समारोप: मायबोली गणेशोत्सव २०२५
नमस्कार मंडळी.
नुकताच आपण गणरायांना निरोप दिला. दहा दिवस धामधुमीत कसे गेले ते कळले देखील नाही. दरवर्षी गणेशोत्सवाइतकीच वाट आपण "मायबोली गणेशोत्सव उपक्रम आणि स्पर्धा" ह्यांची पाहत असतो. ह्या दिवसात घरातल्याइतकीच लगबग आणि उत्सवी वातावरण मायबोलीवर असते.
२०२५ च्या मायबोली गणेशोत्सवाची घोषणा झाली आणि लगेचच संयोजक समिती स्थापन झाली.संयोजक मंडळाच्या मिटिंगा झाल्या, विचार मंथन झाले, मेसेज-कॉल्स झाले, व्हॉट्स ॲप ग्रुप बनला, एक्सेल बनवली गेली. स्पर्धा आणि उपक्रमांची यादी सुद्धा तयार झाली.
गणपतीत ज्यांच्या घरी गौरी गणपती असतात त्यांना तसेच, इतरांनाही वेळ मिळत नसल्याने यावर्षी गेल्यावर्षीसारखे धागे लवकर काढायचे ठरवले. त्यासाठी पाककृती स्पर्धा व काही उपक्रमांचे धागे लवकर प्रकाशित करण्यात आले.
नेहमीच्या उपक्रमामध्ये मायबोली गणेश प्रतिष्ठापनेसाठी गणेश मूर्ती, सजावट याचबरोबर आपल्या मायबोलीवरील किल्ली यांनी त्यांच्या आवाजात सुश्राव्य गणपती स्तोत्र म्हटले. यासाठी किल्लीचे विशेष आभार. सर्वांनी "घरचा बाप्पा" व "बाप्पाचा नैवेद्य" या सदरासाठी आपापल्या घरातील उत्सव मूर्तींचे, गौरीचे, सजावटीचे फोटो व चविष्ट नैवेद्यांचे फोटो देऊन या धाग्यावर अगदी उत्साही वातावरण आणले.
शशक व प्रकाश चित्रांचा झब्बू यासाठी गेल्या पंचवीस वर्षात अनेक विषय आधीच येऊन गेल्यामुळे यात नाविन्य कसे आणावे हा एक मोठा यक्षप्रश्न नेहमी असतो. शशक वाक्य पूर्ण कथेत कुठेही वापरा असा बदल यावर्षी केला. त्याला भरघोस प्रतिसाद देखील मिळाला. यावर्षी "एक क्षण अभिमानाचा" या लेखन उपक्रमादरम्यान मायबोलीकरांनी आपल्या आणि आपल्या स्वकीयांच्या आयुष्यातील अभिमानाचे क्षण सर्वांसोबत वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद. त्याबरोबरच, "मला भेटलेला देवमाणूस" आणि "माझी संस्मरणीय भटकंती" या लेखन उपक्रमांना देखील उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त मंडळ आपले आभारी आहे. आपल्या छोट्या दोस्तांनीही तर नेहमीप्रमाणेच फार सुंदर चित्रे रंगविली आणि माबो गणेशोत्सवाची शोभा वाढवली. मोठ्यांच्या मायबोलीत छोट्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समस्त मायबोली तर्फे त्यांचे खूप खूप कौतुक.
परंतु गेल्या काही वर्षापासून छोट्या दोस्तांचा सहभाग हा लक्षणीय घटला आहे असे नमूद करावेसे वाटते. याबद्दल आपली काही मते असल्यास, सूचना असल्यास त्या जाणून घ्यायला नक्की आवडतील. त्यानुसार योग्य ते बदल नक्कीच केले जातील.
