Submitted by झंपी on 25 August, 2025 - 19:14
न्यु जर्सी इथे कोणाला एखादी घरगुती किंवा रेस्टांरंट मधे उकडीचे मोदक घरपोच डिलीवरी करणारे आहेत का?
माझ्या एका नातेवाईकाला हवेत. वयामुळे त्यांना जमत नाही येणं-जाणं करायला.
तुम्ही अनुभव घेतला/ खाल्ला असेल तर बरे.
ठिकाण न्यु जर्सी एडिसन आहे. घरपोच डिलीवरीच हवी आहे.
फोन किंवा कस्काय नंबर द्या प्लीज.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही माहीत
नाही माहीत
भारतीय दुकानात बेडेकरचे मोदक
भारतीय दुकानात बेडेकरचे मोदक मिळतात, ते उकडीचेच असतात. मायक्रोवेव्ह मधे छान होतात.
सुमा फूड्स ला पण विचारून बघा.
सुमा फूड आता ढवळीकर कुटुंबाने
सुमा फूड आता ढवळीकर कुटुंबाने विकले आहे...
आमच्या भागात ( प्रिन्स्टन )कुठे मिळतात माहीत आहे, पण एडिसन बद्दल माहीत नाही पण तिथे नक्की मिळतील.
भारतीय दुकानात बेडेकरचे मोदक
भारतीय दुकानात बेडेकरचे मोदक मिळतात, ते उकडीचेच असतात>> +१
उकडून जास्त छान , मऊ लुसलुशीत होतात.
या वर्षी मी उशीरा जगी झाले.. दुकानातले मोदक संपले
भारतीय दुकानात बेडेकरचे मोदक
भारतीय दुकानात बेडेकरचे मोदक मिळतात, ते उकडीचेच असतात >> +1
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
न्यु जर्सीत बहुतेक दुकानातले बेडेकरचे मोदक संपले असे आजोबा म्हणाले. आणि ते काही फार लांब ड्राईव करत नाहीत.
सुमावाले डिलीवरी करणार नाही बोलले.
मी म्हटलं त्यांना शीरा करा आणि दाखवा नेवेद्य. पण आजोबा एकदमच जिद्दी. शेवटी मी त्यांना रीकोटा मोदक करा सांगितले. आणि शॉपराईअटमधून ऑर्डर करून पाठवले रीकोटा चीज. तर प्रश्ण आहे, अवन नाही जमत त्यांना आता. सर्वच गंमत आहे. आजी आणखी विनोदी. … असेच रिकोटा दाखवु साखर घालून? म्हटलं करा काहीही. सर्व आपल्याच जिभेचे चोचले. असो.
ह्म्म! वय झाले की कळतही नाही
ह्म्म! वय झाले की कळतही नाही आणि वळतही नाही असे होवून बसते. मी त्यांच्या गावात असते तर पाठवला असता आजोबांसाठी डबा.
आज +१ भल्या पहाटे उठून कॅनडाला त्यामुळे मी पण पाव कप रव्याचा शीराच केला.
मलाही हळहळ वाटली, मला आधी
मलाही हळहळ वाटली, मला आधी लक्षात आले असते किंवा ते बोलले असते तर आधीच मोदकांची शोधाशिध करून ऑनलाईन पाठवले आसते.
मी देशातून फार फार तेवढेच करु शकते.
वय झाल्यावर दोघांनाही मदतीची
वय झाल्यावर दोघांनाही मदतीची गरज असते. त्यातून परदेशात कठीणच.
तुमच्या वाशी कि पनवेल इथल्या वयस्कर नातेवाईकांना मिळाली का हेल्प ?
https://www.maayboli.com/node/86644
रानभुली,
रानभुली,
अच्छा ते होय. तुमच्याकडे आहे का कोणी?
ते माझे नातेवाईक नाहित, ओळखीतले आहेत.
कोणीतरी मध्ये मिळाले होते त्या जोडप्यांना . पण परत तेच त्या बायां सुट्टी घेतात ही तक्रार आहे कायम आजींची. मग खातात ते खिचडी वगैरे करून. कधी तरी खुपच झालं तर करतात हॉटेलातुन ऑरडर
त्यांचा क्रायटेरिया पण खुप कठिण वाटतो बायांना.
त्या आजींना आहे स्वच्छ्तेची आवड. आजकल कोण काम्वाल्या बाया इतकं टापटीप काम करतात…
अवघडच आहे. मी पुण्यात आहे .
अवघडच आहे. मी पुण्यात आहे . इथून कशी मदत करता येईल ?
आजच्या लोकसत्तेत festyfood
आजच्या लोकसत्तेत festyfood च्या फ्रोजन मोदकांची जाहिरात आहे. हाताने बनवलेले, प्रिझरवेटिव्ह नाहीत, तरी वर्षभर टिकतात असा दावा आहे. अमेरिकेत निर्यात करतात. festyfoodtreats@gmail.com
७३८५५५०६५५
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
आता पुढच्याच वर्षी. गणपती दिड दिवसांचाच होता.
सध्या फ्रोझन पदार्थांची
सध्या फ्रोझन पदार्थांची संख्या वाढतेय. फ्रोझन मोदक, थालीपीठ, बटाटे वडे, मिसळ (तर्री), कोथिंबीर वडी इत्यादी सगळे फ्रोझन मधे उपलब्ध आहेत.