युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४

Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24

आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा

आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा लसूण विरहित पाककृती हवेत..
रोजच्या भाज्या, मुगडाळ खिचडी, मसालेभात, सार , आमटी.. संकलन असेल तर शेअर करा ना.. Thanks in advance

केप्र चा मसाला काही एक्सपयर बिक्सपायर होत नाही.
झिपलॉक मध्ये घालून ठेवा.

त्याचा हिंगाचा वास अजिबातच जात नाही. सिम्प्लि लव्ह केप्र

आता इतक्या रेसिप्या मिळाल्यात कि उरलेला केप्र मसाला तर सम्पेलच पण नवीन सुद्धा आणावा लागेल बहुधा Happy

मला एक किस्सा पुसटसा आठवतोय. एकदा पु. ल. देशपांडे एका लग्नाला गेले होते. तिथे होता गुलाबजामचा बेत. तर झालं असं कि काहीतरी बिघडलं आणि ते गुलाबजाम तळताना कि पाकात घातल्यावर उलले. आता असे सलग नसलेले गुलाबजाम लोकांना कसे खाऊ घालणार? म्हणून दुसऱ्या गोड पदार्थाची तजवीज तर झाली... पण उरलेल्या गुलाबजाम चे काय करायचे? असा प्रश्न घेऊन वऱ्हाडी पु. लं कडे आहे. तर त्यांनी सुचवले होता गुलाब आणि व्हॅनिला इसेन्स घाला आणि त्याचे आइस्क्रीम करून दहा दहा रुपयाला विकून टाका...

झालं तो उपाय केला, सगळं आईस्क्रीम विकलं गेलं सुद्धा... पण दुसऱ्या दिवशी लोकांनी कालचे आईस्क्रीम हवे म्हणून त्या कॅटरर च्या ऑफिस बाहेर रांग लावली. Happy

सोयाबीनच्या झटापट रेसिपी मिळतील का ? प्रोटीन इंटेक वाढवायचा आहे . व्हेज मध्ये तोच ऑप्शन आहे पेशंटसाठी

तोफु आणुन पनीरचे प्रकार करतो तसे करणे.
सोया चंक्स मिळतात त्याची भाजी छान लागते.
पनीर सुद्धा ऑप्शन आहेच की व्हेज. की व्हेगन हवे/लॅक्टोज इंटॉलरन्स आहे?

प्रोटीन शेक्स चालणार नाहीत का? भारतात असाल तर एक कोलोस्ट्रम (चीक) पावडर मिळते त्याबद्दल डॉ.ना विचारा. बरेच शाकाहारी लोक अंडी खातात. औषध या दृष्टीने त्याचाही विचार करा.

डॉ ना विचारून आयसोलेट व्हे प्रोटीन पावडर चालू करा.(व्हेगन हवे असेल तर प्लांट प्रोटीन पण मिळतात).
सर्वात सोपा सोर्स सोफिट नो ऍडेड शुगर सोया मिल्क चा 250 मिलिलिटर फ्रुटी पॅक च्या साईझचा टेट्रा पॅक. पण नो ऍडेड शुगर सोया मिल्क प्यायला खूप जणांना आवडत नाही.

मानवदादा , पनीर खाऊन कंटाळली आहे आत्या . आधी तेच देत होतो .

माझे मन , ती कट्टर शाकाहारि आहे , प्रोटीन शेक्स चे सुचले नाही . डॉक्टरना विचारून बघते .

मी अनू, दूध देतो आहेच . सोया मिल्क पण ट्राय करुन बघते

जाई, मला कोविडनंतर डॉक्टरांनी Oziva plant protein (without sugar) घ्यायला लावले होते. मी पण कट्टर शाकाहारी आहे. डॉक्टरना विचारून पाहा. साधारण १ scoop सकाळी घ्यायची ती पावडर.

कुठलीही प्रोटीन पावडर डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणाबाहेर घ्यायची नाही.

