शेतीवर आयकर का नको?

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2009 - 19:35

...............................................................................
या लेखापुर्वीची चर्चा अभ्यासण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................................................

------------------------------------------------------------------------------------------
मी नरेंद्र गोळे यांच्या मताशी शतप्रतिशत सहमत आहे. ( संदर्भ )
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकिय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
घरात पोटभर खायला नसुनही, मिशिवर ताव देवुन पाटीलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरुप समाजासामोर येईल.
आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी,दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये आणण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगुस चाललाय्,त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमता कशी,कुठुन आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडुन ते इतरांनाच जास्त अडचनीचे आहे.
आयकर लावल्यास गरिब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुनी बेंबीच्या देठापासुन ओरडत असेल तर त्यांना "माझं काय होईल',असे म्हनायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहीजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावु नये,नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल,
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही,कारण...
ज्याला आय नाही त्याला कर नाही,ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढोनपिढ्या लाचारासारखे जिवन जगन्यापेक्षा आर्थिक सुदृढ होवुन आयकरदाता शेतकरी म्हणुन सन्मानाने जगायला नक्किच आवडेल.
गंगाधर मुटे.
..............................................................................
२६-१२-२००९

बागायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
------------------------------------------------------------------------
=============================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
-----------------------------------------------------
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-------------------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
-------------------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
------------------------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
------------------------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००

----------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००

-------------------------------------------------------
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
- गंगाधर मुटे

=========================================

...........................................
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
............................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा

बंदिस्त अर्थव्यवस्थेमधे बजाज, टाटा यांना आपले उत्पादनाचे मूल्य ठरवायला परवानगी दिली गेली होती. उद्योगांना सरकार सवलती देत नाही असे कुणी सांगितले ? गुजरातमधे टाटांना मिळत असलेल्या सवलतींबद्दलही बोला कि एकदा...

तुमच्या विविध उत्तरांमधे जबरदस्त विरोधाभास आहे आणि त्यामुळेच शेतक-यांना आयकर का असू नये याचे उत्तर तुमच्याच लिखाणात आहे.

शेतक-यांची शेती फायदातच चालत असती तर धनडांडग्यांनी कधीच कंपन्या काढून शेती करायला सुरूवात केली असती. आज मॉल्समधून वाट्टेल ते दर ठेवायची मुभा मिळाल्यावर मात्र शेतक-यांना करार करायला भाग पाडून अन्नधान्याचा काळाबाजार सुरू झाला आहे आणि त्यांच्या संरक्षणार्थ सरकार कुठूनही काहीही आयात करायला तयार नाही.

प्रत्यक्ष शेतक-याला किती भाव मिळतो असे वाटते आपल्याला ?
तुम्ही तरी तुमचा व्यवसाय सोडून शेतीकडे वळाल का ?

- बंदिस्त अर्थव्यवस्थेमधे बजाज, टाटा यांना आपले उत्पादनाचे मूल्य ठरवायला परवानगी दिली गेली होती.

मी पूर्वीच लिहिले आहे. शेतकरी जोपर्यन्त सरकारकडून मोठ्या प्रमाणात सवलती घेत आहेत तोपर्यन्त सरकार त्यान्ना आपल्या मालाचे मूल्य ठरवण्याचा अधिकार देणार नाही. उद्या समजा तसा अधिकार मिळाला तरी देशभर पसरलेल्या कोट्यावधी शेतकर्‍यान्मध्ये भावाबद्दल एकमत कसे होणार? महाराष्ट्राचे उदाहरण घ्या. महाराष्ट्रात उस पिकवणारे २० लाख शेतकरी आहेत असे गृहीत धरू या. इतक्या शेतकर्‍यान्चे भावाबद्दल एकमत होईल का? ते तसे होण्यासाठी भाव ठरवण्याचा अधिकार असलेली एखादी मध्यवर्ती संस्था पाहिजे, अन्यथा एकमत होणार नाही. सध्या हे काम सरकार करते. एखाद्या शेतकर्‍याने टनाला ५ हजार रू. भाव मागितला व त्याला तो तसा मिळाला तर दुसरा एखादा शेतकरी टनाला ६ हजार मागेल. त्यातून शेवटी गोन्धळ उडेल. सर्वात महत्वाचे म्हणजे साखर कारखाने आपल्याला जो भाव परवडेल तोच भाव देणार. शेवटी सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. नाही केला तर साखर १०० रू किलो होईल. अशा परिस्थितीत सरकार एकतर उसाच्या किम्मतीवर नियन्त्रण ठेवेल किंवा परदेशातून कमी भावाने साखर आयात करेल. शेवटी सर्व काही मूळपदावर येईल.

