सैयारा - A Gen Z intense Love Story !
काय जबरदस्त पिक्चर आहे !! काय गाणी आहेत, काय इमोशन आहेत, काय त्या हिरोचा स्वॅग आहे, आणि कसली गोड हिरोईन आहे.. फुल इन्टेन्स लव्हस्टोरी आहे.
चांगल्यावाईट चर्चा, पेड अनपेड रिव्यू, खर्या खोट्या रील्स.. सगळे एका बाजूला ठेवून या निमित्ताने फक्त चित्रपटाचे नाव जे सतत कानावर आदळत होते ते युट्यूबवर शोधून काल रात्री ट्रेलर पाहिला. सुसह्य वाटला. गाण्यांबद्दल बरेच ऐकून होतो म्हणून ती सुद्धा काल पहिल्यांदाच ऐकली. थोडा वेळ दिला स्वत:ला आणि पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटू लागली. सगळीच गाणी छान वाटल्याने बॅकग्राऊंड म्युजिक सुद्धा छानच असणार याची खात्री पटली तसे कुठलेही पुर्वग्रहदूषित मत न बनवता, मनाची पाटी कोरी करून चित्रपटाला जायचा निर्णय घेतला... आणि चित्रपटाने निराश केले नाही.
हिरोची एंट्री पाहिली, काय स्टाईल, काय स्वॅग.. बरेच दिवसांनी अशी एंट्री बघायला मिळाली. एखादा नावाजलेला स्टार, रणबीर किंवा शाहीद असता तर हवा झाली असती. पण हा पोरगा कोणाला कॉपी न करता आपली स्टाईल घेऊन आला होता हे विशेष. आणि पुढे ते चित्रपटभर जाणवत होते. कुठे अभिनयात चुकला नाही, कुठे बेअरींग सुटले नाही.
पहिल्याच गाण्यात एक उघड्यावर शो करताना त्याचे गाणे अर्धे झाल्यावर पाऊस पडायला सुरुवात होते आणि सर्वांची पळापळ होते, त्यानंतर (बरसात शब्दापासून सुरू होणार्या) अरीजीतच्या आवाजात हळूवार ओळी आहेत. त्याने त्या अश्या सादर केल्या आहेत की स्टार ईझ बॉर्न फिलींग येते.
त्यानंतर क्रिकेटचा एक सीन आहे ज्यात तो हिरोईनला प्रेरणा देताना दाखवला आहे, तो सुद्धा कमाल केला आहे. असे कॅरेक्टर असलेल्या व्यक्तीच्या कोणीही प्रेमात पडेल असे वाटते आणि प्रेमकथा विश्वासार्ह वाटायला सुरुवात होते.
हिरोईन सुद्धा कसली गोड आहे, जणू मृणाल ठाकूरचे कोवळे वर्जन. दोघांमधील केमिस्ट्री भारी होती. जेव्हा जेव्हा दोघे मिठी मारायचे डोळ्यात पाणी तरी यायचे किंवा अंगावर शहारा तरी यायचा. सिच्युएशनच तश्या होत्या.
मोहीत सुरीचा चित्रपट हे ऐकूनच गाण्यांबाबत अपेक्षा ठेवू शकतो. कलियुग, जेहर, राझ, आवारापण, आशिकी-२, एक व्हिलन, हाफ गर्लफ्रेंड वगैरे चटचट आठवणारी उदाहरणे. त्या त्या काळाला साजेशी अन गाजलेली गाणी... आता यात सैयाराची सुद्धा भर पडली म्हणू शकतो.
