सैयारा - A Gen Z intense Love Story !
काय जबरदस्त पिक्चर आहे !! काय गाणी आहेत, काय इमोशन आहेत, काय त्या हिरोचा स्वॅग आहे, आणि कसली गोड हिरोईन आहे.. फुल इन्टेन्स लव्हस्टोरी आहे.
चांगल्यावाईट चर्चा, पेड अनपेड रिव्यू, खर्या खोट्या रील्स.. सगळे एका बाजूला ठेवून या निमित्ताने फक्त चित्रपटाचे नाव जे सतत कानावर आदळत होते ते युट्यूबवर शोधून काल रात्री ट्रेलर पाहिला. सुसह्य वाटला. गाण्यांबद्दल बरेच ऐकून होतो म्हणून ती सुद्धा काल पहिल्यांदाच ऐकली. थोडा वेळ दिला स्वत:ला आणि पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटू लागली. सगळीच गाणी छान वाटल्याने बॅकग्राऊंड म्युजिक सुद्धा छानच असणार याची खात्री पटली तसे कुठलेही पुर्वग्रहदूषित मत न बनवता, मनाची पाटी कोरी करून चित्रपटाला जायचा निर्णय घेतला... आणि चित्रपटाने निराश केले नाही.
हिरोची एंट्री पाहिली, काय स्टाईल, काय स्वॅग.. बरेच दिवसांनी अशी एंट्री बघायला मिळाली. एखादा नावाजलेला स्टार, रणबीर किंवा शाहीद असता तर हवा झाली असती. पण हा पोरगा कोणाला कॉपी न करता आपली स्टाईल घेऊन आला होता हे विशेष. आणि पुढे ते चित्रपटभर जाणवत होते. कुठे अभिनयात चुकला नाही, कुठे बेअरींग सुटले नाही.
पहिल्याच गाण्यात एक उघड्यावर शो करताना त्याचे गाणे अर्धे झाल्यावर पाऊस पडायला सुरुवात होते आणि सर्वांची पळापळ होते, त्यानंतर (बरसात शब्दापासून सुरू होणार्या) अरीजीतच्या आवाजात हळूवार ओळी आहेत. त्याने त्या अश्या सादर केल्या आहेत की स्टार ईझ बॉर्न फिलींग येते.
त्यानंतर क्रिकेटचा एक सीन आहे ज्यात तो हिरोईनला प्रेरणा देताना दाखवला आहे, तो सुद्धा कमाल केला आहे. असे कॅरेक्टर असलेल्या व्यक्तीच्या कोणीही प्रेमात पडेल असे वाटते आणि प्रेमकथा विश्वासार्ह वाटायला सुरुवात होते.
हिरोईन सुद्धा कसली गोड आहे, जणू मृणाल ठाकूरचे कोवळे वर्जन. दोघांमधील केमिस्ट्री भारी होती. जेव्हा जेव्हा दोघे मिठी मारायचे डोळ्यात पाणी तरी यायचे किंवा अंगावर शहारा तरी यायचा. सिच्युएशनच तश्या होत्या.
मोहीत सुरीचा चित्रपट हे ऐकूनच गाण्यांबाबत अपेक्षा ठेवू शकतो. कलियुग, जेहर, राझ, आवारापण, आशिकी-२, एक व्हिलन, हाफ गर्लफ्रेंड वगैरे चटचट आठवणारी उदाहरणे. त्या त्या काळाला साजेशी अन गाजलेली गाणी... आता यात सैयाराची सुद्धा भर पडली म्हणू शकतो.
गाणी युट्यूबवर बघताना आवडलेली, पण चित्रपटात नेक्स्ट लेव्हलला गेली असे वाटले. मूड सेट केला. चित्रपटात एकदोन जागा अश्या होत्या जिथे गाणी टाकायला संधी होती पण तिथे गाणी आली नाहीत तर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटले. थोडक्यात ईतरवेळी जी गाणी आपण पुढे ढकलतो ती ईथे हवी होती असे वाटले. पण या चित्रपटाला म्युजिकल हिट म्हणून आशिकी जुना किंवा नवीन यांच्या पंक्तीत बसवू नका. तिथल्या हिरोंमध्ये अभिनयक्षमतेच्या मर्यादा होत्या. त्यांना गाण्यांनी वाचवले होते. ईथे मात्र इमोशन आधी अभिनयातून आले आणि मग त्याला बॅकग्राऊंड म्युजिकची जोड लाभली आहे.
