शेतीवर आयकर का नको?

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2009 - 19:35

...............................................................................
या लेखापुर्वीची चर्चा अभ्यासण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................................................

------------------------------------------------------------------------------------------
मी नरेंद्र गोळे यांच्या मताशी शतप्रतिशत सहमत आहे. ( संदर्भ )
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकिय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
घरात पोटभर खायला नसुनही, मिशिवर ताव देवुन पाटीलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरुप समाजासामोर येईल.
आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी,दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये आणण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगुस चाललाय्,त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमता कशी,कुठुन आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडुन ते इतरांनाच जास्त अडचनीचे आहे.
आयकर लावल्यास गरिब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुनी बेंबीच्या देठापासुन ओरडत असेल तर त्यांना "माझं काय होईल',असे म्हनायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहीजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावु नये,नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल,
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही,कारण...
ज्याला आय नाही त्याला कर नाही,ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढोनपिढ्या लाचारासारखे जिवन जगन्यापेक्षा आर्थिक सुदृढ होवुन आयकरदाता शेतकरी म्हणुन सन्मानाने जगायला नक्किच आवडेल.
गंगाधर मुटे.
..............................................................................
२६-१२-२००९

बागायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
------------------------------------------------------------------------
=============================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
-----------------------------------------------------
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-------------------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
-------------------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
------------------------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
------------------------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००

----------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००

-------------------------------------------------------
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
- गंगाधर मुटे

=========================================

...........................................
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
............................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< वार्षिक १०८०० रु. भरून प्रत्यक्षात किती वीज वापरली जाते? तेवढीच वीज जर एखाद्या उद्योगाने वापरली तर त्यान्ना किती बिल भरावे लागेल? >>
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?
बुवाजी, जर शेतकर्‍याला उद्योगापेक्षा कमी दराने विज मिळत असेल तर त्यामुळे शेतकर्‍याच्या घरावरची कवेलु सोन्याची नाही बनत. किंवा त्यामुळे शेती फायद्याचीही होत नाही.
फक्त शेतीत येणारा तोटा थोडा कमी होतो, बस एवढेच.

आपल्या अर्थसंकल्पाबद्दल...

शेतीमधे तूट ञेऊनही शेतकरी पुढच्या वर्षी पीक कसे घेतो हा प्रश्न आपण उपस्थित केल्याने मला हा प्रश्न विचारावा लागला..

दोन्हीचे उत्तर एकच आहे.. कर्ज !

धरणे या कर्जातून बांधली गेलीत ज्याला जागतिक बँकेकडून अर्थ सहाय्य मिळालेले आहे. जपान वगैरे प्रगत राष्ट्रांकडून अर्थ सहाय्य मिळालेले आहे. या धरणांच्या बांधणीचा आणि तोपर्यंत जमा झालेल्या महसुलाचा हिशेब एकदा जुळवून पहा... उत्तर आपोआप मिळेल.

तुमचा जो कर आहे तो शासनाच्या नोकरदारांवर खर्च होतो. त्यांचे वेतन, भत्ते, दौरे, सरकारी खर्च इ. इ. साठी जो पैसा लागतो त्यातील काही भाग यातून मिळतो. अर्थसंकल्पाच्या उत्पन्नातील ७० टक्के पेक्षा जास्त भाग यावर खर्च होत होता. हे कित्येक वर्षे चाललेले होते.

आणि याच काळात मोजक्या उद्योगांना आणि त्यांच्या मालाला संरक्षणही दिले गेले होते. बजाजची तद्दन भिकार स्कूटर या देशात आयातीला बंदी असल्याने विकली गेली. अ‍ॅम्बॅसिडरसारखी जुनाट व रद्दी तंत्रज्ञान असलेली कार पर्याय नाही म्हणून कित्येक वर्षे विनास्पर्धा विकली गेली.
याच काळात शेतमालाच्या किंमती मात्र नियंत्रित ठेवल्या गेल्या. का ?
दर वाढल्यास पदेशातून माल आयात केला गेला. का ?

