पंतप्रधान.....

Submitted by रेव्यु on 10 July, 2024 - 12:55

आपले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात कायदा, कोर्ट याचा काय संबंध ?
संकेत पाळायचे कि नाहीत हे ज्याने त्याने ठरवावे. मी एका सूचना केली. तिचा विपर्यास होऊ नये म्हणून खुलासा केला.

जिथे शिष्टाचारांना अनन्यसाधारण महत्व आहे, त्या बाबतीत संकेत पाळायचे नाहीत, अन्यत्र पाळायचे याचेही स्वातंत्र्य आहे. तसे तर ड्युआयडी काढून शिवीगाळ देखील करतातच, ते नेहमीच्या आयडीने सुद्धा करता येईल. कुणी कुणी वयाला साजेसे प्रतिसाद द्या, तुमची लायकी बघा असेही प्रतिसाद देते..... त्यांनाही संकेतांची अडचण होत असेल.

पंतप्रधानांचं नाव लिहिल्याने जनरलायझेशन होतं! >>> अरे उलटे आहे. व्यक्तीचे नाव न लिहीता केवळ पदाचे नाव लिहील्याने जनरलायझेशन होतं इतकेच Happy

आणि एक सजेशन सारखे होते. हट्ट बिट्ट नाही. आता तू म्हणशील मी पंप्र म्हणजे मोदींबद्दलच बोलतोय. शिरीष कणेकर जसे त्या हिंदी पिक्चर मधले लोक मी दोस्त की हैसियतसे नही एक पुलिस अफसर की हैसियत असे वगैरे म्हणायला लागल्यावर "अरे तूच ना तो" अशी कॉमेण्ट मारायचे तसे म्हणशील. कारण तुझ्या नजरेत दोन्ही सध्या सेमच असेल. टोटली फाइन Happy

Lol बाकी मी कायम आदरानेच ... अशा केसेस मध्ये अतीव आदरानेच बोलतो. त्यातच तर जास्त मजा येते.
पण अनादराने कोणी बोललं तरी हसू येतंच ना! Wink

इथले काही ताजे प्रतिसाद वाचून आदर्णीय मोदीजींसारखेच काही मायबोलीकरही नॉन बायॉलॉजिकल असावेत अशी आशा वाटू लागली आहे. वा ! वा! आदर्णीय मोदीजींचे ( चे - हे आदरार्थी बहुवचन - यापुढे आ ब) वारस मायबोलीवरच मिळाल्याचे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दोस्त की हैसियतसे नही एक पुलिस अफसर की हैसियत असे वगैरे म्हणायला लागल्यावर "अरे तूच ना तो" अशी कॉमेण्ट मारायचे तसे म्हणशील>>> कणेकरांचा हा डायलॉग अजरामर आहे, तो व्हिडीओ आठवला Happy

रावल्या कधी पंतप्रधान होईल काय माहित. झाल्यावर त्याच्या नावापुढे पण जी लाऊ. तोपर्यंत त्याला आपला मित्रच समजुया.

मुद्दा असा आहे की विनोदी बोलतात, परदेशांत विनोदी बोलतात. तर काही जण परदेशांत बिन कामाचं बोलतात. तिकडच्या लोकांना इकडचे राजकारण पटवून ते काय इकडे येऊन मतदान करणार आहेत?

आता बाईडन साहेबांना विश्वास आहे की युक्रेन रशिया युद्ध आवरतं घेण्याबाबत पुतीन साहेब मोदींचा सल्ला ऐकतील. ते जमलं की त्यांना इस्राइल गाझा पलेस्तीनचं काम देणार.

कुमार केतकरांच्या मताप्रमाणे मोदी पंतप्रधानपद सोडल्यावर राष्ट्रपती होतील. पण मला नाही तसं वाटत. काहीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समितीत जातील.

हे कसं साध्य करतील हे त्यांच्यावरच सोपवूया. विनोदी बोलून का कंटाळवाणं बोलून.

आदरार्थी वचन वापरण्याची सक्ती ही अलीकडची सुरवात आहे.
>>>>>>>>>>

(या आधी देखील हा किस्सा कुठे लिहिला असावा)
मी लहानपणी शाळेत असताना एका चंद्रावरच्या निबंधात महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख एकेरी करून तो चंद्रावर गेला तर तिथेही भ्रष्टाचार सुरू करेल असे लिहिले होते.

