तुम्ही कोणते युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब केले आहेत?

Submitted by वर्षा on 12 April, 2020 - 10:22

यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. Happy कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः

स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अ‍ॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)

आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach

करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari

तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Red soil stories चॅनलवरची कुक पूजा गवस हिचा नवरा शिरीष गवस ब्रेन हॅमरेजने गेल्याची बातमी वाचली. एक लहान बाळ आहे त्यांचं. It is one of my favourite channels on YouTube.

एफ्रन राईस या बिलयर्ड प्लेयर्सचे अनेक व्हिडीओज सतत फीड मधे येत होते. ते बघता बघता कधी वेड लागलं समजलंच नाही.
त्यांना मॅजिशियन म्हटलं जातं. अविश्वसनीय असा खेळ आहे त्यांचा. तसे बरेच चॅनेल्स आहेत पण हे त्यांच्या नावाने आहे. सबस्क्राईब केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=Fo_aFRA43Es

रसिकांनी १०, ५०, १०० मॅजिक शॉट्स प्लेड बाय एफ्रन राईस असा सर्च द्यावा.

रियाज माला

लता मंगेशकर,मोहम्मद रफी यांची रियाजाची पद्धत यावर व्हिडीओज आहेत.
रफी साहेब कि सूर साधना या लेखावर आधारीत हा व्हिडीओ आवडला.
https://www.youtube.com/watch?v=dfwAC2vlAjQ

रफी साहेबांचे काही कोट्स

खर्ज हा आतला दरवाजा आहे. जोपर्यंत तो उघडत नाही तोपर्यंत आतला, अस्सल आवाज बाहेर येत नाही. हा आवाज हृदयातून येतो.
जर खर्जाचा सा गहिरा असेल तर बाकीचे सूर स्वतःहून चमकू लागतात...

यशवंत देवांनी एका मुलाखतीत खर्जातील आवाजाच्या जादू बद्दल आणि तो कसा गवसला त्याबद्दल सांगितलेलं आठवलं.
त्यांना पूर्वी एक काहीसा दुर्धर आजार झाला होता. अनेक दिवसाचं दुखणं होतं, तर काही विरंगुळा, स्वरसाधनेत किती खंड पाडायचा अशा विचाराने ते स्वर लावण्याच्या रियाझ करत असत. तापात, कणकण असताना असे स्वर लावता लावता खर्जातील स्वर, ते स्वच्छ लावायची एक हातोटी त्यांना तेव्हा सापडली अशा अर्थाचं काही होतं.

अनेक दिवसाचं दुखणं होतं, तर काही विरंगुळा, स्वरसाधनेत किती खंड पाडायचा अशा विचाराने ते स्वर लावण्याच्या रियाझ करत असत. तापात, कणकण असताना असे स्वर लावता लावता खर्जातील स्वर, ते स्वच्छ लावायची एक हातोटी >>>> नतमस्तक

एक रोचक घडामोड आहे युट्यूबवरची

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे १९६७ साली फिल्म्स डिवीजनने १५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या आणि आता २० वर्षे वय असलेल्या अनेकांची मुलाखत घेऊन भारताबद्दल काय वाटतं ?स्वतःच्या भविष्याबद्दल, देशाबद्दल काय वाटतं या थीमवर त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

यानंतर २०२२ साली ही फिल्म एका युट्यूबरने पाहिली. ज्यांची मुलाखत फिल्म्स डिवीजनने ऑफ इंडीयाने घेतली ते भारतीय आज कुठे आहेत असा प्रश्न त्याला पडला. आणि नंतर सुरू झाला एक रोचक शोध. त्या फिल्म मधे श्रेयनामावली मधे कुणाचंच नाव नव्हतं. एका मुलीचं नाव होतं. त्यावरून मग त्याने शोध सुरू केला. बाकीचे लोक कसे शोधून काढले, ते आता काय करतात, फिल्म मधे त्यांनी भविष्याबद्दल जे सांगितले त्यातले कितपत सत्यात उतरले याचा हा शोध म्हणजे स्वतःच एका फिल्मचा विषय आहे.
https://www.youtube.com/watch?v=AICnH7QYmvM

नमस्कार चमत्कार
कल्पना आहे मला की मी गायब होते अनेक दिवस - महिने - वर्ष.

हे आणि ते चालू होते.

या धाग्यावर यायचे कारण असे की मी आणि माझ्या मैत्रिणीने यूट्यूब चॅनल सुरू केला आहे.