बुवा
तुमच्या प्रतिसादाबद्दल मला असे वाततेय कि तुम्ही जाणून घेण्ञाच्या उद्देशाने चर्चा करीत नसून वेड घेऊन पेडगावला जात आहात.
शेती दरवर्षी तोट्यात(च) चालते.. असे माझे ( तरी ) एखादे वाक्य दाखवा.

आम्हाला इतकेच म्हणायचे आहे. शेती हा फायदाचा उद्योग आहे आणि सरकार उगीचच सवलतींचे गाठोडे त्यांच्यापुढे उघडत आहे आणि आपल्यावर मात्र फार मोठा अन्याय होतो आहे या मनोभूमिकेतून बाहेर यावे. उगीच मुद्दे भरकटवून या चर्चेला काहीही अर्थ राहणार नाही.

एखाद्या वर्षी शेतक-याला फायदा होतो. नाही असे नाही. पण मग घर चालवणे, मुलींची लग्ने, शिक्षण , घर बांधणे हे खर्च त्याला नसतात का ?

शेती हा "व्यवसाय" करण्यासाठी घेतलेल्या ट्रॅक्टरचे हप्ते एकाच नफ्यात फिटत असतील का ? सातत्याने आणि सर्वत्र शेती फायद्यात असेल तर शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे असे म्हणता येईल असे आपले आम्हाला वाटते.

आपली परवानगी असेल तर बिंदुमाधव जोशी यांनी कोलगेटच्या उत्पादनखर्चाचा आणि विक्रिच्या किंमतीचा तपशील इथे देता येईल. कोल्ड्रींक्सच्या उत्पादनखर्चाबाबत मी दिलेल्या आकडेवारीला तुम्ही मला नाही वाटत असे उत्तर दिले आहे.
या मला नाही वाटतला काय उत्तर आहे ?
त्या एक बाई आहेत ना..ज्यांनी कोका कोला आणि पेप्सी कोला चे परिणाम दाखवणारे संशोधन माध्यमांतून मांडले होते.. त्यांनी केरलात कोका कोला रोज किती पाणी उपसते आणि त्यासाठी किती पैसे देते याची आकडेवारी मांडली होती. या पाण्यात फक्त किंचितसा कोक टाकला कि झाले...

पाण्याची खरेदी किंमत ०.०००००५६ पैसे प्रति लिटर. एका लिटरची कोका कोलाची उत्पादनकिंमत किती ?

नेटवर सर्च करा.. मिळेल सर्व.

किरणजी,
बिंदुमाधव जोशी यांनी काढलेल्या कोलगेटच्या उत्पादनखर्चाचा आणि विक्रिच्या किंमतीचा तपशील इथे अवश्य द्या.
त्याचा उपयोग होईल.
--------------------------------------
कालपासुन आज दुपारपर्यंत माझ्याकडे पण मायबोली खुपच स्लो होते.

deleted

deleted

शेतक-यांना साबण, कपडे, टीव्ही वगैरे वस्तू विकत घ्याव्या लागतातच. त्याद्वारे एक्साईज, विक्री , जकात वगैरे कर तो ही भरत असतोच कि..

आता कर्ज फेडायसाठी पैसा कुठून येतो तर पहिल्या करजाच्या फेडीसाठी भारत आणखी नवे कर्ज घेत होता हे त्याचे उत्तर आहे. सोने गहाण ठेवण्याचा प्रसंग ऐकलाच असेल आपण. आपण जर कर भरत होतो आणि त्याद्वारे सर्व खर्च चालत होते तर असा नामुष्कीचा प्रसंग का यावा ?

उरलेली तीस ट़क्के रक्कम कुठे जात होती ?

संरक्षण, पोलीस, शिक्षण, वीज उत्पादन हे विसरून कसे चालेल ?

जगात सर्वत्र शेतीला सबसिडी आहे. अगदी अमेरिकेतदेखील आहे. आपल्याकडे काय होतंय फक्त एकाच उद्योगाला अमेरिकेच्या दराने वेतन आणि बाकिच्यांना मात्र भारतीय दराने. ही तफावत राहिल्याने गोंधळ आहे. सर्वांनाच अमेरिकेप्रमाणे वेतन घेउ द्या.