जाई: एक कॉस्मिक्स कंपनी आहे. लिन्क खालील प्रमाणे
https://cosmix.in/

मला पण प्रोटीन वाढवायचे अस ते त्यामुळे इथून नो नॉन्सेन्स प्रोटीन पाव डर चे टेस्टर पॅक मागवले होते. पाच सात आले. ते खालील प्रमाणे

एक मँगो फ्लेवर
रीअल केरला व्हॅनिला बीन
चिक्मगलुर मो का, कोका बीट( बी ई ई ट ) पिना कोलाडा, व्हॅनिला लाते ह्याचे पॅक आले आम्ही सुरुवातीला मँगो फ्लेवर नुसताच पाण्यात घालुन प्यायला ( अश्व त्थाम्याचे दूध!!) बरी चव आहे व अर्ध्या ग्लासात पोटातील भुकेचे फीलिन्ग गेले. पण पोट जड झाले नाही. अर्थात ह्या पावडरी कश्यात तरी मिसळून घ्यायच्या आहेत. दूध, गार कॉफी , व्हेज स्मूदी, बनाना मँगो मिल्क शेक वगैरे, किंवा सोया मिल्क मधून पण
देता येतील. ह्या मध्ये साखर, स्टिव्हीआ गम्स एंज्झाइम्स कसलेही फ्लेवर नाही आहेत. एका बारक्या पाकिटात २४ ग्राम प्रोटीन आहे.
४.५ ग्राम बी सी ए ए आहे.

ह्या व्यतिरिक्त थ्रेप्टैन ची बिस्कि टे मिळ तात ती घेता येतील. छो टी दहा रु च्या नाण्या एवढी असतात बसल्या बसल्या एखादे खायचे. चॉकोलेट फ्लेवर पण आहे. सर्व डॉ. ला विचारूनच घ्या.

दूध व्हेज नाही. अ‍ॅनिमल ओरिजिनचेच आहे.

डाळी खातात का त्या? अर्धी वाटी शिजवलेली डाळ जमली तर खायची.

कॉस्मिक्स च्या उत्पादनांच्या किंमती भारी आहेत.
माय हॅपी गट वापरून बघावेसे वाटते आहे. मानव, तुम्हीही पहा.

मी प्रोटिनेक्स पावडर मागवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०० मिलि दुधात ३ टेस्पू घालून प्यायची आहे. माझ्या बाबांना ( डाय बेटिक्स साठी) अस लेली प्रोटीन पावडर दुधातून दिवसातून दोनदा देत असे. ते त्यांच्या सहा मील्स पैकी एकेक मील असे. मला जोड म्हणून घ्यायचे आहे , म्हणून मी गार दुधात अर्धा टेबलस्पूनच घालून घेतो. गार दुधात नीट मिक्स होत नाही. गरम दुधात मिक्स करून किंवा ब्लेंडरमध्ये फिरवून पाहायला हवे.

वाटीभर बदाम भिजवून खायचे. सोबतीला मूठभर भर काजू, पिस्ता, बेदाणे.
एका बोल मध्ये वाटीभर दही - दोन टे स्पून चिया सिड्स (हे याने फुगून येते म्हणुन वर जागा असावी बोल मध्ये फुगायला), मुठ भर काळे मनुके छान कालवून सहा तास भिजत ठेवत ठेवायचे. मग हवे असल्यास त्यात थोडे फळांचे काप घालून खायचे.
मोड आणून उसळी, यात मूग मिक्स ठेवायचे जसे मटकी - मूग, गॅसेस त्रास कमी होतो.
मुगाचा हलवा/ शिरा बदाम काप, काजू घालून.
मिश्र डाळींचे डोसे

डॉक ने सांगितली असेल तरच ensure d किंवा अजून कुठले प्रोटीन पावडर सांगितले तेवढे दिवस आणि सांगितले त्याच प्रमाणात.

इतर प्रोटीन पावडरचा त्रास होऊ शकतो पेशंटला, अपचन, कॉन्स्टिपेशन, किडनी वर ताण तेव्हा डॉकला विचारूनच घ्या.

पनीर खायला मन धजावत नाही कारण बहुतेक सर्वत्र मिळणारे पनीर कृत्रिमरित्या बनवलेले आहे.

बाजारात मिळणारी बटन मश्रुम हाही एक चांगला प्रोटिन सोर्स आहे. जाई, मालवणी पद्धतीनेही वाटण वगैरे लाऊन भाजी करता येते व चांगली लागते.

