बेगम चली वेस्टर्न!!

Submitted by अश्विनीमामी on 12 July, 2024 - 08:55

तर मंडळी, राहायच्या जागेचा प्रश्न अचानक ऐरणीवर आलेला आहे. झालं असं की इथली जागा सोडून कुठे तरी शिफ्ट व्हायचेच ठरवले होते. लेकीची ऑगस्ट मधे दहा दिवसांची लंडन केंब्रिज ट्रिप होती त्या नंतर हा उपक्रम हाती घ्यायचे आम्ही ठरवले होते. पण काल बीएम सीची नोटीस
ती ही द ऑक्युपंट ह्या नावाने मला काय तर पूर्ण बिल्डिंगचेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही जागा लगेच व्हेकेट करा नाही तर आम्ही अ‍ॅक्षन घेउ. हे ते.

ही नोटीस खरे तर घरमालकाला द्यायला हवी. मला सोडायचेच आहे पण मागे ही अर्जन्सी लावली. ह्या बाबतीत ओनरला कळवणे व डिपोझिट
परत मागणे. इथे सोसायटीत जाउन परिस्थिती चेक करणे. व जनरली अ‍ॅलर्ट राहणे. ह्या नोटिशीला माझ्याकडून काही लेखी उत्तर अपेक्षित असते का? पेपर वर मसुदा तयार करुन ठेवते.

ऑनलाइन सायटींवरून अंधेरी इस्ट/ वेस्ट, वरसोवा , पवई इथे नवे घर शोधणे. ब्रोकर फोटो दाखवेल, तिथे व्हिजिट करणे व त्या फॉर्मालिटीज
पार पाडणे.

जागा लेकीला पसंत पडणे. तिच्या सोयी सुविधा बघितल्या पाहिजेत. नाहीतर रोज इशू नकोत. माझा प्रॉब्लेम म्हणजे मी सर्व लगेच पसंत करुन
काही इशूज असतील तर अ‍ॅडजस्ट करुन राहते पण नव्या पिढीला कमीत कमी काँप्रमाइज करावे लागावे.

साकीनाका, साकी विहार मरोळ ह्या जागा कश्या आहेत. मेट्रो स्टेशन च्या जवळ?

जागा फायनल झाल्यावर अगरवाल पॅकर मुव्हर ला संपर्क साधून शिफ्त करणे.

एका ब्रोकरने कुत्रा असेल तर शक्य नाही असे सरळ सांगितले. हा माझ्या साठी नॉन निगोशिएबल मुद्दा आहे. ती संभाळूनच जागा फायनल करावी लागेल.

पुणे- हैद्राबाद- मुंबई- हैद्राबाद- मुंबई आता इथेच एकदम वेस्टर्न ला!! हैद्राबाद मुंबई शिफ्ट केल तेव्हा २०११ मध्ये प्रेप केले होते. शाळेचा शोध, घर रेंटल वगैरे . तेव्हा कंपनीचा काडीचा का होईना आधार होता. आता तिथून काडी मोड झालेली आहे.

वेस्टर्न वाल्या च नव्हे तर अमेरिकन माबोकरांनी पण सल्ले द्या. हेल्प मी इन धिस शिफ्ट चॅलेंज. आगावु धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंमतच आहे की.
OC देण्याचं काम आणि मिळवण्याचं काम दोघेही बाजूलाच आणि नोटीस तिसऱ्यालाच. असो.
भारतात अशा फार गमती असतात.

मुंबैविषयी नाही माहीत काहीच.
तुम्हाला शुभेच्छा. लवकरात लवकर तुमच्या पेट सहित सामावून घेणारे मनासारखे घर मिळो.

लवकरात लवकर तुमच्या पेट सहित सामावून घेणारे मनासारखे घर मिळो.>> धन्यवाद मिळाले की तुला एक किलो काकडी पाठवीन.

पुण्यात राहाणे हा पर्याय अजूनही ओपन असेल तर मी मदत करू शकेन. माझ्या भावाची मॉडेल कॉलनीमध्ये नविन स्कीम चालू होते आहे. विचारपूशीतून संपर्क केल्यास इथे कळवा. मायबोलीवरच्या बर्‍याच ईमेल्स spam folder मध्ये गेल्याचा अनुभव आहे.

साकीनाका - नक्कोच. सोसायटी मोठी असेल तर तुम्हाला कुत्र्याला फिरवता वगैरे येईल. पण बाहेर चालणे म्हणजे नाईटमेअर आहे.
मरोळ एरियामध्ये पूर्वीच्या एम आय डी सी मध्ये बऱ्याच सोसायट्या आहेत. पण SEEPZ मुळे भाडी कदाचित जास्त असू शकतील. चांदिवली एरियामध्ये अलीकडे बरीच डेव्हलपमेण्ट झाली आहे. तिथे पहा. शेर ए पंजाब सोसायटीमध्ये फार पूर्वी गेले होते. ती शांत वाटली होती. मला आवडली होती पण थोडीशी आत पडेल. पवईला जवळ म्हणून कांजूर,नाहूरचा विचार केला आहात का? एल बी एस रोडवरच्या बऱ्याचश्या कंपन्यांच्या जागांवर आता रिअल इस्टेट डेव्हलपमेण्ट झाली आहे.
तुम्हाला लवकरात लवकर नवे घर मिळण्यासाठी शुभेच्छा.

