शेतीवर आयकर का नको?

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2009 - 19:35

...............................................................................
या लेखापुर्वीची चर्चा अभ्यासण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
................................................................................

------------------------------------------------------------------------------------------
मी नरेंद्र गोळे यांच्या मताशी शतप्रतिशत सहमत आहे. ( संदर्भ )
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकिय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
घरात पोटभर खायला नसुनही, मिशिवर ताव देवुन पाटीलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरुप समाजासामोर येईल.
आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी,दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये आणण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगुस चाललाय्,त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमता कशी,कुठुन आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडुन ते इतरांनाच जास्त अडचनीचे आहे.
आयकर लावल्यास गरिब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुनी बेंबीच्या देठापासुन ओरडत असेल तर त्यांना "माझं काय होईल',असे म्हनायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहीजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावु नये,नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल,
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही,कारण...
ज्याला आय नाही त्याला कर नाही,ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढोनपिढ्या लाचारासारखे जिवन जगन्यापेक्षा आर्थिक सुदृढ होवुन आयकरदाता शेतकरी म्हणुन सन्मानाने जगायला नक्किच आवडेल.
गंगाधर मुटे.
..............................................................................
२६-१२-२००९

बागायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
------------------------------------------------------------------------
=============================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.

इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००

---------------------------------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
-----------------------------------------------------
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-------------------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
-------------------------------------------------------

अ) चालू खर्च..

शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
------------------------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
------------------------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००

----------------------------------------------------------

नफ्यातोट्याचा ताळेबंद :

फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००

-------------------------------------------------------
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
- गंगाधर मुटे

=========================================

...........................................
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
............................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मुटे साहेब माझ्या वरील पोष्ट मधे काही त्रुटी असतील तर दूर कराव्यात.>>
तुमच्या लिखानात त्रुटी आहेत किंवा नाही या पेक्षा तुम्ही प्रामाणिक मत मांडलेत हे महत्वाचे.
आपण प्रामाणिक चर्चा करित राहीलो की शेतकर्‍याच्या समस्याना पण औषध सापडायचा मार्ग नक्की सुकर होईल.
लगे रहो....!!

बटाटा अमर रहे .......
मुटे साहेब आज प्रामाणिक पणे वाटते की शेतीला आयकर नसावा...
काल ७०१० रु. ला आठ क्विंटल बटाटा मोडून आलोय Happy (दर: ८ रु प्रती क्विंटल)
संपूर्ण उत्पादन खर्च १०,६०० रु आला होता.
१०,६०० - ७०१० = ३५९० येवढा तोटा झाला.

पण कमी तोटा झाल्याबद्दल वडील थोडेसे समाधानी होते. इतर लोकांचा तोटा ऐकुन फार वाइट वाटले...
अर्थात एक एकर बटाटा निदान १५ क्विंटल निघेल आणि दर सरासरी १२ रु किलो मिळेल अशी अपेक्षा होती (म्हणजे साधारण १८००० रु). बटाटा पुण्याला आणणार होतो. त्यामुळे वडिल गावाकडून टेंपो पाठवून देणार होते आणि मी येथे व्यवहार करणार होतो. पण प्रत्येक्षात उत्पादन कमी मिळाल्यामुळे माल तिकडेच विकुन टाकला...

असो ... पुन्हा जून मधे प्रयत्न करु... त्यावेळी आम्हाला फायदा होइल Happy
----------------------------------------------------------------------
मला येवढेच सांगायचे आहे की समजा एखाद्या शेतकर्‍याने गतवर्षी आयकर भरला आणि चालू वर्षी त्याला तोटा सहन करावा लागला तर त्याला शेती कशी परवडेल हो ???
अर्थात माझ्याकडे तोटा सहन करायची ताकत आहे पण ज्यांची नाही त्यानी काय करायचे. माझ्याच मित्राचे उदाहरण द्यावेसे वाटतेय ... त्याने ८ क्विंटल बटाटा लावला होता .. त्याने व मी समान दराने बियाणे खरेदी केले होते (१७५० रु. प्रती क्विंटल. त्याला उत्पादन मात्र ६ क्विंटलच निघाले. त्यात त्याने खासगी सावकारा-कडून कर्ज घेतले आहे...... काय करावे त्याने? पुढच्या वर्षी जास्त फायदा झाला तर आयकर भरावा?