घरी येऊन जेव्हा हे आईला सांगितले तेव्हा ती म्हणाली की असा एकेरी उल्लेख करू नये. ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
मी आईला विचारले की पण पुढे तर मी त्यांच्या वर टीका केली आहे.
आई म्हणाली तरीही उल्लेख एकेरी नको. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मान हवाच.
तेव्हापासून हे आजपर्यंत लक्षात आहे. मी कधीच कुठे अश्या पदावरच्या नेत्यावर टीका करताना एकेरी उल्लेख करत नाही.
तर ही सक्ती अलीकडची की पलीकडची हे मला माहीत नाही. पण निदान माझ्यासाठी तरी लहानपणापासून हा संस्काराचा भाग आहे Happy

बाकी मला उलट वाटते. सोशल मीडिया मुळे ट्रोल करणे, शेलकी विशेषणे लावणे, आणि त्याचे समर्थन करणे हे प्रकार वाढले आहेत. बहुतांश लोकांना यात गैर वाटत नाही. किंवा सोयीने ते ठरवले जाते. फेकू, पप्पू. कचरा, वाकड्या, अश्या नावांनी नेत्यांना संबोधने यात देखील बरेच जणांना काही गैर वाटत नाहीये. कारण ज्याने त्याने आपल्या मनाने ठरवले आहे की ती व्यक्ती याच लायकीची आहे. मग आम्ही तर बोलणार...

-------

शीर्षक बदल केला हे आवडले Happy
इथेच नोंद घेतो.
पंतप्रधान.. आपले.. विनोदी लेखन विभाग..
आता कसे हे मजेशीर वाटत आहे.

याला ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियातला फरक माहित नाही... समोर टेलिप्रॉम्प्टर असूनही

आदर्णीय मोदीजी अनिवासी भारतीयांना भाषण देताना - २०१४ पूर्वी लोकांना वाटायचं भारतात आपला जन्म झाला ही किती दुर्दैवी गोष्ट आहे ! ( हे किमान दोनदा झालं आहे)

देशातले मोदीसमर्थक - होय महाराजा

आदर्णीय मोदीजी - मला वाटतं माझा जन्म non biological आहे. माझी आई फक्त निमित्त होती. मला देवानेच इथे पाठवल़य.

मोदीसमर्थक - होय महाराजा!

आदर्णीय मोदीजी - मी युक्रेन युद्ध थोडा वेळ थांबवलं.
गाझिवर रमझानमध्ये बॉंबहल्ले थांबवले.

मोदीसमर्थक - होय महाराजा

आदर्णीय मोदीजी - मी ड्रोन पाठवून प्रोजेक्ट्स वर लक्ष ठेवतो.

मोदीसमर्थक - होय महाराजा!

आदर्णीय मोदींजींनी ऑस्ट्रियाचा दौरा करण्याची वेळ नीट निवडली नाही. त्यांचे ग्रह फिरले आणि तिथे त्यांना त्या मेल्या लेहरूचं कवतिक ऐकायला लागलं.

रावल्या नाचला वरातीत,
उभा पंखावर तारा सर्वांगात,
नाचतो गातो मन हरवला,
सर्वांच्या ह्रदयात वाहतो असा नाचला.

चंद्र हांगामात आला उभा,
कळेचा तो चांदणा जगायला,
अंगणात त्याच्याच त्याच्याच नृत्यात,
दिलं तुफान जगायलं, नाचल्या नाचल्या वरातीत.

झालं तो दिवास तिथलं स्वप्न,
पंखांच्या मध्ये विहंगा स्वप्नांचे,
जागतं वावरे, संपतं पाहतं,
नाचतो जीवनाचं रंग, नाचल्या नाचल्या वरातीत.

