पंतप्रधान.....

Submitted by रेव्यु on 10 July, 2024 - 12:55

आपले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

2029 ला या धागा काढायला.. आता पाच वर्ष काही होत नसते. नितीश अन चंद्राबाबू पलटी मारतील या भाबड्या आशेवर जर तुम्ही बसला असाल तर दोघांनाही मुख्यमंत्रीपद केंद्रात येण्यापेक्षा परमप्रिय आहे हे सिद्ध झालय.

मोदी सारखा माणूस सलग तीन तीन टर्म सत्तेत येतो म्हणजे फारच वाईट दिवस आलेत. पण हाकलून द्यायचं तरी कस? विरोधकांचे मिळूनही २४० नाहीत म्हणजेच बहुमत नाही. पूर्वीच्या काळात जस एक राजा दुसऱ्या राजा बरोबर तलवारी घेऊन युद्ध करायचा तसच काहीतरी करावं लागेल. नाहीतर आधीच १० वर्ष झालीच आहेत तर अजून ५ तडपड तडपद करत बसावं लागेल.

विरोधी पक्ष कसा मूर्ख लोकांनी भरलाय ह्याची भलावण करण्यातच धन्यता मानणारे मंत्री लोक & त्यावर विश्वास ठेवणारे अंध लोक. दुसरं काय होणार?

>>>2029 ला या धागा काढायला.. आता पाच वर्ष काही होत नसते. नितीश अन चंद्राबाबू पलटी मारतील या >>
नेहमी प्रमाणे असंबद्ध उत्तर

2029 ला या धागा काढायला.. आता पाच वर्ष काही होत नसते. नितीश अन चंद्राबाबू पलटी मारतील या भाबड्या आशेवर जर तुम्ही बसला असाल तर दोघांनाही मुख्यमंत्रीपद केंद्रात येण्यापेक्षा परमप्रिय आहे हे सिद्ध झालय.
>>> अनुमोदन

काहीही असो, मोदींनी जनतेचे मोराल व एक 'फीलींग गुड' अशी भावना, देशभक्ती ची भावना, आत्मविश्वास वाढवला आहे.

ते सुलभ शौचालय मोदींच्या कारकिर्दीतच झालेत ना? की काँग्रेसच्या? मला आठवत नाहीये. इतकी बेसिक गोष्ट ....

इकडे कितीही ठणाणा केला तरी येणाऱ्या आणि झालेल्या निकालात काही बदल घडणारे का ? द्वीसहस्त्रक प्रतिसादांची खेळी करणाऱ्या माबोकरांकडे टाईम ट्रॅव्हल सुविधा उपलब्ध असण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थातच निकाल बदलवण्याची सुद्धा !!

मोदी म्हटलं कि हसू ही येईनासं झालं..
त्यालाच पाच सहा वर्षे झाली आहेत. २००२ सालापासून जो राग होता तो रोज बघून बघून निवळला एव्हढंच काय ते.
आता कटट्रर विरोध किंवा भक्ती या दोघांपासून सारख्याच अंतरावर.
धाग्याच्या शीर्षकात व्यक्तीचं नाव असावं. ते पद आहे.

राजकीय विनोद पूर्वी संघ वाले करायचे. उठता बसता प्रत्येक कृतीवर करायचे.
राजकीय विनोद नवीन असण्याच्या काळात त्याला उच्च अभिरूची समजले जायचे. त्या ही वेळी ते पांचट वाटायचे.
आता पहिली काही वर्षे एंजॉय केले. पण तोच तोच पणा अजून किती वर्षे ?
कि दिलंत ना निवडून ? मग सहन करा विनोद असं झालंय बहुतेक.
माझं ऐकेलसा व्यक्ती सत्तेत आला तर राजकीय विनोदाला आय एस आय स्टँडर्ड सक्तीचं करायला सांगावं असं वाटतं.
(सतीश आचार्य आणि अन्य काही सन्माननीय लोक अपवाद आहेत).

शीर्षकात बोलतो ऐवजी बोलतात असे हवे.
व्यक्ती आवडो न आवडो, पदाचा मान हवा.

