Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*बालपरवेसी >>> छान.
*बालपरवेसी >>> छान.
शिवकालीन शब्द दिसतोय.
भाषासंकर झालाय :
सं. बाल + फा. परवरिश् = पालन
‘भेटणे’
‘भेटणे’
हे क्रियापद निर्जीव वस्तू / संकल्पनांच्या संदर्भात लेखनात वापरल्यास त्यावर अधूनमधून टीका होत असते. प्रा. गोरे यांच्या मराठीतील एकाक्षरी शब्दांच्या लघुकोशाला प्र न जोशी यांचे छोटे प्रास्ताविक आहे. त्यात ते असे म्हणतात,
“एरवी ध्यानात न येणारे एकाक्षरी शब्द येथे त्यांच्या विविध अर्थांसह व उदाहरणांसह भेटतात”.
खुद्द श्री जोशी देखील एक कोशकार आहेत.
म्हणजेच, ‘निर्जीव वस्तू भेटणे’ हा वाक्यप्रयोग आता प्रमाण मराठीनेही स्वीकारलाय असे म्हणावे काय ?
Seductress ला मराठी प्रतिशब्द
Seductress ला मराठी प्रतिशब्द आहे का? अभिसारिका योग्य आहे का ?
https://www.maayboli.com/node/2361
येथे चर्चेत आले होते.
अभिसारिका म्हणजे प्रियकराला
अभिसारिका म्हणजे प्रियकराला भेटण्यासाठी उत्सुक असलेली ....असे मला वाटते. मेघदूतात संदर्भ आहे का?
निर्जीव संकल्पनांना अलंकारिक
निर्जीव संकल्पनांना अलंकारिक अनुभूतीसाठी मानवी रूपे आरोपली जातात तेव्हा त्यांना सजीवांना लावली जाणारी क्रियापदे शोभतात. नदी सागराला येऊन भेटते म्हणताना केवळ ती मिळत किंवा मिसळत नाही, तर नदी नावाची मानवीरूपारोपित संकल्पना सागर नावाच्या मानवीरूपारोपित संकल्पनेला येऊन भेटते. भेटीत भावनिक आदानप्रदान अपेक्षित आहे.
'एकाक्षरी शब्द भेटणे' >> इथे केवळ सापडणे हा अर्थ अभिप्रेत नसून एखाद्या अनोळखी व्यक्तीची अनपेक्षित प्रसंगी भेट होणे या अर्थी ते अभिप्रेत असावे असा माझा अंदाज आहे.
* अलंकारिक अनुभूतीसाठी मानवी
* अलंकारिक अनुभूतीसाठी मानवी रूपे >>>> अगदी. छान !
आणि, शब्द मुळात निर्जीव वस्तू
आणि, शब्द ही मुळात निर्जीव वस्तू नाहीच आहे!

भेटणे या शब्दात काही देवाण
भेटणे या शब्दात काही देवाण घेवाण अपेक्षीत आहे. ती देवाण घेवाण शाब्दिक, भावनीक किंवा इतर काहीही असू शकते.
जेंव्हा एखादी व्यक्ती भेटली असे म्हणतो तेंव्हा त्या व्यक्तीत आणि आपल्यात शब्दांची, हास्यकटाक्षाची, हात हलवून Hi म्हणणे असे काहीतरी घडलेले असते. तसे न झाल्यास ती व्यक्ती नुसतीच दिसते . नजरभेटीतही नजरेची देवाण घेवाण असतेच.
शब्दकोषात साधारणपणे आपण शब्द शोधतो आणि ते आपल्याला मिळतात / सापडतात. पण कधीकधी शब्द वाचताना (किंवा ऐकतानाही) शब्दातलं नादमाधुर्य आपल्याला गुंगवून ठेवते, कधी तो वाचताना आपल्या आठवणी चाळवतात तर कधी काही भावना. अशा वेळेस शब्द भेटतात. हाच न्याय इतर निर्जिव वस्तूंना पण लागू होतो.
सुंदर विवेचन, माधव.
सुंदर विवेचन, माधव.
सुंदर विवेचन, माधव. +१
सुंदर विवेचन, माधव.
+१
पेच
पेच
= पीळ; वेढा; आटा; वळसा
>>>>
पेचकट
= (मुद्रण) जुळविलेल्या मजकुराचें, टाइपाचे पृष्ठ बांधण्यासाठी वापरलेला पक्का दोरा.
एकेकाळच्या ‘कंपोज छपाई’च्या काळातला हा वैशिष्ट्यपूर्ण शब्द होता.
(लहानपणी ऐकला होता).
>>> Seductress ला मराठी
>>> Seductress ला मराठी प्रतिशब्द आहे का? अभिसारिका योग्य आहे का ?
नाही.
मोहिनी / मदनिका वगैरे पर्याय प्रचलित आहेत, ते बरे आहेत.
>>> शब्दकोषात साधारणपणे आपण
>>> शब्दकोषात साधारणपणे आपण शब्द शोधतो आणि ते आपल्याला मिळतात / सापडतात. पण कधीकधी शब्द वाचताना (किंवा ऐकतानाही) शब्दातलं नादमाधुर्य आपल्याला गुंगवून ठेवते, कधी तो वाचताना आपल्या आठवणी चाळवतात तर कधी काही भावना. अशा वेळेस शब्द भेटतात. हाच न्याय इतर निर्जिव वस्तूंना पण लागू होतो.
