
बागेची आवड असूनही जागेअभावी बाग लावणे शक्य होत नाही अशावेळी दुधाची तहान ताकावर भागवावी तसे आपण कुंडी, ग्रो बॅग, बाटली इ. मध्ये एखादे तरी झाड आपण लावतो. अशीच गच्चीवर परसबाग करायचा प्रयत्न केलाय..
चुकांतुन शिकत, पड़ता धडपड गेल्या 3 महिन्यांत छोटीशी परसबाग उभी राहिली. मायबोलीवर अनेक विषयातील जाणते आहेत. अनेक निसर्गप्रेमी आहेत. म्हणून याविषयावर लिहावे आपली छोटीशी बाग त्यातून मिळणारा आनंद इथे शेअर करावासा वाटला.
मायबोली च्या इतर सदस्यांनी सुद्धा आपले अनुभव, आठवणी, अभिप्राय शेअर केल्यास आवडेल.
बागकामाचा श्री गणेशा
गाजर - मुळा (रोपं उगवायला लागलीत आता)
नर्सरतुन आणलेली छोटी रोपे ( झेडू, वांगी, टमाटर)
टमाटर लागलेले रोपटे
बेबी कॉर्न
कारलं रोप
कारल्याचं वेल
दोदका - राजमा
अळु आणि पपईचे छोटेसे रोपटे
कोथिंबीर
नुकताच उगवलेता लाल माठ आणि लेटयुस
रताळे
चवळी
पेरू
घोसाळे
शहतुत Mulberry
वांगे
गवती चहा
मिर्ची
फुलझाडे
अपराजिता
पहिला टमाटर पिकतोय
चांगली चालली आहे सुरुवात.
चांगली चालली आहे सुरुवात. जागाही वरची पूर्ण सूर्यप्रकाश येणारी आहे. बरीच झाडे लावता येतील. खते घातली नाहीत तरीही फक्त पाणी आणि सूर्य प्रकाशाने फळे फुले चांगली येतात. गुलाब लावायचे झाल्यास गावठी लावा. कलमी नको. कारण त्यांना सुवासिक फुले येतात आणि रोग अजिबात पडत नाहीत. औषधी फवारे मारायची गरज पडत नाही. आपली घरची बाग त्यातला भाजीपाला आणि बाहेरचा यात फरक म्हणजे बिना विषारी औषधांचे उत्पन्न. सरळ झाडावरून तोडले की वापरले स्वयंपाकात.
धन्यवाद!
धन्यवाद!
ही आमच्या शाळेतल्या गच्ची वरची परसबाग़ आहे. उपक्रम म्हणून केलेली असली तरी त्यातून आम्ही आमचा छंद जोपसतोय.
गुलाबाची रोपे मुलांनी आणलेली आहेत.
गावठी गुलाब सुद्धा लावायचा आहे..
अजुन रोपे तयार करत आहोत.. अपडेट देंइन पुढे.
मस्त आहे की.
मस्त आहे की.
शाळेत असेल तर आजुबाजुला झाडे असणार. आता पावसाळा संपला की आजुबाजुची सुकलेली पाने उचलुन आणा आणि ती पोत्यात भरुन गच्चीतच उन्हात ठेवा. दोन तिन दिवसात कडक वाळली की काठीने पोत्यातच वरुन झोडपायची. बारीक तुकडे होतात. हे सतत करत राहा.
हा कचरा कुंडीत घालायचा. दोन उपयोग - एकतर कुंदीतल्या मातीवर थेट उन न पडल्याने बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे पाणी सतत द्यावे लागत नाही. आणि हा कचरा कुजुन ह्युमस तयार होते जे झाडांना लाभदायक ठरते. हळुहळू मातीच्या जागी हा कचरा वापरा, सुरबातीला जमणार नाही म्हणुन कुंडीत टाकुन जरा मिक्स करत राहायचे. माती पुर्ण रिप्लेस करा वर्षभरात आणि मातीविना शेती करा. सुकलेली पाने म्हणजे सोने आहे जे लोक जाळुन टाकतात.
प्रमोद तांबे यांचे इथे लेख आहेत ते वाचा. माझा शहरी शेती व छतशेती हे लेखही वाचा.
ह्यूमस करिता +१
ह्यूमस करिता +१
जेव्हा ह्याचे महत्व सर्व स्तरावर पटेल आणि आचरणात येईल तेव्हा सेंद्रिय शेती खऱ्या अर्थाने रुजू लागेल. आणि ह्यासाठी शालेय उपक्रम माध्यमातून शिक्षण देण्याची संकल्पना खुप कौतुकास्पद आहे.