साकी नाका ,मरोळ हे फारच रहदारी आणि गर्दीचे भाग झालेत. शक्यतो अंधेरी वेस्ट किंवा पार्ले ईस्ट बघा. पार्ले ईस्ट अजूनही मराठमोळेपण टिकवून आहे आणि त्यामानाने शांत आहे.

अमा तुम्हाला शुभेच्छा.

मी बऱ्याच वर्षांपूर्वी पवई मध्ये राहत होतो. तिथेच काम असेल तर ठीक आहे. पण ईस्टर्न किंवा वेस्टर्नला जायचे असेल तर खूप गर्दी लागते दोन्हीकडे.

अंधेरी वेस्ट मस्त आहे.

शांत निसर्गरम्य आणि तरीही ऐसपैस जागा आणि सभोवताली परिसर हवा असल्यास आरे कॉलनी / रॉयल पाल्मस/ गोरेगाव पूर्व

एका ब्रोकरने कुत्रा असेल तर शक्य नाही असे सरळ सांगितले.
>>>>

वेस्टर्न कंट्री मध्ये एकेकाळी इंडियन्स आणि Dogs not allowed म्हणायचे.. तसे वेस्टर्न मुंबई वाले सुद्धा बोलतात की काय Happy

मुंबैविषयी नाही माहीत काहीच.
तुम्हाला शुभेच्छा. लवकरात लवकर तुमच्या पेट सहित सामावून घेणारे मनासारखे घर मिळो.>>> +१ अमा! घर शोधायला आणी मनासारखे मिळायला शुभेच्छा, तब्येत कशि आहे तुमची?

रॉयल palms ला जाणे येणे हा त्रास आहे. आणि दुसरे म्हणजे तिथे बरेच नायजेरियन्स राहायला आहेत. रात्री उशिरा येणे हिणार असेल तर नकोच नको

पार्ले भागात बघणार असाल तर तुमची अपेक्षा मला विपुत कळवा, प्रयत्न करून बघेन. अंधेरी वेस्ट साठी काही ब्रोकर्स ओळखीचे आहेत.

साकीनाका, साकी विहार मरोळ ह्या जागा कश्या आहेत. मेट्रो स्टेशन च्या जवळ?
sakinaka मरोळ गर्दी तर आहेच...पण मेट्रो आणि प्रवासाचे बाकी पर्याय खूप आहेत ,,पवई चांदिवली तसं थोडं महाग आहे साकीनाक्याच्या तुलनेत ..पण वाहनाची गर्दी तर आहेच

तुम्हाला लवकर मनपसंत घर मिळो!
माझे अस्थानी दोन पैसे - कारण तुम्ही कुठला एरीआ हवा हे आधीच सांगितलेलं आहे.
नवी मुंबई त्यातही खारघर वगैरे जास्त चांगले एरीआ आहेत. तुलनेनं घर मोठं मिळू शकेल. पुण्यात चक्कर असेल तर हयवेवरून लगेच बस इ. मिळतं.
बाकी जागांपेक्षा जरा प्लॅन्ड असल्यानी मोठे रस्ते इ. ही आहेतच.

चांदिवली, मरोळ, साकिनाका हा फारच गर्दी, धूळ, ट्राफिक असा भाग आहे. तरी मरोळ च्या आतल्या भागात चांगल्या बिल्डींग्स आहेत, तपास करा.
अंधेरी तसे खूप महाग आहे ५० हजार च्या वर २ बीएच के भाडी.. मी जेबी नगर ला रहायचे.
विलेपार्ले हा चांगला पर्याय आहे, एरिया, बागा, खादाडी, नाट्यगृह, खरेदी रेलचेल आहे. घरभाडी नक्की कल्पना नाही.

तुम्हाला शिफ्टींग साठी शुभेच्छा अमा Happy

अरे वाह माझे बरेचसे बालपण गेले आहे जेबी नगर इथे.. आणि काही अंधेरीकोल डोंगरी इथे.. आज बरेच दिवसांनी जेबी नगर नाव ऐकून वाचून बरेच आठवणी ताज्या झाल्या.

फार त्रास नसेल तर कांदिवली वेस्ट मध्ये सेक्टर 9 , महावीर नगर वगैरे बघा. तुलनेने शांत एरिया आहे. बस कनेक्टिविटी ऊत्तम आहे.चारकोप ला मराठी मंडळी बरीच आहेत. अपना बझार d mart बॅन्क ATM हे सगळेच चारकोप ला बिल्डिंग खाली ऊतरले की आहेत. जो रस्ता मागे खाडी परेंत जातो तिथे संध्याकाळच फिरायला बरेच लोक येतात. एक मराठी लायब्ररी पण आहे अन CID मधे सारखी दाखवतात ती संदीप की संतोष बेकरी. हव तर एकदा फेरफटका मारून या

मुंबईची जास्त माहिती नाही.
तुम्हाला डॉगीसहीत छानसा निवारा मिळू दे !

मुंबईला काम असेल तेव्हां वर्सोवा अंधेरी रोडला (यारी रोडच्या जवळ) राहतो, तो परीसर त्यातल्या त्यात शांत वाटतो. चालत पुढे गेलं कि कोळीवाडा, मढची फेरी , ख्रिस्ती वस्ती वगैरे पाहिलं आहे. हे जरा पुलाच्या वाडीसारखं वाटतं. समुद्राला मुळा मुठा समजायचं किंवा उलटं. इथे रेण्ट काय आहे कल्पना नाही.

Pages