ईंटरव्हल होता होता जी ट्रॅजेडी समोर आली तेव्हा आतापर्यंत जी लव्हस्टॉरी एंजॉय करत होतो त्यात रडगाणे सुरू होईल म्हणत अरे देवाऽऽ असे झाले. पण शेवटपर्यंत तसे काही झाले नाही, किंबहुना होणारही नाही याची खात्री वाटली. कारण लव्हस्टोरी जेव्हा अशी पॅशनेट असते तेव्हा त्यात आपले प्रेम जाताना बघून रडले जात नाही, तर लढले जाते. यातले हिरोचे कॅरेक्टर तसेच दाखवले होते त्यामुळे चित्रपट पॉझिटीव्ह नोटवरच संपायचा होता आणि तसेच झाले. ते रील मध्ये रडणार्या लोकांना पकडून हाणायला हवे. उगाच सदमा किंवा माहेरची साडी असल्यासारखे चित्र जिथे तिथे तयार झाले आहे.
आणि या उलट ते चित्रपट न बघताच नेपोकिड म्हणून टिका करणारे...
ऋषी, शशी, करिश्मा, करीना, सनी, संजय, अक्षय, अभिषेक, अजय, काजोल, हृतिक, सलमान, सैफ.......लिस्ट संपता संपणार नाही. पुर्ण फिल्म ईंडस्ट्री नेपोकिडसनी भरली आहे आणि आजवर त्यांनीच आपल्याला भरमसाठ आनंद दिला आहे.
फरक ईतकाच की ते सारे सुदैवी होते. कारण त्यांनी आजच्या काळात जन्म घेतला नाही. तेव्हा आवडत्या कलाकारांच्या मुलांचे कौतुकाने स्वागत करायची पद्धत होती. आता लोकं संशयाची चाळणी घेऊन तयारीत असतात. नेपोकिड हा शब्द हिणवण्यासाठीच वापरला जातो. त्यांच्यातील कलागुण जोखण्याआधीच त्यांच्यावर वशिल्याचा तट्टू असा शिक्का मारला जातो. जो एखाद्या आलिया भट किंवा श्रद्धा कपूरला आपल्या कामाने पुसावा लागतो. पण एखाद्या अनन्या पांडेला स्ट्रगल करावे लागते. बरीच टीका झेलावी लागते.
आता तिच्याच भावंडांपैकी एक आला आहे या सैयारा चित्रपटातून. हा हिरो मात्र पहिल्याच फटक्यात आवडला आणि त्याचा पिक्चर सुद्धा आवडला.
पण पिक्चरला जाण्याआधी अजून एका पूर्वग्रहदूषित मतापासून स्वतःला वाचवणे गरजेचे होते. ते म्हणजे हा फक्त "जेन झी" जनरेशनला आवडणारा पर्यायाने उथळ चित्रपट आहे. आपल्या जनरेशनला हा रुचणार नाही. जसे काही आपले बालपण एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट बघण्यात गेले आहे.
पण हा चित्रपट दर्जेदारच आहे. आणि आजच्या जनरेशनची विचारपद्धती आणि दृष्टीकोण बदललेला का असेना, प्रेम ही भावना कालातीत आहे हे दर्शवणारा आहे. आज हे तेव्हा जाणवले जेव्हा माझ्या डावीकडे बसलेली एक मराठी फॅमिली आणि उजवीकडे बसलेला कॉलेजगोईंग मुलींचा ग्रूप हा चित्रपट एकसारखेच एन्जॉय करत होते.
चित्रपटाच्या शेवटी सैय्यारा टायटल साँग वाजते. पण ते फिमेल वर्जन आहे. मेल वर्जनमध्ये जो एक दर्द जाणवतो तो ईथे नाहीसा होतो. त्या जागी हे गाणे श्रेया घोषालच्या गोड आवाजात वाजते. ज्यात एक प्रकाराचा सुकून आहे. आणि हे कमाल आहे. कारण याने चित्रपटात जो पॉजिटीव्ह शेवट दाखवायचा आहे तो मूड अचूक पकडला जातो. यासाठी म्हणून त्या रील्समध्ये रडणार्या जनतेला पकडून आणखी हाणावेसे वाटले.