- उद्योगांना सरकार सवलती देत नाही असे कुणी सांगितले ? गुजरातमधे टाटांना मिळत असलेल्या सवलतींबद्दलही बोला कि एकदा...

उद्योगान्मुळे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो. उद्योगाच्या वाढीला मर्यादा नसल्यामुळे उत्पादन व रोजगार मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. शेतीचे क्षेत्रात वाढ शक्य नसल्यामुळे रोजगार व उत्पादन फारसे वाढू शकत नाही. पुण्यात मगरपट्ट्यात IT Park झाल्यामुळे १ लाखाहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत व मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे व तिथला व्यवसाय वाढीला खूप वाव आहे. जर तिथले शेतकरी आपली जमीन IT Park ला न देता शेती करत बसले असते तर हे शक्य नव्हते. उद्योगान्ना काही सवलती देताना काही अटी पण पाळाव्या लागतात (दरवर्षी काही ठराविक प्रमाणात निर्यातीचे उत्पन्न मिळवावे लागते, रोजगार निर्माण करावे लागतात इ.). शेतकर्‍यान्ना सवलती देताना अशा कोणत्याही अटी नसतात. (आम्हाला मते द्या ही अघोषित अट असते.).

- तुमच्या विविध उत्तरांमधे जबरदस्त विरोधाभास आहे आणि त्यामुळेच शेतक-यांना आयकर का असू नये याचे उत्तर तुमच्याच लिखाणात आहे.

कृपया माझ्या लिखाणातली उदाहरणे द्यावीत.

- शेतक-यांची शेती फायदातच चालत असती तर धनडांडग्यांनी कधीच कंपन्या काढून शेती करायला सुरूवात केली असती.

उद्योगामध्ये शेतीपेक्षा जास्त फायदा होतो. याचा अर्थ असा नाही ही शेतीत फक्त तोटाच होतो व कणभरसुद्धा फायदा होत नाही. शेतीच्या फायद्यात सर्व सवलतीन्ची किम्मत मिळवली तर net फायदा कळेल.

- तुम्ही तरी तुमचा व्यवसाय सोडून शेतीकडे वळाल का ?

माझ्यात शेती करण्याचे कौशल्य असेल व आवड असेल तर शेती करायला माझी ना नाही.

विज फुकट असल्यामुळे व फुकट मिळणार्या गोष्टिचे महत्व कळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी होऊ नये म्हणून मुद्दामच खेड्यात कमी वेळ विज दिलि जाते
>> ह्या वाक्यानं माझी चांगलीच करमणूक झाली आहे!
ह्यासाठी मुंबईपासून सुरुवात करायला हवी खरतर - रात्रभर दिवे चालू असतात - अगदी बिल्डींगवर लावलेल्या माळांपासून ते बंद दुकानांपर्यंत..

deleted

<< ह्यासाठी मुंबईपासून सुरुवात करायला हवी खरतर - रात्रभर दिवे चालू असतात - अगदी बिल्डींगवर लावलेल्या माळांपासून ते बंद दुकानांपर्यंत..

- ही वीज वापरणार्‍यान्ना बिल भरावे लागते का ही वीज फुकट मिळते? >>
.
महाराष्ट्रात शेतकर्‍यांना विज फुकटात नाही मिळत. आपण अशोकरावांना फोन करुन विचारु शकता.

deleted

सध्या विजेचे दर असे आहेत.(प्रती युनिट)
१) बीपीएल ग्राहक.................. ०.६६
२) घरगुति वापर ................... २.३५
३) सार्वजनिक नळ
पाणी पुरवठा..................... १.६०
४) कृषी ............................... १.३७
५) उद्योग ............................. ३.५०
६) स्मशानभुमी...................... २.४०

