सैयारा - A Gen Z intense Love Story !
काय जबरदस्त पिक्चर आहे !! काय गाणी आहेत, काय इमोशन आहेत, काय त्या हिरोचा स्वॅग आहे, आणि कसली गोड हिरोईन आहे.. फुल इन्टेन्स लव्हस्टोरी आहे.
चांगल्यावाईट चर्चा, पेड अनपेड रिव्यू, खर्या खोट्या रील्स.. सगळे एका बाजूला ठेवून या निमित्ताने फक्त चित्रपटाचे नाव जे सतत कानावर आदळत होते ते युट्यूबवर शोधून काल रात्री ट्रेलर पाहिला. सुसह्य वाटला. गाण्यांबद्दल बरेच ऐकून होतो म्हणून ती सुद्धा काल पहिल्यांदाच ऐकली. थोडा वेळ दिला स्वत:ला आणि पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटू लागली. सगळीच गाणी छान वाटल्याने बॅकग्राऊंड म्युजिक सुद्धा छानच असणार याची खात्री पटली तसे कुठलेही पुर्वग्रहदूषित मत न बनवता, मनाची पाटी कोरी करून चित्रपटाला जायचा निर्णय घेतला... आणि चित्रपटाने निराश केले नाही.
हिरोची एंट्री पाहिली, काय स्टाईल, काय स्वॅग.. बरेच दिवसांनी अशी एंट्री बघायला मिळाली. एखादा नावाजलेला स्टार, रणबीर किंवा शाहीद असता तर हवा झाली असती. पण हा पोरगा कोणाला कॉपी न करता आपली स्टाईल घेऊन आला होता हे विशेष. आणि पुढे ते चित्रपटभर जाणवत होते. कुठे अभिनयात चुकला नाही, कुठे बेअरींग सुटले नाही.
पहिल्याच गाण्यात एक उघड्यावर शो करताना त्याचे गाणे अर्धे झाल्यावर पाऊस पडायला सुरुवात होते आणि सर्वांची पळापळ होते, त्यानंतर (बरसात शब्दापासून सुरू होणार्या) अरीजीतच्या आवाजात हळूवार ओळी आहेत. त्याने त्या अश्या सादर केल्या आहेत की स्टार ईझ बॉर्न फिलींग येते.
त्यानंतर क्रिकेटचा एक सीन आहे ज्यात तो हिरोईनला प्रेरणा देताना दाखवला आहे, तो सुद्धा कमाल केला आहे. असे कॅरेक्टर असलेल्या व्यक्तीच्या कोणीही प्रेमात पडेल असे वाटते आणि प्रेमकथा विश्वासार्ह वाटायला सुरुवात होते.
हिरोईन सुद्धा कसली गोड आहे, जणू मृणाल ठाकूरचे कोवळे वर्जन. दोघांमधील केमिस्ट्री भारी होती. जेव्हा जेव्हा दोघे मिठी मारायचे डोळ्यात पाणी तरी यायचे किंवा अंगावर शहारा तरी यायचा. सिच्युएशनच तश्या होत्या.
मोहीत सुरीचा चित्रपट हे ऐकूनच गाण्यांबाबत अपेक्षा ठेवू शकतो. कलियुग, जेहर, राझ, आवारापण, आशिकी-२, एक व्हिलन, हाफ गर्लफ्रेंड वगैरे चटचट आठवणारी उदाहरणे. त्या त्या काळाला साजेशी अन गाजलेली गाणी... आता यात सैयाराची सुद्धा भर पडली म्हणू शकतो.
गाणी युट्यूबवर बघताना आवडलेली, पण चित्रपटात नेक्स्ट लेव्हलला गेली असे वाटले. मूड सेट केला. चित्रपटात एकदोन जागा अश्या होत्या जिथे गाणी टाकायला संधी होती पण तिथे गाणी आली नाहीत तर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटले. थोडक्यात ईतरवेळी जी गाणी आपण पुढे ढकलतो ती ईथे हवी होती असे वाटले. पण या चित्रपटाला म्युजिकल हिट म्हणून आशिकी जुना किंवा नवीन यांच्या पंक्तीत बसवू नका. तिथल्या हिरोंमध्ये अभिनयक्षमतेच्या मर्यादा होत्या. त्यांना गाण्यांनी वाचवले होते. ईथे मात्र इमोशन आधी अभिनयातून आले आणि मग त्याला बॅकग्राऊंड म्युजिकची जोड लाभली आहे.