अमेरिकेतला क्रेन ऑपरेटर, शि़क्षक, रंगारी हे सर्व चारचाकी बाळगू शकतात.. आणि तरीही तिथे शेतीमालाला सबसिडी दिली जाते.

मला एकच सांगा शेतीमालाचे भाव वाढल्याने अर्थव्यवस्था कोसळत असेल तर जीवनावश्यक वस्तू या सदरात मोडना-या औषधांना खुली लूट करण्याचा परवाना दिला जातो... त्याचे काय ?
तीन लाख रूपये दिल्याशिवाय शस्त्रक्रियायकरणारच नाही असे म्हणणारे डॉक्टर आहेत त्याचे काय ?

त्यांच्या या फीयांमुळेच तर वैद्यकीय शिक्षण महाग झाले. हे शिक्षण खाजगी होन्याआधी हा सर्व खर्च सरकार करीत होते... एका अर्थाने भावी डॉक्टरच्या धंद्याचे भांडवल सरकार लावत होते आणि तरीही त्यांच्या दरावर नियंत्रण नव्हते..

मग शे त क -या लाच हा न्याय का ?

एखाद्या गावातील शेतकर्‍यान्नी आपल्या मालाचे भाव स्वतःच ठरवून पाहावेत. एक विशिष्ट किम्मत मिळाल्याशिवाय माल विकू नये व बघावे हा प्रयोग कितपत यशस्वी होतो ते.

जीवनावश्यक वस्तू या सदरात मोडना-या औषधांना खुली लूट करण्याचा परवाना दिला जातो...

हा उद्योग संघटीत आहे. स्पर्धा असूनही सगळे एकमेकांना सामील आहेत. औषधविक्रेतेही आता संघटीत आहेत. डोक्टरांना महाग औषधाचेच प्रिस्क्रीप्शन द्यावे अशी लालूच दाखवली जाते. या क्षेत्रात कितीही भ्रष्टाचार झाला तरी आपल्याला चालतो. आपण मात्र त्यांना "समजून" घेतो. का ?

शेतक-यांचे असे संघटन झाले तर तुम्ही म्हणता तसे होईलही. वाढू देत कि भाव शेतमालाचे. भरतील ना शेतकरी कर... परवडत असेल तर घ्या नाहीतर उपाशी मरा !

आजवर आपण औषधधोरणाला, महागड्या रूग्णालयांना प्रश्न विचारले का ? तेव्हा आपण कोलमडलो का? घेतो ना आपण विकत ?

शेतक-याने या उत्पादनाचे दर निमूटपणे मान्य करायचे आणि शेतीविषयक धोरण मात्र त्याने ठरवायचे नाही... कसला विरोधाभास आहे हा..

बुवाजी,
महागाईसाठी एकटा शेत़करी जबाबदार नाही.शेतकरी आणि ग्राहक यांच्या मध्ये जी यंत्रणा असते ती यंत्रणाच जास्त जबाबदार आहेत. पण तुम्ही या यंत्रणांची बाजु उचलुन धरता त्यांच्यावर काही बंधने असावीत असे तुम्हाला मुळीच वाटत नाही.
ग्राहकाचे हित जोपासले गेलेच पाहीजे. पण त्यासाठी शेतकर्‍याला देशोधडीला लावण्याची गरज नाही.
गहु उत्पादकाला मिळणारी किंमत आणि बाजारात तेवढ्याच गव्हासाठी ग्राहकाच्या खिशातुन वसुल केली जाणारी किंमत काय असते हे एकदा तपासुन बघा जरा.या विषयावर आपण भरपुर चर्चा केली आहे.
जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती स्थानिक बाजारपेठेपेक्षा खूप कमी असतील तर अन्नधान्य आयात करून भाव योग्य पातळीवर ठेवणे हे जर योग्य धोरण असेल तर
जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती स्थानिक बाजारपेठेपेक्षा खूपच जास्त असतील तर अन्नधान्य निर्यात करून भाव योग्य पातळीवर ठेवणे,आणि शेतकर्‍याला नादार होण्यापासुन वाचवणे हे योग्य धोरण आहे का मानले जात नाही ?.
तुमच्या या लिखानामागे शेतकरीव्देष झळकायला लागला आहे. शेतमालाला मिळणार्‍या किंमतीचा महागाईशी फारसा संबध नाही हे तुम्ही समजुन घ्यायलाच तयार नाही. ग्राहकाचे निमित्त पुढे करुन तुम्ही तुमचा शेतकरी व्देश जोपासता आहात,त्याबदल्यात शेतकर्‍यांचे कितीही बळी गेलेत तरी तुम्हाला आनंदच दिसतोय....

