पंतप्रधान.....

Submitted by रेव्यु on 10 July, 2024 - 12:55

आपले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रमर,
सक्षम पर्याय तर मी शाहरूख चा सुद्धा आहे. पण सध्या जे आयुष्य जगतोय त्यात खुश आहे.

असो,
मलाही मोदींच्या बरेच गोष्टी रुचत नाहीत. पण सलग तिसरी टर्म निवडून येणे याचा अर्थ त्यांनी नक्कीच काही चांगले काम सुद्धा केले असणार हे मान्य केलेच पाहिजे. सलग तीनदा पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीचा आदर न करणे याचा अर्थ बहुमताचा (पर्यायाने भारतीय जनतेचा) अनादर करणे असे नाही का वाटत?

<< मान व्यक्तीचा असो नसो.. पदाचा असावा..>>

<< सलग तीनदा पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीचा आदर न करणे याचा अर्थ बहुमताचा (पर्यायाने भारतीय जनतेचा) अनादर करणे असे नाही का वाटत?>>

------- वरिल दोन्ही विधान एकाच आय डी ने व्यक्त केले आहेत. Happy

सलग तीनदा पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीचा आदर न करणे याचा अर्थ बहुमताचा (पर्यायाने भारतीय जनतेचा) अनादर करणे असे नाही का वाटत?>> एकेरीत संबोधले म्हणजे अनादर होतो असं काही नाही. उलट त्यात आपलेपणा असतो.

<<उलट त्यात आपलेपणा असतो.>>
काही काही लोकांबद्दल तर मला फारच आपलेपणा वाटतो. पण इथे लिहिणार नाही!
मागे एकदा लाडाने प्रियांका वड्राला काहीतरी म्हंटले तर लोक मारायला उठले होते!!!
तर हे सगळे काही रिलेटिव्ह आहे.

धाग्याचे शीर्षक आदरणीय कांगावेखोर करावे असे सुचवतो.
आदरणीय पंतप्रधान व आदरणीय सदस्य सगळ्यांचा आदर होईल.

<< मागे एकदा लाडाने प्रियांका वड्राला काहीतरी म्हंटले तर लोक मारायला उठले होते!!! >>

-------- काहीतरी म्हटले होते? चक्क एका जातीचा " हिणकस" वाटेल असा उल्लेख केला होता. Sad

प्रियांका गांधी यांच्यावर टिका करा, तो तुमचा हक्क आहे पण ते करतांना एखाद्या कष्टकरी जातीचा उल्लेख कशासाठी? disgusting असे एका मायबोलीकराने म्हटले होते.

वडार हे एका जातीचे नाव आहे हे माहित नसेल तर समजू शकतो.... पण तसे लक्षांत आणून दिल्यावरही आपले काहीच चुकले नाही हा अविर्भाव नक्कीच भोळा वाटत नाही.

लोक मारायला उठले होते हा कांगावा करु नका. तुमची चूक लक्षात आणून दिली होती.

व्यक्तीपेक्षा पद श्रेष्ठ, पदा पेक्षा देश श्रेष्ठ.
हे आपलं क्लचर आहे आणि ते आपण नीट जपलं पाहीजे.
त्याची अशी हेळसांड होता कामा नये..
451072659_2224685987866250_7528815052566896668_n.jpg

Pages