पंतप्रधान.....

Submitted by रेव्यु on 10 July, 2024 - 12:55

आपले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावल्याने खाल्लं मटण,
मतदानात दाबलं कमळाचं बटण।

असंच जगायचं नवा उत्थान,
सर्वांना मिळवायचं समान।

सत्याची खोली सरळपणेने,
न्यायाचं सिद्धांत वाढवण्याने।

हिरव्या शेतांत फुलंय पावसाचं,
समर्पणाचं हा उद्देश कसाचं?

आपलं वोट मान्य आम्ही,
पाडणार नवीन राजांची आपल्यां देशांची।

गोडी सांभाळू, शांत विचार करू,
अद्याप विवेकाने मतदान करू.

व्यक्ती आवडो न आवडो पदाचा मान राखायला हवा यावर कीर्तन, प्रवचन , निरुपण, आख्यान, निबंध असलं काय काय करायला या धाग्यावर भरपूर् वाव आहे. https://www.maayboli.com/node/85304
बिगी बिगी तिथे जाऊन प्रकाश पाडा.

तो अमेरिका निवडणूक धागा आहे.
माझा काय संबंध? मी तो कधी उघडला सुद्धा नव्हता..

असो,
नका करू आदरार्थी उल्लेख पंतप्रधानपदाचा..
चुकलो मी सांगून.. मलाही माफ करा.. संपवा विषय
तसेही ती सूचना कम विनंती होती.. सक्ती नव्हती.. जो तो आपल्या मनाने वागायला मोकळा आहे.

महोदय, हे लिखाण कादंबरी विभागात हलवावे ही विनम्र सूचना.
पुढे मागे तिचे प्रकाशन करण्यासाठी कादंबरीकार बेफिकीर यांची मदत होऊ शकते.
वाटल्यास खंड १, खंड २, खंड ३ असा संच स्वस्तात उपलब्ध करून द्यावा.

या कादंबरीला नाव ठेवण्यासाठी आवाहन केल्यास मायबोलीकर पुढे सरसावतील याबाबत शंका बाळगू नये.

हेडर मधील उजवीकडची अक्षरे आपोआप गायब होत चालली आहेत.
शेवटी पाहीले तेव्हां आपलेच होते. त्यात ला चमच्याचा गळून पडला आहे. ( च नाही म्हणायचं ...च च ) .आता फ्रेंच वाटू नये म्हणून ले सुद्धा गळाला तर मात्र गोंधळ होईल.
नवीन वाचकांना पंतप्रधान शीर्षक उघडून खाली आप दिसेल.
सर्वांना मागे सारत अरविंद केजरीवाल पंप्र झाले कि काय ही शंका येईल.
होईनात का, पण दिल्लीचं मुख्यमंत्रीपद ते सोडतील का ?
कि संसदेतून दिल्लीचा कारभार हाकणार ?
त्यांच्यासाठी पंप्र बनणे खूप गरजेचे आहे. कारण दिल्लीच्या नायब राज्यपालांविरूद्धची तक्रार त्यांना थेट लोकसभेत करता येईल.
तसेच पंप्र असल्याने ते स्वतःच्याच सरकारविरूद्ध उपोषणास बसले तरी त्यांना अटक होणार नाही.
सरकारी खर्चाने मफलर मिळू शकेल. संसदेत झंडू बाम उपलब्ध असते. ते लावायला पट्टेवालाही असतो.

<< काहीही असो, मोदींनी जनतेचे मोराल व एक 'फीलींग गुड' अशी भावना, देशभक्ती ची भावना, आत्मविश्वास वाढवला आहे.
ते सुलभ शौचालय मोदींच्या कारकिर्दीतच झालेत ना? की काँग्रेसच्या? मला आठवत नाहीये. इतकी बेसिक गोष्ट ....
Submitted by सामो on 11 July, 2024 - 09:37 >>

------- १९९२- १९९५ या काळात, दादर - पुणे असा प्रवास अनेकदा केला आहे. दादरला अंबेडकर रोडवरुन पुण्यासाठी एशियाड बस घ्यायचो, त्यावेळी दादरला सुलभ शौचालय होते. ५० पैसे/ १ रु असे काहीसे शुक्ल होते. अनेक ठिकाणी सुविधा उपलब्द नव्हती ( पुण्यातल्या डेक्कन बस स्थानक Sad ) पण सुरवात नव्वदच्या दशकात झाली होती.