हे वाचा आणि सांगा याचे समर्थन करणे योग्य आहे का ? असली रोजगानिर्मिती बळीराजाला देशोधडीला लावील.

http://www.grahakpanchayat.org/content/view/35/51/

http://www.grahakpanchayat.org/content/view/32/51/

http://loksatta.com/lokprabha/20060818/cover.htm

http://www.loksatta.com/old/daily/20060810/vdh04.htm

http://www.loksatta.com/old/daily/20030211/mv10.htm

http://www.loksatta.com/old/daily/20050820/vdh04.htm

http://www.loksatta.com/lokprabha/20060818/cover01.htm

बुवा

माझे लिखाण आपण वाचताय याबद्दल आभार मानतोय. काही वेळा आक्रम्नक झाल्याबद्दल क्षमस्व !
अर्थात इथे आपण फक्त प्रश्न उपस्थित करू शकतो.
तुम्ही कोणत्या हेतूने लिहीलत माहीत नाही पण मला तुमही कल्पना जाम आवडली..
शेतक-यांनी स्वतः भाव ठरवायचे..

खूप वर्षांपूर्वी मला असेच वाटायचे. शेतक-यांची स्वतःची विक्री व्यवस्था असली पाहीजे. शेतातून थेट ग्राहकाकडे. शेतक-यांनी शेतक-यांमार्फत ग्राहकांसाठी चालवलेली विपणन व्यवस्था उही रहायला हवी. अर्थातच यासाठी संघटन हवे.
महाराष्ट्रात शरद जोशी यांनी प्रयत्न केले. उत्तर भारतात महेंद्रसिंह टिकैत यांनी केले.. पुन्हा पुन्हा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
केंद्रातील सरकारही पूर्णपणे शेतक-यांचेच असावे.. धोरण ठरविणे त्यांच्याच हाती असावे..

- ही वीज वापरणार्‍यान्ना बिल भरावे लागते का ही वीज फुकट मिळते?
-- बुवा, मी स्वतः छोट्या गावातही राहिलेय आणि पुण्यामुंबईतही.
परिक्षेच्या दिवसातही १२-१५ तास लाईट नसतात. गावात MIDC आहे - इतर भरपूर उद्योग आहेत बिगर शेतीचे - कुणालाच फुकट नाहीये वीज.
बरेचदा पाणी पण नाही यायचं पूर्वी- का तर लाईट गेलेले म्हणून.
आलं तरी १५ मिनीट वगैरे.
शेवटी, ज्याचं जळतं- त्यालाच कळतं!

deleted

इथे आता personal टिका सुरू झालेली आहे.

चर्चेचा शेवट असाच केला पाहीजे असे नाही. जे मुद्दे पटतात तिथे सहमत आहे असेही म्हणून माघार घेता येते. आपलेच घोडे दामतले कि मग असे होते.. याला वादसंवाद न म्हणता वितंडवाद म्हणता येईल..

आपल्याला शेतीतले माहीत नाही. शेतक-याम्च्या समस्या माहीती नाही तरीही आपण बिनधास्तपणे बेछूट विधाने केली तर त्याचा समाचार घेतला जाईलच ना ? त्यापेक्षा आपल्या दुनियेत होणारा प्रचार हा चुकीचाही असू शकतो हे भान ठेवून समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्यातील चुका दाखविणे हे जास्त संयुक्तिक झाले असते.

बुवा,
वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. आपल्यापर्यंत येणा-या कित्येक गोष्टी या प्रचारकी थाटाच्या असतात हे भान ठेवलेत तर ब-याच गोष्टी स्विकारताना सोपे जाऊ शकते असे मला वाटते. बघा पटतेय का ?