खूप छान आहे धागा... बाग अशी
खूप छान आहे धागा... बाग अशी मस्त फुलत राहो..
साधना.तुमची सुचना खूपच
साधना.तुमची सुचना खूपच उपयुक्त आहे.. नक्कीच वाचयला हवेत लेख..
सर्वांना..धन्यवाद
स्तुत्य उपक्रम. छान वाढू देत
स्तुत्य उपक्रम. छान वाढू देत तुमची झाडं.
अजुन रोपे तयार करत आहोत..
अजुन रोपे तयार करत आहोत.. अपडेट देंइन पुढे>>>>>
श्रद्धा, मुले या प्रकल्पात आहेत तर कृपया कृपया सेंद्रिय कसे करता येईल हे पाहा. मी वर जे वाळलेल्या पाचोळ्याबद्दल लिहिलेय तो सर्वोत्तम उपाय आहे. वाळका कचरा जास्त मिळत असेल तर एका सावलीवाल्या कोपर्यात गांडुळखत बनवायला घ्या.
मुलेच आता एकमेव आशा उरलीय. प्रौढांना सेंद्रिय शेतीचे महत्व कळत नाही कारण त्यांना आज केले आणि आजच परिणाम दिसले असे हवेय. मुलांकडे वेळ आहे, ते सेण्द्रिय शेती व त्यातल्या अन्नाची चव पाहु शकतात. काय बरे हे ठरवु शकतात.
तुम्ही पुण्यात असाल तर ऑक्टोबरात थोडी स्ट्रॉबेरी लावा. कलमी पेरु, पपई, चिकु लावा. यांना लगेच फळे लागतात व मुलांचा उत्साह टिकुन राहतो. थोडे गहु, ज्वारी पेरा. नंतर त्याचा हुरडा करुन मुलांना द्या. गच्चीच्या जमिनीवर हे करता येते. माझ्या छतशेतीमध्ये मी माहिती दिलीय.
हे सगळे अगदी कमी पैश्यात होते. स्ट्रॉबेरी छोट्या पिशव्यात
लावा व त्या पिशव्या रॅकवर ठेवा. खराब झालेले पाईप असतील तर ते आडवे कापुन टांगुन त्यात लावता येईल. जसे काम करत जाल तसे सुचत जाईल. मुलांचा सहभाग वाढवा.
@साधना.>> हो पुण्यात च आहे
@साधना.>> हो पुण्यात च आहे आमची शाळा... तुम्ही छान सुचना दिल्यात नक्कीच अमलात आणन्याचा प्रयत्न करेन... Thank you so much..
तुमचे लेख वाचतेय.
फोटो पाहून आणि माहिती वाचून
फोटो पाहून आणि माहिती वाचून मस्त वाटले. फक्त एक शंका आहे. गच्ची आणि एकंदरित इमारत किती भार घेण्यासाठी बांधल्या आहेत हे पाहिलं का? त्यात गच्चीवरील बाग बसते का?
Vajan faar nahi karan
धन्यवाद..
वजन जास्त न नाही कारण कोकोपीट मिक्स करुन सॉइल मिक्स तयार केले आहे...
गच्ची / ईमारत याच्या क्षमतेचा विचार करूनच नियोजन केले आहे.
उत्तम!
उत्तम!
अंदाज येण्यास सहज मनात आलेले
अंदाज येण्यास सहज मनात आलेले एक गणित

ह्यावरुन एक ब्रास माती म्हणजे ४ते५ टन ( ४००० ते ५००० किलो )
गच्चीवर 5000 लीटरच्या 2 टाक्या म्हणजे 10 टन वजन जनरली असते. म्हणजे 2 ब्रास माती ठेवण्यासाठी काही टेंशन नसेल.
वित भर खोलीचा 20 फुट x 15 फुट (पाव गूंठा पेक्षा थोडे जास्त क्षेत्र) मातीचा थर म्हणजे 2 ब्रास होईल साधारण.
साधना .. पाचोळ्याचा प्रयोग मी
साधना .. पाचोळ्याचा प्रयोग मी पण करून पाहीन. ईथे strawberry कशी लावायची याची माहिती सविस्तर द्या ना.
श्रध्दा बाग छान आहे.