शेतीला आयकर नसावा हे मला वाटणे स्वाभावीक आहे ना?
आयकरा ऐवजी कुठले तरी वेगळे धोरण असावे ज्यातून सरकारला फक्त धनाड्य माणसाकडूनच कर मिळावा.
चार माणसाकडून कर घेण्यासाठी उर्वरित लोकांचा का बळी द्यायचा?

शेतमालासाठी 'ई-ट्रेडिंग' योजना
साठवणुकीअभावी शेतमालाची दुसऱ्या राज्यात विक्री करण्यास अडचणी असल्याने, तसेच पुरेसा भाव मिळण्याची शक्‍यता नसल्याने मिळेल त्या भावात शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुषीची घटना म्हणजे कृषी पणन मंडळाच्या पुढाकाराने शेतमालाचे 'ई-ट्रेडिंग' योजना सुरू करण्यात आली आहे. अर्थात, ही योजना जुनी असली, तरी आता याअंतर्गत शेतमाल तारण कर्ज व शेतमाल साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध होणार असल्याने, 'ई-ट्रेडिंग'चा चांगला फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

कृषी पणन मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या गोदामांची दुरुस्ती केली आहे. नगर जिल्ह्यात अशी 190 गोदामे दुरुस्त करण्यात आली आहेत. या गोदामांमध्ये शेतकऱ्यांनी शेतमालाची साठवणूक केल्यास जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत शेतकऱ्यांना या मालावर तारण कर्ज दिले जाणार आहे. ही गोदामे नॅशनल स्पॉट एक्‍स्चेंजच्या देशभरातील केंद्रांशी जोडण्यात आली असल्याने 'ई-ट्रेडिंग' सुविधेचा वापर करून शेतकऱ्यांना शेतमाल देशभरातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांना विकता येणार आहे. अशी विक्री करताना शेतकरी आपल्या मालाची अपेक्षित किंमत सांगू शकणार आहेत. शिवाय "नॅशनल स्पॉट'च्या माध्यमातून विक्रीच्या बिलातून कोणतीही कपात न करता शेतकऱ्यांना त्याच दिवशी शेतमालाची रक्कम मिळणार आहे.

शेतमालाचे जादा उत्पादन झाल्यास बाजारपेठेत भाव पडतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल होतात. साठवणुकीची व गुंतवणुकीची क्षमता नसल्याने शेतकरी मिळेल त्या भावात शेतमाल विकतात. मात्र, आता साठवणुकीसाठी तारण कर्ज तसेच ई-ट्रेडिंगद्वारे जेव्हा देशाच्या बाजारपेठेत चांगला भाव उपलब्ध होईल, तेव्हा मालविक्री करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कैलास वाबळे व जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक खंडेराव पावसे यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून, शेतमाल साठवणुकीसाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली गोदामे, जिल्हा बॅंकेमार्फत दिले जाणारे तारण कर्ज व "नॅशनल स्पॉट एक्‍स्चेंज'च्या ई-ट्रेडिंगसह अन्य सुविधांची माहिती देण्यासाठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्या, तालुका सहायक निबंधक कार्यालय, तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विशेष कक्ष सुरू केले आहेत.

पंकज माहीतीबद्दल धन्यवाद ..!!
.
अशा योजनांचा फायदा शेतकर्‍यांपेक्षा ज्यांच्याकडे शिलकी बँक बॅलेण्स आहे त्यांना किंवा छोट्या व्यापार्‍यांनाच जास्त होतो.
अशा योजनांमागे शासनाचा उद्देशही अन्नधान्याची काळाबाजारी रोखणे असा असतो.त्याचा फायदा शेतमालांच्या भाववाढीवर नियंत्रण राखल्यामुळे ग्राहकांना होतो.
शेतकर्‍यांच्या पदरी काहीच पडत नाही.