सुदैवाने आमच्या थिएटरमध्ये कोणी रडले नाही. पण मी मात्र शेवटचे पुर्ण गाणे आणि श्रेयनामावली बघत जागेवरच बसून होतो. त्या निमित्ताने लोकं माझ्याकडे देखील हा रडतोय का म्हणून बघून जात होते. मला जेन झी समजत होते. हे एकंदरीतच बरे वाटत होते 
- ऋन्मेऽऽष
ऋन्मेष लग्गेच हिरोईन च्या
ऋन्मेष लग्गेच हिरोईन च्या पालकांच्या रीअॅक्शन चे जस्टीफिकेशन ची गरज नव्हती.
लग्ना आधी फिजिकल शॉकिंग नसले तरी कोणते आई बाप पोरी ला दही साखर खाऊ घालून लग्ना आधी मजा करायला पाठवतील? उगाच काहीही. लिव इन जरा स्विकारले जात असेलही, पण अगदी एनकरेज नाही करत बरं!
तो लग्नाला तयार असतो हे ही धरले तरी आजकालच्या पोरांचा काय भरोसा..तिचा १ला प्रेमी लग्नाच्या दिवशी पळालेला असतो.
आशू कोणती मजा करायला पाठवली
आशू कोणती मजा करायला पाठवली जे ते आई-वडिलांच्या पश्चात करू शकत नव्हते..
जो मुलगा तिचा आजार समजून तिला सोडून पळून जात नाही तसेच आपला शो आपली करियर सोडून तिला सांभाळायला घेऊन जातो त्याच्यावर अविश्वास कोणी दाखवत असेल तर मी त्या पालकांना मूर्ख म्हणेल...
आणि लग्न करेल की नाही याचा कश्याला भरोसा हवा आहे?
त्या जागी दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करून तिला पाठवले असते आणि नंतर त्याने जबाबदारी झटकली असती तर कोणी काय केले असते? पोरीचा आयुष्याची वाट लावून कोर्टात पोटगी मिळवून समाधानी राहिले असते?
वर्षानुवर्षे अनोळखी माणसाला
वर्षानुवर्षे अनोळखी माणसाला हुंडा देऊन पोरगी देणारे आईबाप आहेत ते याचसाठी की मुलींच्या लग्नाला आपल्याकडे फार अवाजवी महत्व देण्यात आले आहे. आज एखादी हुंडाबळी केस झाली की आपण म्हणतो की हुंडा मागणाऱ्या लोकांना मुलगी द्यायचीच कश्याला, पण इतके वर्षे आपण तेच तर करत आलो आहोत. आज सुधारतच आहोत तर तेवढ्यावरच का थांबायचे, एक एक पाऊल अजून पुढे टाकने गरजेचे..
रिस्पेक्ट > +७८६
रिस्पेक्ट > +७८६
तो माणूस म्हणून सुद्धा खूप चांगला आणि डाऊन टू अर्थ वाटतो.
>
+1
तुमचा सुद्धा प्रतिसाद आढळला तिथे Happy
>>
एकच नाही, जास्ती आहेत
हो असावेत.. मी तुमचे नाव
हो असावेत.. मी तुमचे नाव बघून तुमचे मत तेव्हाही तेच होते का फक्त इतकेच चेक केले
तुमचे मत तेव्हाही तेच होते का
तुमचे मत तेव्हाही तेच होते का फक्त इतकेच चेक केले
>>
तेच आहे
8 वर्षांनी पण
पण अरिजित माणसाबद्दल आदर बराच वाढलाय
त्याचे गाण्यापलीकडचे स्किल्स, डाऊन टू अर्थ बिहेवियर वगैरे वगैरे
आणि प्लीज, तुम्ही नको, तू म्हण...
SRK च्या शब्दात सांगायचं तर, 'तुम्ही' काफी शरीफ सा लगता है, Call me 'तू'...
ओरिजिनल डायलॉग चा रेफरन्स तुला द्यायची गरज पडू नये...
असो,
सैय्यरा OTT वर च बघणार, त्यामुळे ती पोस्ट नंतर...
तो ओरिजनल डायलॉग तर मी मारला
तो ओरिजनल डायलॉग तर मी मारला पाहिजे..
