'मायबोली गणेशोत्सव 202५

शशक - १ - ताबा- देवीका

Submitted by देवीका on 27 August, 2025 - 03:56

सकाळपासून खोलीत तिच्या येरझारा चालूच होत्या. फक्त काहिच तास झाले होते. पण तिची तगमग थांबतच न्हवती.

घेतलेला निर्णय तसा कठिणच होता.

बाहेरुन खिदळण्याचा आवाज येतच होता. तिने परत एकदा 'त्या' जागेकडे कटाक्ष टाकून सुस्कारा सोडला.
तिच्या मनात प्रश्ण घुमु लागले, कोणाला कळले तर? पण त्याच मनाने तिला परत समजावले, अगं वेडे कसं कोणी राहु शकतं अश्या दिवसात?

Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  202५