मी पण गॅलरी मधे पांढरी निळी गोकर्ण ; तीन रंगाची जास्वंद, तीन गुलाबाची झाडे तुळस थोडी शोभेची झाडे कढीपत्ता असे लावले आहे. पारिजातक अन सोनचाफा कुंडीत मावत नव्हते तर खाली बिल्डिंग मधे जागा आहे तिथे लाऊन आले. कमळ बी आणली आहे .. ती ऊद्या लावेन. अजून एक बिया गोमूत्र मधे आधी भिजवून रूजवल्या तर भराभर रुजतात. मी प्रयोग करून पाहिला आहे
प्राजक्ता, स्ट्रॉबेरीची रोपे
प्राजक्ता, स्ट्रॉबेरीची रोपे विकत मिळतात, ५-१० रु ला एक असे. नर्सरीत कितीला मिळतात माहित नाही ( ५० वगैरे असावा), मी दिलेला भाव महाबळेश्वरचा आहे.
रोप कुंडित लावले तर उंच कुंडी घ्या. ह्याला फुटवे खुप येतात, त्यामुळे रुंदी पण हवी. आपल्याकडे अमेझॉमची राखाडी रंगाची दणकट बॅग येते तिचे पोट आडवे फाडुन चार पाच इंच रुंद भोक केले आणि त्यात रोप लावले आणि बॅग उचलुन रॅक किंवा इतर जागी जी जमिनीपासुन थोडी उंच आहे असे ठेवले तरी चालते. शेणखत + माती असे पॉटींग मिक्स घ्या. कोकोपिट हलके असते पण त्यात स्वतःचे जीवद्रव्य काहीच नसते, उलट ते युरीयात कुजवलेले असल्यामुळे आपल्याला युरिया नको असेल तर तो उगीच अदृश्यपणे गळ्यात पडतो. त्यामुळे मातीच्या जागी कोकोपिट वापरले तरी चालते पण हा मुद्दा लक्षात घेऊन वापरा. कोकोपिट वापरले तर खते द्यावी लागणार. बाजारात मिळतात ती आणुन द्या. गांडूळखत पण चालते. स्ट्रॉबेरीजना पाणी लागायला नको म्हणुन जमिनीपासुन उंच ठेवा आणि रोपाच्या मुळांशी पालापाचोळा पसरुन ठेवा.
कुठलेही बी लावायच्या आधी बीजप्रक्रिया करायला हवीच. बीयांवर असलेली अदृष्य बुरशी नाहीशी होते आणि नंतर रोपावर रोग लवकर येत नाहीत. गोमुत्र बेस्ट पण ते डायल्युट करुन वापरा. फवारायला पण वापरता येते पण डायल्युट करा, नाहीतर अॅसिड फवारल्यासारखे होईल.
फुकट गेलेले पाईप आधार देऊन उभे करुनही त्यात स्ट्रॉबेरी लावता येतील. हा खालचा फोटो पुण्यातल्या छतशेतीतलाच आहे. ह्या पाईपात आदल्या वर्षी त्यानी स्ट्रॉबेरीज लावल्या होत्या.
माती ओली झाली की मुळ
माती ओली झाली की मुळ वजनाच्या दुप्पट तिचे वजन होते असे संबंधीत वर्गांमध्ये ऐकले आहे. लगेच फरक दिसुन येत नसला तरी कालांतराने गच्चीतुन पाणीगळती सुरू होते असा अनुभव आहे. गच्ची किती मजबुत बांधलीय यावर सगळे अवलंबुन आहे. त्यामुळे शक्य तितके मातीविरहित शेती करण्याला प्राधान्य द्यावे हे माझे मत आहे.
कोल्हापुरचे सुधाकर पाटील आहेत त्यांनी घर बांधतानाच मजबुत मोठी गच्ची बांधुन घेतली आणि तिथे शेती सुरू केली. त्यांना ह्याच्यातच प्रयोग करायचे होते, इतरत्र जमिनीवरही प्रयोग सुरू होते. काही वर्षांपुर्वी मी त्यांच्या संपर्कात होते, आता काय करतात माहित नाही.
https://youtu.be/v3JjLVOGTYI?si=WLFsCXI6a7AMAygw
शाळा आहे म्हटल्यावर निर्णयावर
शाळा आहे म्हटल्यावर निर्णयावर मर्यादा येतात. प्राचार्य आणि शैक्षणिक संस्था यांचे मत काय यावर अवलंबून.