ईंटरव्हल होता होता जी ट्रॅजेडी समोर आली तेव्हा आतापर्यंत जी लव्हस्टॉरी एंजॉय करत होतो त्यात रडगाणे सुरू होईल म्हणत अरे देवाऽऽ असे झाले. पण शेवटपर्यंत तसे काही झाले नाही, किंबहुना होणारही नाही याची खात्री वाटली. कारण लव्हस्टोरी जेव्हा अशी पॅशनेट असते तेव्हा त्यात आपले प्रेम जाताना बघून रडले जात नाही, तर लढले जाते. यातले हिरोचे कॅरेक्टर तसेच दाखवले होते त्यामुळे चित्रपट पॉझिटीव्ह नोटवरच संपायचा होता आणि तसेच झाले. ते रील मध्ये रडणार्या लोकांना पकडून हाणायला हवे. उगाच सदमा किंवा माहेरची साडी असल्यासारखे चित्र जिथे तिथे तयार झाले आहे.
आणि या उलट ते चित्रपट न बघताच नेपोकिड म्हणून टिका करणारे...
ऋषी, शशी, करिश्मा, करीना, सनी, संजय, अक्षय, अभिषेक, अजय, काजोल, हृतिक, सलमान, सैफ.......लिस्ट संपता संपणार नाही. पुर्ण फिल्म ईंडस्ट्री नेपोकिडसनी भरली आहे आणि आजवर त्यांनीच आपल्याला भरमसाठ आनंद दिला आहे.
फरक ईतकाच की ते सारे सुदैवी होते. कारण त्यांनी आजच्या काळात जन्म घेतला नाही. तेव्हा आवडत्या कलाकारांच्या मुलांचे कौतुकाने स्वागत करायची पद्धत होती. आता लोकं संशयाची चाळणी घेऊन तयारीत असतात. नेपोकिड हा शब्द हिणवण्यासाठीच वापरला जातो. त्यांच्यातील कलागुण जोखण्याआधीच त्यांच्यावर वशिल्याचा तट्टू असा शिक्का मारला जातो. जो एखाद्या आलिया भट किंवा श्रद्धा कपूरला आपल्या कामाने पुसावा लागतो. पण एखाद्या अनन्या पांडेला स्ट्रगल करावे लागते. बरीच टीका झेलावी लागते.
आता तिच्याच भावंडांपैकी एक आला आहे या सैयारा चित्रपटातून. हा हिरो मात्र पहिल्याच फटक्यात आवडला आणि त्याचा पिक्चर सुद्धा आवडला.
पण पिक्चरला जाण्याआधी अजून एका पूर्वग्रहदूषित मतापासून स्वतःला वाचवणे गरजेचे होते. ते म्हणजे हा फक्त "जेन झी" जनरेशनला आवडणारा पर्यायाने उथळ चित्रपट आहे. आपल्या जनरेशनला हा रुचणार नाही. जसे काही आपले बालपण एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट बघण्यात गेले आहे.
पण हा चित्रपट दर्जेदारच आहे. आणि आजच्या जनरेशनची विचारपद्धती आणि दृष्टीकोण बदललेला का असेना, प्रेम ही भावना कालातीत आहे हे दर्शवणारा आहे. आज हे तेव्हा जाणवले जेव्हा माझ्या डावीकडे बसलेली एक मराठी फॅमिली आणि उजवीकडे बसलेला कॉलेजगोईंग मुलींचा ग्रूप हा चित्रपट एकसारखेच एन्जॉय करत होते.
चित्रपटाच्या शेवटी सैय्यारा टायटल साँग वाजते. पण ते फिमेल वर्जन आहे. मेल वर्जनमध्ये जो एक दर्द जाणवतो तो ईथे नाहीसा होतो. त्या जागी हे गाणे श्रेया घोषालच्या गोड आवाजात वाजते. ज्यात एक प्रकाराचा सुकून आहे. आणि हे कमाल आहे. कारण याने चित्रपटात जो पॉजिटीव्ह शेवट दाखवायचा आहे तो मूड अचूक पकडला जातो. यासाठी म्हणून त्या रील्समध्ये रडणार्या जनतेला पकडून आणखी हाणावेसे वाटले.