पाककृती स्पर्धेला सुद्धा यावर्षी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद दिलात. "चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ" आणि "फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ" या स्पर्धेत एकेक नावीन्यपूर्ण आणि चटपटीत पाककृती आल्या आहेत. यावर्षीच्या "पदार्थ आमचा सजावट तुमची" या हटके पाककृती स्पर्धेसाठी अप्रतिम आणि अगदी मिशेलिन स्टार रेस्टॉरेंट मध्ये पण वाढता येतील या दर्जाच्या पाककृतींच्या प्रवेशिका आल्या. वरण भात आणि शिरा या मराठमोळ्या पदार्थांना इथल्या बल्लवाचार्यांनी आणि सुगरणींनी अगदी कुठल्या कुठे नेऊन ठेवले. मायबोली गणेशोत्सवातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्सवामुळे अनेक रोमात असलेले मायबोलीकर इथे अँक्टिव्ह झाले. त्यांनी सर्व उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.
"सवाल जबाब" हा नवीन गंमत खेळ सगळ्या मायबोलीकरांनी छान खेळला. नवनवीन स्वरचित भन्नाट कोडी आणि त्यांची उकल करताना सगळ्यांना धमाल आली.
गेल्यावर्षीचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला गंमत खेळ म्हणजे "मायबोली व मायबोलीकरांवर मीम्स" ज्याला उदंड, भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तेच लक्षात ठेवून त्याची वर्जन 2.0 या वर्षी गंमत खेळ म्हणून ठेवली. त्या धाग्यावरील तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद पाहून आमचा निर्णय योग्य होता असे वाटले. किंबहुना आता हा गंमतखेळ दरवर्षी "by default" असणार यावर शिक्कामोर्तब झाले. एकापेक्षा एक विनोदी मीम्सने सर्वांना खळखळून हसवले. सभासदांच्या मायबोलीवरील वावरावरील अनेक मीम्स, त्या सर्वांनी खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. तसेच या समस्त उपक्रमांच्या, मतदानाच्या धाग्यांसाठी आणि लागेल तिथे योग्य ती तांत्रिक मदत केल्याबद्दल वेमा आणि ॲडमिन यांचे देखील आभार.
सर्व मायबोलीकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात इथले वातावरण सतत उत्साही, उत्सवी, आनंदी, खेळकर ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तुम्हा समस्त मायबोलीकरांमुळे या उत्सवाला शोभा आहे. तुमच्या सहभागामुळेच हा उत्सव एवढा सुरेख होऊ शकला.
यावर्षीचा गणेशोत्सव तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे आम्हा संयोजक मंडळाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या ही नक्की कळवा.
यावर्षीच्या गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम तुम्हाला येथे https://www.maayboli.com/node/87139 पहायला मिळतील.
शशक व पाककृती स्पर्धांचे निकाल येथे https://www.maayboli.com/node/87244 पहायला मिळतील.
सर्व सहभागकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
चला तर मग यावर्षी आम्ही निरोप घेतो. पुढच्या वर्षी परत भेटू या.
आपला लोभ असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत रहावा ही सदिच्छा.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया !!!!
कळावे,
मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०२५
अतरंगी, किल्ली, ऋतुराज, धनि, अभ्या, वामन राव
 
मायबोली गणेश उत्सव धमाल झाला.
मायबोली गणेश उत्सव धमाल झाला. ऐन उत्सवकाळात वैयक्तिक कटकटींनी बेजार केले म्हणून प्रतिसाद फार कमी/उशीरा दिले.
पाककृती विषयीच्या सर्वच प्रवेशिका एकापेक्षा एक सरस होत्या. Non glamorous वरणभात आणि शिरा सजावटीची स्पर्धा विशेष.
फार फरक पडत नसला सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका निनावी असल्यास कंटेंटकडे जास्त आणी स्पर्धकाकडे कमी लक्ष देऊन मतदान होईल असे वाटले. पण नो बिग डील. तसेही मी मत दिलेला स्पर्धक प्रथम आल्याचा एकमेव अपवाद आहे यावर्षी
 
संयोजकांची कल्पकता आणि उपक्रमातली मेहनत दिसून येतेच आहे. No wonder सर्वच उपक्रमांना भरपूर प्रतिसाद लाभला. आपापले रोजचे व्याप आणि time zones सांभाळून तुम्ही केलेल्या उत्तम संयोजनाचे खूप कौतुक.
