शशक - १ - ताबा- देवीका

Submitted by देवीका on 27 August, 2025 - 03:56

सकाळपासून खोलीत तिच्या येरझारा चालूच होत्या. फक्त काहिच तास झाले होते. पण तिची तगमग थांबतच न्हवती.

घेतलेला निर्णय तसा कठिणच होता.

बाहेरुन खिदळण्याचा आवाज येतच होता. तिने परत एकदा 'त्या' जागेकडे कटाक्ष टाकून सुस्कारा सोडला.
तिच्या मनात प्रश्ण घुमु लागले, कोणाला कळले तर? पण त्याच मनाने तिला परत समजावले, अगं वेडे कसं कोणी राहु शकतं अश्या दिवसात?

जस जशी रात्रं चढु लागली, तसे तिचे डोकं भणभणायला लागले. आता अजिबातच रहावत न्हवते.
आपसुकच तिची पाउलं 'तिथे' वळली. अंधारातच चाचपडत ती गाठोडे शोधु लागली.
इतक्यातच मागून स्पर्श झाला आणि आवाज आला, हेच शोधतेस ना?
गर्र्कन वळली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधनाशी सहमत. शशक मध्ये लग्न किंवा त्यानंतरची प्रथा असा काहीतरी क्लू आला पाहिजे.
मला व्यसन वाला अंदाज पटला होता.

कथेत सस्पेन्स तयार करणे ही एक तारेवरची कसरत असते. अगदी सोपा निघाला तर ओळखायला काही मजा येत नाही. अगदीच अवघड निघाला आणि कुणाला ओळखताच नाही आला तरी मजा येत नाही. थोडेसे क्लू सोडून निदान एखाद दोन लोकांना ओळखता येईल इतपतच अवघड करणं चांगलं. पण ते म्हणजे किती अवघड हे स्वतः लिहून अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे हाही एक प्रयत्न म्हणून समजून घेऊ.

थँक्स सर्वांना.
घरी गणापतीची धावपळ असल्याने यायला जमत नाहि इथे.

मी काही फारसा विचार करून लिहिली नाही कथा. मी लेखिका तर अजिबातच नाही. एक प्रसंग आठवला आणि लिहिले इतकेच.
मला वाटले पुरेसे क्लु आहेत. पण एक वाक्य लिहिलेलं लग्नाविषयी पण शब्द मोजल्यावर १०८ होते म्हणून काढलं.
पण मज्जा आली तुमचे प्रोत्साहन पाहून. दुसरी कशी वाटली ते ही लिहा. शिकायला मिळेल.
ह.पा. थँक्स प्रोत्साहनाबद्दल.

ही प्रथा माहित नव्हती.
त्यामुळे कळली नाही.

मला दत्तक देणं टाइप काहीतरी वाटलं होतं.

Pages