दागदागिने

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23

दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.

Discussions related to Jewelry

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट. वामन ह री पेठे साइट वर हिर्‍याची नथ आहे Absolutely to die for. दिवाळी पाडवा-भाउ बिजे च्या

गिफ्ट साठी फिल्डींग लावता येइल.

अमा .. लिंक द्या ..
हिर्‍याची काय झेपणार नाहीय .. नेत्रसुख तेव्ह्ढं Wink
पण या वर्षी मोत्याचे अगदी पारंपारेक घेईन म्हणते .. आईकडे खड्याचे आहे Happy

मस्त धागा. अनिश्का तू स्वतः केलेले दागिने टाक ह्यावर, बघायला आवडेल, वरचे छान आहेत कानातले, तू केलेस का?

चला इथे माहिती मिळेल नवीन ट्रेंड्सची.

DSCN1504.JPGDSCN1505-001.JPG

ही आज बनवलेली सिल्व्हर एनॅमल्ड ज्वेलरी.

सुमेधा, आधीच्या जेवलरीसाठी, तांब्याचा हवा तो शेप कापून त्यावर एनॅमलचा आधी प्रीकोट दिला. भट्टीमध्ये ८०० डिग्रीवर १ मिनीटासाठी गरम केलं. नंतर एक काळा बेसकोट दिला. मग परत भट्टीमध्ये ७२०-७४० तापमानावर साधारणतः मिनीटभर गरम केलं. त्यानंतर ब्राउन रंग लावून तो वाळल्यावर त्यावर डिझाइन खरवडून बनवलं. मग परत भट्टीमध्ये गरम केलं. नंतर मध्ये मध्ये काही ठिकाणी पिवळा रंग लावून परत डिझाइन बनवून भट्टीमध्ये गरम केलं.

यासाठी इंडस्ट्रियल एनॅमल कलर्स वापरले होते.

वरच्या चांदीवरच्या कामासाठी मात्र ज्वेलरी एनॅमल्स वापरले होते. करायची पद्धतही थोडी वेगळी होती. हे चांदीवालं काम म्हणजे खरंतर मीनाकारीचं काम आहे.

मामी, माझ्याकडे अजून सेटअप नाहीये.. भट्टी, टूल्स, रंग..सगळा स्टुडिओ सेटअप करणं बर्‍यापैकी खर्चिक काम आहे. सध्या १५-२० दिवसांमधून एकदा गुडगावच्या एका स्टुडिओमध्ये भाड्याने सेटअप घेवून थोडं काम करता येईल. थोडेफार ज्वेलरी पीस तयार झाले की सांगेन तुम्हाला.

मस्तच ग अल्पना.
Accessories organise करण्यासाठी काय करू? खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.
आश्विनिमामी तुमच्या पोस्ट्स भारी अस्तात. Happy

मस्त धागा. अनिश्का तू स्वतः केलेले दागिने टाक ह्यावर, बघायला आवडेल, वरचे छान आहेत कानातले, तू केलेस का?

चला इथे माहिती मिळेल नवीन ट्रेंड्सची.
>>>>>>>> नाही गं मला नवीन सध्या घरचं इंटीरियर यात वेळ मिळत नाहीये.....अजुन एक दिड महिना तरी...मग बनवेन

अल्पना..... ----------^---------
कोपरापासुन दंडवत.....मस्त आहेत सर्व दागिने....... मला पण बनवुन दे नं.....राहतेस कुठे तु???

वेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स हा धागा गायबला आहे का? तसा बराच रिसेंट होता तो आणि ३००+ प्रतिसाद देखील होते तिथे!

Pages