बेगम चली वेस्टर्न!!

Submitted by अश्विनीमामी on 12 July, 2024 - 08:55

तर मंडळी, राहायच्या जागेचा प्रश्न अचानक ऐरणीवर आलेला आहे. झालं असं की इथली जागा सोडून कुठे तरी शिफ्ट व्हायचेच ठरवले होते. लेकीची ऑगस्ट मधे दहा दिवसांची लंडन केंब्रिज ट्रिप होती त्या नंतर हा उपक्रम हाती घ्यायचे आम्ही ठरवले होते. पण काल बीएम सीची नोटीस
ती ही द ऑक्युपंट ह्या नावाने मला काय तर पूर्ण बिल्डिंगचेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही जागा लगेच व्हेकेट करा नाही तर आम्ही अ‍ॅक्षन घेउ. हे ते.

ही नोटीस खरे तर घरमालकाला द्यायला हवी. मला सोडायचेच आहे पण मागे ही अर्जन्सी लावली. ह्या बाबतीत ओनरला कळवणे व डिपोझिट
परत मागणे. इथे सोसायटीत जाउन परिस्थिती चेक करणे. व जनरली अ‍ॅलर्ट राहणे. ह्या नोटिशीला माझ्याकडून काही लेखी उत्तर अपेक्षित असते का? पेपर वर मसुदा तयार करुन ठेवते.

ऑनलाइन सायटींवरून अंधेरी इस्ट/ वेस्ट, वरसोवा , पवई इथे नवे घर शोधणे. ब्रोकर फोटो दाखवेल, तिथे व्हिजिट करणे व त्या फॉर्मालिटीज
पार पाडणे.

जागा लेकीला पसंत पडणे. तिच्या सोयी सुविधा बघितल्या पाहिजेत. नाहीतर रोज इशू नकोत. माझा प्रॉब्लेम म्हणजे मी सर्व लगेच पसंत करुन
काही इशूज असतील तर अ‍ॅडजस्ट करुन राहते पण नव्या पिढीला कमीत कमी काँप्रमाइज करावे लागावे.

साकीनाका, साकी विहार मरोळ ह्या जागा कश्या आहेत. मेट्रो स्टेशन च्या जवळ?

जागा फायनल झाल्यावर अगरवाल पॅकर मुव्हर ला संपर्क साधून शिफ्त करणे.

एका ब्रोकरने कुत्रा असेल तर शक्य नाही असे सरळ सांगितले. हा माझ्या साठी नॉन निगोशिएबल मुद्दा आहे. ती संभाळूनच जागा फायनल करावी लागेल.

पुणे- हैद्राबाद- मुंबई- हैद्राबाद- मुंबई आता इथेच एकदम वेस्टर्न ला!! हैद्राबाद मुंबई शिफ्ट केल तेव्हा २०११ मध्ये प्रेप केले होते. शाळेचा शोध, घर रेंटल वगैरे . तेव्हा कंपनीचा काडीचा का होईना आधार होता. आता तिथून काडी मोड झालेली आहे.

वेस्टर्न वाल्या च नव्हे तर अमेरिकन माबोकरांनी पण सल्ले द्या. हेल्प मी इन धिस शिफ्ट चॅलेंज. आगावु धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ अमेरिकन येऊन रहा, आजकाल मुंबईहून पुण्याला जातात तसे लोक अमेरिकेतून भारतात जा ये करत असतात.
भारतात दोन चार नतेवाईकांची घरे अस्तील, तर १५ दिवस इथे, १५ दिवस तिथे, असे करत आपली भारतातली बँकेची, पैसे गुंतवणुकीची कामे करायला तेव्हढे दिवस पुरेत. काही काही हुषार लोक तर अमेरिकेतूनहि ऑन लाईन भारतातली कामे करतात. मग नंतर एक दोन महिने त्यात कसा त्रास झाला हे सगळ्यांना सांगत बसतात!
आता भारतातले कायदे, रितिरिवाज, अमेरिकेपेक्षा वेगळे नसावेत का? पण हे बाटलेले अमेरिकन, यांना भारतातले सगळे वाईटच दिसते. मग प्रश्न पडतो, पुढची पिढी भारतात जायला नाही का म्हणते!

अमा,
साकिनाका, चांदिवली कनेक्टेविटी च्या दृष्टीने फारच चांगले, मेट्रो, एअरपोर्ट, वेस्टर्न आणि सेंट्रल सर्बब्स ला उत्तम कनेक्टीविटी.

साकिनाका , चांदिवली ट्राफिक इस एव्हरी डे नाईटमेर, क्राऊड पण पांढरपेशा नाहीये, कॉस्मो आहे, फार विपर्यास आहे, एकिकडे स्लम्स आणि दुसरी कडी टॉवर्स.

पर्मनंट सेटल होत असाल तर चांदिवली मधे काही रेप्युटेड बिल्डर्स चे कंस्ट्रकशन चालु आहेत

साकिनाका इस नेव्हर इन न्युज फॉर गुड रिसन्स, वी आर हॅबिचुएटिड टु इट.

फक्त एकदा होती, मेट्रो चालु झाली तेव्हा इट वॉस इन न्युज फॉर गुड रिसन.

साकिनाका म्हणजे नातेवाईक ही नाक मुरडतात Proud तुच्छ कटाक्ष टाकतात.

बट I लव साकिनाका

ते सगळं ठीक आहे, पण कनेक्टेविटी आणि इतर परिसर बघायचा तर साकीनाका/चांदिवलीपेक्षा हिरानंदानी, पवई जास्त चांगले नाही होणार का? हॉस्पिटलपण जवळच आहे कधी गरज लागली तर.

हिरानंदानी, पवई <<< तुम्ही सेंट्रल च्या जवळ जात आहात. वेस्टर्न पण अ‍ॅक्सेसिबल आहे बट देन अगेन ट्रॅफिक ऑन साकी विहार अ‍ॅन्ड जे व्ही एल आर

बेगम शब्दाचा नक्की अर्थ काय ?
गम नसणे / दोन दु:खे
डिंक नसणे / दोन डिंक(लाडू)
बे गम आफ्टरशेवची किंमत ३६०० रूपये आहे.

Pages