Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, आधी करावे मग बोलावे,
हो, आधी करावे मग बोलावे, त्याप्रमाणे आधी धागे काढावेत मग लिंका फिरवाव्यात

नवीन लोकांना जुने धागे कळतात, अन्यथा मुद्दाम कोणी शोधायला जात नाही. जसे या धाग्याच्या निमित्ताने माझी सुद्धा आता गाणी ऐकली जातील. तसेच प्रत्येक धाग्यात, प्रतिसादात, चर्चेत काही ना काही गवसतेच किंवा भर पडते. त्यामुळे लिंका देणे कधीही चांगलेच
https://youtu.be/77vRyWNqZjM
https://youtu.be/77vRyWNqZjM?si=pDAeus_n7pJ-6k4x
छावा ट्रेलर आला. मला आवडला. बाहुबली टाइप्स बरेच सीन दिसतायत. भरारी मारणारे. पण ठीक आहे, आता सगळीकडेच असतात ते. विकी कौशल मस्त वाटतोय. संवादसुद्धा बर्यापैकी स्पष्ट आहेत आणि इंग्रजाळलेले किंवा हिंदाळलेले(?) वाटत नाहीत. रश्मिका आवडत नाही. कशीही. अक्षय खन्ना ओळखण्याच्या पलिकडचा आहे. एकंदर चित्र छान आहे. बघायचा आहे.
छावा- विकी मराठी झाक वाटतोय,
छावा- विकी मराठी झाक वाटतोय, पण पंजाबी जास्त. त्यालाही नाचवलेय खलीबली सारखे
मराठी कित्ती सुंदर अभिनेत्री आहेत. प्रिया बापट, प्राजक्ता, प्रार्थना बेहरे..
रश्मिका ला का घेतात ते पण पेशवाईण बाई म्हणुन
पेशवीणबाई? येसूबाई ना?
पेशवीणबाई? येसूबाई ना? येसूबाई औरंगजेबाच्या कैदेत गेल्या तेव्हा जेमतेम विशीच्या असतील. रश्मीका दिसतेय चांगली. प्राजक्ता, प्रार्थना, प्रिया खूप मोठ्या वाटतील वयाने. मराठीच हवी तर वैदेही परशुरामी चालली असती.
बाकी ट्रेलर, लढाया, येसूबाईंसकट लेझीम डान्स अ अ. पण मी विकी आणि अक्षयसाठी बघणार आहे.
विकी कौशल विकी कौशलच दिसतोय.
विकी कौशल विकी कौशलच दिसतोय. मला नाही झेपला संभाजी म्हणून. रश्मिकाचा एम्ब्रॉयडरीचा ब्लाउज दिसला तेवढ्यात
बाकी व्हिजुअल्स हल्लीच्या इतर बिग बजेट सिनेमाप्रमाणेच , तत्सम दिसणारेच आहेत. काही विशेष, खास नाही.
अक्शय खन्ना ओळखू येत नाही, बहुधा चांगला करेल तो रोल. पण एकूण फार अपेक्षा ठेवायला नकोत.
छावा ट्रेलर आवडले. एकदम
छावा ट्रेलर आवडले. एकदम बघण्यासारखा झालेला दिसतो आहे. असेच भव्य दिव्य चित्रपट बनायला हवेत !
रश्मिकाला पेशवीण बाई म्हणून
रश्मिकाला घेतलं हे अजिबातच आवडलं नाही. वैदेही अगदीच चालली असती.
विकी मात्र परफेक्ट दिसतोय. रांगडा गडी. एक्स्प्रेशन्स पण सुंदर. तो नाच मात्र झेपला नाही. असं गाणं कशाला हवं?
अक्षय खरंच ओळखू आला नाही. गुड चॉईस!
ट्रेलर छान झालंय बाकी.
अक्षय खरंच ओळखू आला नाही.
अक्षय खरंच ओळखू आला नाही.
>>>>
अच्छा, तो सुद्धा आहे..
मला पुन्हा बघावा लागेल ट्रेलर..
बाकी आवडला ट्रेलर.
स्पेशल इफेक्ट सगळीकडेच हल्ली असतात म्हटले तरी एखादा तंत्रज्ञ त्याचाही आदीपुरुष करू शकतो.. इथे ते झालेले नाहीये याबद्दल अभिनंदन.
विकी कौशल त्याची एनर्जी आणेल असे वाटत आहे..
रश्मीका छान निवड.. तिचे सौंदर्य पारंपारीक नाही आणि हेच तिचे बलस्थान आहे. डोळे आवडतात मला तिचे.
मध्ये एका गाण्यात विकी कौशल नाचताना दिसला.. स्टेप्स चटकन हुसन तेरा तौबा तौबा वाटली. पुन्हा चेक करायला हवे..
काही युट्युब रिव्ह्युअर्सने
काही युट्युब रिव्ह्युअर्सने वेगळाच मुद्दा उचलून धरलाय “हे हिन्दवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा “ , असं पाहिजे त्या ऐवजी नुसतच “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा “ म्हणताना दाखवलाय, याबद्दल वाद चालु आहे.