कडधान्ये जसे काबुली व साधे चणे, चवळी, मुग, मटकी इत्यादी भिजवुन, ज्यांना मोड काढणे शक्य आहे त्यांबा मोड काढुन मग वाफवुन त्यात टोमटो, काकडी, गाजर, कोथिंबिर इ इ घालुन सलाद बनवता येईल. मुग मटकीची स्प्राऊट भेळ करता येईल.
प्रोटिन व्यवस्थित शिजवुनच खावे, पचायला मदत होते.

बहुतेक सर्वत्र मिळणारे पनीर कृत्रिमरित्या बनवलेले आहे.
<<
जगातील कोणती म्हैस डायरेक्ट नैसर्गिक पनीर "देते"?

***
The amount of protein (2.62 g per 100 g) in raw mushrooms is higher than the average amount found in raw vegetables (1.87 g per 100 g).
<<
इतर भाज्यांपेक्षा जास्त प्रोटीन आहे, डाळी इतकं तर अजिबात नाही.

क सर्वत्र मिळणारे पनीर कृत्रिमरित्या बनवलेले आहे.
<<
जगातील कोणती म्हैस डायरेक्ट नैसर्गिक >>>>

म्हैस जे दुध देते त्यापासुन पनीर बनवले जाते. पण बाजारात रसायने व युरीया वापरुन पनीर बनवतात व चांगल्या हॉटेलातही हे पनीर पाठवले जाते हे वाचल्यापासुन मी घरीच पनीर बनवते. मी गावी राहात असल्यामुळे दुध खात्रीचे आहे. मुंबईत तेही कृत्रीमरित्या बनवतात हे वाचलेय. असो. आपली तब्येत आपल्या हातात. हॉटेलातले खाणे कमी केलेय, जेव्हा खावे लागते तेव्हा पनीर खायचे, ते आता बंद केले.

सोया चंक भिजवून शिजवून त्यातल्या त्यात घरगुती अगदी कमी तेल ग्रेव्हीत भाजी हा चांगला पर्याय आहे.किंवा आवडत असल्यास सोया चंक भिजवूनअगदी कमी तेलात चाट मसाला तिखट मीठ घालून परतून क्रिस्प.
सोया चे चणे पण मिळतात.पण त्यात कोणताही फ्लेवर घ्यायाची सक्ती नाही पाहिजे, प्लेन सॉल्ट वाले.अन्यथा पेरीपेरी वगैरे फ्लेवर मध्ये प्रचंड सॉल्ट जाते पोटात.बिन सॉल्ट वाले सोया चणे मिळाल्यास जास्त उत्तम.

भरत My happy gut मध्ये ज्येष्ठमध आणि जीरा पावडर आहे आणि त्यांनी कसा फायदा होतो ते दिले आहे.
मी दुधातून ज्येष्ठमध पावडर घेतले आहे, त्यांनी म्हटले तसा म्युकस तयार होण्यास, ऍसिडटी कमी होण्यास फायदा झाला. आणि जेवल्यावर ताकात जीरा पावडर घेतो, त्याने ब्लोटिंग बर्पिंग कमी होते. पण हे सर्व प्रॉब्लेम मॉडरेट लेव्हल असे पर्यंत चांगला फरक जाणवतो. बाकी फरमेन्टेड पपई, पेरू याबद्दल काही माहीत नाही. तिथे जे हे घटक सांगितले आहेत त्यावरून वापरून पहायला हकरत नाही असे वाटते. ६० ग्रॅम ला ७८०₹ किंमत जास्त आहे. मी एक डबा वापरून पहायची माझी पण इच्छा होतेय.
(ज्येष्ठमध नियमित घेण्यास हार्ट पेशंट आणि बीपी पेशंटने जपून वापरावे असे आधी वाचले आहे.)

धन्यवाद सगळ्यांना . चांगले पर्याय मिळालेत .
बदाम भिजवून देत आहे . डाळी आणि कडधान्यचे टाईम टेबल बनवून चालू करू सगळे . डाळ घट्ट शिजवून खायला आवडते तिला . सोया चंक पण ट्राय करते आता .

