Submitted by देवीका on 27 August, 2025 - 03:56
सकाळपासून खोलीत तिच्या येरझारा चालूच होत्या. फक्त काहिच तास झाले होते. पण तिची तगमग थांबतच न्हवती.
घेतलेला निर्णय तसा कठिणच होता.
बाहेरुन खिदळण्याचा आवाज येतच होता. तिने परत एकदा 'त्या' जागेकडे कटाक्ष टाकून सुस्कारा सोडला.
तिच्या मनात प्रश्ण घुमु लागले, कोणाला कळले तर? पण त्याच मनाने तिला परत समजावले, अगं वेडे कसं कोणी राहु शकतं अश्या दिवसात?
जस जशी रात्रं चढु लागली, तसे तिचे डोकं भणभणायला लागले. आता अजिबातच रहावत न्हवते.
आपसुकच तिची पाउलं 'तिथे' वळली. अंधारातच चाचपडत ती गाठोडे शोधु लागली.
इतक्यातच मागून स्पर्श झाला आणि आवाज आला, हेच शोधतेस ना?
गर्र्कन वळली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला समजली नाही.
मला समजली नाही.
पण प्रतिसाद नोंदवून ठेवतो.
बाई दवे,
शशक स्पर्धा जाहीर झाल्याझाल्या इतक्या पटकन पाहिली एन्ट्री येणे हे भारी आहे
देवीका कळली नाही. तुम्हालाच
देवीका कळली नाही. तुम्हालाच संत्रे सोलावे लागेल. पण इतक्यात नको. माबोकरांना वाचू द्यात.
मला पण कळली नाही. मबूदो.
मला पण कळली नाही. माबूदो.
अर्थ काढायचेच ठरवले तर अनेक अर्थ येत होते.
मला एकदा वाटले की ती
मला एकदा वाटले की ती लग्नाच्या मांडवातून पळून जाणार आहे का?
मला समजली नाही.
मला समजली नाही.
पण प्रतिसाद नोंदवून ठेवतो. >> +१
मला समजली नाही.
मला समजली नाही.
पण प्रतिसाद नोंदवून ठेवतो. >> +१........ +१.
Submitted by देवकी >> आणि मी
Submitted by देवकी >> आणि मी विस्मयचकित नजरेने त्या प्रतिसादाकडे बघितलं. वरती स्क्रोल केल्यावर लक्षात आलं की धागालेखिकेचे नाव देवीका आहे, देवकी नाही.
अनेक अर्थ लागताहेत व्हेम्पायर
अनेक अर्थ लागताहेत व्हेम्पायर ,चोर .गर्रकन वळली म्हणजे नागीण पण मग नागिणीला पाऊलं कशी????इच्छाधारी नागीण
जाऊदे देविका तुम्हीच शेवटी संत्र सोला.
पण सगळा सस्पेन्स "अगं वेडे कसं कोणी राहु शकतं अश्या दिवसात?"या वाक्यात आहे असं वाटतंय.
>>>> अगं वेडे कसं कोणी राहु
>>>> अगं वेडे कसं कोणी राहु शकतं अश्या दिवसात?"या वाक्यात आहे असं वाटतंय<<<< +१
मला तर ह्याचे बरेच विचित्र( चावट) अर्थ लागताहेत.
ह्यावरून एक आयडिया सुचली.
संयोजक, तुम्ही अशी मजेशीर वाक्य पुढील शशक साठी द्या. धमाल होइल.
काय म्हणता लोक हो?
१) बाई! काय प्रकार?
२) सहन होत नाही आणि सांगता येत नाही
३) बस्स! आता पुरे हां
हपा
हपा
आणि सेम पिंच..
झंपी मस्त आयडिया.. आणि वाक्ये
झंपी लोल
झंपी लोल
मला कळली मला कळली.
मला कळली
मला कळली.
खिदळण्याचे आवाज - बाहेर लहान
खिदळण्याचे आवाज - बाहेर लहान मुल आहे. काही लहान मुलाशी संबंधित आहे. मे नॉट बी. खिदळू कोणी ही शकतं. हे रेड हेरिंग आहे बहुतेक.