, तसाही खिल्जीच्या डान्सचा प्र्॑भाव जास्तं दिसला, खूपच केअरलेस अॅटिट्युड !
संभाजी महाराजांसाठी हिदुत्त्व महत्त्वाचे होते तर उगीच इतिहास बदलून सेक्युलर बनण्यासाठी ते वाक्य का बदललं यावर वाद चालु आहे !
मला पर्सनली आता आठवत नाहीये पुस्तकात ‘हिन्दवी स्वराज्य ‘ वाचलय ही ‘राज्य’ !
बाकी ट्रेलर काही खास वाटले नाही आणि विकी - रश्मिका तर अजिबातच फिट वाटत नाहीत तिथे !
रहमानचं म्युझिक ऐकायची उत्सुकता आहे पण मराठ्यांच्य इतिहासावर सिनेमा असताना Ajay Atul जोडीला का संधी दिली नाही हे आलच मनात !
संभाजी महाराज भर पब्लिक मधे त्यांच्या राणी बरोबर लेझिम करतील त्या काळात
लहानपणापासून हिंदवी स्वराज्य
लहानपणापासून हिंदवी स्वराज्य आणि मुघल सल्तनत हेच शब्द ऐकत आलोय..
पेशवीण?
पेशवीण?
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा, येसूबाईंचा रीले आहे ना रश्मिकाचा?
त्या लेझिम वगैरे खेळताना दाखवायच्या मूर्खपणाचा मोह नाहीच वाटतं आवरला यांनाही...
उगीच इतिहास बदलून सेक्युलर
उगीच इतिहास बदलून सेक्युलर बनण्यासाठी ते वाक्य का बदललं यावर वाद चालु आहे ! >>> सध्याच्या ट्रेन्ड मधे उलटच बघायला जास्त मिळते की. मुळात नसले तरी हिंदुत्व आणतील एक वेळ !
सध्याच्या ट्रेन्ड मधे उलटच
सध्याच्या ट्रेन्ड मधे उलटच बघायला जास्त मिळते की. मुळात नसले तरी हिंदुत्व आणतील एक वेळ !
<<<<
हो पण इथे उलट आहे, त्यामुळे आता ज्यांच्याक्॑डे संधी आहे ते बोलतायेत
त्यात लक्ष्मण उतेकर लेफ्टिस्ट म्हणून फॉर सम रिझन गुड बुक्स मधे नाहीयेत हिदुत्त्ववादी लोकां मधे .
अत्यंत हिडीस ट्रेलर छावा चा
अत्यंत हिडीस ट्रेलर छावा चा
बघून संताप संताप झाला
असं कसं दाखवू शकतात हे लोकं
काहीच कशी कुणाला लाज वाटत नाही
ही माणसे कुठं दिसली तर चोपून काढावी इतका तिळपापड झाला ते छपरी बघताना
आज तीन चार जणांच्या व्हॉटसअप
आज तीन चार जणांच्या व्हॉटसअप स्टेटस वर छावा बद्दल पोस्ट पाहिल्या..
बॉक्स ऑफिस हिट जाईल असा अंदाज आहे माझा.
साहजिकच आहे
साहजिकच आहे
नाहीच आवडला. सगळ्या ऐतिहासिक
नाहीच आवडला. सगळ्या ऐतिहासिक सिनेमांसारखाच दे मार, मेन कॅरेक्टर्स्ना नाचवणं> नथिंग न्यू. विकी पण काही खास नाही. उगा घशाच्या शिरा ताणून मुठी आवळून आवेश आणलाय! हट!
ते मावळ्यांचे काळे कपडे आणि कटप्पा सारखे लोखंडी जाळीवाले ड्रेस होलसेल ने घेतलेत की सगळ्या सिनेमात तो एकच कपडेपट फिरतोय? काहीही आहे.
कोणी जोधा अकबर चित्रपट पाहिला
कोणी जोधा अकबर चित्रपट पाहिला आहे का?
त्यात अकबर नाचताना दाखवला आहे का?
कारण त्यात अकबर हा हृतिक रोशन होता. भारतीय हिरोमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा नर्तक
>>>> दुसऱ्या क्रमांकाचा
>>>> दुसऱ्या क्रमांकाचा
पहीला क्रमांक शाखा का?
अंजली +१
अंजली +१
ते राहिलच लिहायचं , बेंबीच्या देठापासून सतत कोकलणे म्हणजे झाला योद्ध्याचा अभिनय आणि ‘छावा स्वॅग’ असे डिरेक्ट्स्र हिरो सगळ्यांचं एकमत दिसतय , ‘हाउज द् जोश’ म्हणेल इथेही
जोधा अकबरमधे अकबर करतो सुफी
जोधा अकबरमधे अकबर करतो सुफी/दरवेश डान्स (गोल गोल फिरण्याचा). मला नव्हता आवडला तो.