शुगर नाही आहे तिला फक्त बिपी हाय होतो अधून मधून .

मी दुधातून ज्येष्ठमध पावडर घेतले आहे, त्यांनी म्हटले तसा म्युकस तयार होण्यास, ऍसिडटी कमी होण्यास....... ॲसिडिटी कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दूध बंद करायला सांगितले होते.2-३ महिने दूध बंद केले.वाटीभर दही चालू होते.असिदिटी कमी झाली.पण केस फार गळले,तेव्हा परत दूध चालू केले.परत acidity चालू झालीय.परत दूध बंद केलेय.

मजेची गोष्ट म्हणजे आमच्या ताईची ॲसिडिटी पण दूध बंद केल्यावर कमी झाली.
आता पाण्यातून प्रोटिनेक्स पावडर घ्यायला पाहिजे.

ज्येष्ठमध पावडरीचा अजून एक चांगला उपयोग मला pigmentation साठी होतोय. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन चालू होतेच.पण 5-६ दिवसात ज्ये.पावडर आणि दही यांचा अर्धा एक तास लेप लावून डाग फिकट झाले आहेत.

मानव, ज्येष्ठमधाने भरपूर स्टिरॉइड्स वाढत असतात.

बीपी अन अरीदमिया देखील सैद इफेक्ट मध्ये आहेत.

ज्येष्ठमधाने भरपूर स्टिरॉइड्स वाढत असतात.>> हो. बरोबर खूप स्ट्रोंग हर्ब आहे.

कॉस्मिक्स चे प्रोटीन पाव्डर लेकीने काळजीने ऑर्डर केले म्हणून ठेवुन घेतले आहे. पण मला तीच काळजी वाट ते. नेट वर द लिव्हर डॉक म्हणून आहे ते कोणतेही आउर्वेदिक औ षध पाव्डर सप्लिमेंट्स घेणार्‍या लोकांच्या इमर्जन्सी केसेस सांगत राहतात अगदी लिव्ह ५२ पण डेंजरसच आहे लिव्हर साठी. मी अजुन एक पाव्डर घेतलेली नाही त्या म्यांगो फ्लेवर शिवाय. भीतीच वाटते.

अमा तुम्ही तर अधिकच काळजी घ्या असे काही घेण्या बाबतीत. प्रोटीन पावडरी व्यतिरिक्त कितीतरी ऑप्शन्स आहेत खाण्यातून पुरेसे प्रोटिन्स मिळवायला.
अशक्तपणा मुळे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा थ्रेप्टीन/इतर सप्लिमेंट्स ही वेगळी गोष्ट.

ज्या काही पावडरी आहेत, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. हे आयुर्वेदिक व ऍलोपेथिक दोघांनाही लागू होते.

बरोबर. धन्यवाद मानव आणि माझे मन. मी पदार्थांची एक्स्पायरी समजून च खाते. उगीच काही ही संपवत नाही. आणि स्वतः बनवलेले ताजेच पदार्थ खाते. प्रिस्किर पशन प्रमाणेच गोळ्या. आता ह्या पावड री किचन मध्ये ठेवुन दिल्या आहेत. लेकीचे मन मोडवत नाही हळू हळू विस्म्रुतीत गेले की झिंदाबाद. मुलां चा मीटर जरा वरनंच सुरू होतो.

परत दूध चालू केले.परत acidity चालू झालीय.परत दूध बंद केलेय>>>>

देवकी, तुम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स असण्याची शक्यता आहे. काही सिरियस नाही, दुधाची अ‍ॅलर्जी असे म्हणु शकतो. दुध व दुग्धजन्य पदार्थ टाळावे लागतील. आपल्याकडे बाळपणापासुन दुध पाजले जाते, त्यापासुन काही त्रास होऊ शकतो ही शक्यताही कोणी विचारात घेत नाही.

