संथ चालती ह्या मालिका

Submitted by फारएण्ड on 2 June, 2008 - 00:00

कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्‍याच बेटियॉ दिसत होत्या. एकूण प्रसंग सात फेरे वाला होता. सगळे क्रमाक्रमाने आनंदी, वात्सल्ययुक्त (काही 'युक्त' म्हंटले की श्रीखंडच आठवते. भूक लागली ) वगैरे नजरेने पाहात असतात. तेवढ्यात त्यातली एक खुनशी वगैरे हास्य करते यातील त्या कृतिका देसाईसारख्या दिसणार्‍या बेटीकडे बघून (सोयीसाठी आपण तिला क्रुतिका देसाईच म्हणू), चार पाच वेळा कॅमेरा फटाफट झूम इन झूम आउट होतो, पण इकडे फेरे चालूच असतात. वधूच्या डोक्यावरचा घूंघट पूर्ण चेहरा झाकत असतो, पण पुढून खालच्या कोनातून बघितले की आत एक हॉरर पिक्चर मधे दाखवतात तसे डोळे असलेला चेहरा दिसतो. त्याचबरोबर एक दुसरी बेटी कोठेतरी बहुधा कोंडलेली तेथून बाहेर पडते व रिक्षाने कोठेतरी जायला निघते.

मग क्रु.दे. ला शंका येऊ लागते, तेवढ्यात तो घूंगट जरा हालतो आणि तिच्या लक्षात येते की ही भलतीच बेटी फेरे मारते आहे. आणि एकदम क्रु.दे. 'रोक दो ये शादी' ओरडते. पुढचे ५-१० मिनीटे प्रत्येकाचे reaction शॉट दाखवलेत नुसते वेगवेगळ्या कोनातून. प्रत्येक जण इमाने इतबारे दुसर्‍याची प्रतिक्रिया झाल्याशिवाय आपली देत नाही. इतके की शेवटी दिग्दर्शकच विसरतो की मूळ आरोळी क्रु.दे नेच मारली होती, कारण तिच्याच ओरडण्यावर तिचीच पुन्हा प्रतिक्रिया दाखवली आहे. या प्रतिक्रियांमधेच चार पाच फेरे होऊन गेले असतील मग तो गोंडस वगैरे दिसणारा वर त्या बेटीचा घूंघट (खस कन वगैरे नाही, अगदी 'घूंघट उठा रहा हू मै...' कभी कभी स्टाईल) उचलतो आणि अजूनपर्यंत तुमच्या लक्षात आले नसेल तर (मात्र तुम्ही या सिरीज पुन्हा पुन्हा पाहा) सांगतो की त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतीच मुलगी निघते.

मग तो बहुधा सासरा किंवा मोठा दीर असावा असा माणूस (तो पहिल्या मुन्नाभाई मधला... ज्याला शेवटी मुन्नाभाइ बोलका करतो तो, नाव आठवत नाही) बरेच डॉयलॉग बोलतो. मग पुढची वाक्ये ऐकू आली नाहीत (कोणीतरी चुकून रिमोटवर mute दाबले आणि रिमोट शोधून म्यूट बटन शोधून लावण्यासाठी तेथे काही रिची बेनॉ बोलत नव्हता) पण झीकृपेने सबटायटल्स होती: you are a prostitiute , किंवा ...behaving like a lajawanti girl किंवा असेच काहीतरी. वर तिला ही धमकी देतो की जर तू पुन्हा असे केलेस तर काहीतरी करीन. म्हणजे एकदा हा प्रसंग घडल्यावर सुद्धा पुढच्या लग्नात जिचे लग्न आहे तीच मुलगी फेरे मारायला उभी राहील याचा भरवसा यांना नाही.

१० मिनीटेच एवढी जबरदस्त असतील तर सिरीयल काय असेल? लावायला पाहिजे हे चॅनेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेपनाह सिरीयलची मेन जोडी मला आवडते पण परवाचा एपिसोड फक्त बघितला कारण युट्यूबवर समजलं की अखेर आदित्य झोया एकत्र येणार. कालचा एपिसोड अजूनही टाकला नाहीये voot वर. टाकला की बघेन. जेनिफर विंगेट, हर्षद चोप्रा जोडी आहे. हर्षदची आई किती यंग दिसते, सासू वाटणार नाही जेनिफरची.

बाप माणूस मालिका अजून सुरु आहे का? कोणी अपडेट्स देऊ शकेल का? >> सध्या बापमाणूस मधले मेन character मिस्सीन्ग आहे, रवींद्र मंकणी यांना स्मृतीभ्रंश झाल्याचे दाखवले आहे, आणी ते घर सोडून निघून गेल्याचे दाखवले आहे.. आईसाहेब (mrs बापमाणूस ) या सध्या दरबाराचे कामकाज पाहतात, संग्राम समेळ (ललित २०५ मिळाल्यामूळे ) चे काम या सिरीयल मध्ये संपले, त्याला निशा (सूर्या ची चुलत बहीण) मारते, आता निशा main villan दाखवली आहे

कलर्सवर अजून एक नवीन सिरियल सुरु होतेय. ' तू अशी जवळी रहा'... ओव्हर पझेसिव्ह नवरा आणि नाजूक बायको...हिरो नवीन वाटला...हिरोइन 'सरस्वती' मधली सरस्वती आहे.... Life Ok वरच्या 'सौभाग्यवती भव' सारखी वाटतेय.

`इस प्यार को क्या नाम दू' नावाची एक सिरियल पूर्वी मध्ले काही भाग बघितली होती. तीच आता `रब्बा वे ' नावाने लागत्येय ७ ते ८ या वेळात. बरून सोबती आणि सना मक्बूल - गोड जोडी आहे. अर्थात एक तास म्हणजे फार वेळ जातो. जमेल तेव्हा बघणार.