संभाजी लेझिम खेळतात हे त्याहून अतर्क्य. बरं एकटं मावळ्यांबरोबर खेळताना दाखवलं असतं तरी ठीक. येसूबाई??? फार तर राणीवशात फुगडी खेळताना दाखवायचं. निदान मराठी दिग्दर्शकाने एवढं तारतम्य बाळगायला हरकत नव्हती.
दुसऱ्या क्रमांकाचा
दुसऱ्या क्रमांकाचा
पहीला क्रमांक शाखा का? Happy
>>>>
छे .. मी सुपरस्टार नाही म्हणालो तर डान्सर म्हणालो..
पहिला मुकाबला सुभान अल्लाह प्रभू देवा!
नाईन्टीज किड इमोशन
इथे मला उगीचच मराठी
इथे मला उगीचच मराठी दिग्दर्शकाच्या इतक्या मोठ्या चित्रपटाला छोट्या छोट्या गोष्टी काढून नावं ठेवलेली दिसतात. आणि मग मराठी कथा असलेले चित्रपट चालत नाहीत असे म्हणतील.
लोखंडी जाळीवाले ड्रेस काय म्हणता - चिलखत आहे ते. जरा कुठे म्युझियम मध्ये जाऊन पाहिले असते तर दिसले असते की खरंच असे चिलखत होते.
छत्रपतींनी जरा आवेश दाखवला तर काय वाईट आहे? की सगळा जोश फक्त पुष्पा सारख्या तस्करांनी दाखवायचा.
बेंबीच्या देठापासून सतत
बेंबीच्या देठापासून सतत कोकलणे म्हणजे झाला योद्ध्याचा अभिनय
>>>>
याला अभिनय म्हणून का बघता.. जे काम चित्रपटात बॅक ग्राउंड म्युझिक करते, म्हणजे जोश भरायचे, तोच इफेक्ट इथे साधला जातो. आणि हे सरसकट सगळ्या हिरोणा नाही जमत.
सनी देओल ने देखील अश्याच काही कर्तृत्वाच्या जीवावर कित्येक रोल अजरामर केलेत
विकी कौशल चांगला अभिनेता आहे. चित्रपटात त्याने अभिनय सुद्धा नक्कीच चांगला केला असेल.
चित्रपट आक्षेप घेणाऱ्यांच्या
चित्रपट आक्षेप घेणाऱ्यांच्या मनासारखा बनला तर कदाचित तो बॉक्स ऑफिसवर फेल जाईल. लोकं बघायला जाणार नाहीत. आणि आपला इतिहास सर्वदूर पोहोचणार नाही.
संभाजी महाराज छत्रपती असूनही
संभाजी महाराज छत्रपती असूनही भर मैदानात बायकोसोबत नाचतात
कुठूनतरी डोंबारी असल्यासारखे दोराला लटकून शत्रूला मारतात
ग्लाडीएटर सारखे त्यांना सिंहाच्या पिंजऱ्यात सोडून लढताना दाखवतात
असला दळभद्री इतिहास दाखवायचा आणि वर त्याची भलामण करायची हे फारच थोर आहे
आणि तुमच्याकडून दुसरं काही अपेक्षित ही नव्हतं म्हणा
सिंहाच्या पिंजऱ्यात सोडून
सिंहाच्या पिंजऱ्यात सोडून लढताना दाखवतात >> हे चित्र तर मी लहानपणापासून पाहत आहे.
मैदानात बायकोसोबत नाचतात कदाचित चूक असेल पण इतर गोष्टींना आक्षेप कशाला.
आणि ऋन्मेऽऽष म्हणतो त्यानुसार साधा अभिनयाने संपूर्ण चित्रपट केला की त्याचा अमलताश होईल
बरोबर आहे आक्षेप घेतलाच नाही
बरोबर आहे आक्षेप घेतलाच नाही पाहिजे, छत्रपती झाले म्हणून काय झालं सिनेमा काढला त्यांच्यावर म्हणजे त्यांनी डोंबारी खेळ केला पाहिजे, बायकोसोबत भर चौकात नाचल पाहिजे, लांबून उडत येऊन शत्रूचा नायनाट केला पाहिजे, इथं कोणाला इतिहास हवाय
हवंय फक्त स्वस्तातले मनोरंजन
मग संभाजी असो वा बाजीराव पेशवे
हाच तर खरा इतिहास आहे जो नव्या पिढीला कळला पाहिजे
नाचवा मग
तुमच्यासारखे धन्य लोक असताना सिनेमा हिट होणारच
चुकीला चूक सुद्धा धड म्हणवत नाहीये, कदाचित चूक असेल म्हणे
धन्यवाद
आशुचँपना अनुमोदन. कैच्याकै
आशुचँपना अनुमोदन. कैच्याकै वाटतो आहे ट्रेलर बघून!
सिंहाच्या पिंजऱ्यात सोडून
सिंहाच्या पिंजऱ्यात सोडून लढताना दाखवतात >> हे चित्र तर मी लहानपणापासून पाहत आहे.
>>>>
मी सुद्धा हे चित्र लहानपणापासून बघत आलो आहे.
हे खोटे आहे का?
Pages