दागदागिने

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23

दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.

Discussions related to Jewelry

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोकलं नाही अजिबातच, मला वाटलं गोदरेजचं कपाट आणि झेरॉक्स मशिनसारखी 'फन्क्शनल' ज्वेलरी पण असते की काय. बाकी बायांनी चटाचटा उत्तरं पण दिलेली दिसली.

रोजच्या ऑफिस वेअर कपड्यांवर शोभून दिसणारे चांगल्या प्रतीचे मोत्याचे / पर्ल दागिने कुठे मिळतात? कुठला ब्रँड चांगला आहे?

हैदराबादचे मंगतराय पर्ल्स चांगले आहेत. शक्यतो सॉल्ट वाटर पर्ल्स घ्या. ते थोडे महाग असतात.

पुण्याच्या श्रीकृष्ण पर्ल्सचे मुंबईत प्रदर्शन लागले होते तेव्हा मी घेतले आहेत. ते गोड्या पाण्यातले असावे. श्रीकृष्णमध्ये आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये ते गाठवून घेता येतात.

Pages