गाणी युट्यूबवर बघताना आवडलेली, पण चित्रपटात नेक्स्ट लेव्हलला गेली असे वाटले. मूड सेट केला. चित्रपटात एकदोन जागा अश्या होत्या जिथे गाणी टाकायला संधी होती पण तिथे गाणी आली नाहीत तर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटले. थोडक्यात ईतरवेळी जी गाणी आपण पुढे ढकलतो ती ईथे हवी होती असे वाटले. पण या चित्रपटाला म्युजिकल हिट म्हणून आशिकी जुना किंवा नवीन यांच्या पंक्तीत बसवू नका. तिथल्या हिरोंमध्ये अभिनयक्षमतेच्या मर्यादा होत्या. त्यांना गाण्यांनी वाचवले होते. ईथे मात्र इमोशन आधी अभिनयातून आले आणि मग त्याला बॅकग्राऊंड म्युजिकची जोड लाभली आहे.
ईंटरव्हल होता होता जी ट्रॅजेडी समोर आली तेव्हा आतापर्यंत जी लव्हस्टॉरी एंजॉय करत होतो त्यात रडगाणे सुरू होईल म्हणत अरे देवाऽऽ असे झाले. पण शेवटपर्यंत तसे काही झाले नाही, किंबहुना होणारही नाही याची खात्री वाटली. कारण लव्हस्टोरी जेव्हा अशी पॅशनेट असते तेव्हा त्यात आपले प्रेम जाताना बघून रडले जात नाही, तर लढले जाते. यातले हिरोचे कॅरेक्टर तसेच दाखवले होते त्यामुळे चित्रपट पॉझिटीव्ह नोटवरच संपायचा होता आणि तसेच झाले. ते रील मध्ये रडणार्या लोकांना पकडून हाणायला हवे. उगाच सदमा किंवा माहेरची साडी असल्यासारखे चित्र जिथे तिथे तयार झाले आहे.
आणि या उलट ते चित्रपट न बघताच नेपोकिड म्हणून टिका करणारे...
ऋषी, शशी, करिश्मा, करीना, सनी, संजय, अक्षय, अभिषेक, अजय, काजोल, हृतिक, सलमान, सैफ.......लिस्ट संपता संपणार नाही. पुर्ण फिल्म ईंडस्ट्री नेपोकिडसनी भरली आहे आणि आजवर त्यांनीच आपल्याला भरमसाठ आनंद दिला आहे.
फरक ईतकाच की ते सारे सुदैवी होते. कारण त्यांनी आजच्या काळात जन्म घेतला नाही. तेव्हा आवडत्या कलाकारांच्या मुलांचे कौतुकाने स्वागत करायची पद्धत होती. आता लोकं संशयाची चाळणी घेऊन तयारीत असतात. नेपोकिड हा शब्द हिणवण्यासाठीच वापरला जातो. त्यांच्यातील कलागुण जोखण्याआधीच त्यांच्यावर वशिल्याचा तट्टू असा शिक्का मारला जातो. जो एखाद्या आलिया भट किंवा श्रद्धा कपूरला आपल्या कामाने पुसावा लागतो. पण एखाद्या अनन्या पांडेला स्ट्रगल करावे लागते. बरीच टीका झेलावी लागते.
आता तिच्याच भावंडांपैकी एक आला आहे या सैयारा चित्रपटातून. हा हिरो मात्र पहिल्याच फटक्यात आवडला आणि त्याचा पिक्चर सुद्धा आवडला.
पण पिक्चरला जाण्याआधी अजून एका पूर्वग्रहदूषित मतापासून स्वतःला वाचवणे गरजेचे होते. ते म्हणजे हा फक्त "जेन झी" जनरेशनला आवडणारा पर्यायाने उथळ चित्रपट आहे. आपल्या जनरेशनला हा रुचणार नाही. जसे काही आपले बालपण एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट बघण्यात गेले आहे.
पण हा चित्रपट दर्जेदारच आहे. आणि आजच्या जनरेशनची विचारपद्धती आणि दृष्टीकोण बदललेला का असेना, प्रेम ही भावना कालातीत आहे हे दर्शवणारा आहे. आज हे तेव्हा जाणवले जेव्हा माझ्या डावीकडे बसलेली एक मराठी फॅमिली आणि उजवीकडे बसलेला कॉलेजगोईंग मुलींचा ग्रूप हा चित्रपट एकसारखेच एन्जॉय करत होते.