अश्विनीमामी, तुमचे इथले आणि इतरत्रचे प्रतिसाद वाचलेत, तुमच्या खाण्यात बाहेरचे रेडिमेड पदार्थ खुप दिसतात. तुमची लाईफस्टाईल तशी असल्यामुळे कदाचित रोजचे घरचे जेवण करणे शक्य होत नसेल.. पण बाहेरच्या खाण्यात पाकिटावर लिहिलेले आणि प्रत्यक्षात आत असलेले यात खुप अंतर असते. बनवणार्‍या कंपनीला कोणाच्याची आरोग्याची काळजी करायची गरज नाही, हे मोठ्या नेसले व ब्रिटानियासारख्या ब्रॅड्सनी देखिल दाखवुन दिलेले आहे. तुमच्या तब्येतीला अनुसरुन खा, बाहेरचे व प्रोसेस्ड फुड शक्यतो टाळा. खरेतर सगळ्यांनीच टाळायला हवे.

अरे एक युक्ती शेअर करायची होती.

परवा साडेसात सकाळी दार उघडले तर एकदम मस्त सांबाराचा वास येत होता. मावशी शेजारुन बाहेर आल्या त्यांना रेसीपी विचारली. शेजारी तमीळ आहेत व त्याती ल नवरा उगीचच माझ्यावर खार खाउन आहे. यप्पड मास्कुलानिटी.

तर एक दोन दिवसांनी बेल वाजली व मावशी आल्या मला सांबाराची रेस्पी दिली. त्यात एक युक्ती सांगितली. एका भांडयात भाज्यांच्या प्रमाणात
पाणी उकळ त ठेवायचे. त्यात आमसूले व कोथिंबीर घालुन उकळायचे. उकळले की आमसुले व कोथमीर काढायचे व त्यात आपण सांबरात घालणार त्या भाज्या घालुन शिजवुन घ्यायचे जसे की भेंडी, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, गुडमकाइलू. तोंडली .

कुकर मध्ये डाळ शिजवून घ्यायची व त्यात वरील भाज्या घालुन एक टोमाटो घालुन रीतसर सांबार करायचे. तो मसाला ही घरी केला तर बरे कारण एवरेस्ट हे ते मध्ये इशू आहेत. एकदा हे करुन बघीन. ह्या वीकांता ला जपानी स्वयंपाक केलेला. त्यामुळे इडली सांबार राहिले. भाज्या मागवल्या आहेत.

अश्विनीमामी, तुमचे इथले आणि इतरत्रचे प्रतिसाद वाचलेत, तुमच्या खाण्यात बाहेरचे रेडिमेड पदार्थ खुप दिसतात.>> नोकरी होती तेव्हा तसे होत होते. आता घरीच असल्याने स्वहस्ते. जाने वारी फेब मध्ये तब्येत व एनर्जी लेव्हल फार फार डाउन होती तेव्हा काहीतरी पोटात जायला पाहिजे म्हणून रेडिमेड पदार्थ ठेवले होते हाताशी. किनले व अक्वाफिना पण पाणी ठेवले होते कारण उठून बाटल्या भरणे होत नव्हते अशक्त पणाने.

आता पैशे वाचवायला स्विगी पण करत नाही. प्लान करुन घरीच स्वहस्ते. भेळ खायला या.

मी गावी राहते हो , कशी येणार Happy Happy मीही किलोभर कुरमुरे आणुन ठेवलेत. भुक लागली की चटकन भेळ करुन खाता येते. इथे स्विगी झोमॅटो नाहीत ही अतीउत्तम गोष्ट आहे. खाली सावंतवाडीत गेले की झोमॅटो भुरकन इकडुन तिकडे जाताना दिसतात Happy

दूध थोडेसेच घेतले (पाव कप, टोन्ड) तर ऍसिडिटी होणार नाही. उलट अन्ननलिकेतली जळजळ कमी होते.
जास्त घेतले तर त्यात जास्त फॅट आणि प्रोटीन आले, ते पचवायला पोटात जास्त ऍसिड सिक्रिट होणार.

लॅक्टोज इनटॉलरन्स असल्यास दुधाऐवजी दही / ताक चालते का बघा. बर्‍याच जणांना दुधाचा त्रास होतो पण हिंग लावलेले ताक चालते.

कालच प्रतिसाद लिहिला होता.सेव्ह करायच्या आधी बॅक बटण वर हात पडला.