बुवा तुम्हाला विरोधाभास हवा असल्यास थोडक्यात सांगतो.. तुमचे उत्तर पहा..
१. शेतीमालाच्या भावाला संरक्षण देणार का ?
- संरक्षण द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? कापसाला रू. ३००० प्रति क्विन्टल हे संरक्षण नाही का? इतर कोणत्या व्यवसायामध्ये अनेक सवलती देऊन वर भावाला संरक्षणही दिले जाते?
२. एक रूपया इतकेही उत्पादनमूल्य नसलेले कोल्ड्रिक्सचे विक्री दर मात्र (मोठ्या बाटलीचे ) चाळीस रूपये हे ज्यांना चालते त्यांच्यासाठी नफ्यावर आधारीत शेतमालाची विक्री ही संकल्पना मान्य होईल का ?
- शेतमालाची विक्री ही इतर कोणत्याही उत्पादनाप्रमाणे नफ्यावर आधारीतच आहे. कोणताही शेतकरी वर्षानुवर्षे तोटा सहन करणार नाही. नफा असल्याशिवाय शेतकरी शेती इतके वर्षे करणारच नाही.
कोल्ड्रिन्क ही जीवनावश्यक गोष्ट नाही. ती चैनीची गोष्ट आहे. कोल्ड्रिन्कचा उत्पादनखर्च एक रूपयाहून कमी असेल असे मला वाटत नाही. ते बनविताना पाणी, पाण्याची शुध्दत्ता, इतर ingradients, bottling, कामगारान्चे वेतन, तयार मालाची वाहतूक, राज्यशासन, नगरपालिका व केन्द्रशासनाचे कर, उत्पादन करणार्‍या कंपनीचा नफा, मधल्या १-२ डीलरचा नफा, जकात अशा अनेक बाबींमुळे किम्मत जास्त असणारच. ही चैनीची व जीवनावश्यक गोष्ट नसल्यामुळे सरकारने किंमतीत हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही.
एखाद्या वस्तूची विक्रीची किम्मत ही फक्त निव्वळ व प्रत्यक्ष उत्पादनखर्चावर अवलंबून नसते. त्यात इतर अनेक अप्रत्यक्ष खर्च धरावे लागतात. छोट्या हॉटेलात १५-२० रू. ला मिळणारा मसाला दोसा मोठ्या हॉटेलात ४०-५० रू. ला मिळतो कारण त्याच्या किंमतीत उत्पादनखर्चाबरोबर इतर खर्चही मिळविलेले असतात (उदा. हॉटेल चे फर्निचर, A/C, वेटरचा पोषा़ख, वेटरचा पगार इ.). छोट्या हॉटेलात इतर खर्च कमी असतात त्यामुळे पदार्थांची किम्मतही कमी असते.

