युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४

Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24

आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा

आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करवंटी बरोबर नारळ पण भिजवला आणि सकाळी प्यायला किंवा 2 दिवसांनी प्यायला तर कोकोनट वाइन आणि प्रोबायोटिक फायदे मिळतील का?फॉरवर्ड विशारदांनी इथे लक्ष द्यावे.

काकाफॉ Happy
फॉरवर्ड विशारद Happy

ह्या फॉरवर्ड विशारद जोशींकाकांचे फॉरवर्ड्स हे माहितीरंजक असतात.
माहितीच्या बरोबरीने मनोरंजनाची खात्री !

मध्ये तांब्या-पितळेची भांडी घासून चमकवण्याची माहिती कुठल्या धाग्यावर वाचली तेच आठवत नाहीये.
मी शक्यतो पितांबरी वापरते. ती घरच्या मोजक्या देवाच्या भांड्यांना सहज पुरते.
आता यावर्षी मंडळाच्या दुर्गा पूजेची मोठी आणि अनेक भांडी स्वच्छ करायचं काम घेतलं आहे.
इथे पितांबरी मिळत नाही, घरात असेल ती पुरेल वाटतं आहे.
पण ती नाही पुरली तर अजून पर्याय काय?
कोणी व्हिनेगर वापरलं आहे का? dilute केलेलं?
त्याने भांडी खराब होणार नाहीत ना?

जुनी काळी पडलेली चिण्च मोठ्या लिंबाएवढी + गव्हाचे कपभर पिठ + थोडे जाड समुद्री मिठ हे पाणी घालुन एकत्र करायचे, चिंच चांगली मिक्ष व्हायला हवी, मिश्रण इडली पिठाईतके जाड ठेवायचे. दहा पंधरा मिनिटांनी यांनी भांडी घासायची, धुवायची आणि परत नेहमीच्या पावडरने/ विमने घासुन सुंदर स्वच्छ धुवायची. हा उद्योग मी अनेक वर्षे केला. भांडी लखलखीत सुण्दर होतात. हातात मोजे घालावे लागतात नाहीतर बोटे/नखे थोडी काळी होतात. दर पंधरा दिवसांनी एकदा असे अनेक वर्षे करुन कंटाळल्यावर आईला धमकी देऊन तिची सगळी पितळेची भांडी माळ्यावर ढकलली.

कोणी व्हिनेगर वापरलं आहे का? dilute केलेलं? >>>> हो, मी बऱ्याचदा व्हिनेगर वापरलं आहे.
माझी घराची interior थीम ethnic असल्याने माझ्याकडे पितळ मूर्ती, समया, दिवे आणि बरेच show चे items आहेत. ते व्हिनेगरच्या पाण्यात भिजवून ठेवून मग vim liquid ने घासले की फार चकाचक स्वच्छ होतात. पण gloves वापरावे लागतात कारण maids च्या बोटाना कामे करून किंचित चिरा असतात. त्या व्हिनेगरमुळे चरचरतात.

कोकम आगळं आणि तांदूळ/गहू/बेसन पीठ एकत्र करून त्याने तांबा-पितळेची भांडी घासली तरी छान चकचकीत होतात. नंतर साबणाच्या पाण्याने धुऊन लगेच पुसून ठेवायची. पाण्याच्या थेंबाचे डाग पडतात नाहीतर.

कोणी व्हिनेगर वापरलं आहे का? dilute केलेलं?
त्याने भांडी खराब होणार नाहीत ना?
<<
कोणतेही अ‍ॅसिड चालेल, अगदी बाथरूम घासण्याचे सुद्धा.
फक्त जास्त स्ट्राँग असेल तर धातू त्यात वितळतो हे लक्षात ठेवावे, चांदीसाठी वापरू नये, पैसे विरघळून जातील..