सुदैवाने आमच्या थिएटरमध्ये कोणी रडले नाही. पण मी मात्र शेवटचे पुर्ण गाणे आणि श्रेयनामावली बघत जागेवरच बसून होतो. त्या निमित्ताने लोकं माझ्याकडे देखील हा रडतोय का म्हणून बघून जात होते. मला जेन झी समजत होते. हे एकंदरीतच बरे वाटत होते 
- ऋन्मेऽऽष
ते डिमेन्शिआ वगैरे वाचून या
ते डिमेन्शिआ वगैरे वाचून या सिनेमाच्या वाट्याला गेले नाहीये कदाचित जाणारही नाही. हा आलाय आमच्याकडे थेट्रात.
तुमची एकूण आवड भिकारच आहे
तुमची एकूण आवड भिकारच आहे
सामो.. मलाही त्याचीच भीती
सामो.. मलाही त्याचीच भीती वाटली होती. पण निर्धास्त राहा. हृदय पिळवटून निघत नाही.
मराठीत स्माईल प्लीज चित्रपट आहे. या दोन्हीत बरेच साम्य आहे. ते नंतर लिहितो...
काहीच माहीत नाही या
काहीच माहीत नाही या पिक्चरबद्दल. सुरूवातीला बराच पीआर आहे असे वाटले - आणि ते खरे असावे. एकही गाणे ऐकलेले नाही.
"आजच्या पिढीची म्युझिकल लव्ह स्टोरी" म्हणता येईल असा पिक्चर बर्याच वर्षांत आलेला नाही. कयामत से कयामत तक, मैने प्यार किया, डीडीएलजे, थोडाफार दिल तो पागल है, कहो ना प्यार है - हे लक्षात आहेत. त्या त्या वेळेस शाळेतून नुकतीच कॉलेज मधे गेलेली पिढी ते पिक्चर उचलून धरते. (यातले कयामत से कयामत तक व डीडीएलजे वेगळ्या लीग मधे आहेत - इतर त्या लेव्हलचे नाहीत. मैप्याकि तर भिकार आहे. पण हे सर्व गाजले आहेत हे नक्की). तसा पिक्चर कित्येक वर्षांत आलेला आठवत नाही. हा तो आहे का माहीत नाही, पण याला तसा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न दिसतोय. त्या पीआरवाल्यांचा. ऋन्मेषचा नव्हे
मलाही पीआरच वाटला. पण छान
मलाही पीआरच वाटला. पण छान लव्हस्टोरी बघायला आवडतेच, मग ती जेन झीची असो की बेबी बुमर्सची. ओटीटीवर आला की पाहीन.
पीआरच असणार कारण शोकांतिका
पीआरच असणार कारण शोकांतिका नाहीये. असे रडण्याचा प्रश्नच नाही.
(हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, नोट करून ठेवतो)
पण बनवला आहे इंटेन्स. त्या जनरेशनला जास्त भिडला असेल तर त्यात मात्र नवल नाही. मला स्वतःला बघताना त्या वयात जायला झाले.. किंबहुना पिक्चर असेच एन्जॉय केले पाहिजे.. काठावर राहून नाही
सोशल मीडियावर काही दिवस या
सोशल मीडियावर काही दिवस या चित्रपटाचे नाव झळकताना दिसत आहे.
पिक्चर बघणे सोडूनच दशके लोटली (काही अपवाद)
तुम्ही छान भावनिक होऊन लिहिता
फा >> अरे त्यावेळेस आशिकी २
फा >> अरे त्यावेळेस आशिकी २ ची पण अशीच हवा झाली होती. त्यामुळे हिरोला काही फार भाव नाही मिळाला. श्रद्धा कपूर मात्र हिट झाली. सगळ्यांत जास्ती फायदा अर्जित सिंगला झाला
(माझा एक नंबर नावडता गायक. सगळ्या गाण्यांची वाट लावतो)
धन्यवाद बेफी..
धन्यवाद बेफी..
मलाही तुमचा बरेच दिवसांनी चित्रपट चर्चेत प्रतिसाद बघून आश्चर्यच वाटले
@ धनि
<<<<माझा एक नंबर नावडता गायक. सगळ्या गाण्यांची वाट लावतो>>>
माझेही मत आधी असेच होते त्याच्याबद्दल नंतरच्या काळात बदलले. म्हणजे काही गाण्यांची वाट तो आजही लावतो पण काही गाण्यात वेगळाच अनुभव देतो. ती वेचावीत..
