पाककृती स्पर्धा क्रमांक १ - वरणभात सजावट - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 4 September, 2025 - 13:55

वरणभाताला ग्लॅमर देण्याचा हा उपक्रम आवडलेला होता. पण घरच्या, दारच्या उत्सवात बिझी झाल्यामुळे वेळच होईना. तरीही आता हा लास्ट मिनिट प्रयत्न :
कृती : भात, वरण शिजवले, मग भाज्या कापल्या.
IMG_4979.jpg
एशियन पदार्थांसाठी वापरतात तो राइस पेपर वापरून भात आणि कापलेल्या सॅलड ची रचना केली, त्याचा रोल केला , तसाच प्रेझेन्ट करण्याचा विचार होता पण तो रोल जरा जाडा जुडा झाल्यामुळे छान दिसेना! मग अर्धा कापून फुलासदृश आकार दिला झालं Happy सोबत वरणाचा फराटा. (तो पण जरा अजून बेटर होऊ शकला असता! आय नो! ) आणि लोणचं. चॉपस्टिक्स नव्हत्या पण उगीच क्राफ्ट च्या काड्या वापरून तसा इफेक्ट दिला आहे.
तर हा फायनल प्रॉडक्ट. गोड मानून घ्या.
varanbhat.jpg

Group content visibility: 
Use group defaults

भारी क्रिएटीव्ह!
वरणाच्या फराट्याला केळ्याचा आकार चुकून आलाय का? मला तसंच दिसतंय Proud

कमाल आहे !

साधा वरण-भात किती विविध प्रकारे सादर करता येतो.

सगळ्यांच्या सर्जनशीलतेचा हेवा आणि कौतुक वाटते.

Pages