समोसा टाईप बटाटा भाजी.त्यात खोबरं खपून जाईल, आणि कधीकधी बेदाणे पण असतात.किंवा मग तिखट आंबट चव घालून ही खिरापत घालून आंबट गोड आमटी.
(आम्हाला हा प्रश्न आलाच नाही Lol tv बघत बघत एक एक चमचा करून खाऊन संपली.)

चमचा चमचा रोज जेवण झालं की सगळ्यांनी खाऊन संपवा...
किंवा फ्रिज मध्ये ठेवा दिवाळीत करंज्या करायला वापरून टाका.

ऑफिसात किचन/ कॉमन एरियात नेऊन ठेवा. काहीही उरलं/ जास्त आणलं की हा उपाय हमखास कामी येतो.
हौशीने पोतंभर सफरचंद पिक केलेली आहेत. उद्या मी अशीच संपवणारे.

गणपतीत केली पंचखाद्य खूपच उरल आहे .. ती reuse करून काय बनवता येईल ? >>> नारळीपाकाचे लाडू ,गुळपापडी,बेसन लाडू,शिरा , डिकाचे लाडू,कणकेचे लाडु, ओल्या नारळाच्या वड्या या पैकी कशातही घालता येइल....पन्चखाद्य फार बारिक नसेल तर एकदा मिक्सरला फिरवुन घ्या म्हणजे मिळुन येइल..

तसे फिरवून घेऊन मसाला वांग्यात टाकता येईल. थोडी तिखट मसालेदार आणि थोडी गोड भाजी होते. काळा किंवा गोडा मसाला घालून

धन्यवाद नवीन नवीन टिप्सबद्दल. Happy
पीठपण कधी मिसळलं नाहीये. interesting वाटतंय. करून बघेन.
इथे मेड नाही. मला आणि नवऱ्याला मिळून करायचं आहे. Happy

व्हिनेगर dilute करायला किती प्रमाण घ्यावे?
इथे १२%, २४% व्हिनेगर मिळते.

चांदीच्या भांड्यांना टूथपेस्ट जिंदाबाद. फार लखलखीत भांडी होतात. Happy

चांदीच्या भांड्यांना टूथपेस्ट जिंदाबाद. >> त्या पेक्षा कोलगेट टूथ पावडर जास्त चांगली आहे, कमाल निघतात चांदीची भांडी त्या पावडरने.

दुसर्‍या एका धाग्यावर (कुकरचे स्फोट वगैरे चर्चा झालेल्या )सुचवलेले प्रेशर पॅन / हंडीमध्ये डायरेक्ट उसळी / खिचडी शिजवताना पाण्याला उकळी आली की शिटी काढलेले झाकण लावणे. चांगली वाफ आली की शिटी लावणे हे उपाय केल्यापासून शिटीतून फक्त वाफच येते, रंगीत पाणी यायचे बंद झाले आणि शिट्याही व्यवस्थित होतात. संबंधितांना धन्यवाद.

दुसर्‍या एका धाग्यावर (कुकरचे स्फोट वगैरे चर्चा झालेल्या )सुचवलेले प्रेशर पॅन / हंडीमध्ये डायरेक्ट उसळी / खिचडी शिजवताना पाण्याला उकळी आली की शिटी काढलेले झाकण लावणे. चांगली वाफ आली की शिटी लावणे हे उपाय केल्यापासून शिटीतून फक्त वाफच येते, रंगीत पाणी यायचे बंद झाले आणि शिट्याही व्यवस्थित होतात. संबंधितांना धन्यवाद. >> +११११

त्या पेक्षा कोलगेट टूथ पावडर जास्त चांगली आहे >>> इथे टूथ पावडरच मिळत नाही. पण पुढच्या वेळी खास चांदीची भांडी घासायला एक पॅक घेऊन येईन. Happy

आईच्या चांदीच्या भांड्यांसाठी राबवलेल्या टूथपावडर शोधमोहिमेच्या अनुभवावरून सांगत्ये.
कोलगेटची टूथ पावडर जनरली मोठ्या दुकानात, मेडीकल स्टोअरमध्ये मिळत नाही. छोटी किराणा दुकानं, मोठी टपरीसदृश जनरल स्टोअर्स, ‘येथे कोकम-आंबे-परकर मिळतील’ स्टाईल दुकानं, मुळजी चापशी किंवा गुप्ता किराणा भंडार नामक दुकानं अशाच ठिकाणी ती मिळते.

