गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स २.०

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:02

नमस्कार मंडळी,

कसे आहात?

तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.

आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.

पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.

तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.

जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.

आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>Submitted by vijaykulkarni on 5 September, 2025 - 09:30<<
फक्त गणेशोत्सवात नाहि, इतर वेळेलाहि भोकांड पसरणारे आहेत निळे झब्बेवाले... Lol

हो बरेच मायबोलीकर गणेशोत्सवात येतात मज्जा (गोंधळ) घालायला. Wink
आम्हाला काय नाय, आम्ही मज्जा घेतो. तेव्हा या याच…

—-
सगळे मीम्स धमाल..

हे जुआ म्हणजे अतीच करतात. आम्ही धागे काढतो तर ह्यांच्या पोटात का दुखतंय? खरच प्रभू ह्यांच्या पोटावर बाण मारा.

सगळेच मीम्स Lol
पेट पे बाण आणि गाली खा भारीच. Lol

fail-drunk.gif
गणेशोत्सवातील पाकृ स्पर्धेतील भरपूर प्रतिसादांच्या रेसिपी मोठ्या आत्मविश्वासाने घरी ट्राय करताना माझ्यासारखे काही मायबोलीकर

Ani
Lol

Pages