सर बहोत शरीफ सा लगता है..
कॉल मी डॉन
असो..
ओटीटी वर पिक्चर येईल तेव्हा बहुतांश जण हा जरूर बघतील आणि चर्चा करतील अशी अपेक्षा.
ज्यांना थिएटर जायचे असेल त्यांनी निव्वळ मार्केटिंग आहे आणि पिक्चर बंडल असणार अश्या समजात राहून टाळू नये.
सर
सर
तुम्ही पिक्चर बघून रडलात का ? खर सांगा बरका. आम्ही हसणार नाही.
केशवकूल नाही रडलो,
केशवकूल नाही रडलो,
कारण चित्रपट रडवा नाही.
इमोशनल म्हणाल तर, माझ्या डोळ्यात पाणी येते सहज इमोशनल सीन असले की.. तरी या चित्रपटात तितके आले नाही. पण पूर्ण चित्रपटभर रोमांच फुलल्यासारखे, शहारल्यासारखे वाटत होते. जे काही सीनपुरते डोळ्यात पाणी येण्यापेक्षा भारी फिलिंग होते. कदाचित मी मनाने अजूनही कॉलेजातच आहे, आजही माझ्या इमेजिनेशनमध्ये कॉलेज लव्हटोरीच येते, त्यामुळे चित्रपटाशी एकरूप होता आले असावे, म्हणून जास्त आवडला.
पण तसे कोणाबाबत नाही झाले तरी चित्रपट चांगला आहे, म्हणून आवडायला हरकत नाही. उगाच चित्रपट न बघता केवळ त्याचे मार्केटिंग होते म्हणून नावे ठेवण्यात काही अर्थ नाही. पीआर मार्केटिंग कोण नाही करत. तो काही गुन्हा नाही...
बापरे! असाध्य आजार, काळजी,
बापरे! असाध्य आजार, काळजी, इमोशनल वगैरे वाचून कोरिअन फॉर्म्युला फिल्म वाटते आहे. लव्हस्टोरी असली तरी माझा पास. मी पुन्हा एकदा 'जाने तू या जाने ना' बघेन त्यापेक्षा.
लेख छान लिहिला आहेस, ऋ.
ऐकली सगळी गाणी. बरबाद बरे आहे
ऐकली सगळी गाणी. बरबाद बरे आहे. मोहित सुरी आणि भट्ट कॅम्पच्या जुन्या गाण्यांची रीहॅश व्हर्जन वाटतात. आणि महत्त्वाचे म्हणजे गिटार हेवी करण्याच्या नादात त्यांचे बिट्स कमी केलेत. किंवा actual ड्रम न वाजवता काहीतरी डिजिटल वापरून घेतले आहे. त्यामुळे जो एक हूक असतो तो सगळीकडे मिसिंग वाटतो. इव्हन आशिकी २ ची गाणी यापेक्षा बरी होती.
एवढा बारीक अभ्यास
धनि, एवढा बारीक अभ्यास
रमड हो,
it is loosely based on the 2004 Korean film A Moment to Remember
पण असला आजार असला तरी रडवा नाहीये. मला नुकतेच पाहिला एक मराठी चित्रपट स्माईल प्लीज आठवला. जवळपास सेम प्लॉट.
स्माईल प्लीज छान होता. शिवाय
स्माईल प्लीज छान होता. शिवाय त्यात ललित प्रभाकर पण होता. त्यामुळे बघायला अजून छान वाटला.
प्रामाणिक उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद, ऋ!
बहुतेक A Moment to Remember
बहुतेक A Moment to Remember फार वर्षांपूर्वी पाहिलेला होता त्यामुळेच स्टोरी ओळखीची वाटली.
स्माईल प्लीज पण पाहिला आहे. त्यात dementia होता पण बाकी स्टोरी वेगळी होती. त्यात ललित तिचा मित्र बनून तिला उभारी देतो.
>>>> पण अगदी एनकरेज नाही करत
>>>> पण अगदी एनकरेज नाही करत बरं!<<<
हो करतात ना. म्हणजे आधीच लग्न करून धोंडा मारण्यापेक्शा बरे असे असते. पाहिलेत, एकलेत. आणि हा प्रत्येकाचा चॅाइस आहे.
त्यात काय जज करण्यासारखे नाहीच.
