Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सावी हा असाच भुषण कुमारने
सावी हा असाच भुषण कुमारने आपल्या बायकोच्या प्रेमासाठी काढलेला आणि अनिल कपूरच्या खांद्यावरून वाहिलेला सिनेमा आहे.>> आज समोर रेकमंडेशन आलं म्हणून सावीचा सिनॉप्सीस वाचला. त्यावरुन मला शंका आली की हा The Next Three Days ची देसी कॉपी असावा. खात्री करायला पहिली दहा मिनिटे बघितला. फक्त जेंडर हाच काय तो बदल दिसला ओरिजीनल आणि या कॉपीत. पण मग ओरिजीनल आवडलेला असताना हा बघायची रिस्क घ्यावी की ओरिजीनलच परत बघावा? या प्रश्नात ओरिजीनल जिंकला.
त्यावरुन मला शंका आली की हा
त्यावरुन मला शंका आली की हा The Next Three Days ची देसी कॉपी असावा. >> कुठल्या तरी फ्रेंच सिनेमाची कॉपी आहे असे वाचलेले.
बरसों पहले ते दोघं छान
बरसों पहले ते दोघं छान प्रेमात असताना ती या दु:खी, निगेटिव्ह ओळी का गायली असेल >>>
मुळात मग "किसी नजर को तेरा इंतजार आजभी है" हे सुद्धा कशाला म्हणतील
संवादात गडबड झाली असेल. पूर्वी ते एकत्र गजला म्हणत इतकेच खरे सांगायचे असेल. स्पेसिफिकली ही गजल नव्हे.
'अरे, आपण आहोत खरे एकत्र.पण
'अरे, आपण आहोत खरे एकत्र.पण उद्या देव न करो वेगळे झालो, तर आपल्याकडे व्हॉटसप स्टेटस ला टाकायला चांगला कंटेंट आहे का?'
'अगदी बरोबर बोललीस बघ.प्रेमभंगाला पण किमान 500 लाईक्स आले पाहिजेत.नाहीतर प्रेमभंग करून उपयोग काय?चल गाणं बनवू.'
किसीं नजर को तेरा....
(No subject)
कुठल्या तरी फ्रेंच सिनेमाची
कुठल्या तरी फ्रेंच सिनेमाची कॉपी आहे असे वाचलेले.>> हो आत्ता मी शोधलं नेटवर - the next three days हा एका फ्रेंच सिनेमाचा रिमेक आहे.
आता ओरिजीनल फ्रेंच शोधून बघते कसा आहे. The next three days आवडलाय मला.
सावी मधे नवऱ्यावर खुनाचा आरोप, त्याला कुणीतरी धडकले असणं त्याच इन्श्युलीन इंजेक्षन घेणं वगैरे सीन बघितले सुरवातीचे. इंग्रजी सिनेमात नवरा बायको फक्त अदलाबदल करुन इमॅजीन करा. बायकोवर आरोप बायको धडकते बायको डायबेटिक आणि नवरा सोडवायचा प्रयत्न करतो इंग्रजी सिनेमात.
अनु
बाला (आयुष्मान, भूमी, यामी) मधे आयुष्मान ब्रेकप नंतर तिला कळावे म्हणून स्टेटसला 'दिल चिरके देख तेरा ही नाम होगा' वगैरे स्टेटसला का फेसबुकवर टाकतो. ऐकूनच रक्तबंबाळ वाटलं.
मी_अनु _/\_
मी_अनु
_/\_
मग ही गझल म्हणायची वेळ आल्यावर आणि गझल म्हणून झाल्यावर ती म्हणाली असेल "पहा, म्हणाले नव्हते का मी तुला? झाला किनै उपयोग?"
पार्टीत 'मेरे बाद अब किसको
अस्मिता, rmd

पार्टीत 'मेरे बाद अब किसको बरबाद करेगी', 'दिल चिरके देख' 'दिल के झरोके मे' सारखी गाणी राजरोस त्या नायिकेच्या होणाऱ्या नवऱ्याकडचे लोक कसे म्हणू देतात काय माहित
तुरू रू रू रू रू रू, तेरा
तुरू रू रू रू रू रू, तेरा मेरा प्यार शुरू
या चालीवर किसी नजर को तेरा हवं होतं. त्यांना तरी काय माहिती
काही वर्षांनी मायबोली डॉट कॉम बनेल, तिकडे रथी महारथी जमतील आणि मग हुं
हो.
हो.