संयोजकांनी शिरा वरणभात एकदम
संयोजकांनी शिरा वरणभात एकदम प्रो लेव्हलला नेऊन ठेवलाय त्याबद्दल विशेष कौतुक.
स्पर्धांच्या प्रवेशिका निनावी असल्यास कंटेंटकडे जास्त आणी स्पर्धकाकडे कमी लक्ष देऊन मतदान होईल +1
त्याचसोबत निकाल डायरेक्ट शेवटच्या दिवशी दाखवले तरी बराच सस्पेन्स राहिल आणि पोल पाहुन मतदान होणार नाही. तसेही हा सर्व खेळीमेळी चा भाग आहे त्यामुळे जे संयोजकांनी ठरवले असेल ते आणि जे त्याना ऑपरेट करायला सोपे असेल ते मॉडेल वापरण्याचे योग्य ठरेल.
------
छोट्या दोस्तांचा सहभाग हा लक्षणीय घटला आहे ::::→ ह्यासाठी मुद्दाम वेगळ्या चित्रकला वगैरे स्पर्धा न करता त्याना त्यांच्या नेहमीच्या खेळण्याच्या वस्तुपासुन एखादे मॉडेल ( स्पर्धा विषयानुसार) बनवायला दिले तर चालेल का ? चित्रकला हा विषय सर्वांच्या समान आवडीचा नसु शकतो पण खेल खेल में कुछ बात बन सकती है।
संयोजक आभार
संयोजक आभार
अजून दहा ठिकाणी मानले आहेत. पुन्हा तेच लिहीत नाही.
पण मजा आली.
मीम उपक्रम हिट होता. अजून काही वर्षे नक्कीच राहील.
पाककृतीत सजावट स्पर्धेने मजा आणली.
लिखाणात उपक्रम छान होते.
शशकमध्ये फार काही नावीन्य नव्हते.
झब्बू सुद्धा यंदा दिसले नाहीत. पहिले दोन तीन विषय फार प्रतिसाद आले नाहीत तसे पुढे नवीन विषय आलेच नाहीत.
बालगोपालांचा सहभाग लक्षणीय घटला. कदाचित मायबोलीकरांचे सरासरी वय वाढत आहे तसे त्यांच्या मुलांचे सुद्धा वाढत आहेत त्यामुळे मुळातच बालगोपाळांचा टक्का कमी झाला असावा. किंवा मग आपण या पिढीला आवडावे असे विषय पुरवू शकत नाहीये. यावर विचार व्हावा.
निनावी एन्ट्री वगैरे ठेवून स्पर्धांची आणि प्रतिसादाची मजा नका घालवू हे माझे मत.
पुढच्यावेळी संयोजकांची पूर्णपणे नवीन टीम बघायला आवडेल जे पूर्णपणे नवीन आणि चमत्कारिक संकल्पना घेऊन येतील. पुढच्यावेळी मला मायबोलीवर एक तप होत असल्याने तो गणेशोत्सव स्पेशल राहील
संयोजक मंडळाचे अभिनंदन व आभार
संयोजक मंडळाचे अभिनंदन व आभार!
स्पर्धांच्या प्रवेशिका निनावी
स्पर्धांच्या प्रवेशिका निनावी असल्यास कंटेंटकडे जास्त आणी स्पर्धकाकडे कमी लक्ष देऊन मतदान होईल >> +1. फक्त तो संयोजक मंडळासाठी खूप मोठा व्याप होईल याची कल्पना आहे. इथल्या टेक तज्ज्ञांनी काहीतरी आयडिया काढावी पुढच्या वेळी.
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन !
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन !
मतदान आणि निकालाच्या धाग्यावर
मतदान आणि निकालाच्या धाग्यावर संयोजक मंडळाचे आभार मानले आहेत. या धाग्यावर कौतुक करायची संधी मिळाली आहे तर त्यासाठी दोन शब्द.
आपले नेहमीचे व्याप सांभाळून कोणत्याही सार्वजनिक उपक्रमासाठी वेळ देणे, त्यातही वेगवेगळ्या गावात, देशात बसून हे किती अवघड असेल याची कल्पनाच करवत नाही. आमच्या इथे दोन गल्ली पलिकडे म्हणजे " इतक्या लांब?" असं म्हणतात.