३. साखर दोमशे रूपये किलो हा दर चालेल का ?
- साखरेचा दर दोमशे रूपये किलो कसा होईल? जर दोन्शे रुपये प्रति किलो होत असेल व इतर देशात ४०-५० रु. प्रतिकिलो असेल, तर सरकार साखर त्या भावाने परदेशातून आयात करेल.
४. एकीकडे टोमॅटोला दर मिळत नाही म्हणून रस्त्यावर टोमॅटो फेकून द्यायचे प्रकार घडलेले आहेत त्याचवेळी मॅगी हॉट अँड स्वीटचे दर मात्र कमी होत नाहीत. शेतक-यांनी टोमॅटो खुल्या बाजारात न विकता बाहेरच्या देशात अथवा स्वतःच प्रक्रिया उद्योग उभारून बाटलीबंद उत्पादन म्हणून विकावेत का ?
- मॅगी हॉट अँड स्वीट अनेक महिने टिकतो. त्यामुळे उत्पाकदाला त्याचे भाव कमी करण्याचे कारण दिसत नाही. टोमॅटो काही दिवसच टिकतात. शेतकार्‍यांकडून घेतल्यावर ग्रा़हकांकडे पोचेपर्यंत अजून काही दिवस जातात. टोमॅटोचे किती दिवस आयुष्य शिल्लक आहे, त्याला मागणी किती आहे व पुरवठा किती आहे (मागणीच्या मानाने पुरवठा जास्त असल्यास भाव पडणारच), त्याची क्वालिटी इ. गोष्टींवर भाव ठरतो.
५. ज्यांना आम्ही इथे मरतोय असे वाटतेय त्यांनी ज्याप्रमाणे आपण अमेरिकी दराप्रमाणे स्वतःचे वेतन घेतो त्याप्रमाणेच अमेरिकेप्रमाणेच शेतमालाचे भाव इथल्याही शेतक-यांना मिळावेत यासाठी पाठिंबा द्यायला काय हरकत आहे ? अमेरिकेमधे फ्रेश फूड ही लक्झरी आहे असे म्हणतात.. आपल्याला ती खूपच स्वस्तात उपलब्ध होते आहे..
- भारतात अन्नधान्य अमेरिकेपेक्षा स्वस्त नाही. अमेरिकेत अन्नधान्याची किम्मत अमेरिकन जीवनमानाप्रमाणे तसेच महिन्याच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. महिन्याला २००० डॉलर मिळवणार्‍याला ग्रोसरीसाठी महिन्याच्या उत्पन्नाच्या १० टक्क्याहून अधिक खर्च येत नाही. भारतात बहुतेकांचा ग्रोसरीचा खर्च महिन्याच्या उत्पन्नाच्या १० टक्क्याहून कितीतरी अधिक आहे.
भारतात किती व्यक्ती अमेरिकी दराप्रमाणे स्वतःचे वेतन घेतात?
६. सोने चार हजारावरून अठरा हजारांवर गेले, सर्व वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली, वेतनातली व्रूद्धीही चार आकडी पगारावरून सहा आकड्यापर्यंत गेली मग आजही दोन रूपये दराने आपल्याला भाजीची जुडी मिळावी का ?
- दोन रूपये दराने आपल्याला भाजीची जुडी मिळते का? वीजेचे दर आता जवळपास ६-७ रू. प्रति युनिट झाले आहेत, पण शेतकर्‍यान्ना वीज अत्यल्प दराने (काही राज्यात तर फुकट) मिळते. शेतकर्‍यान्ना मिळणार्‍या भावातही भरपूर वाढ झाली आहे. त्यात त्यान्चे अप्रत्यक्ष उत्पन्नही मिळवायला पाहिजे (वेळोवेळी मिळालेली कर्जमाफी, अत्यल्प दराने मिळणारी वीज व वीजदरवाढीपासून सुटका इ.).
याप्रमाणे शेतमालाचे भाव मुक्तपणे ठरवू दिल्यास कोण आरडाओरडा करेल ? देश अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण व्हावा असे धोरण असते त्याचे काय ? पुढा-यांकडे बोट दाखवून शेतक-यांवर आयकर लादण्याआधी या सर्व प्रश्नांची गांभीर्याने मिळायला हवीत. विनोदासाठी इतर अनेक विषय आहेत.. अंबानींनी गोदावरी खो-यात सरकारला कसे लुटले याचे विश्लेषण वर्तमापत्रांमधून आलेले आहे. पुढा-यांना पैसे कमावण्यासाठी शेतीच हवी असे काही नाही. इतरही धंदे दाखवून ते तूट दाखवू शकतात. आणि आयकर बसवल्यास आहेत ते लोकही शेती करणार नाहीत त्याचे काय ?

किरण व गंगाधर यांच्याशी सहमत.

बुवा, आर्क, तुम्हाला शेतीचा किती अनुभव आहे? शेतकर्‍याला दूध, अंगणातला भाजीपाला इ. फुकट मिळते वाचून फारच करमणूक झाली.

शेतकरी जोपर्यन्त सरकारकडून मोठ्या प्रमाणात सवलती घेत आहेत तोपर्यन्त सरकार त्यान्ना आपल्या मालाचे मूल्य ठरवण्याचा अधिकार देणार नाही. >>> का नाही? बाकी देशात तर सवलती देऊन सुद्धा करता येते.

शेतीचे क्षेत्रात वाढ शक्य नसल्यामुळे रोजगार व उत्पादन फारसे वाढू शकत नाही.>>>>
शेती व त्यावर आधारित उद्योग योग्य रितीने केले तर रोजगार व उत्पादन चांगलेच वाढते.
शेती, त्याचा जोडधंदा दुग्धोद्योग, फूड प्रोसेसिंग, कॅनिंग इ. बरेच उत्पादन वाढू शकते, फार काय, तुम्हाला सुपरमार्कॅट/अन्य ठिकाणांहून जे धान्य मिळते ते शेतीतून होते, पण ते चढ्या भावात विकल्यावर पैसे शेतकर्‍याला न मिळता भलत्यालाच मिळतात.
ऑस्ट्रेलियतील एक बार्ली उगवणारा शेतकरी चायनाला ती विकून मिलियन्स कमावतो.