संगीताचं माधुर्य, तारांचं तेज,
राहतं सजलं आनंदाचं नाच,
सर्वांच्या मनात आलं उचलं,
रावल्या नाचला वरातीत

पुष्पा 1 - झुकेगा नही साला

पुष्पा - आताचा
नोटीस के डर से झूकेगा भी ओर लेख बदलेगा भी
-----

काही रोजनिशी व्यावहारिक उलथापालथ किंवा चरितार्थ अवलंबून असेल असे काही नसलेला ..... इकडे फक्त एक निर्भिड मत मांडणारा लेख थोड्या वेळात बदलावा लागला तर ज्या लेखकांकडून ठराविक व्यक्तिबाबत जसे की राजकीय आर्थिक भवितव्य अवलंबून असलेल्या नेत्यांनी पक्ष बदलले राजकारण समीकरण बदलले तर का इतकी चर्चा घडवली जाते ??

नोटीस के डर से झूकेगा भी ओर लेख बदलेगा भी>> एका सह माबो करास विचित्र त्रास भोगायला लागु नये म्हणून मी अ‍ॅडवान्स कल्पना देउन ठेवली आहे. आपण एक च जीवन जगतो. परमात्मा बघत असतो सगळे.

लोकसत्तातील बातमी नुसार राहुल गांधींनी स्मृती इराणीना ट्रोल नका करू म्हणून विनंती केली आहे. अत्ता भाजपने यातून काहीतरी शिकल पाहिजे.

Rahul is an educated gentleman. Koi comparison nahi. I am buying a white t shirt to show solidarity.

रावल्या रडला मोरीत आणि मतं गेली चुलीत,
वेगळं स्वप्नांचं जगलं आज मनातलं उठलं चित।

गाभरलेल्या भावनांचं अंतरंग मळकून घेतो,
प्रेमाच्या गंधाने हळूहळू विराजेतो।

मनातलं तळमळ कसा वेडतं,
विश्वाच्या नात्याचं फड तळायलं जडतं।

स्वप्नांच्या भांडयांत मातेत क्षण,
अंतरंगातलं उधळलं सर्वं।

रावल्या रडला मोरीत आणि मतं गेली चुलीत,
पुन्हा नव्या स्वप्नांचं समुद्र उभं दिलं जित।

एक वर्षाहून अधिक मणिपूर जळत ठेवणार्‍या किंवा असले प्रश्न सोडवण्याइतका आपला वकूब नाही . तशी प्रवृत्तीही नाही, हे चांगलेच ठाऊक असल्याने तिथे ढुंकूनही न पाहणारे आदर्णीय विश्वगुरू आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कन्फ्लिक्ट्समध्ये समेट घडवून आणून शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवतील, अशी स्वप्ने पाहायला काहीच हरकत नाही.

बादलो से रडार को हराने वाले..
खुद को अवतार समजने वाले..
अपनी याददाश को फोटोजेनीक बतानेवाले..
डिजिटल कॅमेरा बनने से पहले ही उससे फोटो खिचाने वाले..
अमेरिका हो या यूरोपीय संघ, रुस हो या चायना पाकिस्तान हो या अन्य राष्ट्र.. जो सभी के लिए एक पहेली है।
अद्दभुत कार्यक्षमता, मजबूत निर्णय लेने के लिए तैयार, इरादो पर अड़िग,
इस सदी के सबसे महान व्यक्तित्व के मेरा सादर प्रणाम..

450416232_10232778167172630_6006929518216863787_n_1.jpg
या ०.००५६ इंच छातेीच्या माणसानी हिच्यावरेील अन्याय निर्लज्जपणे पाहिला.
Vinesh Phogat has won the Spain Grand Prix.
These pictures are pure gold. Both of them tell a story of her incredibly tough and gritty journey.

पंधरवड्यात काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. एक म्हणजे हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरून गेल्या वर्षी अदानी ग्रुप शेअर मार्केटमधील गैरव्यवहारांमुळे चर्चेत आला आणि त्यावर काही प्रमाणात चर्वितचर्वण झाले. गोदी मीडियाने हा विषय चर्चेत राहू नये आणि सत्ताधारी पक्षावर हे प्रकरण शेकू नये ह्याची पुरेपूर काळजी घेऊन `सर्वेसर्वा’ प्रसेंच्या प्रती आपली निर्विवाद निष्ठा नेहमीप्रमाणे सिद्ध केली. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने ह्या प्रकरणात नेमलेल्या समितीचा रिपोर्ट म्हणजे अदानीना आणि म्हणून प्रसेंना `क्लीन चिट’च असल्याचा डांगोरा पिटला होता. अर्थात सेबीचा तपास सुरू होताच. सेबीने तपास करण्याच्या नादात म्हणे हिंडेनबर्गलाच एक नोटीस पाठवली. त्याला उत्तर देताना हिंडेनबर्गने सेबीच्या तथाकथित तपासाचे वाभाडेच काढले आणि ते जाहीरही केले. त्याने व्हायची ती नाचक्की सेबीची आणि सत्ताधाऱ्यांची झालीच. अर्थात अंधभक्त ते कधीही मान्य करणार नाहीत.