ब्रेकप सोबत एक प्रकार अजूनही आहे. 'इंग्लिश बाबू देसी मेम' टाईपचची गाणी जिथे हिरो हिरविनीला 'ज्ञानदान' करत असतो. शोलेत धर्मेंद्र जसा जेंटलमन वृत्तीने बसंतीला कैऱ्या पाडायला शिकवतो. वेगळेच लोणचे झाले त्या कैऱ्यांचे ते सोडा. धर्मेंद्रने तर फार वेळा केले आहे. 'एक बी सी डी छोडो, नैनों से नैना जोडो'. 'मैं गांव की गोरी बाबू रंग लहरी, जरा मुझको भी पढना सिखादे तू' गट. मुलगी शिकली प्रगती झाली ..
गावात बाकी कितीही जुनाट
गावात बाकी कितीही जुनाट वातावरण असुदे, गाव की गोरी मात्र हमखास जास्तीत जास्त तुटपुंजी बॅकलेस घालणार.आणि सर्वत्र बागडत फिरणार.सगळ्यांना तिचीच मदत हवी असणार.होळीच्या गाण्यात सगळे आधी तिलाच पुढे वेगळ्या कपड्यात नाचायला चान्स देणार.कोणीही मागची पंटर 'बहुत अटीट्युड मारती है वो.इसबार मै जलदी आके आज नाचुंगी' म्हणत नाही.
1 मेन नायक नायिका दुसरे थोडे कमी पैश्यात मिळणारे नायक नायिका असले की दुसऱ्या जोडीतला एक जण टपकलाच पाहिजे.जुन्या सडक मध्ये तर फुकट दोन्ही साईड कलाकार टपकवले होते बहुतेक.
मी_अनू, रमड
मी_अनू, रमड, अस्मिता

होळीच्या गाण्यात सगळे आधी
होळीच्या गाण्यात सगळे आधी तिलाच पुढे वेगळ्या कपड्यात नाचायला चान्स देणार >>>>>
हो. आणि हिरो व वाकड्या नजरेने बघणाऱ्या व्हिलनशिवाय सगळे तिला बहन किंवा भाभी समजणार. तिसरा कुणी प्रेमात असेलच तर तो प्रपोज वगैरे करणार नाही, नुसताच सॅड सॉंग्ज गात ऑब्लिक रेफरन्सेस देणार. ऍक्चुअली जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलीवर एकाच वेळी किमान ७-८ जण लाईन मारत असतात.
मी_अनु, अस्मिता
मी_अनु, अस्मिता
बहुत अटीट्युड मारती है वो.इसबार मै जलदी आके आज नाचुंगी >>> हे आवडलंच
मला एकदम शोले मधला जयाचा सीन आठवला. संजीव कुमार तिला मुलासाठी मागणी घालायला जातो तो. प्रचंड ओव्हरबोर्ड गेली आहे ती होलीची एक्साइट्मेंट दाखवताना.
नुसतात सॅड सॉंग्ज गात ऑब्लिक
नुसतात सॅड सॉंग्ज गात ऑब्लिक रेफरन्सेस देणार >>> होळी नसतानाही सिद्धार्थ रे ने हे बाजीगर मधे करून दाखवलं आहे
प्रचंड ओव्हरबोर्ड गेली आहे ती
प्रचंड ओव्हरबोर्ड गेली आहे ती होलीची एक्साइट्मेंट दाखवताना. >>>
हो डोक्यात गेला होता तो सीन. बहुतेक दिग्दर्शकाने अती केलं असावं.
उलट ‘उपहार’मध्ये लहान वयात लग्न झालेली व लग्नाचा अर्थही न समजलेली चाईल्ड ब्राईड फार छान दाखवलीय तिनेच.
पार्टीत 'मेरे बाद अब किसको
पार्टीत 'मेरे बाद अब किसको बरबाद करेगी', 'दिल चिरके देख' 'दिल के झरोके मे' सारखी गाणी राजरोस त्या नायिकेच्या होणाऱ्या नवऱ्याकडचे लोक कसे म्हणू देतात काय माहित >>>
हो असाच प्रश्न मलाही पडला होता. त्या चित्रपटीय व्याख्या लेखात तेच लिहीले होते - "हे तू कोणाबद्दल बोलतोयस? तुझी व हिची कहाणी असेल तर थेट सांग. नाहीतर आमच्या कार्यक्रमात हे दुनियेचे रडगाणे कशाला?" 
The Ministry of Ungentlemanly
The Ministry of Ungentlemanly Warfare अशा विचित्र नावाचा सिनेमा आहे प्राईमवर. आठ मिनिटे पाहून बंद केला.
आठ मिनिटे पाहून बंद केला >>>
आठ मिनिटे पाहून बंद केला >>> तुमच्या प्रिसिजनची दाद द्यायला हवी आचार्य! पण मुळात हे असलं काहीतरी चालूच कशाला करायचं?