<<शेतीत कायम तोटाच होतो अशासारख्या विधानान्वर बहुतेक जण एकमेकान्ना दुजोरा देतील>>
प्रश्न एकमेकांना दुजोरा देण्याचा नाही वास्तविकता काय आहे हे समजुन घेण्याचा आहे.

<< ज्यान्ना भरपूर उत्पन्न मिळते अशा शेतकर्‍यान्ना income tax लावावा (income tax पात्र उत्पन्नावर), शेती खर्च काढताना सबसिडीची किम्मत देखील विचारात घ्यावी असे म्हणणारे villain आहेत या विचारावर सहमती होईल..>>

१) शेती करुन भरपुर उत्पन्न मिळते किंवा नाही हे सिद्ध व्हायला नको ?
शेतीतज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ यांनी नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी प्रयोग शेती करुन पहायला काय हरकत आहे?, कृषी विद्यापिठांकडे हजारो एकर जमिन आहे.तेथे ते किति खर्चात किती उत्पन्न घेतात हे जाहीर का करित नाही?
किंवा एखाद्या पिकाचा काय उपादन खर्च येतो हे शास्त्रियरित्या का शिकवत नाहीत? कृषी विद्यापिठांत सगळेच विषय असतात पण नेमका शेतमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा हाच विषय का नसतो.?
किंवा
एखाद्या कृषी विद्यापीठाला हजारो एकर जमिन देवुन त्या शेतीत एक वर्ष उत्पन्न घेवुन त्या उत्पन्नावर कुलगुरुसहीत सर्वांना आपला उदरनिर्वाह करण्यांस सांगावे.शासकिय अनुदान बंद करावे.वर्षाशेवटी काय शिल्लक राहाते ते शेतकर्‍याला स्वानुभवाने दाखवावे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात असे किमान एखादे विद्यापीठ असणे अत्यंत आवश्यक आहे.
आता जर अशी थेरपी अमलात आणली तर "दुध का दुध आणि पाणी का पाणी" होऊ शकते.
बुवाजी यात न पटण्यासारखे काय आहे?
२) शेती खर्च काढताना सबसिडीची किम्मत देखील विचारात घ्यावी अशा द्रविडी प्राणायामापेक्षा वस्तुची प्रत्यक्ष किंमत उत्पादन खर्चात धरली की आपोआप प्रश्न निकाली निघतो.
उदा- समजा 'अ' वस्तुची सबसिडीविरहीत किमंत १० रु. असेल आणि एखाद्या पिकाचा ती किमंत गृहित धरुन उत्पादनखर्च १०० रु. निघत असेल तर 'अ' वस्तुची सबसिडीयुक्त किमंत ९ रु. असतांना त्या पिकाचा ती किमंत गृहित धरुन उत्पादनखर्च ९९ रु.असेल.
यात न पटता येण्यासारखे काय आहे?

आपल्याला शेतीतले माहीत नाही. शेतक-याम्च्या समस्या माहीती नाही तरीही आपण बिनधास्तपणे बेछूट विधाने केली तर त्याचा समाचार घेतला जाईलच ना ? त्यापेक्षा आपल्या दुनियेत होणारा प्रचार हा चुकीचाही असू शकतो हे भान ठेवून समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्यातील चुका दाखविणे हे जास्त संयुक्तिक झाले असते.>>>>

सहमत.

मुटे जी तुमचा "वांगे अमर रहे " वाचला,
मी कॉलेज मध्ये असताना (१९९६) ,आमच्याकडे पानाचे माले असल्यामुळे,मी एकदा मुंबईला पाठवलेल्या पानाची पट्टी (बिल) पहिली ,तर त्यात पानाचा डाग (म्हणजे १२००० अस्सल पाने) 6० रुपैयेला विकला गेला आणि वाहतूक,पान खुडणी,बांधणी,दलाली,हमाली,टपाल हे सगळं मिळून १०० रुपिये खर्च आला,पट्टी मध्ये -४० देणे असं लिहिले होते,आत्तासुद्धा खावूचा पानाची एक डापि (3000 पाने ) शेतकरी बर्याच वेळा ५०-८० रुपिये ला (म्हणजे १ रुपिया ला ६० पाने ) विकतो आणि हे असं कित्येकवेळा घडतं,वरील उदाहरणावरून शेतकर्याला आपला माल कित्येक वेळा कवडी मोल किमतीने विकावा लागतो, सरकार नावाच्या गोष्टीला याच्याशी काही देणं घेणं नाही,कारण त्यांना निवडणुकीला पैसा हा दलाला कडून मिळतो ,शेत्काराच्याकडून काहीच मिळत नाही !