एव्हढ्या सगळ्या निरनिराळ्या आवडीच्या लोकांना एकत्र आणतील अस उपक्रम सुचणे, त्याची अंमलबजावणी करणे है कौतुकास्पद आहे. जग फक्त मेट्रो उन्दीनो आवडलेले आणि न आवडलेले यातच विभागलेले आहे या अफवेवर विश्वास न ठेवता राजाबाबू ते पथेर पंचोली ते माय फ्रेंड गणेशा अशा सर्व प्रकारच्या रसिकांना सामावून घेतले यासाठी एजोटाझापा.
या उपक्रमात पहिल्यांदाच भाग घेतलेल्यांचे आभाळभर कौतुक.
ज्यांनी जास्तीत जास्त प्रवेशिकांवर प्रतिसाद दिलेत अशा सर्वांचे कौतुक.
नियमितपणे नवीन सदस्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मोठ्या मनाच्या सदस्यांचे शाल / शालू देऊन कौतुक.
अजून काही शिल्लक असतील त्यांचे सुद्धा कौतुकच.
अशा सर्वांमुळे उपक्रम यशस्वी होतात.
अजून कोण राहिले?
प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानणाऱ्यांचे देखील कौतुक आणि "It is part of one's role to recognize good work." असा विचार करणाऱ्यांचे देखील चितळेंची बाकरवडी देऊन कौतुक!
आणि अर्थातच महत्त्वाचे
 
समारोपाची घोषणा झाल्या झाल्या चालू घडामोडी आणि राजकारणाचे धागे वर काढणाऱ्यांचे सुद्धा कौतुक.
लास्ट बट नॉट लीस्ट
 
तेव्हढा पेशन्स न राहिलेल्यांचे तर शिडी वर चढून कौतुक!
तारीख : आजची
स्थळ : अर्थातच ते विशिष्ट
नेहमीप्रमाणे इतके व्यापताप
नेहमीप्रमाणे इतके व्यापताप सांभाळून सर्व उपक्रम इतके गंमतीदार करणाऱ्या संयोजक मंडळास हॅट काढून सलाम.
मला सोसायटीच्या गणपतीत आली नाही इतकी धमाल इथल्या गणेशोत्सवाला येते.(रोमात असले तरी लक्ष इथेच आहे!!!)
सर्व संयोजकांचे (अतरंगी,
सर्व संयोजकांचे (अतरंगी, किल्ली, ऋतुराज, धनि, अभ्या, वामन राव) आभार आणि - स्वत:चे व्याप सांभाळून ही धुरा यशस्वीपणे उचलल्या बद्दल!
शशक लिहायला / वाचायला दोन्ही मजा देणारे असते. अशा उपक्रमा दरम्यान ती मजा मुबलक लुटता येते.
देवमाणूस हा चांगला उपक्रम होता.. खूप जास्त लेख जरी नाही आले.
अभिमानाचा क्षण - लिहिलं नसेल तरी (प्रत्येकाला(? )) उपक्रम वाचल्यावर आपल्या आयुष्यातील असे काही ( मोजके (?)) क्षण आठवण्याचे ( आणि कॉलर ताठ वाटण्याचे ) सुख दिलेत त्याकरता धन्यवाद
सगळ्यात महत्वाचं आणि थोड वैयक्तिक म्हणजे भटकंती --
Insta / reels चा हा काळ आहे. तेव्हा कोणी वाचत नाही/ कोण वाचतय ह्या कारणास्तव काही छान अनुभवलेल्या भटकंतीविषयी लिहिले नव्हते.
ह्या उपक्रमा निमित्ताने लिहिताना परत नव्याने जाणवले, रीळ लेखाची जागा घेऊ शकतात का?? पूर्वी एक रुखरुख राहून गेली होती .. ती म्हणजे फोटोंमागे काही आठवणी/ गोष्टी असतात, ज्या एक दुसऱ्यांना कनेक्ट करायचा धागा बनतात. जे फक्त फोटो/ रीळ मधून साध्य होत नाही.