आणि आत्ताच भारतातले काही अन्नधान्याचे भाव ऑस्ट्रेलियाच्या जवळपास पोचले आहेत. पुढे बघा अजून काय होते ते.

- तुम्ही तरी तुमचा व्यवसाय सोडून शेतीकडे वळाल का ?

माझ्यात शेती करण्याचे कौशल्य असेल व आवड असेल तर शेती करायला माझी ना नाही.
>>>>>

ह्यावरूनच कळते की तुम्हाला शेतीबद्दल किती माहिती आणि अनुभव आहे ते. आणि खेड्यापाड्यात गेल्यावर शेतकर्‍यांच्या घरातली किती माणसे लठ्ठ, सुखवस्तू दिसतात? त्यांची हाडाळलेले शरीर, फाटके तुटके कपडे अंगावर घातलेली मुले इ. दिसत नाही का कोणाला? काही शेतकरी सुखवस्तू असतीलही, पण बहुतांशी गरीब आहेत.

शेतक-यांच्या नव्या पिढीत आता शेती करण्याचे धाडस राहिलेले नाही. मगरपट्ट्यामधे शेती विकून इमारती बांधून पैसा मिळवला याचे कौतुक करण्याऐवजी शेतीमधे हा पैसा शेतक-याला का मिळत नाही याचा विचार व्हायला हवा. शेतक-याला शेतीचे माल ठरविण्ञाचा अधिकार नाही. तो अधिकार अडते, दलाला, व्यापारी आणि सरकार यांना आहे. असा कोणता उद्योग आहे ?
अशा पद्धतीने पिकाऊ जमिनीमधे कारखाने आणि इमारती व्हायला लागल्या तर अन्नधान्यासाठी आपल्याला परदेशावर अवलंबून रहावे लागेल त्याचे काय ?
ज्या देशात ८० टक्के लोक शेती करत होते आणि आजही बहुतांश लोकांचा परंपरागत व्यवसाय शेती हाच आहे त्या देशात मालाची साठवणूक, वाहतूक असे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने उभारणे आवश्यक होते. उद्योगांच्या मागणीवरून शहरांना जोडनारे हमरस्ते सरकार नागरिकांकडून टोल घुण उभारत असते . ही उद्योगांची गरज असते. आठवा नारायणमूर्तींचे उद्गार..!
टाटांना सवलतीचे कर्ज, भांडवलासाठी मदत आणि अत्यल्प दरात जमीन गुजरात सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे... ती का ? या सवलती पाहील्या तर टाटांनी स्वतःच्या खिशातूखिकाय घातले हा प्रश्न उभा राहतो. इंडिकाच्या वेळीही स्वदेशी कारला प्रोत्साहन म्हणून जकातमाफी आणि विक्रीकरात सवलत असे निर्णय झालेले आठवत असतीलच..
टाटांची ईंडिका काय किंवा नॅनो काय हा टिकाऊ माल आहे तेव्हा असल्या सवलती कशासाठी ?