असह्यारा
असह्यारा
धनि,
धनि,
स्माईल प्लीज मध्ये तिचा घटस्फोट झालेला दाखवला आहे यात लग्न तुटलेलं दाखवले आहे.
त्यात ती फोटोग्राफर दाखवली आहे आणि विस्मरणाच्या आजारात तिची लोप पावणारी कला टिकवून ठेवायला मित्र मदत करतो ज्यातून ती व्यक्त होऊ शकते, स्वतःची ओळख टिकवू शकते.
इथेही असेच आहे. यात हिरोईन लेखिका आणि गीतकार दाखवली आहे.
दोन्हींचा शेवट पुढे आजार वाढत गेल्यावर काय हाल होतील हे न दाखवता वर्तमानात तिच्या जवळचे सपोर्ट करून आजच्या जगण्याला अर्थ आणि उद्याच्या जगण्याची उमेद देतात या नोटवर केला आहे. ती बरेच काही विसरते यापेक्षा जे काही आठवते त्यावर फोकस केला आहे. त्यामुळे पुढे तिचे काय होणार हा विचार दोन्ही चित्रपट संपताना डोक्यात येत नाही. माझ्यातही आला नाही. म्हणून मला दोन्ही शेवट सकारात्मक आणि फिल गुड वाटले.
झंपी +७८६
झंपी +७८६
आणि एनकरेज म्हणण्यापेक्षाही मुलांना सपोर्ट करतात, त्यांच्यावर विश्वास दाखवतात असे म्हणणे जास्त योग्य राहील.
मुलीला इंडिपेंडंट वूमन म्हणून वाढवायचे आणि नंतर आपल्या विचारानुसार लग्नबंधनात अडकवून टाकायचे याला काय अर्थ आहे..
त्यात तो हिरो जे हीरोइनसाठी त्याग करतो त्यानंतर त्यांचे लग्न झाले आहे की नाही हा मुद्दा फार क्षुल्लक बनून राहतो.
Saiyaara हिरोईन बरीचशी मृणाल
Saiyaara हिरोईन बरीचशी मृणाल ठाकूर सारखी वाटते. फारच फ्रेश चेहरा शोधला आहे. नजीकच्या काळात या जोडीची क्रेझ वाढत जाईल हे नक्की. ती कॅश करायला हवी. पर्सनली मला सुद्धा यांचा अजून एक चित्रपट एकत्र आलेला आवडेल. म्हणजे याचा सिकवेल नाही. वेगळी स्टोरी पण हाच जॉनर..
सैयारा तू तो बदला नहीं है
सैयारा तू तो बदला नहीं है
मौसम जरा सा रूठा हुआ है...
आज याची रिंगटोन सेट केली..
अलार्म टोनला सुद्धा लावायची ईच्छा झालेली. पण राहू दिले नाही तर बायको मारायची
मोहित सुरीचा ' कलयुग'
मोहित सुरीचा ' कलयुग' थेअटरमध्ये पाहिला होता. त्यातली गाणी खूप हिट होती त्यावेळी. गाण्यांमुळेच मी चित्रपट थेअटरमध्ये पाहिला होता. कोणे एके काळी चित्रपटातल्या प्रेमकहाण्या बघण्यात इंटरेस्ट होता.
' सैय्याराची' गाणी ऐकली. शीर्षक गीत आणि एक-दोन ऐकायला चांगली वाटली. ऐकताना मोहित सुरीच्या मागच्या चित्रपटातल्या गाण्यांचींच सरमिसळ वाटतात. हिरो आवडला सैय्याराचा.. आत्मविश्वासाने एन्ट्री केलीयं असं वाटतेय् अभिनय क्षेत्रात. अभिनेत्री पण छान दिसतेय. तरीही या घडीस चित्रपटातल्या प्रेमकहाण्या बघण्यात आणि बघून रडण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे थेअटरमध्ये बघणार नाही चित्रपट..!
पाहीला. थेअट्रातुन घरी गेले
पाहीला. थेअट्रातुन घरी गेले की लिही ते.