माम, बरोबर आहे छोट्या दुकानातच मिळते ती.
आणि एक लक्षात ठेवा कोलगेट पावडर लावताना ती वस्तू कोरडी आपला हात कोरडा हवा म्हंजे बेस्ट रिझल्ट मिळतो. तसेच एखाद मऊ फडकं वापरलं घासायला तर आपली नखं काळपट होत नाहीत.

धन्यवाद माझेमन आणि मनीमोहोर.
टूथपेस्ट ओल्या भांडयालापण चालते, हात फारसे काळे पडत नाहीत. आणि जो काही काळेपणा येतो तो लगेच साबणाने धुवून जातो.
पीतांबरीने मात्र हात खूप काळे पडतात.

खायचा सोडा,surf, aluminium foil चा एक लहान बोळा एकत्र पाण्यात उकळवायचे.त्यात चांदीची भांडी 5 मिनिटे उकळून नंतर साफ करायची.एकदम लख्ख होतात.स्वानुभव.

खायचा सोडा,surf, aluminium foil चा एक लहान बोळा एकत्र पाण्यात उकळवायचे.त्यात चांदीची भांडी 5 मिनिटे उकळून नंतर साफ करायची.एकदम लख्ख होतात.स्वानुभव. >>>
हे बेस्ट आहे. ताट वगैरेसाठी खूप मोठे भांडे लागेल. देवांसाठी वापरून पाहते.

खायचा सोडा,surf, aluminium foil चा एक लहान बोळा एकत्र पाण्यात उकळवायचे.त्यात चांदीची भांडी 5 मिनिटे उकळून नंतर साफ करायची.एकदम लख्ख होतात.स्वानुभव.>>>
विशेषतः: नक्षीची भांडी आणि दागिने स्वच्छ करायला हे छान आहे.
surf च? कारण ते मिळत नाही. कोणतीही डिटर्जेन्ट पावडर चालेल का? की काही विशिष्ट chemicals अ/न सावेत?

भांड्यात तळाशी अ‍ॅल्युमिनियम फॉइल पसरून त्यात हाताला सोसवेल इतपत गरम पाणी घ्यायचं. त्यात बेकिंग सोडा (किंवा वॉटर सॉफ्नर पावडर) + मीठ मिसळायचं. या पाण्यात चांदीच्या वस्तू बुडवून काढल्या की स्वच्छ निघतात.

देवांसाठी वापरून पाहते >>> देव लखलखीत होतात हा स्वानुभव. फक्त फुशारकी मारायला हे आईला सांगितलं तर जबरदस्त ओरडा खाल्ला मी - देवांना असं उकळत्या पाण्यात टाकतात का? या मुद्द्यावरून Sad

मी लिंबाच्या साली फ्रीजमध्ये जमा करून ठेवतो. त्या वापरून केलेले प्रयोग. एकदा इडलीपात्रात भरपूर पाणी त्यात लिंबाच्या साली घालून उकळले आणि तांब्यापितळीच्या भांड्यांना त्या स्विमिंग टॅकमध्ये सोडले. जर आधी नेहमीसारखे घासून सोडले तर आणखी चमकदार निघतात असा अनुभव आहे.
न सुकलेल्या सालींत पितांबरी घेऊन त्याने तांब्याचे तांबे घासले तर तेही छान चमकले.

वेलचीची पूड करून ठेवली तर वास राहतो का? चहात घालायला सालीसकट पूड केली तर?>>>> राहतो वास..मी करते सालीसकट इलायची पावडर नेहमी आणि छोट्या एअरटाईट डबीत ठेवते.