एकीकडे तुम्ही म्हणता शेतक-यांचा माल नाशवंत आहे त्याचवेली तुम्ही म्हणता शेती नफ्यात आहे. नाशवंत मालामुळेच शेतक-यांची अडवणूक होते. शरद जोशींना विचारा. टोमॅटोला भाव इतका कमी मिळत होता कि त्यात वाहतूकखर्च देखील निघायला तयार नव्हता तेव्हा त्यांनीच टोमॅटो फेकून द्या पण व्यापा-यांना देऊ नका असे आंदोलन केले होते. हॉ गोष्ट आहे पंधरा वर्षांपूर्वीची... त्यानंत कांदाफेक आंदोलन झाले.
लक्षात घ्या ट्रकला दिलेले भाडेही मिळत नव्हते म्हणतोय मी. तुमच्या भाषेत उत्पादनख्रच धरलाच नाही. उत्पादनखर्चाव्यतिरिक्त मेहनताना, पीक येईपर्यंतचे मजुरांचे वेतन, शेतक-यांचे पारंपारिक ज्ञान वापरले गेल्याने त्याचे मूल्य हाही खर्च मिलायला हवा. ... बी बियाणे, खत, कीटकनाशके, ट्रॅक्टरचे भाडे, बैलजोड्या इ. खर्च, पीक काढका, साठवणूक, नांगरणी इ. आवश्यक खर्च हे त्याच्या खिशातून गेलेले असतात..
हे सर्व खर्च भाव न मिळाल्याने वाया गेले. आता मला साध्या भाषेत सांगा.. याला नफा म्हणणार कि तोटा.
वादासाठी वाद घालू नये ही नम्र विनंती.
शेतीतले तुम्हाला कळत नाही हे तुम्ही स्वतः कबूल केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी आकडेवारी कामाला येत नाही हे ही तुम्हाला ठाऊक आहे.
आता जर वीज, पाणी आकारून कर देखील द्यायचा असेल तर शेतक-याला आपल्या मालाचा भाव ठरवण्ञाचा अधिकार असला पाहीजे. सरकारने त्याला साठवणुकीची सुविधा उपलब्ध करूजन द्यायला पाहीजे. आपल्याला नाही का रस्त्याच्या कडेला दिवे, सांडपाणी सुविधा, बगीचा, नाट्यग्रूह, सिनेमाग्रूह, सरकारी इस्पीतळ, सरकारी शाळा, कॉलेजेस इ. इ. सुविधा मिळत ?
तेव्हा शेतीलमाला साठवणूक सुविधा मिळायला ना नसावी. अशा प्रकारे जे काही खर्च शेतक-यांना येणार आहेत ते त्याला नफ्यसहित मिळेपर्यंत त्याला विक्रीची सक्तीची करता येणार नाही. काय म्हणता ?
आणि शेतमालावर नियंत्रण ठेवायचे असतील तर घर या वस्तूचे वाढलेले भाव नियंत्रित करायला हवेत, कपडा या वस्तूचे भाव नियंत्रित करायला हवेत. आयटी मधे वाढलेले भाव नियंत्रिक करायला हवेत. कारण वाढलेल्या असमतोलानेच तर घराचे भाव वगैरे नियंत्रणाच्या बाहेर गेलेले आहेत..

बघा पटतेय का ?

<< मुटे साहेब,
हे स्मशानभुमीचं दर जास्त का आहे, जमल्यास अधिक माहिती लिहा. >>

प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायची पुढार्‍यांना सवय असते असे म्हणतात म्हणुन कदाचित अंधाराची सक्त गरज असावी.

आणि रोजगारन्बिर्मितीबद्दल बोलत असाल तर इत्केच म्हणेन शेंडा आणि बुडखा याची तुलना होऊ शकत नाही. शेती बुडवून बेरोजगार निर्माण करायचे आणि त्यांना चाकरमानी बनवून रोजगारनिर्मितीबद्दल टि-या बडवायच्या... हा काय फडणविसी कारभार आहे का ??
आणि तसे असेलच तर अन्नधान्यापासून दारू बनवायचा निर्णय चांगला होता कि.
रोजगारनिर्मिती झाली असती, शेतक-यांना भाव मिलाला असता.. मग ख्सुहाल कर बसवा . कोण नाही म्हणतेय ??

या निर्णयाला विरोध का बरे करायचा ? आपला काय संबंध त्यांच्यात लुडबूड करायचा ?

बुवा

पुण्यात आपण राहतो. पुण्याला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांद्वारे पाणीपुरवठा होतो. या धरणातील ८० टक्के पाणी शहराच्याहपाणीपुर्वठ्यासाठीच खर्च होते. पाटबंधारे खात्याकडून आपण खात्री करू शकता. उन्हाळ्यात तर शंभर टक्के पाणी फक्त शरासाठीच राखीव ठेवावे लागते. जादाचा पाऊस झाला तरच खाली पानी सोडले जाते. आपण फक्त पाण्याचेच पैसे भरतो हे लक्षात घ्यावे.

धरण बांधण्याचा खर्च, त्यावरील व्याज, पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि त्यावरील खर्च, पाण्याच्या साठवणुकीचा खर्च हा आजही आपल्याला मोफत आहे.. काय म्हणता ?

तेव्हां आपल्यासाठी स्वस्तात अन्नधान्य पिकवणा-या शेतक-याच्या का मागे लागलाय ?