होय, किंवा ते त्यांच्याच अर्थाचा एखादा नवीन/निराळा पैलू आपल्यासमोर खुला करतात. माणूस प्रत्येक भेटीगणिक अधिक उमजत जावा तसे उमजायला लागतात.
छान पोस्ट.
छान पोस्ट.
प्रत्येकाला भेटत नाहीत शब्द फक्त मिळतात आणि नेमकं त्यांना तीच भेट वाटते. शब्दच ठरवतात ते कुणाला भेटायचं कुणाला नुसतं 'मिळून' यायचं. एरवी ते पोकळच असतात 'भेटी लागी जीवा लागलेसी आस' क्षणांची वाट बघत असतात. कुणीतरी भेटतो मग प्राण फुंकणारा
मदनिका माहिती आहे आणि आवडला आहे पण तितका चपखल वाटला नाही. पण चालवून घेऊ.
धन्यवाद !चांगली चर्चा
धन्यवाद !चांगली चर्चा
. . .
द्वित्त
= दुप्पट; दुहेरी; जोड (अक्षर)
द्वित्तअसलेले अनेक शब्द मराठीत आहेत : कळकळ, खळखळ, भळभळ, मळमळ, . . . इत्यादी
द्वित्त >> नवीन शब्द कळला.
द्वित्त >> नवीन शब्द कळला. आभार.
या शब्दाची व्युत्पत्ती जाणून घ्यायला आवडेल.
उपलब्ध कोशांमध्ये तरी नाही
उपलब्ध कोशांमध्ये तरी नाही सापडली.
द्विरुक्त याचे लघुरूप असेल का, कदाचित ? ?
नाही वाटत. उक्त ह्यात वच धातू
नाही वाटत. उक्त ह्यात वच धातू आहे. त्या उ आणि क चा लोप होऊन त् यायला काही कारण सापडत नाही.
द्विज म्हणजे दुसर्यांदा
द्विज (ब्राह्मण) म्हणजे दुसर्यांदा जन्मलेला का?
होय,
होय,
१ ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य (यांची मुंज म्हणजे दुसरा जन्म होतो, त्यावरून).
२ कोणताहि अंडज प्राणी (पक्षी, साप, मासा इ॰ यांचा अंडें फुटल्यावर होणारा दुसरा जन्म होतो यावरून).
दाते शब्दकोश
पण मुंज म्हणजे दुसरा जन्म का?
पण मुंज म्हणजे दुसरा जन्म का?
तसे तर कुठल्याही आई ला द्विज म्हणायला हवे. ती खरी दोनदा जन्म घेत असते!
*मुंज म्हणजे ? >>> याबाबत
*मुंज म्हणजे ? >>> त्याचा लाक्षणिक अर्थ येथे हिंदीत दिला आहे : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C
मानव जब पैदा होता है तो वो केवल पशु समान होता है परन्तु जब वह संस्कारवान और ज्ञानी होता है तव ही उसका जन्म दुवारा अर्थात असली रुपमे होता है।
तो दुसरा अर्थ जो प्राण्यांचा आहे तो सोपा आहे.
वरील द्विज चर्चेवरून ३ शब्द
वरील द्विज चर्चेवरून ३ शब्द आठवले.
चंद्रासाठी द्विजेंद्र आणि द्विजेश असे दोनही शब्द वाचलेत, कुठे ते नाही आठवत.
वैष्णव भोजनात “द्विजशप्त” खाद्यान्नांची सूची असे, म्हणजे वैष्णव ब्राह्मणांना वर्जित असलेले पदार्थ. तमिलनाडुचे अय्यंगार आणि बंगाली ब्राह्मण विशेष पाळत असत पूर्वी.
* द्विजेंद्र >>> छान ! इतके
* द्विजेंद्र >>> छान ! इतके सारे अर्थ आहेत :
1. ज्ञानवान 2. चंद्रमा 3. कपूर 4. गरुड़ 5. द्विजराज
https://www.hindi2dictionary.com/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0...
..
**“द्विजशप्त” खाद्यान्नांची >>> रोचक.
परिसर्ग
परिसर्ग
= परिसर + निसर्ग
निसर्गात असणं या निसर्गसुलभ उर्मीला हाक घालणारा हा शब्द.
हा शब्दकोशात नसून तो वसंत वसंत लिमये यांनी तयार केलेला आहे.
'परीक्षण' आणि 'परिनिरीक्षण'
'परीक्षण' आणि 'परिनिरीक्षण'
चित्रपट सेंसॉर बोर्डला "परिनिरिक्षण मंडळ" म्हणतात हे कधी लक्षपूर्वक वाचले नव्हते.
बरोबरच वाटले. परीक्षण क्रिटिक लोकं करतात आणि परिनिरिक्षण ही सेंसॉर वाली मंडळी.
+१
+१
नाटकांच्या संदर्भात पूर्वी तो शब्द वाचला होता.
परीक्षण क्रिटिक लोकं करतात
परीक्षण क्रिटिक लोकं करतात आणि परिनिरिक्षण ही सेंसॉर वाली मंडळी >> सहीच!
वाह हे माहीत नव्हते.
वाह हे माहीत नव्हते.
परीक्षण क्रिटिक लोकं करतात
परीक्षण क्रिटिक लोकं करतात आणि परिनिरिक्षण ही सेंसॉर वाली मंडळी >> सहीच!
+1
Pages