बाकी लेखातील मुद्द्याशी सहमत. मलाही त्यांचे पंतप्रधान म्हणून वागणे रुचत नाही.
पण त्यांचे जे सेल्फ मार्केटींग स्किल आहे ते भारी वाटते. शाहरूख लेव्हल आहे.
या देशात सलग तीन टर्म निवडून येणे आणि पंधरा वर्षे राज्य करणे खाऊचे काम नाही.

व्यक्तीचा आणि पदाचा मान मिळवायला आणि राखायला ही लागतो.
पर्पेच्युअल केवळ पद आहे म्हणून पदाला मान सन्मानाने बोलवा हे सामान्यांच्या नजरेत होत नाही. आजच्या काळात ते शक्य नाही.
आता आपले कायदे जुने असल्याने हा देशद्रोहाइतका गुन्हाही असूच शकेल, आणि त्यावर कोणाला तुरुंगाची हवा/ खासदारकी ही सहज गमवावी लागू शकेल.

व्यक्तीचा आणि पदाचा मान मिळवायला आणि राखायला ही लागतो.
>>>>>

हे मान्य आहे.
पण तुम्ही मान द्या अशी माझी अपेक्षा नाहीये. तुमच्या खाजगी वावरात, मित्रमंडळींमध्ये तुम्ही शिव्या घालायचा हक्क सुद्धा राखून आहात. पण पब्लिक फोरमवर आपण देशाच्या पंतप्रधानपदाचा मान ठेवून संयत भाषाच वापरली पाहिजे असे माझे मत आहे.

अन्यथा तुमचाच युक्तीवाद ते सुद्धा करू शकतात. Happy
जसे की आधीच्या लोकांनी चांगले काही केलेच नाही तर मी त्यांच्याबद्दल चांगले कसे बोलू

नका की बोलू! कोणाबद्दल चांगलं बोललंच पाहिजे अशी काही आवश्यक्ता नाही.
बाकी पदाचा मान हे अत्यंत लेम आर्ग्युमेंट आहे. एकेरी हाक मारुन तो जातो आणि प्रत्यक्ष अद्वातद्वा, बेजबाबबदार वागणुकीतून तो रहात असेल तर असो बापडा. आता मूळ मुद्द्यावर लिहू मला वाटतं.

अगदी आतापर्यंत मीही मोदींचा उल्लेख एकेरीच करत असे. हा व्हिडियो पाहिल्यावर त्यांच्याबद्दल इतका आदर वाटू लागला की त्यांच्यासाठी आदरार्थी बहुवचन वापरू लागलो.

एकेरी हाक मारुन तो जातो आणि प्रत्यक्ष अद्वातद्वा, बेजबाबबदार वागणुकीतून तो रहात असेल....
>>>>>

छे ..
आदरार्थी उल्लेख केल्यावर मग पुढे अद्वातदवा बोला आणि बेजबाबदार वागणूक करा, ते चालेल असे मी कुठे म्हटले आहे?
ते सुद्धा करायचे नाहीयेच Happy
आधीच क्लिअर करतो हे..
अन्यथा उद्या कोणी एखाद्याचा आदरार्थी उल्लेख करून खून करेल आणि म्हणेल की रूनमेश म्हणाला होता आदरार्थी उल्लेख केला की सात खून माफ Happy

आता मूळ मुद्द्यावर लिहू मला वाटतं.
>>>>>

आणि हो, मला वाटते मूळ मुद्दा हाच आहे.
काय कुठे कसे बोलावे...
जर आपण त्यावरून समोरच्यावर टीका करतो तर आपणही काही निकष पाळायला नको का.

मायबोली प्रशासनाची पॉलिसी काय आहे मला कल्पना नाही.
पण शीर्षकातील एकेरी उल्लेख असो किंवा लेखातील नालायक शब्द असो हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीबाबत इथे लिहिले जाणे मला व्यक्तिशः रुचत नाही.