नफ्यात शेती असतानाही आत्महत्या करणारे विदर्भातील शेतकरी हा तर मग संशोधनाचाच विषय ठरेल ना ?
आपल्या खानदानात कुणाला आयटी, सॉफ्टवेअरचे ज्ञान नव्हते. पण पैसा मिळतोय म्हटल्यावर आपल्याकडे ते कौशल्य आले ना ?

शेतीत पैसा आहे तर हे कौशल्य प्राप्त करायला कुणी बंदी केली कळेल का वुवा ?

भेटूयात पुन्हा असंच..

एका नावेत चाललेल्या एका पंडिताची आणि नावाड्याची गोष्ट उगाचच इथे आठवली.

deleted

बुवा,
शेतीला २ तर्‍हेनी विजपुरवठा केला जातो.
१) पहीला पर्याय - प्रती युनीट प्रमाणे
२) दुसरा पर्याय - प्रती अश्वशक्ती/महिना या प्रमाणे.
त्यामुळे माझ्या लिखानात कुठेही विरोधाभास नाही.
-----------------------------------------------------
माझ्या आणि तुमच्या दरासंबधी जी थोडीफार तफावत दिसते त्याला एम.एस.ई.बी जबाबदार आहे.
त्यांच्या लिखानात आणी मुद्रणात भोंगळपणा आहे असे सिद्ध करणारा आहे.
---------------------------------------------------------------------------------
मागणीपेक्षा पुरवठा खूप वाढला तर भाव पडतात हा अर्थशास्त्राचा नियम आहे
मग हा अर्थशास्त्राचा नियम माहित असुनही त्याला अधिक पिकवायचा सल्ला देणे म्हणजे त्याच्या दफनासाठी कफन तयार करणेच नाही का ?.
अशा गुन्ह्याला ईश्वर , अल्ला , किंवा येशुतरी माफ करेल काय ?

मला शेतीतले फारसे कलत नाही, पण मी फायद्यात चाललेली शेती पाहिलेली आहे.जे शेतकरी उपलब्ध resourcesचा intelligently वापर करतात, त्यांची शेती तोट्यात नाही.
...
माझा वरील पोष्टमधील मुद्दा मी थोडा वेगळ्या शब्दात मांडते म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते कळेल.
१.cost of living कमी असल्यामुळे शेतकर्‍याचे उत्त्पन्न आणि शहरी उत्पन्न ह्याचे तुलना होउ शकत नाही असे मला वाटते.
२.उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर शेतकर्‍यानी cost of living कमी करण्यासाठे केला तर त्यांचे आयुष्य जास्त सुखकर होउ शकते.
३.survival of the fittest haa rule सगळीकदेच लागतो. शेतकर्‍यानाही त्यातुन सुटका नाही.i know this is rude ,but this is the truth.

काय बुवा

अहो विरोधाभास दाखवून दिलाय कि तुम्हाला..
आता पुन्हा बघा एकीकडे तुम्ही म्हणता शेती फायद्यात चालते(च)... तोटा नाही(च). आणि हे वाक्य बघा

टोमॅटोला भाव इतका कमी मिळत होता कि त्यात वाहतूकखर्च देखील निघायला तयार नव्हता

मागणीपेक्षा पुरवठा खूप वाढला तर भाव पडतात हा अर्थशास्त्राचा नियम आहे.

इथे तुम्ही नियम शिकवताय. म्हणजे तोता झाला कि नफा हे सांगत नाही बुवा ! ( इथे बुवा उद्गारवाचक)

एक काम करा. पुन्हा पहिल्यापासून वाचा. मी काहीही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही.. शहराच्या पाणीपुरवठ्याबद्दलही लिहीलयय बघा मी.. ते तेव्हढं गाळू नका राव.

आर्क

.उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर शेतकर्‍यानी cost of living कमी करण्यासाठे केला तर त्यांचे आयुष्य जास्त सुखकर होउ शकते.

हे आपण त्यांना का सांगायचे. आपण स्वतःपासून नओ सुरूवात करायला ? मुळा मुठेच्या पिण्याच्या पाण्यात आख्ख्या शहराचे मैलापाणी सोडून देनारे आपण खालच्या गावातील लोक तेच पाणी पितात हा तरी विचार करतो का ?