मला शेती विषयी खुपच कमी महिती आहे.पण नेहमी मी विचार करते... शेती ही contract पद्धतीने केली आणी आधिच घेणारे पीकाचा भाव आणि विकत घेणारे (say some company (letus say some atta company for time being here)) यान्च्यात काहि aggrement केले तर?.तर शेतकरी ही confident asel.In case एखाद्या वर्शी पीक नाहि आले,पाउस नाही आला तर contract मध्ये आधिच हे clause mention केले असतील.Insurance हि करता येइल..

मुटेसाहेब साखरेचे भाव कडाडले आहेत अशी सर्वत्र बोंब का आहे?
कपडा, साबण, साबूदाणा, गाड्या महाग आहेत असे का लोक म्हणत नाहीत? CCD मधे ६० रु. ची COFFEE पिणार्‍याना ४०रु किलो ची साखर महाग वाटते.
आपल्याला नुसता सरकारला दोष देऊन चालणार नाही, काही महाभाग आपल्यातही आहेत की ज्याना शेतीमधील ग. म. पण कळत नाही आणी उगाच वक्तव्य करतात.

साखरेचे भाव वाढले म्हणुन शेतकरी श्रीमंत झाला असं,क्रुपया आणखी एक गैरसमज करुन घेऊ नका,आज ४० रू नी विकत असलेल्या साखरेला,जो ऊस शेतकर्यांनी गेल्यावर्षी कारखान्यांना दिला,त्याला अजुनही यातले १५ रु देखील मिळु शकले नाहीत,तरी सरकारमधला कोणताही नेता,मंत्री याबद्द्ल बोलत नाही,यासाठी काहीं नेत्याना अजूनही वारंवार आंदोलनं करावी लागतात,डोकं फोडुन घ्यावं लागतं, सद्या एक टन ऊसापासुन कमीतकमी ६५०० रु (सध्याच्या बाजारभावाप्रमाणे, साखर, बगैस,मळी आणि इतर उपपदार्थ यांसाठी) कारखान्यांना मिळंतात,(६५००-२५००=४००० रु एका टनाला फरक) त्यातले यावर्षी २५०० देतानां देखिल त्यासाठी शेतकर्यांच्या ऊसाची "काटा" मारुन सरळसरळ फसवणुक केली जाते ...एक कारखाना दर वर्षी कमीत कमी ३ ते ८ लाख टन गाळप करत असेल तर, आज महाराष्ट्रात दिडशेच्या वर कारखाने आहेत आणि उत्पादन १ कोटी टनापेक्षा नक्कीच ज्यास्त आहे, एका टनाला जरी १००० रू जरी फायदा धरला तर विचार करा .....त्याच मुळे निवडनुकीत बराच पैसा हा "इकडुन" आलेला असतो ...शेतकर्याला पुर्वी टनाला १०००-१२०० रु मिळत होते,आता २५०० रु मिळाले तरी तो आहे तिथेच राहील ,कारण उत्पादन खर्च ,म्हणजे खते,औषधे,बियाणे,मजुरी या गोष्टी अगोदरच त्या-त्या प्रमाणात वाढल्या आहेत ....

पंकज जी, एवढी महागाई वाढुन देखिल "शेतकरी" आणि "ग्राहक" आहे तिथेच आहे ....फक्त "दलाली" तेवढी वाढली आहे ..

थोडक्यात काय सहावा वेतन आयोग सरकारने असा दिला आणि तसा घेतला. आपण आहोत तेथेच आहोत. शंभरच्या नोटेची किम्मत दहा झाली, हाच काय तो फरक.