काही तास, ती जागा - काही तासांपूर्वी त्या जागेवर तिने काही तरी केलं आहे.
कठिण निर्णय, कुणाला कळले तर - काही तरी जगरहाटीच्या विपरीत केलं आहे.
पण कोण राहू शकतं - जगरहाटी विपरीत असलं तरी निसर्ग नियमांना/ आवेगाला धरुनच आहे.
सकाळ पासून आणि आता रात्र - ती दिवसभर त्या बहुतेक बंदिस्त जागी (कारण बाहेरुन आवाज येत आहेत) एकांतात आहे असं तिला वाटते आहे. मागूस स्पर्ष झाला तेव्हा तिच्या विमनस्क नजरेने तिला त्या ठिकाणी तो आहे याची जाणिव झाली.
रात्र, भणभणणारे डोके, न रहावणे - केलेल्या कृतीत काही तरी अजुन राहिलेलं आहे, अजुन काही +१ केलं तर थोडा आराम पडणार आहे. मानसिक/ शारीरिक.
आता या टेम्प्लेट मध्ये काय बसेल?
तिने गर्भ पाडला आहे.
कुणाचा मुडदा पाडला आहे.
ती होमो सॅपियन नसून कुत्री/ मांजर वगैरे आहे.
कोण राहू शकतं अशा दिवसांत.... हे अजुनही चकवा देतंय. अशा दिवसांत म्हणजे हे असे दिवस वारंवार येतात. आणि जातातही. याचा अनुभव अनेकांना येतो. या दिवसांत काही जगावेगळं नाविन्य नाही. म्हणजे सिच्वेशन एकदम मुडदे पाडण्यालायक नसली पाहिजे. मेन्स्ट्रुअल सायकलशी निगडीत काही असावं वाटलं पण सगळ्या अटींत बसेल असं काही सुचलं नाही.
काय वाटतंय ते लिहुन ठेवलं. परत तोच विचार करायला नको.
आणखी एक राहिलं. कथेचं नाव 'ताबा' आहे.
तिने गर्भ पाडला आहे. >> मलाही
तिने गर्भ पाडला आहे. >> मलाही पहिल्यांदा तेच वाटले. पण या दिवसांत आणि शिर्षक ताबा अजून काही वेगळे सांगू पहातेय बहुदा!
झंपी >>
मस्त आहे शशक! तिने सिगरेट
मस्त आहे शशक! तिने सिगरेट/गांजा किवा वीड चं तिला असलेलं व्यसन सोडायचं ठरवलं आहे आणि ते तिने सगळ्यांना सांगितला आहे . घरात पार्टी चालू आहे, मस्त माहोल आहे, पाऊस कोसळतो आहे, तलफ आलेली आहे.गाठोड्यात समान लपवले आहे फक्त आपल्यालाच माहीत आहे असा तिचा समज आहे आणि इतक्यात......
सॉरी इथे यायलाच झाले नाही
सॉरी इथे यायलाच झाले नाही गणपतीच्या घाईत.
इथले एकेक प्रतिसाद वाचून हसून पुरेवाट झाली. खुपच कल्पक आहेत इथे एकेक जण. थॅक्स सर्वांना.
मी दुसर्यांदाच ह्यात भाग घेतला. मजा येतेय. आणखी एक लिहायचा विचार करतेय. इथले प्रतिसाद ओसरले की, लिहिते काय गोष्ट आहे ती.
एक क्लु, हि सत्यघटनेवर आधारीत आहे.
आणि वसुदेवाने देवकीला संमती
आणि वसुदेवाने देवकीला संमती दिली...
आणि वसुदेवाने देवकीला संमती
आणि वसुदेवाने देवकीला संमती दिली...>>>> अरे वा!
पल्लवी09 cha प्रतिसादही आवडला.
देवीका,शासकमध्ये वातावरण निर्मिती चांगली केली आहेस हे पहिल्या प्रतिसादात लिहायचे राहून गेले होते.
अर्रे इथे अजुन संत्र सोललेलं
अर्रे इथे अजुन संत्र सोललेलं नाही.
देवीका, तुम्हीच सोला आता.