एआरसीजी,
शेतीविषयावर चर्चा करतांना ग्रामिण उत्पन्नाची आणि शहरी उत्पन्नाची तुलना करण्याचे काहीही प्रयोजन नाही तशी चर्चा विषयांतरास कारणीभुत ठरत असते.
चर्चेचा मुख्य केंद्रबिंदु एकंदरितच शेती किफायतशीर आहे किंवा नाही असा आहे.तुम्ही म्हनता ''मी फायद्यात चाललेली शेती पाहिलेली आहे " म्हणजे नेमके काय ? तो तसे म्हणाला असेच ना ? तुम्ही त्याची शहानिशा केली? त्याचा इनकम सोर्स फक्त शेतीच होता की अजुन काही? इनकमसोर्सचे sources काय कमी आहेत ? भुरट्या चोरांपासुन त खिशेकापुपर्यंत,दारु विकण्यापासुन ते अफु-गांज्या विक्रीपर्यंत,अवैध सावकारीपासुन ते स्वस्त धान्य दुकान चालविण्यापर्यंत,पुढारीगिरिपासुन ते पुढार्‍यांची चमचेगिरि करण्यापर्यंत.
हे सर्व उद्योग प्रचंड नफ्याचे आहेत.
पण हा व्यवसाय करुन आम्ही माया जमवतो असे सांगण्याची या सर्व आधुनिक भामट्यांची अजिबात हिंमत नाही. त्यासाठी त्यांना शेतीची गरज पडत असते.
शेतीचा विषय निघाला की हेच भामटे सर्वात समोर येवुन शेती खुपच परवडते अशी बोंब ठोकतात.
म्हणुन एआरसीजी, उदाहरणच द्यायचे तर नांव आणि पत्त्यासहित द्याना,जावुन पाहता येईल.

deleted

बुवाजी,आता जरा हे समिकरण बघा.
- शेती: १३१८ तासांपुढे - रू. १८० प्रति अश्वशक्ती/महिना (मागणि अधिभार)
-- रू. १८० प्रति अश्वशक्ती/महिना गुनिला पाच अश्वशक्ती गुनिला बारा महिने.
= 180.00 X 5 X 12 + मागणी अधिभार
= 10,800.00 + मागणी अधिभार
------------------------------------------------------------------
विजेचा वार्षिक खर्च १०८०० रु. पेक्षा जास्त असतानाही बागायती कापसाचा उत्पादन खर्च काढतांना आपण विजेचा वार्षिक खर्च फक्त ४००० रु. एवढाच धरलेला आहे आणि तरिही तोटाच.

शेती दरवर्षी तोट्यात जाते, शेतीतून उत्पादनखर्चही निघत नाही असा इथे काहीजणांचा दावा आहे. असे असूनसुद्धा शेतकरी दरवषी तेच पीक कसे काढतो व ते पीक काढण्याचा खर्च कुठून मिळवतो? जर ओळिने अनेक वर्षे उत्पादनखर्चसुद्धा भरून निघत नसेल तर परत पुढच्या वर्षी ते पीक काढण्याचा खर्च कोण देते?
म्हनुन तर शेतकरी वारंवार कर्जबाजारी होतो.

deleted

धरण बांधण्याचा खर्च, त्यावरील व्याज, पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि त्यावरील खर्च, पाण्याच्या साठवणुकीचा खर्च हा आजही आपल्याला मोफत आहे.. काय म्हणता ?

Infrastructure चा खर्च विविध करातून वसूल केला जातो. उदा. व्यवसाय कर, आयकर, टोल, पाणीपट्टी, सेवाकर, पेट्रोलवरील सरचार्ज इ.

maaf kara .. sahamat nahee. ektara bahutansh dharane british kalatil aahet anee tyancha udddesha ha sheti hota. Bhakra Nangal he dharana matra shetisathee zale ani tyacha karanasathee vaparale gele. Parinaam ? Panjab hariyana hee rajye shreemant aaheta. phakta shetivar.

dharanacha kharcha apan deto he statement tapasun pahave.
jar ha kharch vasul kela jat hota tar itakee varshe aapla arthasankalp tuticha kasa hota ? anee itakee varshe tuticha arthasankalpa chalavunahee pudhachya varshasathee paisa kuthun yet hotaa ?

deleted

Pages