<< शेतकर्याला आपला माल कित्येक वेळा कवडी मोल किमतीने विकावा लागतो, सरकार नावाच्या गोष्टीला याच्याशी काही देणं घेणं नाही,कारण त्यांना निवडणुकीला पैसा हा दलाला कडून मिळतो ,शेत्काराच्याकडून काहीच मिळत नाही ! >>
अनिलजी महत्वाचे बोललात.हे सगळ्यांना कळते.पण ते मान्य करायला तयार नाहीत.

अनिलजी महत्वाचे बोललात.हे सगळ्यांना कळते.पण ते मान्य करायला तयार नाहीत.>>>>>

शेतीकडे दुर्लक्ष करुन भविष्यात प्रचंड नुकसानाला तोंड द्यावे लागणार आहे, पण राजकर्त्यांना ते आत्ता कळणारच नाही.

अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-------------------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
-------------------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
------------------------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
------------------------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००

----------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००

-------------------------------------------------------
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
- गंगाधर मुटे.
================================

बुवा

यांच्या सर्वच प्रतिक्रिया का रद्द करण्यात आल्यात ? त्यांनी शेतक-यांना केलेल्या विरोधामुळे तरी खरी बाजू मांडण्याला मदत झाली. नाहीतर मुद्दामहून कुणी हा विषय मांडला नसता. एका अर्थाने त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत..

गंगाधरपंत

शेतीसाठी जे कौशल्य आणि परंपरागत ज्ञान वापरले जाते ते हिशेबात धरलेच नाही कि हो. आजवर हेच चाललेय.. कमीत कमी इथे तरी आपण ते जमेस धरूयात...

साध्या टूथपेस्टपासून शेतक-यांनी बौद्धिक स्वामित्व हक्कापोटी त्या उत्पादानांचे भरमसाट मूल्य खळखळ न करता द्यायचे मग त्याने ही असे दर आकारायला हवेत ना ?

<< यांच्या सर्वच प्रतिक्रिया का रद्द करण्यात आल्यात ? त्यांनी शेतक-यांना केलेल्या विरोधामुळे तरी खरी बाजू मांडण्याला मदत झाली. नाहीतर मुद्दामहून कुणी हा विषय मांडला नसता. एका अर्थाने त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.. >>
..... वाईट वाटले. बुवा यांनी प्रतिक्रिया रद्द करायला नको होत्या.आणि चर्चेतुन बाजुला होण्याचेही काहीच प्रयोजन नाही.या विषयावर अजुन खुप चर्चा व्हावी.