चॅनलचे नाव - Hey ChiriMiri
https://www.youtube.com/@TheChiriMiriProject

हा लेटेस्ट एपिसोड - https://www.youtube.com/watch?v=ovXDMWT3FF0&t=4s

तर तुम्हा सर्वांना विनंती - कृपया सबस्क्राइब कराल का? तुम्हाला एक मिनिटही लागणार नाही सबस्क्राइब करायला - पण it will mean a lot to us.

लाईक आणि शेअरही करालच.

चॅनलचा उद्देश - हलक्या फुलक्या गप्पा - अजून पुढे बरेच प्लॅन्स आहेत या चॅनलद्वारे करायच्या गोष्टींचे - पण त्यासाठी आधी ५०० सबस्क्रायब्रर्सचा टप्पा गाठायला हवाय.

एक शिंदे मॅडम नावाच्या पुणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचे व्हिडिओ मी फॉलो करते. ग्रामीण भागातील मुलाना त्या जे जीव तोडून शिकवतात त्याचाच हा चॅनेल आहे. शिंदे मॅडम आणि त्यांचे व्हिडिओ मला फार आवडतात. तुम्ही ही नक्की बघा.
@shindemadam हे त्यांच्या चॅनेल च नाव आहे. त्यांच्या एका रील ला आठ करोड व्ह्यूज आहेत.

शिंदे मॅडम चानेलचे काही विडिओ पाहिले. इंग्रजी शिकवणे भयानक आहे. तर्खडकर छाप आहे. इंग्रजी भाषा इंग्रजीतूनच का शिकवता येत नाही? शब्द वापरायचा वगैरे, तसेच कुठे काय शब्द लावायचा इत्यादी. शाळेत मुलांचे विडिओ करतांना पालकांची आणि शाळेची अनुमती लागेल ना? त्या विडिओंवर या बाई पैसे कमावणार?

शोभा डे एक्स्क्लुझिव्ह
जबरदस्त आऊटस्पोकन आणि सॉर्टेड बाई आहे. विचारांची क्लॅरिटी आहे. तिचे मला वाटते स्टारी नाईटस मी पूर्वी वाचलेले.

शिंदे मॅडम जे शिकवतात ते कौतुकास्पदचं आहे. ग्रामीन भागात असचं इंग्रजी शिकवतात. म्हणजे मी ज्या भागातून आलोय तिथं तरी.
सध्या बऱ्याच शाळात एक शिक्षक आणि दोन तीन ईयत्ता असा प्रकार आहे. माझ्या गावातल्या शाळेत जे शिक्षक रिटायर झाले त्यांच्या जागेवर शिक्षक भरले नाहीत. मग उरलेल्या शिक्षकांनी काही वर्ग वाटून घेतलेत.
त्यांची शिकवण्याची पद्दत काहीना चुकीची वाटू शकत असेल पण त्यांना ZP ने ट्रेनिंगचं तस दिल असेल.
त्या बाई नी व्हिडीओसाठी परवानगी घेतली नसेल. पण पालकांचा आक्षेप नसावा कारण मराठी शाळेची सध्याची अवस्था दयनीय आहे. त्यात त्या शिकवत तरी आहेत. पण त्या अजून फेमस झाल्या की सरकार काढून नक्कीच दबाव येईल.

मला ही त्यांचं इंग्लिश शिकवणं खटकत नाही. ग्रामीण भागातील शाळांमध्ये असच शिकवतात. काही भागात कॉलेजमध्ये ही फिजिक्स वगैरेचा पेपर जरी इंग्लिश मधून लिहायचा असला समजावून मराठीत सांगतात. असो.
पालकांची अनुमती मुद्दा माझ्या ही मनात आला होता पण घेतली असेल परवानगी असं मीच मनात म्हटलं आणि सोडून दिलं.
व्हिडिओ मात्र मला खूप आवडतात. त्या मॅडम, ती ग्रामीण भागातली मुलं, सजवलेला वर्ग, फळा सगळच.

सगळीकडे साजूक तुपातले नाजूक शिक्षक कुठून मिळणार ? ते तर आयटीत जाऊन मायबोलीवर कळ दाबत बसतात.
फावल्या वेळात जर ग्रामीण भागात जाऊन शिकवले तर देश ऑक्सफर्ड, केंब्रिज ला मागे टाकेल.

Pages