त्याच्या एका इंटरव्यूची ही क्लिप बघा, ज्यात तो म्हणत आहे की त्याचा आवाज आधी असा नव्हता. पण तो लोकांना न आवडल्याने आणि हा असा आवडू लागल्याने त्याने आपल्या गळ्यावर अत्याचार करून आवाजाचे टेक्चर असे केले.. हे सांगताना त्याला होणारे दुःख जाणवते यात.. वाईट वाटते.
https://youtube.com/shorts/nb5EwNutkP8?si=natcED81ZSa4RqAv
ऋन्मेऽऽष छान review . तुझा
ऋन्मेऽऽष छान review . तुझा review वाचून मलाही मूवी बघावासा वाटतोय .
त्या एका नोटबूक चित्रपटाला
त्या एका नोटबूक चित्रपटाला किती वेळा पिळवटून हिंदी रीमेक बनवतील देव जांए.
इतका काह्री खास नाहिये… काह्र्री मुली वेड्या सारख्या रडत होत्या, मला वाटले माझेच वय झाले. पण सिनियर बायका काय आज्या पण डोळे डबडबून समजेना झाले.
सामी धन्यवाद.
सामी धन्यवाद.
आशिकी २ किंवा तेरे नाम वगैरे हे रडवे चित्रपट होते. दर्द बेचो टाईप. मला तरी नव्हते आवडले. हा तसा नाहीये. हा मॅजिकल आहे. आपल्या आयुष्यात असा किंवा अशी कोणीतरी हवे अशा इन्व्हॉलमेंटने तुम्ही लव्हस्टोरी बघत असाल तर हा तुमच्यासाठी आहे..
मी पाहिला. एक्सलंट असा नाही
मी पाहिला. एक्सलंट असा नाही म्हणता येणार. पण दोघांनी छान काम केलेय, छान दिसलेय, गाणी छान आहेत आणि डोक्यात वाजत राहतात.
आशिकी २ & रॉकस्टार चं मिश्रण विशेष जेंव्हा तिच्या साठी तो ठरलेले शोज रद्द करून फिरतो तेंव्हा.
हिरोईन भलतीच नाजूक आहे, हात लावला तर वळ उमटतील अशी. हिरो फार आवडला, त्याचे केस, देहबोली, वावर, हाता वरचा टॅटू & डोळे मस्स्त आहेत.
संवाद्फेक ठीक आहे.
छान review.
छान review.
ह्यात १ सीन आहे. मुलीचे आई &
ह्यात १ सीन आहे. मुलीचे आई & बाबा तिला हवापालट म्हणुन हिलस्टेशन ला स्वतः न्यायचे सोडून काय काय कारणं बोलत बसतात & नेक्स्ट सीन ला हिरो सोबत बाईक वर हनी मून ला धाडतात दही चिनी खाऊ घालून. ती दोघं पण पुर्ण वसूल करतात खाल्लेली दही चिनी


असे आई बाप भारताच्या कोणत्या कोपर्यात असतात बरे?
हिरोची एंट्री पाहिली, काय
हिरोची एंट्री पाहिली, काय स्टाईल, काय स्वॅग.. बरेच दिवसांनी अशी एंट्री बघायला मिळाली. एखादा नावाजलेला स्टार, रणबीर किंवा शाहीद असता तर हवा झाली असती. पण हा पोरगा कोणाला कॉपी न करता आपली स्टाईल घेऊन आला होता हे विशेष. आणि पुढे ते चित्रपटभर जाणवत होते. कुठे अभिनयात चुकला नाही, कुठे बेअरींग सुटले नाही.
नशीब, अभिनयाबाबतीत काका आणि चुलत बहिणीवर गेला नाही तो.
तशी काकाने पण पहिल्या चित्रपटात (आग हि आग ) अशीच हवा केली होती.
आशू
आशू
आई बाबांना आपला प्रपंच असेल तर तो सोडून मुलीला दोन महिने कुठे घेऊन जाणे अवघड, म्हणून ते बहुधा नैनीतालमधील नातेवाईकाकडे ठेवायचा विचार करतात.