मी आमच्या शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर सुद्धा हा मुद्दा घेऊन भांडलो आहे. मी स्वतः तिथे कोणाचे नाव न घेता सर्व राजकीय नेत्यांना एकजात चोर म्हणतो. पण कोण्या एकाबद्दल बोलायचे असल्यास टीका संयत भाषेतच करतो आणि तशीच इतरांकडून अपेक्षा धरतो.

आणखी एक म्हणजे जो राजकीय नेता तुम्हाला चोर वाटत असतो तो इतरांसाठी आदर्श असू शकतो.
आणि तसेच व्हायसे व्हर्सा असू शकते.
थोडक्यात आपण जे एखाद्या राजकीय नेत्याबद्दल लिहीत असतो ते आपले वैयक्तिक मत असते. आपले ओपिनियन असते. तेच फॅक्ट असेल हे जरुरी नसते. त्यामुळे तुम्ही एखादा याच भाषेच्या लायकीचा आहे म्हणू शकत नाही.

आमच्या कंपनीत मोदीजींचा मोठा फोटो आहे. सगळे सकाळी त्यांना नमस्कार करून कामाला सुरवात करतात. लोकं जर काम करताना कुठे अडले तर मोदीजी कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन त्यांना मदत करतात असा लोकांचा अनुभव आहे.

सलमान का कोणी एक अ‍ॅक्टर तो एकदा मोदींना शिव्या घालणार्‍या लोकांना म्हणाला होता की मोदींना शिव्या घालायच्या आधी स्वतः निदान सोसायटीच सेक्रेटरी म्हणून काम करून दाखवा. काही तरी लायकी दाखवा व मग दुसर्‍यांना नालायक म्हणा.

नुसता जळफळाट करून काय होणार?
सध्याचे पंतप्रधान आवडत नाहीत हा लेखाचा विषय झाला आहे. त्यांचा पक्ष आवडत नसल्याचा आणखी एक धागा वर्षभर जोरात पळतोच आहे.

आदरार्थी वचन वापरण्याची सक्ती ही अलीकडची सुरवात आहे. यावर एक धागा सुद्धा आहे माबोवर.
सम्राट पदवी लावून सुद्धा एकेरी वचन वापरण्याची पद्धत आहे .

विषय व्याकरण/ रुढीचा नसुन व्यक्ती विचाराने काय चुकीचे बोलते हा आहे. व्याकरण/रूढी मध्ये दुमत असु शकते पण धाग्याचा तो विषय नाही. वर म्हटल्याप्रमाणे यावर एक वेगळा धागा आहे तो शोधून तिथे मत मांडता येईल किंवा नवा धागा काढता येईल.

पंतप्रधान अमूक तमूक असा उल्लेख असेल तर काहीच हरकत नसावी.
पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर हे महत्वाचे पद आहे. नाव न लिहील्याने या पदावर येणारी कोणतीही व्यक्ती असे जनरलायझेशन होत आहे. एव्हढाच मुद्दा आहे. फारेण्ड यांनी क्लिअर केलेला आहे.

जनरलायझेन कसलं डोंबलाचं!
हे काय कोर्ट आहे की शब्दच्छल करुन केस जिंकायची आहे! पंतप्रधानांचं नाव लिहिल्याने जनरलायझेशन होतं! बरं! कायद्याच्या भाषेत होतही असेल, पण फोरम वर नाही होत. कोणाबद्दल आहे ते व्यवस्थित समजतं आहे. आता इतकं मोजुन मापून बोलायला ही काय मोदीपूर्व काळातील चर्चा आहे का?
सध्या पांढरा सदरा घातलेल्या कर्दम नृत्य जनक वराहावतारावर शिंतोडे उडाले तर आडा चौतालात शिंतोडे उडणारच. आणि शिंतोडे त्या वराहावतारापुरते सीमित कसे राहतील? त्या अवतारी बाबाच्या चरणकमलाने पूनित झालेले आसनही त्या कर्दम तुषारांनी रोमांचित होईलच की नाही?
बाकी एकेरी बोलण्यात मजा नाही याबाबत १०० टक्के सहमत. आदरयुक्त बोलण्यात जी मजा आहे त्याला तोड नाही. मराठीत शालजोडीतले असा शब्दच आहे ना!

Pages