सातारा तालुक्यातील वाजेवाडी येथील शंकरराव दिनकर खोत यांनी शेतीक्षेत्रात अनोखी किमया करत आणि मिश्रशेती पध्दतीच्या माध्यमातून एक एकरात चक्क ९.३६ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेण्याची किमया साध्य केली आहे. महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात अल्प उत्पन्नाअभावी आणि कर्जबाजारीपणमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श उभा केला आहे. शंकरराव खोत यांनी शेतीमध्ये घेतलेले उत्पन्न लक्षात घेता त्यांनी सोनेच पिकविले, असे मानावे लागेल.
शंकरराव खोत हे उंब्रज तसेच सातारा तालुक्याच्या परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. गेली बारा वर्षे ते मिश्र पध्दतीने शेती करत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग केले आहेत. यात त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ते शेतीक्षेत्रातील स्वत:चेच विक्रम मोडत आहेत. गतवर्षी त्यांनी मिश्रशेतीत आले हे प्रमुख पीक घेतले होते. याबरोबरच त्यांनी कोथिंबीर, झेंडू, दोडका, मिरची, कारले, घेवडा, तुळस, सब्जा, मका, पपई आदी पिके घेतली. या पिकांच्या माध्यमातून त्यांनी फक्त उत्पन्नच डोळ्यासमोर ठेवले नाही तर या पिकांचा वापर त्यांनी मूळ पिकाच्या संगोपनासाठी कसा होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. त्यांचा या अनोख्या उपक्रमाचा फायदा इतर शेतकऱ्यांनी घेण्यासारखा आहे.
शंकरराव खोत यांनी शेतीक्षेत्रात स्वत:चे असे एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. अनुभवातून नेमका शहाणपणा घेत त्यांनी अधुनिक तंत्रज्ञान अवगत केले आहे. कोणते पीक केव्हा घ्यायचे आणि त्याचा फायदा कसा मिळवायचा, बाजारपेठेत नेमके काय चित्र आहे, याची माहिती त्यांना चांगली अवगत आहे. ते स्वत:च एक 'कृषी विद्यापीठ' असून 'कुलगुरु'ही तेच आहेत आणि 'विद्यार्थी'ही तेच आहेत, असे मानले तर वावगे काही ठरणार नाही. आल्याची लागण करण्यापूर्वी ते जमीन भुशभुशीत नांगरतात. यावेळी ते रासायनिक खताची मात्राही देतात. आल्यासाठी वाफे तयार करतात. सातारी, माहित, उदयपूर जातीचा बियाणे म्हणून ते वापर करतात. त्यांनी शेतीत सर्वत्र तुषार सिचन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कमीत कमी पाण्याचा वापर ही एक शंकरराव खोत यांची खासियत आहे. जमिनीला पाणी दिल्यानंतर त्यांनी लागणीयोग्य आले कंदाची निवड केली आहे. कंदकुज टाळण्यासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खताचाही वापर केला आहे. निबोळी पेंड आणि शेणखताचाही त्यांनी प्राधान्याने वापर केला आहे.