कलर्सवर अजून एक नवीन सिरियल सुरु होतेय. ' तू अशी जवळी रहा'... ओव्हर पझेसिव्ह नवरा आणि नाजूक बायको...हिरो नवीन वाटला...हिरोइन 'सरस्वती' मधली सरस्वती आहे.... Life Ok वरच्या 'सौभाग्यवती भव' सारखी वाटतेय. >>>>> ती सिरियल झी युवावर सुरु होणारे. तितिक्षा तावडे आणि नाजूक बायको? Uhoh Proud

कलर्सवर अजून एक नवीन सिरियल सुरु होतेय. ' तू अशी जवळी रहा'... ओव्हर पझेसिव्ह नवरा आणि नाजूक बायको>>> 'अग्निसाक्षी'

मला तेंव्हाही आवडायचे दोघं खुशी व अर्णव सिंग रायजादा.. खुशीची आत्या पण.परत दाखवतायतय ती संपतही आली.
खुशीच्या बहिणीचं व दिराचं ठिगळ ऊगाच घेतलं होतं.

हो अंजूताई मला पण बेपनाहचे लीड्स आवडतात दोघंही. दोघेही फार छान एक्सप्रेसिव्ह आहेत जास्तकरून हर्षद! Happy
त्याची आई झालेली अभिनेत्री त्याच्याहून 2 वर्षांनी लहान आहे! Lol

त्याची आई झालेली अभिनेत्री त्याच्याहून 2 वर्षांनी लहान आहे! >>> वाटतेच लहान ती मेन पेअरपेक्षाही. हा सावत्र मुलगा दाखवला आहे का.

बेपनाह काल voot वर एक एपिसोड बघितला, त्यात ती झोयाची सासुच तिला मेसेज पाठवते की काय. झोया कसली दिसतेय ओये होये, लवली एकदम. आदित्य पण फार गोड दिसतो काही ठिकाणी. झोयाची सासू पण सॉलिड दिसते.

नाही अगं आदी आणि अर्जुन दोघे सख्खे मुलं आहेत >>> अच्छा ओके. परत आता त्यादिवशीनंतर बघितलं नाही. झोयाला ज्यूस प्यायला लावतात त्या ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स केलं असावं म्हणजे किटी पार्टीत गोंधळ घालेल ती, असं वाटतं.

मधुगंधा कुलकर्णीची मालिका म्हणून कलर्स मराठीवरची 'हे मन बावरे'चा पहिला भाग पाहिला, आणि सॅडली फक्त १५च मिनिटं पाहू शकले Sad पात्र एस्टॅब्लिश करायची कोण घाई! संवाद तेच ते, पहिल्याच प्रवेशात सगळं काही सांगून टाकणारे, काही पात्र अगदी खोटी, काही डोक्यात जाणारी. सिरियलमधली ऒफ़िसेस काही बदलायचं नाव घेत नाहीत. मधुगंधा, मंदार देवस्थळी असले तरी चार क्युबिकल्स आणि एक शिपाई आणि एक केबिन हेच ऑफिसचं रूप! ट्रॅव्हल एजन्सी आहे, तर तिथे क्युबिकलसमोर ग्राहकांना बसायला खुर्च्याही नाहीत! अरे कधी बदलणार हे? सोशिक हीरॉइनही अगदी तीच! साडी नेसणारी, सासूचं वाट्टेल ते बोलणं ऐकून घेणारी, घराकरता राब राब राबणारी! एकूणात, घनघोर निराशा झाली.

साडी नेसणारी, सासूचं वाट्टेल ते बोलणं ऐकून घेणारी, घराकरता राब राब राबणारी! एकूणात, घनघोर निराशा झाली >>>>> पण प्रोमोजमध्ये मृणालला ड्रेसेस मध्ये दाखवल होत. Uhoh

बेपनाह बघते मधेच कधीतरी. आदित्य झोया काय दिसतात, cute couple. अभिनय पण छान.

तो राजवीर आदित्यचा सावत्र भाऊ असणार नक्की. तो मला आवडतो, जस्सी जैसी कोई नही चा हिरो.

कलर्स मराठीवर ’अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ पाहतं का कोणी? गुरु-शुक्र रात्री ९.३० ला असते. मकरंद अनासपुरे मुलाखती घेतो सेलिब्रिटीजच्या. मस्त चालू आहे कार्यक्रम. बॅ. उज्ज्वल निकम, नितिन गडकरी, अमेय वाघ-निपुण धर्माधिकारी, गिरिश कुलकर्णी-जितेंद्र जोशी यांच्या गप्पा विशेष आवडल्या. अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलिप प्रभावळकर हे तिघेही एकत्रच आले होते, त्यामुळे त्यांच्याशी म्हणाव्या इतक्या गप्पा रंगल्या नाहीत. बाकी अभिनेते-अभिनेत्री, मालिकेतल्या हीरॉइन्स वगैरेही येऊन गेले आहेत, छान मनोरंजन होतं.
रीपिट असते का माहित नाही, पण व्हूटवर जरूर पहा.

'हे मन बावरे'>> साडी नेसणारी, सासूचं वाट्टेल ते बोलणं ऐकून घेणारी, घराकरता राब राब राबणारी! एकूणात, घनघोर निराशा झाली +१
तरीही हिरोइन मृणाल दुसानीस आहे , म्हणून अधून मधून पहावी लागतीये Wink
सध्या चालू असलेला शशांक केतकर-शर्मिष्ठा राउत मधला भाऊ-बहिणीं चा प्लॉट चांगला वाटतोय पहायला. संवाद आणि अभिनय चांगले वाटले.