त्या दोघांना एकत्र बघून तिच्या आईवडिलांची पहिली रिएक्शन काळजीचीच होती. पण नंतर तिच्या आजाराचे निदान होण्याआधीच तिच्या आईने माझ्या मुलीशी लग्न करशील का म्हणून त्याला विचारून झाले असते आणि तो सुद्धा तयार दाखवला आहे. म्हणजे तसे त्याला आपला जावई म्हणून स्वीकारून झाले असते.
आणि आजार उघड झाल्यावर कोणी आपल्या मुलीची आयुष्यभर काळजी घेईल असा मुलगा कोण आईबाप नाकारतील??
बाकी लग्नाआधी हनीमून/फिजिकल रिलेशन म्हणजे काहीतरी अभद्र हे वाटायचा काळ आता सगळीकडे राहिला नाही.
मला तर ते दही भरावयाचा सीन सुद्धा आवडला. आपल्या मुलीला असे त्याच्यासोबत पाठवताना तो आपलेपणाचा विश्वास निर्माण करणारा सीन गरजेचा होता.
जेव्हा तिची आई म्हणते लग्न करशील का आणि तो लगेच तयार होतो, तेव्हा हिरोईनच म्हणते की आपले स्वप्न पूर्ण करायच्या आधी उगाच घाई करायची बिलकुल गरज नाही.
मला तर सगळ्यांचे विचार सुलझे हूए आणि आपल्या जागी योग्य वाटले.
अज्ञान बालक,
अज्ञान बालक,
चंकी पांडे अभिनयात एव्हरेज असला तरी कॅरेक्टर धमाल होता. आता कपिल शर्मा शो मध्ये वगैरे येतो तेव्हा ते जास्त जाणवते, पण तेव्हाही पडद्यावर त्याच्यातला तो खट्याळपणा दिसायचा. मला ऍक्च्युली आवडायचा तो.
अज्ञान बालक या नावाचे शीर्षक
अज्ञान बालक या नावाचे शीर्षक असणाऱ्या सदस्याला येथेच पाच वर्षे झाली आहेत. इतरत्र काय ते माहीत नाही.
अज्ञानी थेरडा हे शीर्षक कोण कोण ठेवू शकतात हे बघायला मजा येईल
अज्ञान बालक या नावाचे शीर्षक
अज्ञान बालक या नावाचे शीर्षक असणाऱ्या सदस्याला येथेच पाच वर्षे झाली आहेत. इतरत्र काय ते माहीत नाही.
अज्ञानी थेरडा हे शीर्षक कोण कोण ठेवू शकतात हे बघायला मजा येईल
नवीन Submitted by बेफ़िकीर on 28 July, 2025 - 13:37
अज्ञान बालक या आयडी मध्ये आपणास नक्की काय खटकले ते आपल्या प्रतिक्रियेवरून नीट समजले नाही, तसेच माझ्या सदस्यता काळाचा आणि आपल्या कुत्सित प्रतिक्रियेचा नक्की काय संबंध आहे ते पण समजले नाही.
तसेच मी जी प्रतिकिया दिली ती तुमच्या लेखावर नव्हती
आपल्या मायबोलीवरील जेष्ठतेचा पूर्ण मान राखून सांगू इच्छितो कि "अज्ञानी थेरडा" किंवा "अतिज्ञानी थेरडा "हा आयडी तुम्ही आनंदाने घेऊ शकता, येथे कोणालाही त्यावर ऑब्जेक्शन नसेल.
सैयारामय वातावरण आहे घरात
सैयारामय वातावरण आहे घरात कालपासून..

रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर, उठता बसता.. खाता पिता.. मोबाईलवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर आलटून पालटून मी सध्या नॉनस्टॉप सैयाराची सगळी गाणी ऐकत आहे...
शेवटी बायको आता मला म्हणाली की तू काय वेडा झाला आहेस का
गाणी आणि त्यामागचे इमोशन भिडल्याने नक्कीच झालो आहे..
पण अजून तिने मला गाणी बंद करायला लावली नाहीयेत.. उलट ती सुद्धा आता तोडमीमोडकी गुणगुणू लागली आहे
या सिनेमाबद्दल बरंच ऐकून आहे.
या सिनेमाबद्दल बरंच ऐकून आहे.