>>>>>>आणि मी विस्मयचकित
>>>>>>आणि मी विस्मयचकित नजरेने त्या प्रतिसादाकडे बघितलं.
हपा
पल्लवी यांचा टेक अगदी चपखल
पल्लवी यांचा टेक अगदी चपखल आहे.
सोसंच्या प्रतिक्षेत.
सोसंच्या प्रतिक्षेत.
वर जे अनेक अर्थ लावले आहेत ते सर्व मनात येऊन गेले पण भट्टी जमेना.
सधा सोपा प्रसंग आहे. लिहु का
सधा सोपा प्रसंग आहे. लिहु का आताच इथे?
अजिबात समजली नाही
अजिबात समजली नाही
व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न
व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न फसतोय.
किती ताणताय लिहा की.
किती ताणताय लिहा की.
सामो,
सामो,
>>पण इतक्यात नको. माबोकरांना वाचू द्यात.<<
अहो तुमच्याच परवानगीची वाट पहात होते.
नवीन नवरी लग्न होवुन सासरी
नवीन नवरी लग्न होवुन सासरी येते. नवीन घरात लगेच एक विधी/प्रथा म्हणून नवरीला पुर्ण दिवस उपवास करायचा असतो फक्त पाणी पिवुन.
सासरचे सर्वजण, आजकालच्या मुली तुम्ही, तुला जमणार नाही वगैरे म्हणतात पण उगाच नको तो बाणेदारपणा दाखवून ती हट्ट धरून उपवास करते.
तिच्या डोक्यात हा (सामाजिक गैर)समज कि , आपण सासरी असं करून खुष करु/मनं जिंकू( 'ताबा'), देवभोळी सून वगैरे.
लग्न घरातले दिवस( अश्या दिवसात) जिथे भरपुर खाण्याची रेलचेल चालु असते सर्वांची आणि हि उपास म्हणून थकून एकटीच आपल्या खोलीत बसली असते.
दिवसभर नुसतं पाणी पिवुन डोकं ठणकायला लागतं आणि आता बाहेर जावून खायचं कसं हा प्रश्ण छळत असतो.
माहेरून तिच्या आईने दिलेला एक डब्बा असतो ज्यात तिचा आवडिचा खाउ असतो.
सर्व झोपल्यावर ते खाउ असा विचार करते. रात्री शोधते तेव्हा तो डब्बाच गायब असतो.
तिला वाटत असते की, कोणालाच तो डब्बा माहित नसेल. पण नवर्यच्या हातात डब्बा बघुन ती चकित होते.
त्याने गंमत केली असते. कारण तिचे सर्व माहेरचे सामान त्यानेच ठेवून दिले असते नवीन घरात. ह्या प्रसंगानंतर तिच्या मनाचा 'ताबा' हा नवर्याने घेतला असतो.
पल्लवी , तुमचे पण वर्जन मस्त
पल्लवी , तुमचे पण वर्जन मस्त बसतेय.
देवीका, तुमचे स्पष्टीकरण छान
देवीका, तुमचे स्पष्टीकरण छान आहे.
पण ते उलगडायला पार्श्वभुमी माहित असणे गरजेचे आहे. नवीन लग्न झालेय हे दाक्गवणारी एक ओळ आली असती तरी असली प्रथा आहे हे कोणाला कळले नसते.
व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न ही पार्श्वभुमी मला जास्त योग्य वाटली. मोबाईलचे व्यसन आणि तो कोपर्यात लपवुन ठेऊन त्यापासुन मुक्ती मिळवण्याचा नायिकेचा प्रयत्न. बाहेर इतर लोक ग्रुपबरच्या कमेंट्स वाचुन खिदळताहेत आणि ही कासाविस होतेय. सध्याच्या दिवसात मोबाईलवाचुन राहणेही अशक्यच आहे ना. शेवटी नवर्यालाच दया येते व मोबाईल आणुन देतो हातात.
या व्यसनाने ताबा मिळवलाय माणसावर 
(मोबाईल व्यसनमुक्तीचा प्रयत्न म्हणुन हाही उपाय मी केलाय म्हणुन शशक वाचल्यावर लगेच रिलेट झाली
)
Pages