ह्या उपक्रमा निमित्ताने त्यावर ( माझे/ माझ्यापुरते तरी) शिक्कामोर्तब झाले म्हणून विशेष धन्यवाद!
बालगोपालांचा सहभाग लक्षणीय
बालगोपालांचा सहभाग लक्षणीय घटला. कदाचित मायबोलीकरांचे सरासरी वय वाढत आहे तसे त्यांच्या मुलांचे सुद्धा वाढत आहेत त्यामुळे मुळातच बालगोपाळांचा टक्का कमी झाला असावा.>>> माझ्याही डोक्यात तेच आलं होतं.
सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका
सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका निनावी असल्यास कंटेंटकडे जास्त आणी स्पर्धकाकडे कमी लक्ष देऊन मतदान होईल असे वाटले>>>
उपक्रमच ठेवावेत स्पर्धा नको असे माझे गेल्या वर्षीही मत होते. यंदाही बदललेले नाही. असो!
सर्व संयोजकांचे (अतरंगी,
सर्व संयोजकांचे (अतरंगी, किल्ली, ऋतुराज, धनि, अभ्या, वामन राव) आभार, कौतुक आणि अभिनंदन !
सुंदर झाला उत्सव.
सुंदर झाला उत्सव.
सर्व संयोजकांचे खूप कौतुक.
उपक्रम.कल्पक होते.
स्पर्धा छान होत्या.
सर्व संयोजकांचे आभार, कौतुक
सर्व संयोजकांचे आभार, कौतुक आणि अभिनंदन !
यंदा पाकृ स्पर्धा फारच मस्त होत्या. शशक लिहायला मजा आली.
मुलांचे उपक्रम थोडे कल्पक असयला हवे होते, तर जास्त एंट्रीज आल्या असत्या.
स्पर्धा असेल तर जास्त उत्साहाने भाग घेतला जातो असे माझे मत, स्पर्धा हवीच त्यात मजा आहे.
रच्याकने आम्ही प्रशस्तीपत्र उर्फ सर्फितिकेट ची वाट बघत आहोत...
कार्यक्रम छानच झाला. मजा आली
कार्यक्रम छानच झाला. मजा आली मीम्स बघताना, शशक वाचताना, पाकृ करुन बघताना (स्वत:च्या आणि इतरांच्याही) , पाकृ सजावट स्पर्धा पण आवडली. देवमाणूस, अभिमान क्षण हे लेखन उपक्रमही छान होते.
संयोजकांचे मनापासून आभार.
खूप मस्त झाला गणेशोत्सव. यंदा
खूप मस्त झाला गणेशोत्सव. यंदा काही वैयक्तिक कारणांमुळे फार भाग घेता आला नाही. पण संयोजनातील उत्साह आणि उपक्रमांची रेलचेल जाणवत होतीच.
सर्व संयोजकांचे खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन
संयोजकांचे (अतरंगी, किल्ली, ऋतुराज, धनि, अभ्या, वामन राव) कौतुक आणि अभिनंदन !
मायबोलीच्या एकूण सदस्य
मायबोलीच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा खुपच नगण्य प्रमाणात मतदान होते. पाकृ स्पर्धाना फक्त 100 ते 150 मत नोंदणी आणि शशक साठी तर 100 हुन खुप कमी
 रोमातल्या मायबोलीकराना gst लागू करण्याची वेळ जवळ आलीय.
अni, मी पण हाच विचार करत होते
अni, मी पण हाच विचार करत होते. पण माबोवर नियमित लिहिणाऱ्यांची संख्या ही साधारण तेवढीच असेल, एकूण सभासद जरी लाखाच्या पुढे असले तरी. तेवढेच जण मायबोलीला चालती/जागती ठेवतायत. असो.
>>>>>>स्पर्धांच्या प्रवेशिका
>>>>>>स्पर्धांच्या प्रवेशिका निनावी असल्यास कंटेंटकडे जास्त आणी स्पर्धकाकडे कमी लक्ष देऊन मतदान होईल
जमवा हे कसेतरी. उत्तम आयडिया आहे. नाहीतर स्पर्धकाच्या प्रभावळीनेच बरेच जण दिपून जातात.
