शशक २,३ - होम मिनिस्टर! - छंदीफंदी

Submitted by मीस्वच्छंदी on 30 August, 2025 - 21:05

बांदेकर भाऊजींनी जिंकलेल्या वहिनींना पैठणी दिली आणि होम मिनिस्टर चा एकच गजर सुरू झाला!

दूरदर्शनवरील ते दृश्य बघून तिने त्याला सहजच विचारलं, ”ए, मी पण बघू का रे होम मिनिस्टर मध्ये प्रवेशिका टाकून?”

तो हसून तत्परतेने म्हणाला, “हो, कर ना! फक्त आपल्या शोभाबाई आणि कुलकर्णी मावशींच्या सवडीने बघ.”

एक भुवई उंचावली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले, “का??”

“बघितलसं ना, त्या एका फेरीमध्ये घरातल्या, स्वयंपाकघरातल्या ते सांगतील त्या वस्तू पटापट आणून द्याव्या लागतात. आता पैठणी जिंकायची तर त्यांना पण इथै असायला लागेल ना…”

“खडूस, काय रे पूर्वी इतकं गोड बोलायचास, मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील..” हातातली उशी त्याच्यावर फेकत ती चित्कारली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलीय.
------
@सामो- किचन मध्ये ढ असणाऱ्या त्याच्या बायकोला त्याने सेफ राहून शाजो दिलेत.

किचन मध्ये ढ असणाऱ्या त्याच्या बायकोला >>> एकदम ढ..? Lol

सामो, तो तिच्या मदतनिसांविषयी बोलतोय.. त्यांच्याशिवाय तिचं काही खरं नाही.. Happy

खडूस नवरा आणि हा प्राणी तसाच असतो.>>> Lol

असेच तर वागतात जगभरातले नवरे >>> म्हणजे सगळे नवरे खडूस??
बहुदा पैठणी मिळणाऱ्या वहिनींचे सोडून Lol

छान जमली आहे.
नवऱ्यांना शेरवानी Happy

Lol

मस्तय Lol

SSKVP2.jpg