<< शेतीसाठी जे कौशल्य आणि परंपरागत ज्ञान वापरले जाते ते हिशेबात धरलेच नाही कि हो. आजवर हेच चाललेय >>
.
बौद्धिक स्वामित्व हक्क कशाचा? शेतीत बौद्धिक संपदा आहे? शेती करायला काही अक्कल लागते किंवा शेतकर्‍यालाही काही अक्कल असते हेच कुणी मानायला तयार नाही.शेतकरी सुद्धा अक्कलहुशारीने शेती करतो,शेती करणे येरागबाळ्याचे काम नव्हे, शेती करायला ज्ञान,कौशल्य आणि अनुभव याची नितांत आवश्यकता असते एवढे जरी आमच्या शासन,प्रशासन,तज्ज्ञ व प्रगाढ पंडितांनी स्विकारले तरी खुप झाले म्हणायचे.
शेती करायला निसर्गशास्त्र,हवामानशास्त्र,जिवशास्त्र,भुगर्भशास्त्र, गणितशास्त्र,सुक्ष्मजिवजंतुशास्त्र,वनस्पतीशास्त्र,विपननशास्त्र, व्यवस्थापकियशास्त्र एवढ्या किंवा यापेक्षाही अधिक विषयातील ज्ञानाची गरज असतेच त्याशिवाय शेती होऊच शकत नाही हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. त्याअर्थी शेतकरी म्हटले की त्याच्याकडे हे सर्व असणारच. पण हे मान्य करतोय कोण? शेतकर्‍यांची तर पैशाचा निट उपयोग करण्याचीही लायकी नाही असे अनेकांना वाटते. ही बातमी वाचा.
.
एक बातमी
पुणे , ता. १ - ""विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी "पॅकेज' हा उपाय नाही. त्यामुळे हे प्रमाण वाढणारच आहे. ,'' "शेतकऱ्यांना पैशाचे नियोजन करता आले नाही, अशांसाठी पॅकेज जाहीर करणे म्हणजे आत्महत्या वाढविण्याचा खेळ आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी शनिवारी व्यक्त केले. समाजाला पर्यावरणरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे, यासाठी "क्रिएशन एंटरटेनमेंट' आणि म्हैसकर फाउंडेशनतर्फे "सृष्टी' हा नृत्याविष्कार आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या
पूर्वार्धात ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी राजेंद्रसिंह बोलत होते.
..
या वाक्यावर मी टाळ्या वाजविल्या अजुन कोणाची इच्छा झाल्यास मनसोक्त टाळ्या वाजवाव्यात.

माझ्या माहितीप्रमाणे प्रा. राजेंद्रसिंह हे चिपको आंदोलनाने प्रसिद्धीला आलेले ज्येष्ठ जलतज्ञ आहेत. टिहरी प्रकल्पाबाबत केलेले आंदोलन आणि राजस्थानातल्या वाळवंटात केलेल्या पाणीविषयक प्रयोगांमुळे त्यांच्या एकंदरच हेतूविषयी आणि कामाविषयी समस्त भारतीयांच्या मनात आदरभाव आहे. जलव्यवस्थापन या विषयावर त्यांनी बोलावे आणि आम्ही ऐकावे..

पण त्यांनी विदर्भात कधीपासून बस्तान मांडले हे कळालेच नाही.

धन्यवाद किरणजी,
प्रा. राजेंद्रसिंह यांच्याबद्दल मला माहीती नव्ह्ती.
शेतीबद्दल जो जेव्हडा उपटसुंभ बोलेल तो तेव्हडा मोठा तज्ज्ञ या समिकरणाला छेद जाण्याऐवजी दरवेळी बळकटीच मिळत जाते हे दु:खद आहे.

<<शेतीत कायम तोटाच होतो अशासारख्या विधानान्वर बहुतेक जण एकमेकान्ना दुजोरा देतील>>

शेतीमधे कायमच तोटा होतो हे विधान चुकिचे आहे. बरोबर विधान खालील प्रमाणे
बागायती शेतीमधे थोड्या फार प्रमाणात फायदा होतो व जिरायती शेतीमधे कायम तोटा होतो.

वरील विधाने सत्य असुन सुद्धा शेतकरी शेती का करतो? का आपली हाडे रानात झिजवतो? का गरीबी मधे दिवस काढतो? का लाचार बनतो?
१. शेतकरी हा मुळातच गरीब आहे किंवा त्याचा गरीब कुटुंबात किंवा गरीब surrounding मधे जन्म होतो.
२. गरीबीमुळे शिक्षण जेमतेम.
३. काही उद्योग करणे शक्य नसते. कारण उद्योगासाठी भांडवल लागते ते त्याच्याजवळ नसते.
४. कमी शिक्षणात नोकरी मिळणे अवघड असते आणि मिळालीच तर ४००० ते ५००० प्रती महीना MIDC मधे किंवा ३००० रु. प्रती महीना एखाद्या सहकारी संस्थेमधे.
५. बरं जरी आज ४००० ची नोकरी मिळाली तर त्याचे ५००० होण्यासाठी त्याला ५ वर्ष काम करावे लगणार.
६. नोकरी, धंदा सोडला तर त्याला शेती हा पारंपारीक व्यवसाय पर्याय असतो.
७. त्यास शेती करणे भाग पडते.
८. १-२ एकर बागायत आणि ५-६ एकर जिरायत असेच चित्र सर्वत्र दिसते.
९. वाड-वडलार्जित घर असते, शेतीची अवजारे, अनुभव असतोच.
१०. तो शेतीसाठी सुरुवात करतो.
मग प्रश्न असा आहे की असे असून सुद्धा त्याचे घर कसे चालते.
असे समजुन चालु की त्याचे १.५ एकर कायम बागायत आहे. २ एकर हंगामी बागायत आणि ४ एकर जिरायत शेती आहे.
-------------------------------------------------------------------------