--------------------
>>>>>>अनेक विषय आधीच येऊन गेल्यामुळे यात नाविन्य कसे आणावे हा एक मोठा यक्षप्रश्न नेहमी असतो.
तेच तेच द्या की. आमच्याकडेही नवी नवी फॅशन ज्वेलरी येते. ती कुठे मिरवायची?
आपल्या व्यक्तिगत धावपळीतू वेळ
आपल्या व्यक्तिगत धकाधकीतून वेळ काढून उत्सवाच्या संयोजनाचं उत्तरदायित्व स्वीकारल्याबद्दल आणि ते उत्तमरीत्त्या पार पाडल्याबद्दल सर्व संयोजकांचं कौतुक आणि आभार!
दहा दिवस मांडव नांदताजागता राहिला, मजा आली.
मात्र यंदा उत्सवादरम्यान संयोजकांचा इतर सभासदांशी आतापावेतो असे तसा सुसंवाद नव्हता हे निरीक्षण नमूद करायला हवं.
मायबोलीसारख्या संस्थळावर - जिथे जगभरातले विविध पार्श्वभूमीतून आलेले लोक उपस्थिती लावतात, तिथे मतमतांतरं असणार हे गृहित आहे.
एकदा संयोजकांचा झगा चढवला की व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवता यायला हवेत, शंकाप्रश्नांना वेळच्या वेळी उत्तरं दिली जायला हवीत.
यंदा उदाहरणार्थ ममोंसारख्या सालस सभासदाचाही उपक्रमाचे धागे खुले होण्याच्या वेळेबद्दलचा प्रश्न दुर्लक्षिला गेला. 'सॉरी हं, लक्षात आलं नाही - बरं झालं तुम्ही सांगितलंत' हे म्हणणं इतकं अवघड असतं का?
विरोधी मत मांडणार्या, अवघड प्रश्न विचारणार्या आयडीला उत्तर देण्याऐवजी खिडकीतून बाहेर फेकून देण्याचं, तो आयडी उंच इमारतीतून खाली पडत असल्याचं - अशी चित्रं असलेला मीम संयोजक मंडळातील एका सदस्याने वैयक्तिक सभासदनामाने टाकला.
याने उत्सवाला कमीपणा येतो. अशा बाबी यापुढे टाळता यायला हव्यात.
उत्सव संपला, झगे उतरवले की खुशाल पुन्हा हेवेदावे सुरू करावेत.
वरच्या ऋन्मेशच्या
वरच्या ऋन्मेशच्या प्रतिक्रियेशी पूर्णपणे सहमत. शशक मला यंदा बोर झाल्या, ज्या वाचल्या त्यात नाविन्य फार कमी सापडलं, मग सोडून दिलं वाचणं. प्रतिक्रिया वाढल्या की फोमो येऊन मग काही वाचल्या
 . त्याच्यास संदर्भाने पुढचा मुद्दा.
निनावी एंट्री.
धागे आले की त्यातील कंटेंट इतकाच मला त्यावरील चर्चेत रस असतो. कोण जिंकतंय, कोण हरतंय मी बघतही नाही. यंदा मत द्यायची तसदी ही घेतली नाही. एरवी कधी देतो कधी नाही. मी एंट्री दिली तरीही मत देतोच असं नाही.
आता निनावी एंट्रीवर जर चर्चाच होणार नसेल तर मी धागे कितपत वाचेन ही सुद्धा शंकाच आहे. उगा ५० वरणभातांच्या सजावटी बघण्यात मला शून्य रस आहे. पण त्यावर प्रतिक्रिया देण्यात, कोणी काय केलं आहे हे बघण्यात, इतरांच्या प्रतिक्रिया वाचण्यात, हसण्या खिदळण्यात, टोलवाटोलवी करण्यात प्रचंड रस आहे. मायबोली माझ्यासाठी कंटेंट साईट आहेच पण त्याच बरोबर जवळचा परिवार, ह्युमन कनेक्शन हे फार जास्त,महत्त्वाचे आहे - अॅट द कॉस्ट ऑफ फेअरनेस सुद्धा ( हे लिहुन झाल्यावर इंग्रजीचे भाषांतर आहे हे लक्षात आले, जाऊद्या! ). नुसता कंटेट आणि नि:पक्षपाती मतदानापेक्षा पक्षपात विथ ह्युमन टच माझ्यासाठी कधीही वरचढ ठरेल.
