच्याबद्दल फार जाणून घ्यावेसे वाटले नाही. किंबहुना त्यावरून त्याला जज न करता शाहरुख या बापाबद्दल वाईट वाटले होते. थोडक्यात लाडक्या बापाचीच पहिली इनिंग संपली नसल्याने त्याच्या मुलाबद्दल शून्य उत्सुकता होती.
पण, काल त्याच मुलाने, आर्यन शाहरुख खानने दिग्दर्शित केलेले जे काही पाहिले त्यानंतर ईतर कश्यापेक्षाही त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची उत्सुकता जास्त राहील.
खरे तर गेले काही दिवस त्याच्या रील बघण्यात येत होत्या. त्यात तो शाहरुखचीच फर्स्ट कॉपी वाटावे असे संवाद म्हणत होता. ते पाहून म्हटले याची अवस्था अभिषेक बच्चनपेक्षा वाईट होणार. अभिषेक एक गुणी कलाकार असूनही त्याची नाहक अमिताभशी तुलना होणे त्यावर अन्यायकारक ठरले होते. आणि हा जर शाहरुखचीच शैली घेऊन अभिनेता बनायला जाणार असेल तर फार वाईट पद्धतीने तोंडावर आपटेल.
पण तेव्हा मला याची कल्पना नव्हती की त्याचे खरे क्षेत्र तर दिग्दर्शन आहे. आणि काय पहिल्याच चेंडूवर षटकार मारावे किंवा पहिल्याच सामन्यात शतक झळकवावे अशी कामगिरी केली आहे त्याने.
सात एपिसोडची मालिका, रात्री बघायला घेतली. म्हटले तीन-चार एपिसोड आज बघू आणि शिल्लक उद्या.. पण रात्रभर रिमोट हातात घ्यावासा वाटला नाही. सकाळी साडेसहा वाजता पुर्ण संपवूनच सोफ्यातून ऊठलो. एकीकडे पहाटेचे उजाडत होते तर दुसरीकडे एक नवीन स्टार उदयास येत आहे असे फिलींग आले.
स्टोरी म्हटले तर दोनचार ओळींची आहे. ती सांगून पोपटाचा जीव घेत नाही. पण नेपोकिड आणि आऊट सायडर यांची लव्हस्टोरी आहे समजा. सॉरी समजू नका, तीच स्टोरी आहे आणि ती ज्या पद्धतीने प्रेझेंट केली आहे ते कमाल आहे. म्हटले तर हटके आहे, म्हटले तर तेच आपले मसाला मूवी मटेरीयल आहे. पण फुल्ल ऑन एंटरटेनमेंट आहे. आणि या उद्दीष्ट्यापासून एका मिनिटभरासाठी चित्रपट हलत नाही.
चित्रपटात करण जोहरने करण जोहरचाच रोल केला आहे. त्याच्याकडून आर्यनला दिग्दर्शनाच्या टिप्स मिळाल्या असतीलच. पण दिग्दर्शनावर करणचा प्रभाव जाणवत नाही. कारण तो जाणवला असता तर वेगळेपण जाणवले नसते. ते वेगळेपण आर्यन स्वतःच घेऊन आला असण्याची दाट शक्यता आहे.
दिग्दर्शनच नाही तर कथा, पटकथा, संवाद सगळीकडे आर्यन खानचे नाव आहे. आणि संवाद कमाल आहेत. कित्येक पंचलाईन आहेत. तर कित्येक एपिसोड अश्याच एखाद्या पंचलाईनवर संपतात.
फक्त थोडी शिवीगाळ कमी करता आली असती तर फॅमिली चित्रपट झाला असता. हल्ली फॅमिली वेबसिरीजचे निकष सुद्धा बदललेच आहेत म्हणा, पण ते लाऊनही जरा जास्त वाटल्या. त्यातही Ass hole हा शब्द ईतके वेळा ऐकला की Ba***ds of Bollywood देखील मी Bad Ass of Bollywood असे वाचू लागलो
पण त्यातल्या त्यात एक चांगले म्हणजे अश्लील शब्दांचा किंवा संदर्भाचा वापर विनोद निर्मिती करायला फारसा केला नाहीये. ते अजून वल्गर वाटते. यात ते एक कल्चर म्हणून येताना दाखवले आहे. कदाचित बॉलीवूडचे कल्चर तसेच असावे. आणि हो, अंगप्रदर्शन बिलकुल नाही. त्यामुळे हेडफोन लावून बघितल्यास फॅमिली मूव्ही आहे
अभिनय सगळ्यांचेच मस्त. मला उगाच वाटत होते की यात काही नेपोकिडस सहन करावे लागतील. पण तसे काही नाहीये. हिरो-हिरोईन फ्रेश आहेत. हिरोईन सुंदरच नाही तर चांगला अभिनय करणारी आहे. हिरोचा मित्र झालेला राघव जुयाल याला फक्त डान्स शो मध्ये बघायचो, त्यात तो त्याच्या स्लो मोशन डान्ससाठी फार प्रसिद्ध आहे. त्याला ईतका उत्स्फुर्त अभिनय करताना बघणे सुखद धक्का होते.