तुम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स असण्याची शक्यता आहे.>>>> असेलही.2004-५ मध्ये काही कारणांमुळे दूध घेणे बंद केले होते. डॉक्टरांनी त्या ऐवजी दही ताक पनीर खायला सांगितलं होतं. पण ग्लासभर दुधाच्या मात्रेत पनीर किंवा ताक,दही खाल्लं जात नव्हतं. मानसिक असेल किंवा इतर काही असेल पण मला अशक्तपणा लवकर येतो दूध घेतलं नाही तर. म्हणून काही वर्षाने थोड्या प्रमाणात परत दूध चालू केलं होते.

मानव,थोड्या प्रमाणात दूध चालू करून बघेन.धन्यवाद!

मेलास्मा (pigmentation) + हायपो काहीतरी dermatologist ने सांगितले होते.उन्हातून आल्यावर चेहरा ओरबाडून काढावा इतकी खाज यायची. गाल सुजले होते.काही दिवस बर्फाचा शेक घेतल्यावर थोडे बरे वाटले.क्रिमपेक्षाही ज्येष्ठमध पावडर + दही यांनी डाग फिकट झाले.2500 च्या डॉकटर+ क्रीमपेक्षा 40 रुपयाची ज्ये.पावडर
चांगले काम करतेय.

कांदा लसूण न घालता वेज कुर्मा करायचा आहे (पुरीबरोबरखाण्यासाठी ). त्यात वाटणात ओल्या नारळा ऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरता येइल का.

>>ओल्या नारळा ऐवजी डेसिकेटेड कोकोनट > थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून मग चटणी करायच्या भांड्यातून वाटून घ्या.

डेसिकेटेड खोब्र्याचा १ विशिष्ठ वास येतो. त्यापेक्षा भिजवलेले काजू/मेलन सीड्स वापरून घट्टपणा आणता येईल.

माझा सध्याचा पेट पीव्ह चवळी आहे(यावर मी राजमाइतकेच दुःखी प्रतिसाद लिहू शकते.)
एकतर चवळी आम्ही जास्त बनवत नाही.मूग, मटकी,अख्खा मसूर आणि छोले राजमा ही पंजाबी मंडळी बनतात.चवळी जेव्हा भिजवून निथळून मोड आणायला ठेवावी तेव्हा काही तासाने चिकट बुळबुळीत होते, मग परत घासून धुवून निथळते.मोड येईपर्यंत हे 2 वेळा.
माझं भिजवण्यात चुकतंय काहीतरी. चवळी इतर धान्यांपेक्षा अगदी कमी वेळ भिजवायची असते का?

मी चवळी मोड न आणता वापरते. चांगली भिजून मोठी झाली की पाणी काढून टाकते. रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी शिजवता येते. चांगली शिजते कुकर मध्ये.

मोड हवेच असतील तर अमेझॉन फ्रेशवर मोठ्ठाले मोड आलेली चवळी मिळते. ते मोड बघून भीती वाटते. म्हणून कधी घेतले नाहीत Wink

घाई असेल तर चवळी आणि मसूर न भिजवता डायरेक्ट कुकर मध्ये ही मस्त शिजते. करायचया आधी थोडे भाजून घेतले तर चांगलच पण नाही भाजले तरी शिजते.
पावसाळ्यात भाजी नसते कधी फ्रीजमध्ये, आणि ऑफिस मधून आल्यावर भिजत घालायला पण विसरायला होतं, कंटाळा येतो, बघू उद्याच उद्या अस वाटत.
चवळी आणि मसूर कायम ठेवा स्टॉक मध्ये पावसाळ्यात. मुंबई च्या मुलींनी फ्रिज मध्ये ठेवा मात्र नाहीतर तो वेगळाच व्याप व्हायचा. एक छोटी चवळी मिळते ती चवीला जास्त बरी असते मोठ्या चवळी पेक्षा, ट्राय करून बघा.

एक छोटी चवळी मिळते ती चवीला जास्त बरी असते मोठ्या चवळी पेक्षा, ट्राय करून बघा. >>>
मलाही छोटी चवळी(लाल आणि पांढरी दोन्ही) जास्त आवडते मोठ्या चवळीपेक्षा.

Pages