पाककृती स्पर्धा क्रमांक १ - वरणभात सजावट - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 4 September, 2025 - 13:55

वरणभाताला ग्लॅमर देण्याचा हा उपक्रम आवडलेला होता. पण घरच्या, दारच्या उत्सवात बिझी झाल्यामुळे वेळच होईना. तरीही आता हा लास्ट मिनिट प्रयत्न :
कृती : भात, वरण शिजवले, मग भाज्या कापल्या.
IMG_4979.jpg
एशियन पदार्थांसाठी वापरतात तो राइस पेपर वापरून भात आणि कापलेल्या सॅलड ची रचना केली, त्याचा रोल केला , तसाच प्रेझेन्ट करण्याचा विचार होता पण तो रोल जरा जाडा जुडा झाल्यामुळे छान दिसेना! मग अर्धा कापून फुलासदृश आकार दिला झालं Happy सोबत वरणाचा फराटा. (तो पण जरा अजून बेटर होऊ शकला असता! आय नो! ) आणि लोणचं. चॉपस्टिक्स नव्हत्या पण उगीच क्राफ्ट च्या काड्या वापरून तसा इफेक्ट दिला आहे.
तर हा फायनल प्रॉडक्ट. गोड मानून घ्या.
varanbhat.jpg

Group content visibility: 
Use group defaults

एकदम मस्त!
वरणाचा फराटा आणि वर पानं इफेक्ट भलता जमला आहे.
हे बघुन सुशी हँडरोल मध्ये वरण भात टाकून एक दाखवता आला असता Lol

आर्टिस्टिक!
खरेच वरणभाताला ग्लॅमर आले आहे..
यापुढे घरचा कसा गळ्याखाली उतरणार हे जरा अवघडच आहे..

भातफूल नि वरणफळ दोन्ही सुंदर.
यापुढे घरचा कसा गळ्याखाली उतरणार हे जरा अवघडच आहे..>> खरंय. आता घरी वरणभात जेवताना खाण्याऐवजी डेकोरेशन कल्पना घोळू लागतील.

धन्यवाद सर्वांना!
धनवन्ती , हाहा. माउई भटजीबुवाच आहे घरचा. नो डेकोरेशन नीडेड! सणावारी दोन तीन घास छान गरम वरणभात तूप असं कालवून दिलं की भयंकर खुषीत लपालपा खातो आणि मग सुस्त झोपतो.

Pages