पण म्हणून सगळे उपक्रम करावे असं ही अजिबात वाटत नाही. स्पर्धा तर हव्यातच. थोडक्यात जे आहे ते उत्तम आहे असंच वाटतं.
माबो मीम्सला मजा येते, पुढच्या वर्षी काही वेगळेपणा त्यातही आणावा. तोचतोचपणा फार होतो असं लवकरच वाटू लागेल.
माबोकरांची वयं वाढली + मुलांकडून काही करुन घेणे फार खर्चिक (आर्थिक न्हवे) आहे इ. कारणे असतील. फार मनावर घेऊ नये. मुलं माबो सभासद नाहीत. +आपल्या वयाच्या व्यक्तींच्या अक्कलेने मुलं एंगेज होतील असं काही करता येण्याची अपेक्षा फारच जास्त आहे.
बाकी उत्सव छान पार पाडला. अभिनंदन आणि आभार.
>>>>>>जवळचा परिवार, ह्युमन
>>>>>>जवळचा परिवार, ह्युमन कनेक्शन हे फार जास्त,महत्त्वाचे आहे - अॅट द कॉस्ट ऑफ फेअरनेस सुद्धा
 आवडले.  आहे ते असे आहे 
 खूपच आवडले. वेगळाच मुद्दा आहे हा.
>>विरोधी मत मांडणार्या, अवघड
>>विरोधी मत मांडणार्या, अवघड प्रश्न विचारणार्या आयडीला उत्तर देण्याऐवजी खिडकीतून बाहेर फेकून देण्याचं, तो आयडी उंच इमारतीतून खाली पडत असल्याचं - अशी चित्रं असलेला मीम संयोजक मंडळातील एका सदस्याने वैयक्तिक सभासदनामाने टाकला. >> हो! ते मीम बघुन तेव्हा माझं डोस्कंच फिरलेलं. असं कसं कोणी करेल म्हणून तिकडे लिहिलं. ते मर्यादा ओलांडणारे मीम काढलं असतं तर माझा रिप्लाय ही काढणार होतो. पण तसं काही झालं नाही. असं का केलं असेल, विचार करुन वैषम्य वाटलं.
आता मला सगळ्याचंच हसायला येतं.
सर्व संयोजकांच खरच खूप कौतुक
सर्व संयोजकांच खरच खूप कौतुक वाटतं. आपला इतका पर्सनल वेळ द्यायचा आणि नवनवीन कल्पना तयार करायच्या. खूप खूप धन्यवाद, अतरंगी, किल्ली, ऋतुराज, धनि, अभ्या, वामन राव.
>>> आता मला सगळ्याचंच हसायला
>>> आता मला सगळ्याचंच हसायला येतं
हो, त्या ढकलून मरण चिंतलेल्या आयडीचं आयुष्य उलट वाढलंच असेल अशी माझी तर अंधश्रद्धाच आहे!
बाकी उत्सव छान पार पाडला.
बाकी उत्सव छान पार पाडला. अभिनंदन आणि आभार. >> अमितने आधी झाप झाप झापून शेवटी सशे गुरुजींना दंडवत लिहिलाय असं वाटलं.
:दिवे:
अरे झापलेलं नाही रे! स्प आणि
आपल्याला अशी पारावरची बडबड करण्यात रस. हेन्स प्रूव्ड. अक्षरास हासू नये.
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार.
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार.
यंदा फार धागे वाचता आले नाहीत. शशक तश्याही बोअर होतात, स्पर्धेतल्याही वाचल्या जात नाहीत. पाकृ स्पर्धेतल्या काही रेसिपी वाचल्या. छान होत्या.
Pages