मी विधान केल्याप्रमाणे बागायत शेती ही त्याची फायद्याची शेती आहे. यातून त्याला २०,००० रु प्रती एकर येवढा फायदा होतो.
-------------------------------------------------------------------------

हंगामी बागायत शेतीमधे त्याचे गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, पालेभाजा, कांदा, लसूण, बटाटा इ. पिके असतात. घरखर्च भागून त्यातून त्याला कसेतरी ४००० रु. सुटतात.
आता रहिली जिरायती शेती.... यामधून जनावराच्या वैरणी शिवाय त्याला काहीच मिळत नाही.
---------------------------------------------------------------------------

आता आपण त्याचे जोडधंदे पाहू.
* दुभती जनावरे(गाय/म्हैस): २ ------ १२००० रु. (प्रतीवर्षी १ दूभते याप्रमाणे)
* शेळी: १ --- ३००० रु.
* कोंबडी : १५ --- १००० रु
-------------------------------------------------------------------------------

जोडधंदे व हंगामी बागायत शेती मधून शेतकर्‍याचा खर्च भागत नाही म्हणून तो दुसर्‍याची शेती वाट्याने करतो...
वाट्याने म्हणजे... दुसर्‍याच्या शेतीमधे हा शेतकरी काम करणार (अर्थातच धनाड्य शेतकर्‍याने (मालक)त्याची शेती Outsourcing केलेली असते) त्या बदल्यात ह्या शेतकर्‍याला १/३ हिस्सा मिळणार. येथे भांडवल आपल्या आपल्या हिस्स्या-प्रमाणे घालणे.
--------------------------------------------------------------------------

ह्यातून पण शेतकर्‍याचा खर्च काही भागत नाही म्हनूण तो इतरांची शेती पण भाड्याने करतो.
त्याला वर्षाला सरसरी ५००० रु भाड्यामधून मिळतात.
--------------------------------------------------------------------------
शेतकरी ब+क+ड+इ मधून आपला खर्च भागवतो व शिल्लक ठेवतो. म्हणजे २०,००० रु. तो भविष्यनिधी म्हणून शिल्लक ठेवतो.
अर्थातच येखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला किंवा मुला-मुलीचे लग्न असेल तर तो कर्ज काढतो आणि इथेच त्याची अर्थव्यवस्था कोलमडते.... यातूनच त्याला सावरायला किती काळ जातो हे calculation काढण्याचा माझा जीव होत नाही ....

मुटे साहेब माझ्या वरील पोष्ट मधे काही त्रुटी असतील तर दूर कराव्यात. शेतकर्‍याच्या समस्या मांडण्यासाठी मायबोलीचे व्यासपीठ अपुरेच आहे... तरीही आपण सर्वजण या व्यासपीठाच्या आधारे शेतीसाठी नक्किच काहीतरी करु अशी आशा बाळगतो.
प्रत्येक रोगावर औषध आहे मग या किडीवर पण औषध असणार हे नक्कि...

---- पुर्वी एक म्हण होती...
ज्याच्या शेतात हराळी व कुंदा त्याने सोडावा शेतीचा धंदा...
आता हराळी कुन्द्यावर नवीन औषधे आली -- मीरा ७१, Roundup यासारखी ...

आता शेतकर्‍याच्या समस्याना पण औषध मिळो हीच ईश्वर चरणी प्रर्थना......

Pages