सामो, लिहा नक्की. उद्या सकाळी
सामो, लिहा नक्की. उद्या सकाळी उठल्यावर दात घासायच्या आधी पहिले मायबोली उघडून तुमचीच पोस्ट वाचेन
रुपाली,
रुपाली,
कलयुग मधील गाणी म्हणजे नुसती गाणी नव्हती तर क्रेझ होती. जिया धडक धडक कमालीचे गोड होतेच. पण आदत गाण्याने जनरेशन खाल्ली होती आमची
मागे इथे आतिफ अस्लम धाग्यात आदत गाण्याची काय क्रेझ होती ते लिहिले होते.
https://www.maayboli.com/node/55443
कलयुग चित्रपट मात्र दीड वेळाच पाहिला. पहिला हाफ फार क्युट लवस्टोरी होती. ती दोनदा पाहिली. उत्तरार्ध आता फारसा आठवत नाही.
शेवटी सैय्यारा पाहीला. कल्पना
शेवटी सैय्यारा पाहीला. कल्पना आवडली की सैय्यारा म्हणजे तारामंडलातील भटक्या तारा, अस्वस्थ शोध घेत रहाणारा तारा. पण माबुदो त्याचा संबंध नीटसा लागला नाही.
सिगरेट असूनही ऋन्मेष यांना कशी आवडली? 
अभिनेत्री खूप गोड आहे, अभिनेता रफ & टफ हिरो. सिगरेट पेटविण्याची पाठमोरी , मोटरसायकलवरुन एन्ट्री
ती एकदम फ्रेश आणि हा सेल्फ सेन्टर्ड पण महत्वाकांक्षी, स्वप्ने ऊराशी बाळगणारा, यंग मॅन. पैकी तो ज्या पावसात भिजत असतो त्याच पावसात ती अनवाणी पावलांनी भिजते ते गाणे आवडले कारण दोघांची मने त्या पावसात, दूर दूर असुनही त्या क्षणी जोडली जातात.
रोमँटिक आहे आवडला. मधे मधे जरा कंटाळा व रेस्टलेस्नेस जाणवला पण नवरा ऊठेना तो म्हणाला शेवट बघ आणि शेवट खूप सुरेख आहे खरा.
गाणी आवडली.
राहों पे तेरी मैं जाऊँ बिखर अगर साथ मेरे तू है हमसफ़र
मैं ना ये सोचूं है जाना किधर अगर साथ मेरे तू है हमसफ़र
तिचे पांढरे टॉप्स बघून मला वीट आला. खरच. अरे गुलाबी, लाल चुटुक, पोपटी , मोरपंखी किती सुंदर रंगात तिला नटविता आली असती. हे काय पांढरा एक्के पांढरा? आणि तो काळ्या टी शर्टमध्ये. त्याचे जाउ देत. पण तिला चांगला वेशभूषापट मस्ट होता. कथा सुंदर आहेच.
मला दोन्ही ठीक वाटले कारण मूळात सिनेमे फारसे आवडत नाहीत त्यामुळे, यात सिनेमांचा दोष नाही.
.
आणि क्रिश कपूरचा तो मित्र ज्याची एमेस्सी अजुन बाकी असते हाहाहा ..... त्या जोकला फार हसले.
.
ऋन्मेष तुमच्या अति कौतुकामुळे पठाण पाहीलेला व आता हा
अजुन एक - आश्रमात सुद्धा ती इतकी ग्लॅमरस दिसत असते सुंदरच कपडे घालत असते? रिअली? जरा तरी साडीत, थोडी उदास, मरगळलेली, दु:खी, एकाकी दाखवायची ना. पण कोरलेल्या भुवया, लिप्स्टिक, डूल, कपडे - सगळं तस्सच्या तसं अर्र्र्र!! कै च्या कै असे वाटलेले.
-----------------------------------------------------------------
>>>सैयारा तू तो बदला नहीं है
मौसम जरा सा रूठा हुआ है...
आज याची रिंगटोन सेट केली..
अरे वा!
>>>>>>>हो करतात ना. म्हणजे
>>>>>>>हो करतात ना. म्हणजे आधीच लग्न करून धोंडा मारण्यापेक्शा बरे असे असते. पाहिलेत, एकलेत. आणि हा प्रत्येकाचा चॅाइस आहे.
त्यात काय जज करण्यासारखे नाहीच.
+१
मस्त लिहिलेय सामो..!
मस्त लिहिलेय सामो..!
पहिला हाफ फार क्युट लवस्टोरी होती.>> हो.. आवडली होती मला ..!