मूळ पिकाबरोबरच त्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणासाठी इतर पिकांचा वापर केला आहे. ज्या खड्ड्यात त्यांनी आले घेतले त्याच खड्ड्यात त्यांनी कोथिंबिरीचे पीक घेतले आहे. बारा दिवसांनंतर त्यांनी गांडूळखत, राख, भाताचे भुस, ट्रायकोडर्मा, पीएसबी बायोला यांचे मिश्रण शेतीला दिले. सुमारे ३५ दिवसांनंतर कोथिंबिरीचे पीक सुरू झाले. कोथिंबीर काढल्यानंतर जागा भुसभुसीत झाली. यामुळे आले पिकाची उगवण होण्यास चांगली मदत होते. तिसाव्या दिवसानंतर दोडका, कारली, तसेच मिरचीची लागण करण्यात आली. चाळिसाव्या दिवशी आले पिकाच्या वाफ्यालगतच झेंडूची रोपे लावण्यात आली. आवश्यकतेनुसार रासायनिक खताची मात्रा देण्यात आली. दोडका, कारली आणि झेंडू फुलांची तोडणी सुरू होताच २७० ते २८० दिवसांनी सरीमध्ये पपईची लागवड केली. याचवेळी आल्यावर पाचटीचे आच्छादन करण्यात आले. वाफ्याच्या बाजूने स्वीटकार्न मका पिकाची लागवड करण्यात आली.
एकाचवेळी इतकी पिके घेण्याचे कारण काय, याबाबत खोत यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'अधिक उत्पन्न हा हेतू जरी असला तरी पीक निरोगी व्हावे आणि किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते करावे लागते. कोथिंबिरीमुळे पिकाला सावली मिळते. झेंडूची फुले पिवळी असल्याने आल्याचा मुख्य शत्रू असणारी कंदमाशी फुलांकडे आकर्षित होते. यामुळे आले पिकावरील हल्ला कमी होतो. मिरची बुरशीनाशक आहे. दोडका आणि कारल्याचा वेल कुंपणावर असल्याने हवेतून येणारा बुरशीचा मारा रोखला जातो. पपईमुळे जमिनीतील जीवाणूंचे प्रमाण वाढते. आल्याला सावली म्हणूनही याचा उपयोग होतो. स्वीटकॉर्नमुळे पाण्याचे नियंत्रण होते. वाऱ्याचा वेगाने येणारा प्रवाह रोखला जातो परिणामी गारवा निर्माण होतो. आजूबाजूची हवा शुध्द करण्यासाठी तुळस आणि सब्जा उपयोगी पडतो.'
एक एकरातील खर्च आणि उत्पन्नाचे गणित मांडताना शंकरराव खोत म्हणतात, 'सर्व प्रकारचे बियाणे खरेदी करण्यासाठी ८० हजार रुपये, पाणी व्यवस्थापन २० हजार रुपये, खते, कीटकनाशक, जैविक खते व इतर खर्च ७० हजार, मजुरी, मशागत आणि इतर खर्च सुमारे ५० हजार असे मिळून २ लाख २० हजार रुपये खर्च आला आहे. मिळालेले उत्पन्न ९.३६ लाखांचे उत्पन्न लक्षात घेता निव्वळ नफा ७.१६ लाख झाला आहे.'
एकत्तित कुटुंब पध्दतीमुळेच यश...
शंकरराव खोत यांना कुटुंबाचा मोठा आधार आहे. सर्व कुटंब एकत्तितच राहते. त्यांच्या पाठिब्यावरच त्यांनी ही झेप घेतली आहे. त्यांच्या आई सुभद्राबाई 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या, 'शंकरराव माझा धाकटा मुलगा. तो नियोजन करतो. गजानन, हिदुराव, साहेबराव, बाबूराव ही मंडळी शेतात राबते. सुना आणि नातवंडेही शेतीच्या कामाला हातभार लावतात त्यामुळेच तर शेतीत सोने पिकतेय.'
हिशेब...
उत्पन्न :
आले - २३ टन (रक्कम : ७.२३ लाख)
कोथिंबीर - ३० हजार
झेंडू - १२ हजार
दोडका, कारले, घेवडा, तुळस, सब्जा - १० हजार
मका - ६ हजार
पपई - १.५० लाख
मिरची - ५ हजार
एकूण : ९.३६ लाख

