Submitted by पियू on 31 March, 2022 - 14:49
लेखाचा विषय तसा कटू आहे. पण तरीही हिंमत करून लिहितेय.
माझ्या आसपासचे लोक / जवळचे नातेवाईक / काही सेलिब्रिटीज इत्यादी यांच्या मृत्यूने मला काही न काही साक्षात्कार झालेला आहे. काहीतरी आयुष्यभराचा धडा दिलेला आहे.
कदाचित तुमच्याही बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असा डोळे उघडण्याचा क्षण आला असेल. तर शक्य असेल आणि काही हरकत नसेल तर कृपया इथे शेअर करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान प्रतिसाद
छान प्रतिसाद
आत्महत्या करायचा विचार मनात येणे आणि तो अमलात आणणे खूप अवघड.
संकट खूप मोठे नसते उत्तर असतेच .
पण प्रचंड भावना विवेष होतो माणूस.
ती स्थिती खूप वेगळी ..
काही तासाची असते .पण असते.
पण जेव्हा मरण समोर दिसते तेव्हा सर्व राग,द्वेष नष्ट होतो..
जगायची इच्छा तीव्र होते .पण वेळ निघून गेलेली असते
मी असे ऐकले आहे .खरे की खोटे माहीत नाही.
माणूस फाशी घेवून जेव्हा आत्महत्या करतो .
तेव्हा..
जेव्हा फास बसतो आणि जीव गुदमरतो तेव्हा मरण नको वाटतं.
पण फास बसल्यावर हात वर जात नाहीत
त्या मुळे फाशी घेवून मेलेल्या व्यक्तीच्या मांडी वर नखांचे तीव्र ओरखडे अस्तात.
हा बाफ जेव्हा पहिला तेव्हा
----
धागा वाचताना मला सकाळी
धागा वाचताना मला सकाळी फिरायला जातो तेव्हा भेटलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यू मुळे इथे लिहिलेला हा धागा आठवला
गेले ऐकायचे राहून
उद्या करु /रिटायरमेंट मधे
उद्या करु /रिटायरमेंट मधे वेळच वेळ तेव्हा करु म्हणून गोष्टी पुढे ढकलण्यात अर्थ नाही. आज जमत असेल ते करुन घ्यावं.
आणि असे जरी केले तरी काही ना काही गोष्टी हातातून सुटणार आहेत. सगळं पूर्ण झाले म्हंटले तरी काही तरी उरलेले असतेच. तर ते ही स्विकारुनच पुढे जायचे
हे मला या दोन वर्षात जवळच्या मित्र मैत्रिणींच्या जाण्याने, मित्र मैत्रिणींच्या लाईफ पार्टनरच्या जाण्याच्या बातमीमुळे (बातमी नंतरची परिस्थिती बघितल्यामुळे) कोरले गेलेय
उद्या करु /रिटायरमेंट मधे
उद्या करु /रिटायरमेंट मधे वेळच वेळ तेव्हा करु म्हणून गोष्टी पुढे ढकलण्यात अर्थ नाही. आज जमत असेल ते करुन घ्यावं.
सगळं पूर्ण झाले म्हंटले तरी काही तरी उरलेले असतेच. तर ते ही स्विकारुनच पुढे जायचे. >> १००% सत्य आहे.
माझे अनेक मित्र/नातेवाईक त्यांना शक्य असूनही निवृत्त होत नाहीयेत. जीवाचा आटापिटा करून, बॉसला शिव्या घालत पण तरीही कामावर जातात तेव्हा मला प्रश्न पडतो की का हे असे? कदाचित पैशांचा मोह सुटत नाहीये किंवा ते मानसिक दृष्टीने रिटायरमेंटसाठी तयार झालेले नाहीत.
पोस्ट पटली, कविन.
पोस्ट पटली, कविन.
धागा थोडा विचित्र वाटला!
धागा थोडा विचित्र वाटला!
पण माझ्याही मनात एका मृत्यूनंतर एक सल राहिलेला... तो सांगते
आमच्या बिल्डिंग मध्ये एक मुलगी होती. ती आणि तिची आई थोडे वेगळे होते. काही लोकं जे स्वतःला वेगळे समजतात, तशातले शिष्ट..
काही न काही कारणांवरून आमच्या बिल्डिंग मधल्या सर्व मुलींचं एक एक करून तिच्याशी वाजलं.. आणि हळू हळूहळू सगळ्यांनी तिच्याशी बोलणं चलन बंद केल. पाच-सहा बरोबरचे आम्ही खूप धमाल करायचो, पार्ट्या, दिवाळी, एकत्र सिनेमा, नाटक, फिरणं सगळ मजेत चाललं होतं. फक्त हे एक घर वाळीत टाकल्या सारखं.
कालांतराने ते कुटुंब दुसरीकडे राहायला गेलं.
दोन वर्षांपूर्वी कळलं की ती मुलगी कॅन्सर ने गेली, तिला छोटं मूल आहे वगैरे वगैरे..
ऐकून खूप धक्का बसला आम्हा सगळ्यांनाच.
कोणालाही तिच्याशी बोलणं का सोडलं आठवतही नव्हतं...
म्हणजे खूप काही महत्वाचं नसावच..
पण मग जाणवलं, की त्या अबोल्यामुळे तिच्याकडे बालपणाच्या काही सुखद आठवणी नसाव्यात, ज्या आमच्या सगळ्याकडे भरभरून आहेत.
कदाचित तिच्या आजारपणात तिला ते क्षण, जुनी मैत्री काही सुखद क्षण देऊ शकली असती.
अर्थात ह्या जर तर च्या गोष्टी..
पण एक मनाने घेतलं की रुसवे फुगवे, भांडण ताणून धरायचं नाही.. सोडून द्यायचं.. ते एवढं महत्त्वाचं नसतंच कधी..
Pages