उत्तरार्ध आता फारसा आठवत नाही.>> मला आठवतो .. हिरोईन मरते आणि हिरो तिच्या मृत्यूचा बदला घेतो.. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचा शोध घेताना उत्तरार्धात अमृता सिंग व्हीलन म्हणून चित्रपटात समोर येते.. परदेशातून ती रॅकेट भारतात चालवत असते.. पुढे तिची मुलगीच वाया जाते .. असं काही तरी आहे.
अगर साथ मेरे तू है हमसफ़र..
अगर साथ मेरे तू है हमसफ़र..
>>>
वाह सामो काय मस्त ओळी बोल्ड केल्या. या ओळी माझी पुढची रिंगटोन आहे. या दोघात कुठली ठेवावी कन्फ्युज होतो पण म्हटले आधी टायटलच ठेवूया..
या गाण्याची सुरुवात मस्त आहे. आधीचा तो क्रिकेट सीन ज्याचा वर लेखात उल्लेख आहे. त्या गाण्यात ही त्याच्या प्रेमात पडते. त्यामुळे बघायला सुद्धा छान वाटते.
....
पण माबुदो त्याचा संबंध नीटसा लागला नाही.
>>>
मी तर त्या सैय्यारा नावाचा संबंध शोधायच्या भानगडीत सुद्धा नाही पडलो. चित्रपटात ते काय अर्थ सांगतात यापेक्षा जास्त महत्वाचे की आपल्यापर्यंत काय पोहोचते
..
नवरा ऊठेना तो म्हणाला शेवट बघ आणि शेवट खूप सुरेख आहे खरा.
>>>
ग्रेट, म्हणजे त्यांना आवडला तर..
मोटरसायकलवरुन एन्ट्री Happy
मोटरसायकलवरुन एन्ट्री Happy सिगरेट असूनही ऋन्मेष यांना कशी आवडली? Happy
>>>
कारण पुढच्या एका सीनमध्ये सिगारेट हे एक व्यसन च आहे असे दाखवले आहे. हिरोईन ती हिरोला सोडायला सांगते आणि हिरो सुद्धा ती फेकतो. यामुळे जर युवा पिढी प्रभावित होत असेल तर हे चांगलेच आहे की
बाई दवे, मी तर शाहरुखच्या कुठल्याही चित्रपटाचे जरा जास्तच कौतुक करतो. ते माझे कर्तव्य समजतो. पठाण तसा ऍक्शन आवडणाऱ्यासाठी बरा होता. पण जवान भारी आवडलेला मला. फुल शिट्ट्या आणि टाळ्या. माझ्या मुलीसोबत पाहिलेला. ती सुद्धा हरखून गेली होती आणि म्हणालेली की पप्पा पहिल्यांदा मी एखाद्या पिक्चरला इतक्या टाळ्या आणि शिट्ट्या बघतेय. नंतर ती पुन्हा मैत्रिणीसोबत बघायला गेली आणि अगदी नाचून वगैरे आली. नंतर आम्ही घरात तो आणखी चार वेळा थिएटर सारखा माहोल करून पाहिला. पण तो आवडायला मुळात तश्या जॉनरचे चित्रपट आवडीचे असावे लागतील. उच्च अभिरुची असेल तर अवघड आहे. त्यामुळे तिथे त्या दुसऱ्या धाग्यावर शाहरुखला जवान बद्दल पुरस्कार दिलाच कसा असा वाद चालू आहे. कारण मायबोलीकरांची सरासरी अभिरुची उच्च आहे. हा उपरोध नाही तर actually असे आहे.
म्हणून या लेखाच्या शीर्षकात सुद्धा मी जेन झी लिहून ठेवले आहे. कारण मायबोलीकरांचे सरासरी वय सुद्धा जास्त आहे

त्यामुळे उगाच कोणाला रेको द्यायच्या फंदात पडू नये. आपल्याला आवडला तेवढेच लिहावे
शोध घेताना उत्तरार्धात अमृता
शोध घेताना उत्तरार्धात अमृता सिंग व्हीलन म्हणून चित्रपटात समोर येते..
>>>>
Yes.. अमृता सिंग आता आठवली. आणि आठवले आसपासचे बरेच काही..
काल मी इथल्या चर्चेमुळे कलयुगची दोन्ही गाणी ऐकली
Pages