चित्रपटाच्या शेवटी सैय्यारा टायटल साँग वाजते. पण ते फिमेल वर्जन आहे. मेल वर्जनमध्ये जो एक दर्द जाणवतो तो ईथे नाहीसा होतो. त्या जागी हे गाणे श्रेया घोषालच्या गोड आवाजात वाजते. ज्यात एक प्रकाराचा सुकून आहे. आणि हे कमाल आहे. कारण याने चित्रपटात जो पॉजिटीव्ह शेवट दाखवायचा आहे तो मूड अचूक पकडला जातो. यासाठी म्हणून त्या रील्समध्ये रडणार्या जनतेला पकडून आणखी हाणावेसे वाटले.
सुदैवाने आमच्या थिएटरमध्ये कोणी रडले नाही. पण मी मात्र शेवटचे पुर्ण गाणे आणि श्रेयनामावली बघत जागेवरच बसून होतो. त्या निमित्ताने लोकं माझ्याकडे देखील हा रडतोय का म्हणून बघून जात होते. मला जेन झी समजत होते. हे एकंदरीतच बरे वाटत होते 
- ऋन्मेऽऽष
नवर्याला आज परत सैय्यारा
नवर्याला आज परत सैय्यारा पहायचा होता. मी डोक्याला हात लावायचे बाकी ठेवले. मला नाही पुन्हा बघायचा. एकदाच ओके आहे. म्हणे रोमॅन्टिक मुव्हीज फार आवडतात.
याला 'दिल चाहता है' आवडला नव्हता. मग दिल चाहता है काय रोमँटिक नव्हता? माझं डोकच फिरलं होतं तेव्हा. थेअट्रात सगळी मजा बिघडवुन टाकलेली. कंटाळा आल्यासारखा बसला होता.
त्यांची आणि माझी आवड बरेच
त्यांची आणि माझी आवड बरेच सारखी आहे वाटते.
सैयारा दुसऱ्यांदा मलाही बघायचा आहे. पण बायकोच्या भीतीने जात नाहीये. ओटीटी वर आल्या आल्या बघणार.
आणि दिल चाहता है पहिल्यांदा पाहिलेला तेव्हा मलाही फार खास वाटला नव्हता. पण दुसऱ्या वेळेपासून जास्त जास्त आवडत गेला. किंबहुना मी महिन्याभरापूर्वीच तो कित्येक वर्षांनी कितव्यांदा तरी पाहिला. आणि तेव्हाही जास्त आवडला. म्हणजे अक्षय खन्नाची स्टोरी मला लहानपणी बोर झालेली. ती सुद्धा आवडली यावेळी..
हे सैयारा गाण्याचे किशोर
हे सैयारा गाण्याचे किशोर कुमार वर्जन ऐका..
धमाल आहे. प्रेमात पडाल
https://www.instagram.com/reel/DMkOzj1pI48/?igsh=MTg2ZTVqNzh6cW1mdQ==
नवर्याने परत मुलीला व मला
नवर्याने परत मुलीला व मला सैय्याराला नेले. म्हणजे मला जायचे नव्हते. मुलीने पहील्यांदा पाहीला. दोघी अर्ध्या तासात उठुन मॉलला गेलो. नवर्याने परत पाहीला.
इतका अॅव्हरेज/ ऑर्डिनरी सिनेमा कसं काय लोक २ वेळा बघतात - नवल वाटते. मला ओ येणे बाकी होते. कदाचित मूळ मुदलात सिनेमे आवडत नसल्याने असेल पण सैयारा परत पहाणे, फार पेनफुल झालेले.
DCH आवडत नाही?????????????
DCH आवडत नाही?????????????
सामो भारी आहे..
सामो भारी आहे..