साबा वेलची (साले काढून) आणि साखर अशी पूड करून फ्रीजमध्ये ठेवायच्या. महिनोन्महिने चांगली रहायची.

वेलचीची पूड करून ठेवली तर वास राहतो का.... हो.पण मी फ्रीजमध्ये ठेवते.कारण क्ष वर्षांपूर्वी बाहेर ठेवलेल्या वेलची पावडरमध्ये टोके झाले होते.तुम्ही दर आठवड्याला करत असाल तर बाहेर ठेवली तरी चालेल.

मी शक्य तितके सगळे फ्रिजात ठेवते. माझा फ्रिज कोरड्या वस्तुनीच भरलाय.

वरचे देव उकळवायचे बाचुन तेव्हाच बोलणार होते, देवांना असे करणे बरे नाही :). ते देव आहेत, चांदीची भांडी नाहीत.

वरच्या कमेंट वाचल्या नाहीत पण वेलची पुड करायची तर वेलची तव्यावर थोडी गरम करुन मिक्सरमध्ये मुठभर साखरेसोबत सालासकट दळली तर मस्त बारिक पुड होते.

मी ह्या वेळी प्रथमच काटदरे यांची वेलची पूड रेडिमेड आणली आहे. वास चांगला आहे. काही कृत्रिम फ्लेवर मिक्स केलेला असू शकतो अर्थातच.

मी पण सालं काढतो.
बटर चिकनच्या रेसिपीत रणवीर ब्रार सालासकट दळतो त्यामुळे फक्त तिथे सालासकट ताजा मसाला करतो. शिर्‍यात/ इतर गोड पदार्थात सालं लागत नाहीत का?
आम्ही एकदा वेलची आणली की.. इथे तसं मोठं पाकिट मिळतं का कोण जाणे.. पण ती वर्षानुवर्षे संपतच नाही. मला सगळ्यात वेलची आवडते पण गोड इतकं केलंच जात नाही. बिर्याणी करुन करुन किती वेळा करणार. अनेक तयार मसाले वापरले जातात.

शिर्‍यात/ इतर गोड पदार्थात सालं लागत नाहीत का? >>> जराही लागत नाहीत. साखर घालून मिक्सरवर एकदम बारीक पूड करायची.

मी वेलची (वापरून गरम राहिलेल्या तव्यावर) भाजते. मग ती मिक्सरमधे वाटून झाल्यावर साध्या(चहाच्या नाही) गाळणीतून गाळून वर जाडसर राहिलेली पूड चहासाठी वापरते.

अशी सालं पूर्वी आजी एमआर कॉफीत घालत असे.
मी इथे घालून बघितली तर सालात फार म्हणजे फारच कमी वास असतो. मूठभर सालं इक्वल टू बारीक वेलची दाणा असं काही प्रमाण असेल. तेव्हा पासून आपल्याला फुकट न गेल्याचं समाधान पेक्षा जास्त साले वापरण्यात काही फायदा नाही असं मत झालं. माझं चूक असू शकेलच.

स्पाइस ग्राइंडर किंवा मिक्सरचा लहान जार असेल तर त्यात सालासकट वेलची एक सेकंदभर भरडली की साले काढणे सोपे जाते, खलबत्ता असेल तर त्यात पण वेलची ओबड धोबड कुटून घेतली तर साले काढणे सोपे जाते. जी साले मग चहाच्या पावडरमधे मिसळून ठेवायची. चहाच्या मसाल्यापेक्षा माइल्ड फ्लेवर येतो चहाला.

वेलची पूड काचेच्या बाटलीत ठेवावी. प्लास्टिकची बाटली / डबा किंवा चमचा त्यात ठेवलेला असला तर त्यातल्या इसेंशियल ऑइल ची काहीतरी रिअ‍ॅक्षन होते आणि प्लास्टिकचं Corrosion होतं हळू हळू.

Pages