पण थेट्रात जाऊन बघणार नाही.
ऋतुराज +123
ऋतुराज +123
>>> माझ्या सदस्यता काळाचा आणि
>>> माझ्या सदस्यता काळाचा आणि आपल्या कुत्सित प्रतिक्रियेचा नक्की काय संबंध
नाही हो, अजिबात कुत्सित नाही माझी प्रतिक्रिया! क्षमस्व! फक्त गंमत म्हणून लिहिले होते.
साधारणपणे अज्ञान (नी) बालक दोन वर्षाचे असते म्हणून गंमतीने लिहिले.
कृपया राग नसो
>>> अज्ञानी थेरडा" किंवा
>>> अज्ञानी थेरडा" किंवा "अतिज्ञानी थेरडा "हा आयडी तुम्ही आनंदाने घेऊ शकता, येथे कोणालाही त्यावर ऑब्जेक्शन नसेल.
हे मी लिहिलेल्या अवांतरामुळे निर्माण झालेले अवांतर असून त्यावर प्रतिक्रिया देताना मूळ धागाकर्ते व प्रशासन यांची आधीच माफी मागतो
अज्ञानी थेरडा (/डी) व अतिज्ञानी थेरडा (/डी) या महत्वाच्या पदव्यांचे येथे अनेक दिग्गज लाभार्थी आहेत. त्यातील काहींना बारा बारा वेळा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे, पण ते स्वतःच्याच आय डी चा तेरावा घालून अजूनही त्याच भाषेत बोलत आहेत
ऋतुराज, पियू .. अर्थात ज्याची
ऋतुराज, पियू .. अर्थात ज्याची त्याची चॉईस.
पण ऍक्च्युली हा पिक्चर "कुछ फिल्म थिएटर के लिए बनी होती है" कॅटेगरी मधील वाटला मला. मी घरी गाणी सुद्धा हेडफोन लाऊन किंवा मोठ्या आवाजात ऐकतो. आवाज असा घुमला, माहोल बनला की मजा येते
एकच गाणे अर्जित चे दिसते आहे.
एकच गाणे अर्जित चे दिसते आहे. ते सोडून बाकी ऐकून बघतो.
त्याच्या एका इंटरव्यूची ही
त्याच्या एका इंटरव्यूची ही क्लिप बघा, ज्यात तो म्हणत आहे की त्याचा आवाज आधी असा नव्हता. पण तो लोकांना न आवडल्याने आणि हा असा आवडू लागल्याने त्याने आपल्या गळ्यावर अत्याचार करून आवाजाचे टेक्चर असे केले.. हे सांगताना त्याला होणारे दुःख जाणवते यात.. वाईट वाटते
>>
मलाही मोनोटोनस आवाजामुळे अरिजीत ची बरीच गाणी जाम डोक्यात जायची. थोडी आवडायची. पण ही क्लिप पाहिल्यावर कळतंय की जे विकतंय ते देण्यासाठी त्याला बरीच दिव्य करावी लागली आहेत. रिस्पेक्ट...
रिस्पेक्ट > +७८६
रिस्पेक्ट > +७८६
तो माणूस म्हणून सुद्धा खूप चांगला आणि डाऊन टू अर्थ वाटतो.
मागे धागा होता हा माझा..
सोनू निगम v/s अरिजित सिंग
https://www.maayboli.com/node/61325
तुमचा सुद्धा प्रतिसाद आढळला तिथे
>>> माझ्या सदस्यता काळाचा आणि
>>> माझ्या सदस्यता काळाचा आणि आपल्या कुत्सित प्रतिक्रियेचा नक्की काय संबंध
नाही हो, अजिबात कुत्सित नाही माझी प्रतिक्रिया! क्षमस्व! फक्त गंमत म्हणून लिहिले होते.
साधारणपणे अज्ञान (नी) बालक दोन वर्षाचे असते म्हणून गंमतीने लिहिले.
कृपया राग नसो
नवीन Submitted by बेफ़िकीर on 28 July, 2025 - 20:14
राग नाही सर , तसेच आपण क्षमा मागू नये, आपण येथे ज्येष्ठ आहात , तसेच मी आपल्या लेखनाचा चाहता आहे, कदाचित माझाच गैरसमज झाला असावा, क्षमस्व.
Pages