काल लेकीची मैत्रीण जेवायला घरी आलेली. मी एकटाच होतो त्यामुळे फुल volume Saiyaara गाणी लावली होती.
त्यावर लेकीची मैत्रीण म्हणाली की तिचे वडील सुद्धा हा बघून आले, त्यांनाही आवडला आणिंते सुद्धा याचे सारखे कौतुक करत राहतात.
मला फार आश्चर्य वाटले नाही कारण लेकीच्या सर्व मैत्रिणीमध्ये हिचेच वडील मला असे वाटतात ज्यांच्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये जनरेशन गॅप नाहीये. अगदी कूल राहतात. तुमचे मिस्टर सुद्धा याच कॅटेगरी मधील असावेत
इतका अॅव्हरेज/ ऑर्डिनरी
इतका अॅव्हरेज/ ऑर्डिनरी सिनेमा कसं काय लोक २ वेळा बघतात - नवल वाटते. मला ओ येणे बाकी होते. >>> सामो
खरंच, वैतागवाडी डबल बघणे म्हणजे..
१ मुव्ही आलाय अंधेरा..५ मिन लाऊन कंटाळा आला.. काही मुव्हिज मधे आधीच वाईब येते. खौफ आवडला होता मला. अधुरा ही आवडला. हा कुणाला आवडला तर कळवा, प्रयत्न करेन..
पठाण & बॅड न्युज पण सोडले होते १० मिन. मधे..
बॅड न्यूज वाचून गूगल केले
बॅड न्यूज वाचून गूगल केले असता आठवले तो पिक्चर सोडा मी ट्रेलर सुद्धा बघायला गेलो नाही तर पोस्टर बघूनच सोडला होता. असल्या चित्रपटांना कुठे या पंक्तीत बसवता...
बाकी पठाण कसा सोडणार. तो तर शाहरुखसाठी थेटर मध्ये गेलो होतो. कलाकृती म्हणून तो ग्रेट नव्हता. पण फिल्म इंडस्ट्रीला बॉयकट बॉलीवूड मोहिमेचा फटका बसत होता तेव्हा शाहरुखच्या पठाणनेच वाचवले होते.
सैयारा मात्र क्रेझ असलेला मूवी आहे.. तशीच आवड हवी.. तरच त्यातले इमोशन भिनणार.. इट्स मॅजिकल
पठाण वॉज व्हेरी भयाण.. तुला
पठाण वॉज व्हेरी भयाण.. तुला आवडते ते सर्वांनाच झेपते असे नाही ऋ, कधी समजणार तुला?
पण एक्ट्रॉ ओर्डीनरी काहीच नव्हते..
सैयारा १ टाईम वॉच होता आवडला डोळे सुखावले
बरोबर आशू
बरोबर आशू

त्याचप्रकारे जे तुम्हाला भयाण वाटेल ते सर्वांनाच तसे वाटत नाही
माझा काही हट्ट नाही की सर्वांनी मला आवडते त्याचे गुणगान गा.. ते काम मी स्वतःच आवडीने करतो
मी सुद्धा पठाण एकदाच पाहिला आहे. माझ्याही मते त्यातला शाहरुख काढला तर तो एव्हरेज मूवी आहे
सैयारा मात्र पुन्हा बघणार
Saiyaara आला लोकहो नेटफ्लिक्स
Saiyaara आला लोकहो नेटफ्लिक्स वर...
त्वरा करा त्वरा करा...
मी आज फुल थिएटर माहोल बनवून बघणार .. बदाम बदाम बदाम
काय तो हिरो, तिच्या अंगावर
काय तो हिरो, तिच्या अंगावर खेकसतो "लिख गाना" म्हणुन. सिगरेट काय ओढतो, माचो इमेज फक्त. पण पुढे बदललेला दाखवलाय. ती मात्र आश्रमातही बाहुलीसारखी, सतेज, मेक अप केलेली.
Pages