खर्च
आले बियाणे - ६३ हजार ३०० रुपये
कोथिंबीर - १२०० रुपये
झेंडू - १५०० रुपये
दोडका, कारली, घेवडा, तुळस, सब्जा - ३ हजार
मका - ५०० रुपये
पपई - २० हजार रुपये
मिरची - ५०० रुपये
पाणी व्यवस्थापन - २० हजार रुपये
खते, कीटकनाशके - ६० हजार रुपये
मजुरी, मशागत व इतर खर्च - ५० हजार रुपये
एकूण : २.२० लाख

कॄषी विद्यापिठाने शंकरराव दिनकर खोत याना पदवी द्यायला हवी. मी स्व:ता आले या पिकाचा शेती मधे प्रयोग केला होता. खूप मेहनती पिक आहे हे. खोत यानी घेतलेले उत्पन्न हे केवळ बुद्धि नसुन त्यासाठी त्यानी अपरिमीत कष्ट सुद्धा घेतले आहेत.

<< एक एकरात चक्क ९.३६ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न >>

पंकजजी,
१) प्रत्येक पिकाखालील क्षेत्र किती ती माहीती द्या.
प्रत्येक पिकाचा तपशिलवार खर्च द्या.
विक्रिचा तपशिल, दरासहीत द्या.
मग शहानिशा करता येईल.

२)आल्याची / हळदीची शेती ही आदर्श शेती ठरू शकत नाही.
अशा शेतीला आदर्श मानुन सर्व शेतकर्‍यांनी अशी शेती करायची म्हटले तर पहिल्यांदा भारतवाशियांना
आले -हळद खाऊनच जगण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. तेव्हा कुठे तो माल खपेल. नाही तर पुन्हा आलं उत्पादक शेतकर्‍यांच्या सामुहीक आत्महत्या सुरू व्हायच्या.

३) मी पण शेतीतून एकरी ११ लाखाचे उत्पादन मिळवतो. पण ते पिक इतर शेतकर्‍यांसाठी अनुकरनिय नाही.
फक्त स्वतःचा उदो-उदो करण्यासाठी मात्र उपयोगाचे ठरू शकते.

देशात मोठ्या प्रमाणावर जे पिके घेतली जाऊ शकतात. तिच पिके महत्वाची,आणि उदाहरण देण्यायोग्य समजावी.

<<मी पण शेतीतून एकरी ११ लाखाचे उत्पन्न मिळवतो. पण ते पिक इतर शेतकर्‍यांसाठी अनुकरनिय नाही.>>
मुटेसाहेब आपण कोणते पिक घेता. ११ लाख जरा जास्तच वाटतात. असे उत्पन्न फक्त आमली वनस्पती मधूनच मिळू शकेल. माझा विश्वास नाही बसत.

<< विश्वास नाही बसत. >>

तुम्ही विश्वास ठेवत नाही म्हटले तरी विश्वास ठेवावाच लागेल. कारण हे सत्य आहे.
फक्त ते इतरांसाठी अनुकरनिय नाही म्हणुन जाणुन घेऊनही उपयोग नाही.

अशा गोष्टींचा उपयोग मानसन्मान मिळविण्यासाठी, बक्षिसे मिळविण्यासाठी, डिंगे हाकण्यासाठी, मी कसा आदर्श शेतकरी आहे हे दाखविण्यासाठी.... एकंदरीत स्वतःचा बडेजाव वाढविण्यासाठी ते उपयोगाचे असते. आणि मला तसे करायचे नाही. Happy

मुटेसाहेब... जुलै मधे पुन्हा बटाटा लागवड करतोय ... पाहू या काय होतय....
मला नक्कि वाटतय की यावेळी मी उजळ माथ्याने विजयी होउन येणार ....
पेरणी झाली काय तुमच्याकडे ?

मुटेसाहेब तुमच्या कडुन मी प्रेरणा घेतली. या वर्षी प्रथमच मेथी, पालक, टमाटे, वांगी लावलेत. आम्हाला केवळ ४ महिनेच ऊन्हाळा मिळतो, ४-५ महिने पुर्ण बर्फ अंथरलेला असतो, २-३ महिने तळ्यात मळ्यात असतात.

उदय, नंदिनी ....
मुटे साहेब सध्या बीज प्रक्रिया/ बीयाणे या कामात गुंतुन गेले असतील ....
आमच्या कडे पेरण्या चालु आहेत, हळदीची लागावड मोठ्या प्रमाणात केली जात आहे ...

मुटेसाहेब आपण कुंडीतील लागवड नावाचा नवीन Topic सुरू करुया.
कोथिंबीर जरी पिकवली तरी आठवड्या काठी २० रु. वाचुन जातील आपल्या लोकांचे. सध्या पलेभाज्या एकदम तेजीमधे आहेत.
कुंडीतील लागवड आणि स्टोव्ह दुरुस्ती हे दोन विषय सातवीला होते. मला वाटतय कदाचित त्यावेळी शिकलेले विषय मला आता उपयोगी पडतील.

Pages