पहिल्या की दुसऱ्याच एपिसोडमध्ये समीर वानखेडेचा संदर्भ आला आहे. त्याची जरा खेचली आहे. त्या वादाची पार्श्वभूमी माहीत आहे, पण फार डिटेलमध्ये कोण चूक कोण बरोबर याची कल्पना नाही. त्यामुळे त्यावर नो कॉमेंट्स. ईतरही काही ठिकाणी असे स्पूफ आणि काही बॉलीवूडवरच टोमणे आढळतील, पण तुम्ही कान नाक डोळे उघडे ठेवायचा लोड न घेता पिक्चर एन्जॉय करा.
शाहरुखच्या मुलाचा चित्रपट आणि बॉलीवूडचाच विषय असल्याने त्यात कॅमिओ करणार्यांची लिस्ट अभिनेत्यांपेक्षा मोठी होईल ईतकी आहे. ती फोडत नाही. उत्सुकताच असेल तर गूगल करू शकता. पण एक नाव फोडायला हरकत नाही आणि ते म्हणजे खुद्द शाहरुख खान!
तो सुद्धा हजेरी लाऊन गेला आहे आणि त्याने आपल्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये स्वतःवर विनोद आणि स्वतःचे कौतुक, असे दोन्ही करून घेतले आहे.
लॉर्ड बॉबी देओल यात हिरोईनचा बाप आणि मागच्या पिढीचा सुपर्रस्टार दाखवला आहे.
एकेकाळी बॉबी देओल असा रोल करतोय हे हास्यास्पद वाटले असते. आता या रोलसाठी त्याच्यापेक्षा बेस्ट कोणी असूच शकत नाही असा त्याच ऑरा झाला आहे.
कास्टिंगचे जसे फुल मार्क्स बॉबी देओलला जातील तेवढेच अर्शद वारसीच्या गफूरला मिळायला हवे. या भुमिकेसाठी एकीकडे विश्वासार्ह वाटावी अशी भाईगिरी आणि त्याचवेळी पिक्चरच्या जॉनरला जागत संवादात थोडा ह्युमर असे दोन्ही आणायचे होते. अर्शदची त्यात मास्टरीच आहे. त्याच्या एंट्रीला आणि नंतरही तो पडद्यावर आल्यावर "गफूsर" म्हणून गाणे/बॅकग्रांऊड म्युजिक वाजते ते सुद्धा मला आवडले.
शेवटचा ट्विस्ट बघून डोके भंजाळून जाते. त्यावर सगळ्यांनी पाहिल्यावर वेगळी चर्चा होईल.
त्यावर दुसऱ्या बाजूने देखील अजून एक ट्विस्ट येत तो प्रॉब्लेम सुटलेला दाखवतील असे वाटले होते पण तसे काही झाले नाही. पब्लिकला हॅपी एंडिंग आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी जुळून आलेल्या बघायची सवय लागली आहे. पण प्रत्यक्षात लाईफ तसे नसते. ते दि एण्डच्या पाटीसोबत संपत नाही तर पुढेही चालूच राहते.
पण एक आहे, तो शेवटाचा ट्विस्ट आवडो न आवडो, पटो न पटो, जर तुम्ही फिल्मी किडे आहात तर ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल.
मी ब्रिन्ज वॉच करत बघितल्याने एखादा छान पाच तासाचा पिक्चर बघितल्यासारखे वाटले. ते देखील कंटाळा न येता. कारण पिक्चर असावा तशीच वेगवान सिरीज आहे. उगाच ताणून खेचून मोठमोठे तासाभराचे आठ दहा भाग आणि सीजन वन टू करत बसले नाहीयेत. बरेचसे सीन टाळ्या अन शिट्टया याव्यात असे आहेत. जे थिएटरमध्ये बघायला सुद्धा मजा आली असती. थोडक्यात आर्यन खान चित्रपट दिग्दर्शन करायला सुद्धा तयार आहे. त्यामुळे दोन्ही बापलेकांचा एकत्र चित्रपट, म्हणजे "स्टारींग शाहरुख खान अँड डायरेक्टेड बाय आर्यन खान" लवकरच बघायला आवडेल.
- ऋन्मेऽऽष
वावे +१
वावे +१
चार दिवसांत पाहून संपवली सिरीज... पहिला भाग खरंतर आवडला नव्हता .. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवणं मला व्यक्तिशः पटलं नाही .. त्यातून मुजोरपणा दिसून येतो.. ते टाळण्यास हरकत नव्हती.. जे काही असेल ते कायद्याच्या कक्षेत राहून करायला हवे..
म्हटलं बघुया पुढे कशी आहे सिरीज.. म्हणून सगळी पाहून संपवली .. टाइमपास सिरीज आहे. कलाकारांची निवड चांगली आहे ..
सिरीजचा हिरो आणि त्याचा मित्र, मॅनेजर , प्रेयसी सगळी गोड - गोड मंडळी आहेत..