मला अगोदर वाटले तुमच्या घराच्या गच्चीवर आहे बाग.
मी स्ट्रॉबेरी चे रोप ऑनलाइन
मी स्ट्रॉबेरी चे रोप ऑनलाइन बोलवले खूप महाग मिळाले आणि अजिबात चांगले नाही आले... जगले तर बरे होईल..
शाळा असल्यामुळे काही मर्यादा नक्कीच आहेत.. पण माझ्या कडेच पूपण इतर सर्वांचा सपोर्ट आहे मला..
काय छान छान माहीती व फोटो
काय छान छान माहीती व फोटो आहेत.
धन्यवाद अni, प्राजक्ता
धन्यवाद अni, प्राजक्ता, सामो
साधना तुमचे लेख खूप छान आणि उपयुक्त आहेत... बऱ्याच टिप्स मिळाल्या अजुन वाचतेय
मी जर कधी घर घेतलं तर
मी जर कधी घर घेतलं तर आजूबाजूला एक निवांत गचपण करेन जेथे पक्षी, कीटक, फुलपाखरांना मुक्त बागडता येइल. इथे राखलेल्या बागा दिसतात तशा गचपण केलेल्या सुद्धा दिसतात. एक ऑरगॅनिकली ग्रोन असा लुक असतो. फार सुंदर दिसतात. जाळीत फुलपाखरं भिरभिरत असतात.
हो डायल्युट करूनच वापरते मी
हो डायल्युट करूनच वापरते मी गोमूत्र. Strawberry ची रोपे कृषी विद्यापीठात मिळतात का ते चौकशी करून बघते
नत्र सेंद्रिय पद्धतीने
नत्र सेंद्रिय पद्धतीने देण्यासाठी मी अझोला कल्चर एका टबात करत असतो.
नवीन रोपासाठी कुंडी तयार करताना खाली शेणखत अझोला वापरून त्याचा खुप छान रिझल्ट मिळालाय.
हे खुप छान आहे.
हे खुप छान आहे.
अni याची माहिती द्या ना..
अni याची माहिती द्या ना..
माझा फेवरेट song
.
जवळच्या kvk मध्ये कल्चर पुरता
जवळच्या kvk मध्ये कल्चर पुरता अझोला मिळेल. Kvk नसेल तर ऑनलाइन पण असतोच पण महाग पडतो. अगदी छोटा चमचा भर पुरेल.
एक 9ते 10 इंच ऊंच पण जास्त पसरट प्लास्टिक टब / पुट्ठयाचा खोका वरुन फाडून आत प्लास्टिक कापड टाकून कल्चर कंटेनर बनवला की खाली थोड़े शेण खत आणि झाकुन जाईल इतपत मातीचा थर टाकला की सावकाश पाणी भरून घ्यायचे. मातीचा थर विसकटु नये म्हणून रद्दी पेपर टाकून पाणी भरायचे आणि भरून झाले की पेपर काढ़ायचा. 2ऱ्या दिवशी थोड़ा अझोला टाकला की आठवड्यात अक्खा टब भरून जातो. उन आवश्यक असते.
उपयोग खुप आहेत. थोडे देतो इकडे-
गुराना खाद्यात मिक्स करून दिल्यावर दूध वाढले
गावठी कोंबड्या आवडीने खातात
मत्स्य पालनात वापरला जातो.
भातशेतीला सर्वात जास्त फायदा होतो. खत + मल्चिंग असा दुहेरी फायदा.
कुंडी मध्ये सुद्धा इतर तण नको वाढ़ायला तर हा असा थर उपयोगी पडतो.
एखादी वॉटर बॉडी N, NH3, NH4 वाढवून प्रदूषण करत असेल तर ते आटोक्यात येते आणि जाड थर अश्या साचलेल्या पाण्यावर राहिल्याने डास आपोआप कंट्रोल होतात. पण त्या डबक्यात इतर काही वनस्पती असतील तर प्रकाश न मिळाल्याने मरून जातील.
---------
कल्चर मेंटेन करायला 2 गोष्टी लक्षात ठेवल्या की पूरे-
आधी फोटोत दिलाय तसा फ्रेश हिरवा कलर म्हणजे हेल्थी कल्चर
आणि पिवळ सर लालसर तपकिरी आक्रसलेले म्हणजे जास्त वाढल्याने उपाशी राहिलेले कल्चर.
नवी माहिती कळाली. छान आहे हे.
नवी माहिती कळाली. छान आहे हे..