नंतर आला इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या अयोध्येच्या आसपासच्या भागांतील जमिनींच्या व्यवहारांवरील एक रिपोर्ट. बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वादातील खटल्यात १९४९ मध्ये बाबरी मशिदीत राम आणि सीतेच्या मूर्त्या नेऊन ठेवणे असो किंवा ६ डिसेंबर १९९२ रोजी उन्मादी हिंदुत्ववादी जमावाने मशीद उद्ध्वस्त करणे असो ह्या दोन्ही घटना बेकायदेशीर असल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने `हिंदू’च्या पारड्यात जमिनीचे हक्क २०१९ मध्ये टाकले. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून झालेल्या जमिनीच्या व्यवहारात कोणकोण गुंतलेले आहेत आणि त्यात सत्ताधारी, प्रशासन ह्यांच्याशी संबंधितांनी संगनमताने स्थानिक जमीन मालकांना कसे लुबाडले आणि स्वतःची धन केली याचा लेखाजोखाच मांडला. अर्थात हे काही नवे नव्हे. विकास म्हणून लादले जाणारे महामार्ग असोत, बुलेट ट्रेन असो, विमानतळ, बंदरे असोत किंवा वीज निर्मिती केंद्र असो. कुठे काय योजना येणार आहे हे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी ह्यांना सर्वप्रथम कळते. मग त्या भागातील शेतकऱ्यांच्या, असल्या तर आदिवासींच्या, जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून त्या चढ्या भावाने विकून प्रचंड पैसा मिळवायचा हा भांडवली व्यवस्थेतील एक मोठा उद्योगच आहे. बाबरी-रामजन्मभूमी वादाच्या खटल्यात निकाल येण्याआधीपासूनच आरएसएस, विश्व हिंदू परिषद वगैरे `हिंदुत्ववादी’ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर सर्वांनी करायला हवा, कोणाच्याही बाजूने निकाल लागो दुसऱ्या बाजूने शांतता राखावी, हिंसक होऊ नये असे जाहीरपणे म्हणत होते. म्हणजे त्यांना `निकाल’ काय येणार ह्याची पूर्वकल्पना होती की काय असा प्रश्न त्यावेळी पडला होता.

त्या पाठोपाठ आला सिटीग्रुपचा भारतातील रोजगार उपलब्धतेवरील रिपोर्ट. त्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी ७% वाढ होऊनही बेरोजगारीचा प्रश्न सुटणे कठीण आहे. अर्थातच सरकारने हा रिपोर्टही नेहमीप्रमाणे झटकून टाकला. एवढेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टचा हवाला देत २०२४च्या एका आर्थिक वर्षातच ४.७ कोटी रोजगार निर्माण झाले असून २०१७-१८ पासून २०२१-२२ ह्या पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत ८ कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाल्याचे जाहीर करून टाकले. हे जर खरे असेल तर प्रसेंनी निवडणूक प्रचारात जनतेला `मी’ २०१४ मध्ये दिलेले दर वर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन कसे पूर्ण केले आहे हे ५६ इंची छाती ६२ इंचांपर्यंत फुगवून ठोकून सांगितले असते की नाही? पण तसे काही झालेले नाही. प्रसे फक्त `मी' आणि मंगळसूत्र, मुगल, मटन, मछली, म्हैस, मुजरा ह्यातच अडकले होते. त्यांचे सुस्थापित आणि तथाकथित सुशिक्षित अंधभक्त त्यांची वाहवा करत राहतील
.... साभार

हा धागा विनोदी आहे हे सिद्ध करण्याची इतकी अहमअहमिका का लागली आहे?

विनोदी लेखन ग्रुपमध्येच आहे की धागा?

Pages