पंतप्रधान पदावर असणारा व्यक्ती सार्वजनिक सभेत एका राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असणार्‍या व्यक्तीला " दीदी ओ दीदी... " असे लोफर सारखे संबोधित करत असेल तर त्या संबोधण्याने पदाचा मान राखला जातो ?
https://www.youtube.com/watch?v=TNL28SVv3ig&t=25s

स्पेसिफिकली सुलभ शौचालय बद्दल विचारले आहे म्हणून ही लिंक देतो
https://www.sulabhinternational.org/timeline/sulabhinternational/en/sula...

कदाचीत त्यांना " हर घर शौचालय " योजनेबद्दल विचारायचे असेल.

100 million followers..!!
माननीय महोदयांचे हार्दिक अभिनदन..

दीदी ओ दीदी... " असे लोफर सारखे संबोधित करत असेल तर त्या संबोधण्याने पदाचा मान राखला जातो
>>>>>>>>>

आज सर्वच पक्षात मिळून अर्ध्याहून अधिक नेते चोर, भ्रष्टाचारी, स्वार्थी, सत्तापिपासू, वगैरे वगैरे ढोंगी राजकारणी आहेत हे माझे स्वतःचे मत आहे.

पण इथे मुद्दा हा नाही आहे की ते राजकीय नेते कसे आहेत आणि कसे वागतात..
तर आपण कसे वागायचे हा माझा मुद्दा होता.

आपण कितीही पद पद म्हणत पदाला मान दिला आणि त्यानेच पदावर असतांना लोफरपणा , खोटे पणा केला तर त्याने पदाची शान जाते. पदावर असणार्‍या व्यक्तीने प्रथम पदाचा मान राखायचा असतो. त्याने तो राखला तर लोक मान देतील अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो, अर्थात बळजबरी कुणाला करता येत नाही.

मान व्यक्तीचा असो नसो.. पदाचा असावा..
पदावरच्या माणसाने त्या पदाचा (आपल्यामते) अपमान केला म्हणून आपण सुद्धा त्या पदाचा अपमान करायचा हे पटत नाही.
पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री, तो भारताचा आणि राज्याचा असतो. कुठल्या पक्षाचा नसतो. याचा विसर त्या पदावरच्या नेत्याला पडला तरी आपल्याला पडता कामा नये असे मला वाटते.

झोपायला जाण्याआधी इतकेच म्हणू इच्छितो,
माझ्यासाठी तरी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या भारतीय संवैधानिक पदांचा अपमान आणि भारतीय ध्वजाचा अपमान हे एकसारखेच आहे _/\_

शुभ रात्री Happy

<< मान व्यक्तीचा असो नसो.. पदाचा असावा..
पदावरच्या माणसाने त्या पदाचा (आपल्यामते) अपमान केला म्हणून आपण सुद्धा त्या पदाचा अपमान करायचा हे पटत नाही.
पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री, तो भारताचा आणि राज्याचा असतो. कुठल्या पक्षाचा नसतो. याचा विसर त्या पदावरच्या नेत्याला पडला तरी आपल्याला पडता कामा नये असे मला वाटते. >>>

------- पदाचा तसेच व्यक्तीचा दोन्हीचा मान असायला हवा असे माझे मत. व्यक्तीच्या आचार/ विचारांनी पदाला शोभा येते.

आपण भले पंतप्रधान पदाचा मान ठेवू.... पण पदावरिल व्यक्तीनेच तो दर दिवशी पायदळी तुडवला तर तुमच्या/ माझ्या मान देण्याला काही अर्थ रहात नाही.

तर तुमच्या/ माझ्या मान देण्याला काही अर्थ रहात नाही.
>>>>>

इतरांचे माहीत नाही. माझ्या मान देण्याला तरी अर्थ वाटतो मला. इतर कसे वागतात यावर मी हे ठरवत नाही की मी त्या पदाला मान द्यायचा की नाही..
प्रोटोकॉल म्हणून सुद्धा काही गोष्टी असतात त्या सुद्धा व्यक्ती नाही तर त्याचे पद बघून आचरणात आणायच्या असतात.
पण असो, काहीना पद आणि व्यक्ती यांचा वेगळा विचार करणे जमत नाहीये असे दिसते.
त्यामुळे तूर्तास इथेच थांबतो Happy

स्वतःची टिमकी दरवेळी वाजवणाऱ्याला कोणीही मान देत नाही, मग ती व्यक्ती पंतप्रधान असो वा माबो सदस्य!