शिव्यांचा भडीमार मात्र अतिच आहे सिरीजमध्ये..! शिव्या माहित नाहीत असं नाही पण चालता - बोलता प्रत्येक वाक्यात शिव्या देणे हेचं जर ह्या बॉलिवुडकरांचं कल्चर असेल तर मात्र उनकी दुनिया अपने दुनिया से बहुत - बहुत अलग है.. ह्यांना उगाच डोक्यावर घेऊन नाचण्यात अर्थ नाही. ( हे त्या वेड्या चाहत्यांसाठी जे ह्यांना पाहायला गर्दीत जीव घालवून बसतात अथवा त्यांच्याकडून किंवा त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून स्वतःचा अपमान करून घेतात..) .. उडीदामाजी काळे - गोरे असतील... चित्रपटसृष्टीत सगळेच तसे वागत नसतील.
गुरू म्हणून करण जोहरचा हात शिष्य आर्यन खानच्या डोक्यावर आहे हे सिरीज पाहताना जाणवते.. काही प्रसंग पाहताना ' कल हो ना हो..' ह्या चित्रपटाची आठवण होत होती.. ..इतरांना जाणवेल की नाही माहित नाही मात्र मला जाणवलं तसं..!
बाकी ' दुनिया हसिनों का मेला' हे १९९७ चं बॉबी देओलचं गाणं सिरीजमध्ये हुशारीने वापरलं गेले आहे.. ते आवडलं. बॉबी देओलला स्वतःला हि तेव्हा हे गाणं शूट करताना वाटलं नसेल की , पुढे २७ वर्षांनंतर एखाद्या सिरीजचं संपूर्ण सार त्या गाण्यात सामावलं जाईल. जुन्या गाण्याचा छान प्रयोग केलायं ... डोकं मात्र भारी लावलंय..!
शेवट पटायला थोडासा जड जातो .. पण ' बॉबी ' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काही अफवा उठवल्या गेल्या होत्या ( पेपरात वाचलं होते मी त्याबद्दल..) त्यामुळे ठिक आहे शेवट..!
एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची
एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवणं मला व्यक्तिशः पटलं नाही..
>>>>>
हो, मलाही ते तात्विकदृष्ट्या पटले नाही.
जवान मध्ये सुद्धा एका डायलॉग होता.
बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर.
याचाही संदर्भ लोकांनी तिथे जोडला होता हे मला नंतर कधीतरी समजले.
लेखात म्हटल्याप्रमाणे त्या प्रकरणाबद्दल फार माहीत नाही. पण ज्याप्रकारे सामान्य लोकं हा प्रकार एन्जॉय करत होते ते पाहता असे वाटले की कदाचित त्या मूळ प्रकरणामागे केवळ कर्तव्यदक्षता नसून काही राजकीय सीन असावा.
बॉबी देओलला स्वतःला हि तेव्हा
बॉबी देओलला स्वतःला हि तेव्हा हे गाणं शूट करताना वाटलं नसेल की , पुढे २७ वर्षांनंतर...
>>>>>
ते गाणे कोणीकोणी पुन्हा युट्यूबवर टाकत आहेत आणि त्यालाही लाखो व्यू मिळत आहेत.
तर काही जण त्यातील ओरिजनल डान्सर भानू खान हिचा शोध घेत आहेत.
शाहरुखने कधी कुठली फिल्म
शाहरुखने कधी कुठली फिल्म दिग्दर्शित केल्याचे आठवत नाही.. त्यामुळे त्याचा सपोर्ट बाद.>>> how naive!
without enough experience of
without enough experience of life and too ready to believe or trust other people
जिसे जीवन का पर्याप्त अनुभव नहीं और जो दूसरों पर तुरंत विश्वास या भरोसा कर लेता है भोला-भाला
टाइमपास सिरीज आहे. कलाकारांची
टाइमपास सिरीज आहे. कलाकारांची निवड चांगली आहे .. >> +१ मजा आली बघायला . संवाद झक्का जमलेत ( जबरदस्ती घुसडलेल्या शिव्या वगळता). मला सगळ्यात राघवचे काम आवडले. कसला अफलातून कॉमिक सेन्स आहे त्याच. दिल खूश हो गया. " सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली " उडवणारा प्रसंग खरच अननेसेसरी वाटला. चीप रीवेंज घेतल्यासारखे वाटले.
गुरू म्हणून करण जोहरचा हात शिष्य आर्यन खानच्या डोक्यावर आहे हे सिरीज पाहताना जाणवते.. काही प्रसंग पाहताना ' कल हो ना हो..' ह्या चित्रपटाची आठवण होत होती.. ..इतरांना जाणवेल की नाही माहित नाही मात्र मला जाणवलं तसं..! >> ह्याला अनुमोदन !
कथा, पटकथा, संवादद, दिग्दर्शन सब कुछ आर्यन चे आहे ह्या विश्वास बसत नाहि . ह्यामागे त्याचा मोठा वाटा असेल पण बाकीच्यांचा हातभार लागला असावा असे वाटते.
ट्वीस्ट्बद्दल - नेफी वर एका स्पॅनिश सोप ऑपेरामधे हा प्रकार पाहिला होता नि त्याचाच रीव्हर्स ट्वीस्ट पण त्यात पाहिला होता.
Pages