नाहीतर आमच्या कार्यक्रमात हे दुनियेचे रडगाणे कशाला? >>>
खरंय! दुनियेचे रडगाणे वरून एकदम 'मांगा है तुम्हे दुनियाके लिये' आठवलं. ते एक गाणं मला कायम साळसूद नपेक्षा शहाजोगपणाचं वाटायचं - की माझ्याकरता नाही, दुनियेचं भलं व्हावं म्हणून तुम्हे मांगा है! बदमाष!!
रिक्षा. इथे बघा "गरीब हीरो"
रिक्षा. इथे बघा "गरीब हीरो"
https://www.maayboli.com/node/65144
मुळात हे असलं काहीतरी चालूच
मुळात हे असलं काहीतरी चालूच कशाला करायचं? >>> एक डाव माफी असावी
जेम्सबॉण्ड सारखं काहीतरी असेल म्हणून वाटलं. पण सुरूवातीच्या एका प्रसंगानंतर त्याच त्या हिटलरच्या जुनाट टेप आणि रटाळ कॉमेण्ट्री ऐकून बंद केला.
या धाग्यावर इतके येणे जाणे येते होते कि मितवा हे गाणे चिकवा असे ऐकू येते. आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिसलेल्या कमेण्टी वाचायच्या आहेत.
प्रेमभंगाला पण किमान 500
प्रेमभंगाला पण किमान 500 लाईक्स आले पाहिजेत.नाहीतर प्रेमभंग करून उपयोग काय?चल गाणं बनवू. >>>
शोले, ज.भा. होळी सीन ओव्हरअॅक्टिंग >>> +१
असा ओव्हरअॅक्टिंगवाला सीन आला, किंवा मां/दादी मां/ पिताजी गटातलं पात्र एखाद्या सीनमध्ये खूप उत्साहात, बडबड करताना दाखवलं तर पुढच्या १०-१५ मिनिटांत (सीनची १० मि. नव्हे, चित्रपटाची १० मि.) काहीतरी पहाड-कोसळू सीन असणार हे ओळखायचं. (पहाड त्या पात्रावर कोसळतो, प्रेक्षकांवर नाही... प्रेक्षकांवर आख्खा सिनेमाच कोसळलेला असतो.)
भारी आहेत प्रतिसाद वरचे सगळे
भारी आहेत प्रतिसाद वरचे सगळे
पहाड त्या पात्रावर कोसळतो,
पहाड त्या पात्रावर कोसळतो, प्रेक्षकांवर नाही... प्रेक्षकांवर आख्खा सिनेमाच कोसळलेला असतो >>>>

पहाड त्या पात्रावर कोसळतो,
पहाड त्या पात्रावर कोसळतो, प्रेक्षकांवर नाही... प्रेक्षकांवर आख्खा सिनेमाच कोसळलेला असतो >>>
एकेक प्रतिसाद धमाल आहेत.
एकेक प्रतिसाद धमाल आहेत
एखादं पात्र सिनेमात अतिशय
एखादं पात्र सिनेमात अतिशय हसरं, साधारण बायपोलर ची आनंदी फेज चालू असल्या सारखं ओव्हर उत्साही,थोडं आक्रमक असलं की पुढच्या 15 मिनिटात ते गाडीखाली आलं किंवा पिशाच्चाकडून खाल्लं गेलं किंवा गुंडांच्या गोळीबारात मेलंच पाहिजे. जिवंत राहिलं की फाऊल होतो.
दोन f1 रेसिंगवरचे सिनेमे
दोन f1 रेसिंगवरचे सिनेमे पाहिले. पहिला फोर्ड वि फरारी. केन माईल्स आणि कॅरोल शेलबी ह्या जोडीची गोष्ट आहे. ह्या दोघांनी फोर्डच्या गाडीवर काम करून फरारीस नमवण्याचा कसा प्रयत्न केला ह्यावर सिनेमा आहे. ह्यात मग माईल्सचा विचित्र स्वभाव, फोर्ड मधले ब्युरोक्राटीक अडथळे वैगेरे वैगेरे गोष्टी येतात. ख्रिश्चन बेल आणि मॅट डिमन असून सुद्धा सिनेमा ठीक ठीक वाटला. उगाच खेचला आहे असे काही ठिकाणी वाटले.
रश हा दुसरा सिनेमा. ह्यात निकी लौडा म्हणून ऑस्ट्रीयन रेसर आणि जॅक हंट ह्या ब्रिटिश रेसर मधली चुरस दाखवली आहे. अत्यंत calculating असणारा निकी आणि आतातायी जेम्स हंट ह्यांची पात्रे छान रंगवली आहेत. सिनेमा खूप आवडला.
मितवा हे गाणे चिकवा >>> मी
मितवा हे गाणे चिकवा >>> मी तसंच म्हणते हे गाणं
प्रेक्षकांवर आख्खा सिनेमाच कोसळलेला असतो >>>
मी_अनु : +१ . बायपोलरची आनंदी फेज हे करेक्ट वर्णन आहे.
Pages