स्वतःची टिमकी दरवेळी वाजवणाऱ्याला कोणीही मान देत नाही, मग ती व्यक्ती पंतप्रधान असो वा माबो सदस्य! >> या वाक्याशी दोन प्रकारे सहमत.
पहिला आशय. दुसरा..
मग ती व्यक्ती पंतप्रधान असो वा >>> यासाठी. खल्लासच.

1) धागा पुन्हा ऋन्मेऽऽष हायजॅक करणार अशी लक्षणे दिसत आहेत. विषय पंतप्रधानांपर्यंत मर्यादित ठेवूया. ते पाच वर्षांनी असतील नसतील. मी कुठे जात नाही, आयुष्यभर आहेच Happy

2) एखाद्याला आपली चूक पटली तरी जर ती बहुमतात असेल तर ती मान्य केली जात नाही हा मानवी स्वभाव आहे.

3) नरेंद्र मोदी माझेही काही फेवरेट राजकारणी नेते नाहीत. पण आता मुद्दाम हट्टाने मोदींचा आणखी अनादर होऊ नये इतकीच इच्छा.

रावल्या समजायला वेळ लागेल,
मनाच्या अंधारात तेव्हा ज्या दिशेल.

पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल,
ज्ञानाच्या प्रकाशात स्वप्न साकार होईल.

क्षणाक्षणाचा आनंद, क्षणाक्षणाची चिंता,
जीवनाच्या रंगात स्वभावी विचार घेता.

समजून घ्या ह्या भिंतीत नव्या प्रकारांचा,
मार्गावर चला, दुःखांच्या अंतात सुखाचा दरवाजा.

रावल्या समजायला वेळ लागेल,
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.

असो,
नका करू आदरार्थी उल्लेख पंतप्रधानपदाचा..
चुकलो मी सांगून.. मलाही माफ करा.. संपवा विषय
तसेही ती सूचना कम विनंती होती.. सक्ती नव्हती.. जो तो आपल्या मनाने वागायला मोकळा आहे. <<
हे आधी म्हटलेलं आणि आता नव्याने वर म्हटलेलं याचा काही ताळमेळ लागत नाहीये..

ते कुठेही जाणार नाहीयेत. अवतारी महापुरुष आहेत ते.
>>>

येत्या पाच वर्षात सक्षम पर्याय उपलब्ध नाही झाला तर हो नक्कीच.. ते पुन्हा येणार.. आणि तसे झाल्यास पंतप्रधान आणि मोदी हे समानार्थी शब्द होतील..

तसेही धाग्याच्या शीर्षकात (पाच टिंब दिलेत) पाचवी टर्म सुद्धा पूर्ण करणार हेच सूतोवाच केलेय त्यामुळे ह्या धाग्यासाठी 2000 ची मर्यादा वाढवून 5000 किमान करावी लागेल

कफ, खोकला झाल्यावर रस्समचा उपयोग होतो. एका मोहिमेत आमच्या ग्रुप मधे असलेल्या एका तमिळ मैत्रिणीने रस्सम करून दिलं होतं. त्याने खरंच फरक पडला. तिने सांगितल्याप्रमाणे तमिळ, कानडी आणि अजून एक असे रस्समचे तीन प्रकार असून त्यातला एक सर्दी खोकल्याला औषध म्हणून उत्तम आहे तर दुसरा घातक आहे . आम्ही तिचे भाषण लिहून का घेत नाही याबद्दल तिला आश्चर्य वाटत होते. पण त्यात काय राहील लक्षात म्हणून लिहून घ्यायचा कंटाळा केला.

सहा महीन्यांनी मात्र तमिळ रस्सम औषध आहे कि कानडी रस्सम कि अजून कुठले ते हे काहीच आठवेना. तसेच कुठल्या रस्सम मधे काय टाकावे हे पण आठवेना. आई, बायको रेसिपी सांगायला लागले कि लगेच दिसेल तो कागद का ओढतात हे समजले.

आता युट्यूबच्या जमान्यात एका क्लिक वर रेसिपी मिळते. त्यामुळं ती मजा गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खानसामा सगळ्या पाककृती लीलया करतो.

शेवटच्या वाक्यामुळे ही पोस्ट धाग्याशी संबंधित आहे याची नोंद घ्यावी.
तसेच हेडर मधली महाकादंबरी प्रकाशित करण्यासाठी बेफिकीर यांनी पुढाकार घ्यावा ही सूचना.

Pages